आज कुणीतरी येणार येणार ग......

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in काथ्याकूट
28 Sep 2011 - 3:56 pm
गाभा: 

समस्त मिपाकर हो ... कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि काही दिवसा पूर्वी माझ्या गाडी कोणती घ्यावी या धाग्यातील प्रतिक्रियांवर विचार करून मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे.
आज संध्याकाळी तिला घरी आणावयाचा मानस आहे...
तरी आपल्या सर्वांच्या खास करून स्पा , शाहीर , ५० फक्त यांचा जास्त आभारी आहे (ज्यांनी अवेंजर बद्दल जास्त चांगले मत व्यक्त केले) .

आपला चिपळूणकर

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

28 Sep 2011 - 4:12 pm | स्वैर परी

एकदम पर्फेक्ट चॉईस आहे! मागच्या आठवड्यात गोव्याला हिच घेतली होती आम्ही सगळ्यानी... रेन्ट वर... कसली भारी चालते.

मृत्युन्जय's picture

28 Sep 2011 - 4:12 pm | मृत्युन्जय

अभिनंदन. आता गाडी पहिल्यांदा चालवौन झाली की अजुन एक धागा ह्होउन जौद्यात,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Sep 2011 - 4:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आणि मग १०० km रनींग झाल्यावर एक, १००० km, १०००० km, झाल्यावर एकेक असे धागे जरूर काढावेत अशी आमची सूचना आहे. च्यायला आपण दुचाकी घेतली हि केवढी आनंदाची गोष्ट, मग ती मिपावर नाही व्यक्त करायची तर कुठे?

अवांतरः धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे. म्हणजे आपली क्रियेटीव्हीटी तुफानचं आहे. :D

सूड's picture

28 Sep 2011 - 5:29 pm | सूड

>>धाग्याचे शिर्षक तर भन्नाटच आहे.
अगदी अगदी !!

अविनाशकुलकर्णी's picture

28 Sep 2011 - 4:19 pm | अविनाशकुलकर्णी

चिप्लुन्कर ..जरा दारुकाम व गणपान केले तसल काहि तरी होवुन जावु द्या..
परा व चिंतामणीला आणायची जबाब्दारी आमची....

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार

आधीच गाड्यांच्या प्रचंड संख्येने वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना, अजुन एका गाडीची रस्त्यावर भर घालून जनतेच्या हाल अपेष्टात वाढ केली आहेत आणि वर हा असला आनंद साजरा करत आहात ?

स्वतःच्या सुखासाठी, मौजमजेसाठी घेतली ना गाडी ? मग एखाद्या आश्रमाला गाडी दान केल्यासारखे धागा काढून सांगण्यासारखे काय आहे ?

उद्या लोक गंजीफ्रॉक घेतल्याचे धागे काढायला लागले नाही म्हणजे नशिब.

असो...

हे भारतीय लोक कधी सुधारायचे काय माहिती.

विनायक प्रभू's picture

28 Sep 2011 - 5:05 pm | विनायक प्रभू

पराशी सहमत.
अवेंजर बद्दल अभिनंदन.
ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 5:19 pm | श्रावण मोडक

ह्या गाडीवर प्रवास करुन क्रियेटीवीटीला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

च्यायला, कोलमडून पडलो मी... ;) मास्तर, दंडवत!!!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

दंडवतच घालायला आला होतो.

प्रभुदेवा... कहर कहर !!!

चित्र आंतरजालावरुन घेण्यात आल्या गेले आहे.

विनायक प्रभू's picture

28 Sep 2011 - 5:26 pm | विनायक प्रभू

नव्याच्या नवलाईत काही महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित होतात हो श्रामो.
म्हणुन आपला सल्ला दिला. बाकी कै नै.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 6:02 pm | श्रावण मोडक

खरंय. :)

संपत's picture

28 Sep 2011 - 10:20 pm | संपत

अवेंजरमुळे क्रियेटीवीटीला त्रास होतो? सायकलमुळे होतो हे ठाउक होते पण मोटार सायकलमुळे होतो? प्रश्न गम्भिर आहे, उगाच खिल्ल्ली उडवु नये. :)

