दोन लेखांमधील अंतर

शरद's picture
शरद in काथ्याकूट
10 Jun 2011 - 8:26 am
गाभा: 

१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते.
२) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात.
(१)
श्री. परासाहेब यांच्या वरील प्रतिसादावरून मला बरेच दिवस पडलेला प्रश्न समोर आला आहे. किती लिहावे ? केव्हा थांबावे ? आपण लिहतो ते वाचकांना आवडते का ? त्याचा दर्जा काय आहे ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. कोण देणार यांची उत्तरे ? याचे काही निकष ठरले/ठरवता आले तर माझ्यासारख्या ( नवोदित/रिकामटेकड्या/बहुप्रसव) लेखकाला मदतच होईल. आता एक लेखक निरनिराळ्या विषयांवर लिहित असेल तरीही दोन लेखांत अंतर ठेवणे गरजेचे आहे का ?

दोन उदाहरणे देतो. कविता देण्यात कवींबाबत हा दोष आढळून येतो. मला कविता आवडतात व म्हणून मी सर्व वाचतो.पण बरेचदा निराशाच पदरी पडते. म्हणून कविता देतांना अंतराचे बंधन घालावे का ? माझे मत" नाही." चार भिकार कवितांनंतर एखादी चांगली वाचावयास मिळाली तरी मी खुष आहे.एखाद्या कवीच्या कविता आपणास आवडत नाहित असे वाटले तर वाचत नाही. तेव्हा या बाबतीत बंधन घालणे योग्य वाटत नाही. दुसरे उदाहरण छायाचित्रांबद्दल. एखादेवेळी पूर येतो व नंतर बराच वेळ सारे कसे शांत शांत. इथे कसले बंधन घालणार ?

मला बाटते या बाबतीत संपादकांनी ज्येष्ट, जाणकार सभासदांची मदत घ्यावी व अशी गरज भासली तर लेखकाला व्य.नि.ने सुचना द्यावी.
काम नाजुक, अवघड (व वाईटपणा देणारे) आहे.

(२) माझा ब्लॉग नाही व मी इतरांचे ब्लॉग वाचत नाही. ९५% वाचक माझ्या वर्गात मोडत असावेत. मग ब्लॉगवरील लेखन, जाचा वाचकवर्ग अत्यल्प आहे, ते लेखकाने येथे देऊ नये का ? आपले लिखाण जास्त लोकांपर्यंत पोचावे ही इच्छा नैसर्गिक आहे. काय हरकत आहे ? मी माझेच उदाहरण देतो. इथे लिहावयास सुरवात करण्याआधी मी उपक्रमवर लिहित होतो. इथे नंतर सुरवात केली. दोन्ही स्थळांवरील वाचकवर्ग भिन्न आहे असे लक्षात आल्यावर मी संपादकांना विचारले की माझे पूर्वप्रकाशित लेखन इथे देऊ का ? त्यांनी "हो" म्हटल्यावर मी ते येथे प्रकाशित केले. त्याला बर्‍यापैकी वाचकवर्ग मिळाला. मला मनोमन बरे वाटले हे खरेच. इतरांना वाटेल यात शंका नाही. येऊ दे की ब्लॉगवरील लेखन येथे.

प्रतिसादांवर नवीन धागा काढू नये व वैयक्तिक मतेही देऊ नयेत हे मान्य. पण विषयाचा आवाका मोठा व महत्वाचा असल्याने आपली मते जाणून घेण्यास उत्सुक असलेला,

शरद

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

10 Jun 2011 - 8:39 am | नगरीनिरंजन

महत्त्वाचा विषय चर्चेला आणल्याबद्दल आभार!
सर्वच सदस्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या मते दोन भिन्न (म्हणजे लेखमालेत नसलेल्या) लेखांमध्ये, कमीतकमी एक आठवडा अंतर पाहिजे. लेखमालेसाठी हे अंतर कमी करून दोन-तीन दिवसांवर आले तरी हरकत नसावी आणि क्रमशः येणार्‍या कथांसाठी किमान कालमर्यादा नसावी.
तरीही लेखमाला म्हणून दहा-दहा ओळींचे छोटे-छोटे लेख दर दोन-तीन दिवसांनी पाडणार्‍यांसाठी लेखांच्या शब्दसंख्येसाठी काही संकेत असावा काय असा प्रश्न पडतो.

