कविता पुर्ण करुन हवी आहे...

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
28 Sep 2011 - 11:11 am
गाभा: 

राम राम मंडळी. कसं काय बरं हाय ना? काही नाही हो, जरा एक कविता लिहित होतो. छ्या. तुमचं आपलं काहीतरीच. फक्त दहा वीस टक्के कवींनाच कविता स्फुरते. बाकीचे कविता पाडतात. आम्हीही या रटरट कवींपैकीच. म्हणजे र ला र आणि ट ला ट जुळवून कविता पाडणारे. कुणा थोरामोठयाने आमच्यासारख्या कवींना यमक्या कवी म्हणून उचित सन्मान केला आहे. काय म्हणता, रामदास की मोरोपंत यापैकी कुणीतरी ते म्हटलंय? जाउ द्या हो. इथे चावडीवर एकापेक्षा एक अभ्यासू लोकं आहेत. संदर्भ चुकला तर उगाच आपली पुजा बांधून आनंद शिंदेची रेकॉर्ड वाजवायचे. तुम्हाला चालेल का अशी द्विअर्थी गाणी वाजवून चावडीची प्रतिमा खालावलेली? अच्छा ते होय? ओळखतो मी त्यांना. सातपूर यमायडीशीत असतात कामाला. मागे सातपूर यमायडीशीसह नाशिक पुणे मुंबई सुवर्ण चतुष्कोण आंदोलनात आम्ही दोघांनी लोकांना पेटवणारी गाणी म्हटली होती. अहो नाही हो. लोक उगाच पराचा कावळा करतात. काही चेतवणारी वगैरे नाही. तुम्हाला सांगतो, कवी ही जमात बदनाम केलीये या संस्कृतीगान वाल्यांनी. जरा कुठे काही सामान शब्द आला की ह्यांना भलतंच सामान दिसायला लागतं. सगळेच काही आमच्या गुर्जींसारखे किंवा नगरात निरंजन ओवाळणार्‍या आमच्या शैलेंद्रसारखे नसतात.

असो. तर मी काय म्हणत होतो. एक कविता लिहायला घेतलं दोन दिवसांपूर्वी. पण सगळं घास कडव्यांसारखं चालू आहे. गाय जशी रवंथ करत एकेक घास पचवते ना तसं आमच्या कवितेच्या कडव्यांचं झालंय. सोमवारी एक कडवं, मंगळवारी एक कडवं आणि आज बुधवारी एक कडवं अशी तीन कडवी लिहून झाली आहेत. म्हटलं अशी रोज एकेक कडवी लिहिण्यापेक्षा चावडीवर जाऊन हसत खेळत कविता पुर्ण करुन घेऊ या.

ही घ्या ती कविता. आणि होऊन जाउ द्या पुढची कडवी.

आतूरतेने कुणाची वाट पाहतो आहेस रे
आकाशीच्या चंद्राने एकदा विचारलं मला
म्हटलं येणार आहे रे कुणी तुझ्यासारखंच
शुभ्र चांदण्यांच्या गाडीतून मला भेटायला

एक छान हळूवार मंद वार्‍याची झुळूक येईल
झाडे पाने फुले तिच्या स्वागताला सजतील
अगदी अलगद उतरेल ती खाली, पण तरीही
ती खाली उतरताना पैंजण थोडेसे वाजतील

फुललेल्या मोगर्‍याचा गंध पसरेल वार्‍यावर
मेंदी भरलेल्या पावलांनी ती हळूवार चालेल
अन फुलण्याचा ऋतू नसतानाही गुलमोहर
तिच्यासाठी आरक्त लाल पायघडया घालेल

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Sep 2011 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार

अधिर पणे चालत ती माझ्याजवळ येईल,
आपल्या हातात नाजुकपणे धरलेले कशाळपात्र ती माझ्या समोर नाचवेल
आणि तिच्या मंजुळ नाजुक स्वरात मला हळुवारपणे म्हणेल,
अण्णा दो दिनसे कुछ खाया नही है, पाच रुपया दे दो ना.

अहो प्रयत्न उत्तम आहे. पण कवी "तिची" वाट पाहतोय असं सूचित केलंय ना पहिल्या कडव्यात.. चंद्राला म्हणाला ना तो तत्सम..

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Sep 2011 - 11:34 am | ज्ञानोबाचे पैजार

गवि,
सिच्युएशन लक्षात घ्या, रात्रि १० वाजता फुल चार्ज होउन कवि सिग्नलला उभा आहे, समोरचा दिवा म्हणजे त्याला चंद्र वाटतो आहे. आणि या पार्श्चभुमीवर तो तीची वाट पहात आहे. आम्ही थोडी लिबर्टी घेतली. अर्थात आम्ही मान्यच करतो की आम्ही कोणी महान कवी वगेरे नाही. हा आमचा एक फुटकळ प्रयत्न होता.

तुमच्या प्रतिभेला च्यालेंज नाही हो..