चेतन सुभाष गुगळे's picture

28 Sep 2011 - 10:38 pm | चेतन सुभाष गुगळे

माझ्या पाहण्यातील एक घटना:-

एक जण अशाच एका जड मोटरसायकलवर बसून दोन्हीकडे दोन पाय टेकवून रस्त्यावर उभा होता. त्याच्या मागच्या आसनावर साडी परिधान केलेली एक महिला(दोन्ही पाय एकाच बाजुला टाकून) बसण्याचा प्रयत्न करीत होती. त्या महिलेची उंची कमी असल्याने तिला ते काहीसे अवघड होत होते. शेवटी ती एकदाची बॅक जंप मारून आसनावर बसली पण या उडीच्या झटक्याने मोटरसायकल एका बाजुला कलंडू लागली. अर्थात मोटरसायकलस्वाराने ती पडू दिली नाही परंतू त्यामुळे मोटरसायकलस्वाराला अवघड जागी इंधन टाकीचा जोराचा प्रहार बसला व तो असह्य वेदनेनी कळवळू लागला. शेवटी त्याला आजुबाजुच्या लोकांनी रिक्षात बसवून इस्पितळात नेले. पुढे काय झाले ते ठाऊक नाही, परंतू या घटनेवरून योग्य तो बोध घेऊन आधीच काळजी घेतलेली बरी.

शैलेन्द्र's picture

1 Oct 2011 - 3:26 pm | शैलेन्द्र

अग्गदी बरोबर..

छान निरीक्षन आहे तुमचे..

खरंतर पुर्वी बुलेट व तत्सम गाड्यांबरोबर, एक स्टुल, किंवा जीन्स घालणारी बायको(वा गफ्रें) फ्री द्यावी असा प्रस्ताव आम्ही दीला होता.. पण कंपणीने साडीगार्डवर बोळवण केली.

बाकी इंधन टाकीचा प्रहार बसु नये म्हणुन वेगळा गार्ड कंपणीकडे मागावा का? तुम्ही म्हणत असलेली काळाजी बहुदा हीच असावी. चिप्लुन्कर घेतीलच ती काळजी..

शैलेन्द्र's picture

1 Oct 2011 - 3:31 pm | शैलेन्द्र

"क्रियेटीवीटीला काही त्रास" होवु नये म्हणुन योग्य ठीकाणी योग्य मुडप दुडप व खाचा असलेले सीट मिळते.. त्याचा वापर श्री चिप्ळुन्कर यांनी करावा.

तुम्हाला दुसर्‍याचं बरं बघवतच नै!!!
गाडी कोणती घेउ असं त्यांनी इथंच धागा काढुन विचारलं होतं. आता त्यांनी कोणती गाडी घेतली हे नसतं सांगितलं तर तुम्हीच परत " इतकं धागा काढुन काय घेउ हे विचारलं आणि कोणता खटारा घेतला हे सांगायला बँडविड्थ कमी पडली का?" म्हणुन निषेध कराल. माणसानं वागावं तरी कसं!!

मृत्युन्जय's picture

29 Sep 2011 - 12:17 am | मृत्युन्जय

हो ना. आता गाडी अ‍ॅव्हरेज काय देते हे सांगितले नाही तरी हा परा शिव्या घालेल बिचार्‍यांना. तुम्ही त्याचाही एक धागा काढाच हो.

तिमा's picture

29 Sep 2011 - 7:26 pm | तिमा

अहो, लोकसंख्या वाढली म्हणून कोणी लग्न करायचं बंद करतं का ?

५० फक्त's picture

28 Sep 2011 - 4:58 pm | ५० फक्त

धन्यवादासाठी धन्यवाद, आणि धाग्याचं शिर्षक ' आज काही तरी आणणार आणणार गं' असं हवं होतं'

असो, मी तर चेपुला असाच टाकलं होतं ' न्यु मेंबर कमिंग टु होम वेट @ १५० केजि'

रंग कोणता ते सांगा, चेपुला एक ग्रुप आहे तो जॉईन करा तिथं मोलाची माहिती मिळते अजुन एक्सबिचपी पण आहे, ब्रेकं जपुन वापरा महत्वाचे बॅटरीवर मार्करने खुण करुन ठेवा, सर्विसिंगला दिल्यावर बॅट-या बदलणे हा मेकॅनिक लोकांचा आवडता छंद आहे जो आपल्या जीवाला पिसे लावतो, गाडीला किक नाही हे लक्षात ठेवणे. बॅटरी सगळ्यात महत्वाची.

फोटो टाका इथं, माझ्या गाडीचे फोटो चेपुला आहेत. चला कोणीतरी समसुखी / दुखी मिळाला.