रणजित चितळे's picture

10 Jun 2011 - 9:23 am | रणजित चितळे

आपल्या मताशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2011 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> एक लेखक निरनिराळ्या विषयांवर लिहित असेल तरीही दोन लेखांत अंतर ठेवणे गरजेचे आहे का ?
माझं मत असं आहे की, दोन लेखात अंतर ठेवण्याची गरज नाही. एखाद्या लेखकाने एकाच दिवसात दोन कविता, एक लेख, एखादा काथ्याकूट टाकला तरी वाचक ठरवतील काय वाचायचं आणि प्रतिक्रिया कुठे द्यायची. त्यासाठी लिहिणार्‍याला कशाला अट पाहिजे. उद्या लोक म्हणतील एका सदस्याने कमीत कमी दोन-दोन तासाच्या अंतराने प्रतिसाद टाकले पाहिजेत. कोणी म्हणेल एका लेखावर एकच प्रतिसाद टाकला पाहिजे. तेव्हा लिहिणार्‍यावर 'बंधन नको' या लेखकाच्या विचारांशी सहमत....!

शरद साहेब, कशाला लेखनाच्या अंतरा-बिंतराच्या भानगडीत पडत आहात. पाडगावकरांची कविता घ्या एखादी रसग्रहणाला- :)

झाडे गदगदा हलवणारा घनघोर पाऊस,
थेंबाचा अपार उत्सव मनस्वी पानापानातून,
फांद्याच्या हिरव्या जत्रेत गरगरणारे बिलोरी पाळणे,
आत्मा पिसा-याहून फुलवणारा मुक्त मनमोर पाऊस.

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

10 Jun 2011 - 9:46 am | टारझन

१. जसे लेखकाला आपले शिळे लेखन खपवायची "नैसर्गिक" उर्मी असते तशीच फालतु लिखाणावर तोंडसुख घ्यायची माझ्या सारख्या जिज्ञासु वाचकांनाही "नैसर्गिक" उर्मी असणे चुकीचे नाही. तेंव्हा जर लेखन गाळणारंच असाल तर प्रतिक्रीयांबद्दल आक्षेप घेणे चुकीचे वाटते. आपल्याला वाचकही हवेत , टिकाही नको , भिकार लेखनही खपवायचे आहे , फुकटचे कौतुकही करुन घ्यायचे आहे म्हणजे आपण वाचकांनी आपले शेंडेफळ असल्याप्रमाणे लाड पुरवावेत , किती अपेक्षा ह्या ?

२. फालतु लेखणाला बळेच छाण छाण प्रतिक्रिया दिल्याने उत्साहाच्या भरात तो फालतु लेखक रतिबावर रतिब घालतो आणि संस्थळावर वाचण्याचा मुड जातो ( आणि संस्थळाची क्वालिटी खाली येते असे वैयक्तिक मत आहे ) . उलटपक्षी नकारात्मक प्रतिक्रियांमुळे "जर लेखकात पोटँशियल असेल तर" त्याचा लेखनाचा उत्साह कमी न होता तो "चांगले" लेखन करुन टिकाकारांची बोटं थांबवण्याचा प्रयत्न करेल . म्हणजेच गाळणी प्रमाणे चांगले लेखन मिपावर येण्यास मदत होईल.

३. " कॉलिटी इज इव्हर्सली प्रपोर्शनल टू काँटिटी " ही फॅक्ट लोकांना उमगत नसावी. उगाच प्रेशर आला म्हणुण बुंदी पाडल्या सारखे ( काही तर कुंथुन कुंथुन एकेक बुंदी पाडतात .. अगदी पडत नसेल तरीही .. ) लेखन पाडल्याने आमच्या सारख्या वाचकांचा मुड खराब होतो , पक्षी तशी प्रतिक्रीया उमटते.

४, माझ्या सुरुवातीलाही पब्लिक ने मला चांगलेच पीडल्याचे स्पष्ट आठवते आहे. भांडणेही झाली :) विसरलो नाही. परंतु त्यामुळे मी लिहीणे थांबवलेले मला आठवत नाही. :) कोणी चिडवतो म्हणुन मी तक्रारीचा सुर काढल्याचे ही स्मरत नाही हे ह्या नॉस्टॅल्जिक समयी नमुद करावेसे वाटते. (अर्थात आम्ही फार "कॉमन" आहोत ह्या समजुतीतुन वरिल विधान केल्या गेले आहे.