:)

तुम्ही चितारलेली "चार्ज्ड" पार्श्वभूमी सॉल्लिड आहे. तिला तसेच ठेवून थोडा बदल मी सुचवतो..

अधिरपणे चालत ती माझ्याजवळ येईल,
आपल्या हातात नाजुकपणे धरलेली लाल पर्स ती पदराखाली लपवेल
आणि तिच्या मंजुळ नाजुक स्वरात लालचुटुक ओठ विलग करुन
मला हळुवारपणे म्हणेल, ए साब चलो ना........दो सौ लेगी सिर्फ..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Sep 2011 - 12:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मिपावरील अनेक महान व्यक्तिमत्वांपैकी आपणही एक आहात, तेव्हा आपणाला __/\__

किसन शिंदे's picture

28 Sep 2011 - 12:11 pm | किसन शिंदे

हा हा हा... :D

एक नंबर हो गवि..

धन्या's picture

28 Sep 2011 - 12:31 pm | धन्या

आमच्या कवितेत असाही मोड येऊ शकतो असं वाटलं नव्हतं.

मस्तच हो गवि.

शाहिर's picture

28 Sep 2011 - 2:18 pm | शाहिर

मोड आणि तोड सुद्धा येइल

'ज्ञानोबां'च्या पैज़ारांनी नी 'रचले'ल्या चार्ज्ड पार्श्वभूमीच्या 'पाया'वर वर गविंनी 'कळस' चढवला असे म्हणावेसे वाटतेय :)

- (कळसामुळे चार्ज्ड झालेला) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2011 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या हातात नाजुकपणे धरलेली लाल पर्स ती पदराखाली लपवेल
आणि तिच्या मंजुळ नाजुक स्वरात लालचुटुक ओठ विलग करुन
मला हळुवारपणे म्हणेल, ए साब चलो ना........दो सौ लेगी सिर्फ..

मेलो.

च्यायला, आपली मिपाकर मंडळी लैच येडपट आहे. कोणाला काय सुचेल काही सांगता येत नाही. :)

-दिलीप बिरुटे

kamalakant samant's picture

28 Sep 2011 - 11:52 am | kamalakant samant

नाव काय म्हणून पूसतोस च॑द्रा
कवीला विचारण्या हि॑मत कशी तुला
जरी सौम्य तू तडफडू नको च॑द्रा
नाव तिचे रोहिणी सा॑गतो तुजला !!

धन्या's picture

28 Sep 2011 - 12:35 pm | धन्या

हे शेवटचं कडवं वाटतंय... मधलं लिवा की ;)

आरक्त रक्त लाल पायघड्या
आसुसल्या चुंबना मेहंदी पाया
उफाळल्या उत्कट ह्या भावना
पूर्ण कराल का हो धनाजी राया ?

धन्या's picture

28 Sep 2011 - 1:35 pm | धन्या

अशा मेंदीभरल्या पावलांसाठी लालच काय सप्तरंगी पायघडया घातल्या तरीही कमी पडतील ;)

आपका बहुतेही धन्यबाद.

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असेल तर आम्ही त्या पायघड्यांवर लोळायला एका पाठीवर तयार आहोत.

अविनाशकुलकर्णी's picture

28 Sep 2011 - 1:44 pm | अविनाशकुलकर्णी

लाल चुटुक उष्ण अधर. नजर नाचरी धारधार
वर्ण फिकटसा गौरसर. मृदु उन्नत गौर पयोधर

अवतरे भुतळी चंद्रवदना. कृश कटी मादक ललना
रुप असे गोजीरे असे . भंगला तो बिलोरी आईना.

संपली प्रतिक्षा सखे .ये त्वरीत मम बाहुपाशात
करीतो विनंति कवि धनाजी .ऐक त्याची साद आर्त

गणेशा's picture

28 Sep 2011 - 8:10 pm | गणेशा

लाजवाब

शैलेन्द्र's picture

28 Sep 2011 - 3:47 pm | शैलेन्द्र

होउद्यात पुरी.. मग करु रस ग्रहणं

आपल्या हातात नाजुकपणे धरलेली लाल पर्स ती पदराखाली लपवेल
आणि तिच्या मंजुळ नाजुक स्वरात लालचुटुक ओठ विलग करुन
मला हळुवारपणे म्हणेल, ए साब चलो ना........दो सौ लेगी सिर्फ..

साफ खपलो आहे!
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))
=))

____/\____

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2011 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा

फुललेल्या मोगर्‍याचा गंध पसरेल वार्‍यावर
मेंदी भरलेल्या पावलांनी ती हळूवार चालेल
अन फुलण्याचा ऋतू नसतानाही गुलमोहर
तिच्यासाठी आरक्त लाल पायघडया घालेल.... अता पुढे अमच्या स्टाइअलनी.. ;-)

गुलमोहराचा स्मार्टनेस पाहुन मोगरा
आपला एयर फ्रेशनर काढुन घेइल
ती मोगय्राला म्हणेल,अच नै गडे नाराज व्हायचं
त्याचा जर मोहोर-गुल झाला,तर तुलाच आहे ना यायचं? ;-)

मी म्हणेन,मला फुटलेली पालवी :love:
कशी काय दिसत न्हाई हीला?
मी तर अत्ता इतका टाइट आहे
अणी नेमका हीचाच स्क्रु कुठ झाला ढिला?