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 5:03 pm | सुहास झेले

धाग्याचे शीर्षक वाचून पार गोंधळलो.... असो बाईकसाठी पेढे-बर्फी वाटल्यास हरकत नाही.... ;-)

निवेदिता-ताई's picture

28 Sep 2011 - 5:12 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते.....

शाहिर's picture

28 Sep 2011 - 5:17 pm | शाहिर

फोटु टाका !

आत्मशून्य's picture

28 Sep 2011 - 5:22 pm | आत्मशून्य

.

अ‍ॅव्हेंजरबद्दल ज्यांचे मत चांगले त्यांचेच खास आभार का बुवा?
शिर्षक पाहून वेगळे अभिनंदन करायला आले होते.
बाकी विप्रंबद्दल काही बोलायलाच नको.
फिस्स््कन हसू आले.
गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन!

विनायक प्रभू's picture

28 Sep 2011 - 6:29 pm | विनायक प्रभू

आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे.
रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले.
असो. चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 6:35 pm | श्रावण मोडक

आरे कुणितरी अवेंजर वरुन साखर वाटा रे.
रेवती तै ना प्रतिसाद कळ्ला आणि वर हसु पण आले.

मास्तर, किती ते... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2011 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

चिप्लुन्कर तुमचे प्रविणभप्कर कुणी नातेवाईक आहेत का?

चिप्लुन्करांचा पण 'मारुती कांबळे' होणार असे गुर्जींना म्हणायचे आहे काय ?

नाहीतरी तुम्हाला माझी चेष्टा करायला कारणच हवं असतं.
बाकीचेही विनोद किंवा असली बोलणी कळत नाहीत असे नाही.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 9:16 pm | श्रावण मोडक

चेष्टा नाही. उगाच चिडवाचिडवी. पण आता काही दिवस बंद. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2011 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मी बजाज अवेंजर हि गाडी घेतली आहे.

अभिनंदन.....!

च्यायला, हल्ली माझे अशा धांग्यांकडे दुर्लक्षच होत आहे.

-डिलीट बिरुटे

डॉ. सा.
तुमचे दुर्लक्ष म्हणजे पामरांकडून काही प्रमाद कि आगळीक घडली काय ?
क्षमा क्षमा भन्ते.

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2011 - 8:36 pm | टवाळ कार्टा

हेच म्हणतो
चायला फुकट २ २ ओळी खरडल्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2011 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>तुमचे दुर्लक्ष म्हणजे पामरांकडून काही प्रमाद कि आगळीक घडली काय ?

अहो, आता याच्यात तुमच्या काय प्रमादाची गोष्ट आली ? च्यायला, हल्ली माझे साधे बोलणेही मला बंद करावे लागेल असे दिसते.

कालच माझ्या एका मित्राने माझ्या साध्या बोलण्याचे मनावर घेऊन आपली खरडवहीची सुविधा बंद केली. :(

बाईक कोणती घेऊ म्हणू चिप्लूणकरांनी धागा काढला होता. आता बाईक घेतल्यावर त्याच धाग्यावर बाईक घेतल्यामुळे पेडे वाटायला पाहिजे होते असे मला वाट्ले. आता कोणी आपल्या लेकराने शाळेत डबा खावा म्हणून कोणत्या प्रकाराचा डबा घेतला पाहिजे असा धागा काढला आणि पुन्हा डबा घेतला म्हणून सांगण्यासाठी दुसरा दोन ओळीचा धागा काढला तर ते बरे दिसणार नाही असे मला वाटले.

-दिलीप बिरुटे

अगदी अगदी.
तुमच्याशी आम्ही वर्ल्ड कप पासूनच सहमत आहोत.
सध्या आमच्या कडेही हेच चाललेय. पोरीला शाळेत मिड-डे मिल मिळते पण ती खात नाही म्हणून घरून पण डबा द्यावा लागतो. दुहेरी खर्च. काढू काय धागा ?

सर्वसाक्षी's picture

28 Sep 2011 - 11:24 pm | सर्वसाक्षी

नव्या गाडीबद्दल हार्दिक अभिनंदन.

हनिमून वगैरे बद्दलपण लिहा राव! ;-)

विनायक प्रभू's picture

1 Oct 2011 - 6:05 pm | विनायक प्रभू

हा इयत्ता ३ री त नको ती पुस्तके वाचल्याचा परिणाम किंवा प्रगल्भ मास्तर न मिळाल्याचा परिणाम.
इथे हनीमुन ची वर्णने?
काय झाले आहे काय तुला निळ्या?
तुला हवी ती माहीती गुगळल्याने मिळलेच की.