५, लेखन चांगले असेल तर कौतुक जरुर व्हावे , " लेखकात चांगलं लिहीण्याची ताकद दिसत असेल " तर अधिक प्रोत्साहन देण्याला दुजोरा आहे. पण चिउ-काऊ छाप लेखकांनी लिहीताना कौतुकाची आणि "आम्हाला इग्नोर करा" ची अपेक्षा करणे वाचकांवर अन्याय केल्यासारखे वाटते.

- शरट (प्यान्ट)

दोन साहित्यकृतीतील अंतर ठरवणे हे आपल्या हातात नाही. एखादा प्रतिभेचा लेखक एकाच दिवसात जर दोन लेख लिहीत असेल तर त्याने ते देणे योग्यच आहे.

अर्थात प्रतिक्रिया येणे न येणे हा वेगळा मुद्दा आहे, अन त्याला बरेच कंगोरे आहेत जे येथे देणे अप्रस्तूत ठरेल.

सर्वसाधारण विचार केल्यास एखादा मोठा लेख कोणीही लेखक (रिकामा नसेल तर) दिवसातून एखादाच लिहू शकतो. येथे असणारे सदस्य पुर्णवेळ लेखक नसतातच. त्यांचे स्व:ताचे उद्योगधंदे आहेत. अशा परिस्थीतीत लगोलग लेख येणे प्र्याक्टिकली शक्य नाही.

प्रत्येक साहित्यकृतीत किती दर्जा आहे या विषयी चर्चा झालेली असेल. त्या साहित्यकृतीतील दर्जा ठरवीण्याबद्दल कोणी भरीस पडू नये. कोणाला ते साहित्य आवडेल न आवडेल. कोणी दोन चार जेष्ट श्रेष्ट मंडळींनी त्यास मान्यता दिली म्हणजे योग्य असे नाही.

ब्लॉगवरील लिखाण येथे येण्यापेक्षा येथील लिखाण ब्लॉगवर जावू देणे योग्य आहे असे माझे मत आहे. अन ते मी करतो.

बाकी खेळीमेळीचे वातावरणच राहिले पाहिजे या बाबतीत सहमत. हाच मराठी संस्थळाचा USP आहे. उगाच गंभीरता आणण्यास काही अर्थ नाही. टारूशी सहमत.

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 10:05 am | पिवळा डांबिस

आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे
हा सर्वस्वी त्या लेखकाचा प्रश्न!! यावर वाचकांना हरकत घेण्याचे करण्याचे कारण नाही....
त्याचबरोबर कमी-अधिक कालांतराने लेख आला आणि त्यावर टीका झाली तर त्यावर लेखकांनासुद्धा तक्रार करायचा हक्क नाही. हां, ते ही टीका दुर्लक्ष करून फाट्यावर जरूर मारू शकतात....

मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात.
तो सुद्धा त्यांचा आणि मिपा व्यवस्थापनातला प्रश्न! वाचकांना त्यात हरकत घ्यायचे कारण नाही....
पण एखाद्या वाचकाने जर मूळ ब्लॉगचा सोर्स शोधून काढुन 'हे शिळं इथे का टाकता?" असा जर प्रश्न विचारला तर त्यावर लेखकांना कांगावा करायचा अधिकार नाही!!!!

अहो, इथे काही लोकं एकच लिखाण फक्त वैयक्तिक प्रसिद्धिसाठी त्यांच्या ब्लॉगव्यतिरिक्त एकाचवेळी अनेक संकेतस्थळांवर टाकताहेत....
तुम्ही हे काय बाळबोध घेऊन बसलाय!!!!!
:)

गवि's picture

10 Jun 2011 - 10:50 am | गवि

पण एखाद्या वाचकाने जर मूळ ब्लॉगचा सोर्स शोधून काढुन 'हे शिळं इथे का टाकता?" असा जर प्रश्न विचारला तर त्यावर लेखकांना कांगावा करायचा अधिकार नाही!!!!

याला जोरदार सपोर्ट देण्यासोबतच एक शंका..

जे लिखाण आपण पहिल्यांदाच वाचत आहोत ते केवळ पूर्वी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर टाकलं होतं म्हणून शिळं कसं होतं?

आपण पहिल्यांदाच वाचत असतो ना?

