अनंत

जागु's picture
जागु in कलादालन
4 Jul 2011 - 7:59 pm

सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्‍यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे. हे फुल ठेवले टेबलवर की दिवसभर सुगंध दरवळतो.

१)संध्याकाळी एक एक पाकळी उमलतेय.

२) अर्धवट फुललेल फुल

३)

४) आमचा पण फोटो काढा.

५) फुलत आलेल फुल

६) पुर्ण फुललेल फुल

७) हे आमच झाड.

८)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

शुचि's picture

5 Jul 2011 - 2:28 am | शुचि

अप्रतिम!!!

रुतिका's picture

5 Jul 2011 - 9:02 am | रुतिका

खुप सुंदर आहेत फुलं

नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर..

बाकी काही नाही
तुम्ही रहाता कुटे ?

सविता००१'s picture

9 Jul 2011 - 11:01 am | सविता००१

फोटो पाहूनच घरामध्ये अनंताच्या फुलांचा सुवास दरवळायला लागलाय.भन्नाट फोटो आहेत सगळे.

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Jul 2011 - 5:42 pm | श्री गावसेना प्रमुख

एव्हढ एकच झाड आहे का?

स्मिता.'s picture

10 Jul 2011 - 5:51 pm | स्मिता.

जागुताई, खूपच सुंदर फोटो आहेत. अनंताचे पांढरे शुभ्र फुल आणि त्याचा मधाळ सुगंध!!

माझ्या आईच्या घरी अनंताचे एक झाड आहे. त्याच्या बहराच्या दिवसात रात्री वार्‍याच्या झुळुकेबरोबर तो मंद-मंद सुगंध घरात यायचा, मन अगदी प्रसन्न व्हायचं.

मदनबाण's picture

13 Jul 2011 - 8:59 am | मदनबाण

सुंदर... :)
किती गोड गंध असतो या फुलांचा. :)

प्राजु's picture

14 Jul 2011 - 5:20 am | प्राजु

माझं अतिशय आवडतं फूल. खूप सुंदर वास असतो अनंताला.

निनाद's picture

14 Jul 2011 - 5:52 am | निनाद

मी जातो येतो त्या रस्त्यावर हे झाड मेलबर्नमध्ये आत्ता फुलले आहे. मस्त सुगंध येतो. इतके छान वाटते तेथून जातांना!
- सध्या येथे हिवाळा आहे, त्यामुळे इतर झाडांची पानगळ सुरू आहे म्हणून आश्चर्य वाटले. मी उद्या फोटो टाकायचा प्रयत्न करेन.

निनाद's picture

14 Jul 2011 - 10:34 am | निनाद

धन्यवाद जागू, मी रोज येथून जातांना या सुगंधाने वेडावायला होत होते. पण हे झाड कोनते ते मला कळत नव्हते. तुमच्यामुळे ते कळले!
आज अनायसे मस्त उन पडले होते मग लंच मध्ये जाऊन त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. माझा फोन कॅमेरा अगदी लहान म्हणजे २ मेगा पिक्सेल असल्याने, असल्याने फोटो चांगले मानून घ्यावेत ही विनंती!

हे पाहा
From 14 Jul 2011
हे पाहा मेलबर्न मध्ये मला दिसलेले अनंताचे फुल

From 14 Jul 2011
दुसरे चित्र उन्हामुळे फुल अजूनच सुंदर दिसत होते.

From 14 Jul 2011
अनंताची पाने आणि फुले

From 14 Jul 2011
अनंताचे एक छोटे झाड

From 14 Jul 2011
इच्छुकांसाठी अनंताची पाने आणि फुले

From 14 Jul 2011
अनंताचा सडा पडण्याची सुरुवात...
From 14 Jul 2011
फ्लॅगस्टाफ गार्डन येथला अनंत वृक्ष

ता. क. - सर्व चित्रे मी प्रताधिकार मुक्त करत आहे. ज्यांना हवी असतील त्यांनी कॉपी करून घ्या!