ती म्हणेल, स्क्रु माझा टाइटच आहे रे
माझ्या नुकत्याच बहरलेल्या फुला :-D
शेवटी मी तुझ्या बरोबरच येणार
कारन..अप्सरा म्हनत्यात मला...

धनाजीराव आता १ कडक अप्सरा गीत टाका बरं पुढच्या धाग्यात
मंजे हे असं पाय अडकायचं नाही या वेगळ्याच झग्यात... ;-)

पाषाणभेद's picture

29 Sep 2011 - 3:00 am | पाषाणभेद

रामराम धनाजीरावचंद्र वाकडेजी,

खालील कविता चालेल काय की अन्य बदल हवेत ते कळविणे.

आतूरतेने कुणाची वाट पाहतो आहेस रे
आकाशीच्या चंद्राने एकदा विचारलं मला
म्हटलं येणार आहे रे कुणी तुझ्यासारखंच
शुभ्र चांदण्यांच्या गाडीतून मला भेटायला

एक छान हळूवार मंद वार्‍याची झुळूक येईल
झाडे पाने फुले तिच्या स्वागताला सजतील
अगदी अलगद उतरेल ती खाली, पण तरीही
ती खाली उतरताना पैंजण थोडेसे वाजतील

फुललेल्या मोगर्‍याचा गंध पसरेल वार्‍यावर
मेंदी भरलेल्या पावलांनी ती हळूवार चालेल
अन फुलण्याचा ऋतू नसतानाही गुलमोहर
तिच्यासाठी आरक्त लाल पायघडया घालेल
=====================
तेव्हढ्यात खरोखरच आवाज गाडीचा झाला
खाली उतरून ड्रायव्हर मजसमीप थांबला
आणखी चार दोन इसम त्यातून उतरले
'हाच तो पकडा' 'हाच तो पकडा' शब्द उत्तरले

करकचून त्यांनी मज बाहूस पकडले
'काय बरळतो चंद्र चांदणे मेंदी पैंजण' ते वदले
अरे वेड्या आकाशीचा चंद्र का कुणाशी बोलतो
तो तर उपग्रह पृथ्वीचा खडकी* तिच्याभोवती फिरतो
येरवड्याच्या ईस्पीतळातच आता तुला आम्ही सोडतो

"पुण्यनगरीत** राहून तू रे वेडा झाला
सुधरण्यासाठी आता तू आमच्यात आला"
एकजात बोलले रुग्ण त्या रुग्णालयाचे
'सोडा मज सोडा मज' बोल हवेत विरले माझे

* (खडकी ष्टेशन नव्हे)
** तेच तेच, बरोबर ओळखले.

दोन मागण्या:
महेश जवळकरांना जवळ करा नाहीतर खुर्ची खाली करा.
सातपूर यमायडीशीसह मुंबई पुणे नाशिक सुवर्ण त्रिकोण झालाच पाहिजे !!!

आपलाच,
पाषाणभेद

पाषाणभेद's picture

30 Sep 2011 - 12:43 am | पाषाणभेद

कवितेबद्दल मत कळलेले नाही.

रिमझिमत्या चांदण्या अन मंद वारा,
तिच्या रेशमी केसासमवेत खेळ करतील,
लटक्या रागाने झटकेल ती मान, कानामागुन
ढळलेली बट ती, जीव माझा घेतील....

रात-दिन, उन-पाउस न बाळगली तमा यांची,
लक्ष कोटी क्षण, वाट पाहिली जिची,
हाती घेवोनी हात, पडुदे पाउले अधांतरी,
होउ दे सुरु, ही रात प्रणयाची !!
--------------------------------------------------------
क्षीणसा प्रयत्न ---- आवडल्यास माफी असावी....

प्रचेतस's picture

29 Sep 2011 - 7:00 pm | प्रचेतस

मस्त रे वप्या. लै भारी लिवलय.
अजून पुढचा भाग पण येउ दे की रे लवकर.

धन्या's picture

29 Sep 2011 - 9:35 pm | धन्या

काय वल्लीशेठ, भलतीच उत्कंठा लागली आहे बुवा तुम्हाला पुढे काय होणार त्याची ;)

वप्या, झक्कास जमलीत दोन्ही कडवी. :)

प्रचेतस's picture

29 Sep 2011 - 9:47 pm | प्रचेतस

उत्कंठा लागणारच ना धनाजी भौ. कारण आता रात सुरु होणार ना. ;)