वळते तेंव्हा बगळ्यांच्या उडती शुभ्र माळा...

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in कलादालन
11 Aug 2011 - 5:12 pm

Lake Birds

छायाचित्रण

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

11 Aug 2011 - 5:35 pm | किसन शिंदे

काय राव, परतेक येळेला यकच फोटू घिवून येता. जरा टाका कि दोन-चार यकदमच. :)

अभिजीत राजवाडे's picture

12 Aug 2011 - 3:16 am | अभिजीत राजवाडे

राम राम किसनराव,
अहो, याच विषयाचे इतर प्रकाशचित्र माझ्या संग्रहात नसल्यामुळे एकच प्रकाशचित्र टाकले.

पुढच्या वेळेस नक्किच आणखी टाकतो.

खास तुमच्यासाठी.

आभार.

मस्त
अवांतर : तुमचे नाव कोठे तरी ऐकल्या सारखे का वाटते आहे मला.

अभिजीत राजवाडे's picture

12 Aug 2011 - 3:18 am | अभिजीत राजवाडे

अहो, गणेश राव,
अजुन तरी मी एक सामान्य व्यक्ती आहे. आणि आज पर्यंत कधीही चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी वृत्तपत्रात नाव आलेले नाही.

तरीही ऐकुन बरे वाटले.

आभार!!!

जाई.'s picture

11 Aug 2011 - 7:07 pm | जाई.

सुरेख बगळे

आचारी's picture

11 Aug 2011 - 7:17 pm | आचारी

मस्त

अभिजीत राजवाडे's picture

12 Aug 2011 - 3:19 am | अभिजीत राजवाडे

खुप खुप आभार!!!

बगळ्यांच्या माळा.. अस म्हणून प्रत्येक फोटो मध्ये एकच बगळा??
अहो.. जर ४-५ फोटो आणि त्यातले १-२ खरोखरच बगळ्यांच्या माळेचे द्या राव!

अभिजीत राजवाडे's picture

12 Aug 2011 - 3:21 am | अभिजीत राजवाडे

मला आज दुपारी वाटलेच होते कि यावर कोणीतरी कोपरखळी मारणार आहे.
पुढच्या प्रकाशचित्रांच्या वेळेस अजुन चांगले व अर्थ पुर्ण नाव देण्याचा प्रयत्न करेन.

आभार!!!

धनंजय's picture

12 Aug 2011 - 3:24 am | धनंजय

छान.

तिहेरी का होईना, एकच चित्र दिले ते मला तरी बरे वाटले : एका दृष्टिक्षेपात चित्र निरखून बघणे झाले. खूप चित्रे असतात, तेव्हा मी भराभरा स्क्रोल करतो, आणि कुठल्याच चित्राकडे नीट लक्ष देत नाही.

(शीर्षक चित्राच्या संदर्भात चपखल नाही, याबाबत वरच्या प्रतिसादकांशी मी सहमत आहे.)

अभिजीत राजवाडे's picture

12 Aug 2011 - 3:29 am | अभिजीत राजवाडे

खुप खुप आभार!!!

तुम्ही सर्वांनी दिलेल्या सुचनांवर नक्कीच अमंल केला जाईल.

फोटो छान, पण ते व़ळत पण नाहीत शुभ्र पण नाहीत आणि माळेत पण नाही, काय तर काय नाव देता का राव धाग्याला, एका माळेत उडणा-या शुभ्र बगळ्यांचं फोटो काढणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे तसे फोटो असतील अशि अपेक्षा होति. निदान नाव तरी बदला धाग्याचं.

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 8:09 am | अभिजीत राजवाडे

५० फक्त, तुमची सुचना मिळाली. धन्यवाद.
अशेच माझे मनोबल वाढवत रहावे.
पुन्हा एकदा खुप खुप आभार!!!

मर्द मराठा's picture

13 Aug 2011 - 8:56 am | मर्द मराठा

मला तुमचा प्रयत्न आवडला... पण पुढच्यावेळी पक्ष्यांची छायाचित्रे काढताना खालील गोष्टींचा विचार करून पाहा...

१) बारकावे: नूसते उभे असलेल्या पक्षांपेक्षा दाणे टिपणार्‍या/मासे पकडणार्‍या/डौलदार पणे चालणार्‍या/पाण्यात उतरणार्‍या/ पाण्यातून उडणार्‍या पक्षांचे बारकावे छायाचित्रांत पाहणे हा अनुभव असतो.. ह्यासाठी सहनशीलता लागते आणि छायाचित्रकाराची त्यातच कसोटी लागते..

खालील काही मी टिपलेले पक्षी... (अर्थात हे अगदी १००% बरोबर आहेत असा दावा मी करत नाही)

२) फ्रेमिंगः नुसता उभा असलेला पक्षी टिपायचा असेल तर तसे फ्रेमिंग आवश्यक आहे.. म्हणजे छायाचित्रातून अर्थ स्पष्ट होतो...

वाट पाहतो वसंताची...

३) डोळे: पक्षी/ प्राण्यांची छायाचित्रे काढताना त्यांचे डोळे स्पष्ट असतील तर छायाचित्र विल़क्षण बोलके होते..

अर्थात छायाचित्र सर्वतोपरी उत्तम येण्यासाठी उत्तम कॅमेरा आणि झूम लेन्स ह्याची ही तितकीच गरज आहे...

तुमच्या पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा !!

सविता००१'s picture

16 Aug 2011 - 4:44 pm | सविता००१

चांगले आहेत फोटो. पण मर्द मराठा यांनी काढलेले केवळ उच्च आहेत. त्यांच्या सूचनांचा खरच खूप फायदा होइल तुम्हाला.