जर ते "अप्रस्तुत" अशा अर्थाने शिळं असेल तर माझी वरील शंका चुकीची ठरेल. उदा. एक वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या बातमीवर त्यावेळी तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून ब्लॉगवर लिहिलेला लेख आता आउटडेटेड झालेला असूनही इथे उचलून डकवणे.

पण काळाशी फार बांधले न गेलेले लिखाण केवळ त्याच लेखकाच्या मूळ ब्लॉगवर सापडले (तेही मुद्दाम शोध घेतल्यावर) तर ते अचानक शिळे बनावे हे पटत नाही. तुम्ही तुमच्या कॉमेंटमधे असा मुद्दा मांडलेलाही नाहीये. फक्त त्या निमित्ताने ही शंका विचारत आहे.

बाकी अंतर ठेवावे आणि विनाकारण स्वतःच कॉमेंट टाकून धागा वर आणत राहू नये हे एकदम मान्य आहेच.

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 11:19 am | पिवळा डांबिस

जे लिखाण आपण पहिल्यांदाच वाचत आहोत ते केवळ पूर्वी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर टाकलं होतं म्हणून शिळं कसं होतं?

समजा काल तुमच्या बायकोने रात्रीच्या जेवणाला भेंडीची भाजी केली होती...
पण तुम्ही काल रात्री मिपाकरांबरोबर कट्टा करण्यात गुंगलात आणि काही अपेयपानाबरोबरच दाबून पाव-मिसळ खाल्लीत आणि घरी येउन न जेवताच झोपलांत....
दुसर्‍या दिवशी सकाळी तुम्हाला ती भेंडीची भाजी तुमच्या बायकोने पानात वाढली....
तुम्ही ती यापूर्वी खाल्लेली नाही....
मला आता सांगा की ती भाजी ताजी की शिळी?
:)

विनोद सोडा..
तात्पर्य हे की जरी एका वाचकाला ते लिखाण नवीन असलं तरी दुसर्‍या एखाद्याला ते पूर्वी वाचलेलं असेल. मिपावर अशा लिंका देणारे अनेक लिंकाळे जीव आहेत की ज्यांचं जालवाचन जबरदस्त आहे. अशा एकाने जर ते लिखाण शिळं ठरवलं तर लेखकाला त्याविरूद्ध तक्रार करायचा हक्क नाही असं माझं म्हणणं....

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 11:25 am | शिल्पा ब

"लिंकाळे जीव " हे वाचुन पोट दुखुस्तर हसले. =))

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 11:28 am | पिवळा डांबिस

पण आता ते जीव आमच्यावर तडकणार त्याचं काय?
:)

समजा भाजी नसून कविता असेल तर तिने केलेली?

....

पण मूळ मुद्दा कळला आहे.. तस्मात वाद नाही.. :)

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 11:32 am | पिवळा डांबिस

समजा भाजी नसून कविता असेल तर तिने केलेली?
बापरे!! मग तुमचा प्रॉब्लेम खूप गहन आहे!!! बायको बदलता येते का ते पहावे!!!
:)

पण मूळ मुद्दा कळला आहे.. तस्मात वाद नाही
धन्यवाद, सेम हियर!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Jun 2011 - 1:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>पण मूळ मुद्दा कळला आहे.. तस्मात वाद नाही.
माफ करा, पण मला अजूनही मूळ मुद्दा कळला नाही. म्हणजे भाजी शिळी होऊ शकते पण लेखन शिळे कसे काय होईल? तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे दोन प्रकारचे लेख असतात असे गृहीत धरू. तत्कालीन संदर्भ असलेले आणि या प्रकारचे संदर्भ नसलेले.

पहिल्या प्रकारचे उदाहरण म्हणजे सध्याचा बाबा रामदेव चा विषय. अजून एका वर्षाने त्यात कुणाला नक्कीच फारसा रस उरला नसेल, त्यामुळे मी आज माझ्या ब्लॉग वर त्या वर काही लिहिले आणि ते एका वर्षाने मिपा वर प्रकाशित केले तर त्याला शिळा विषय असे नक्की म्हणता येईल. पण ललित प्रकारचे लेखन केले असेल, उदा तुमची "और गिटार.." लेखमाला. असा लेख तुम्ही एकच का तीन वर्षांपूर्वी लिहिला असेल आणि तो आत्ता मिपा वर टाकला तर त्याला शिळे कसे म्हणता येईल ? तुमच्या ब्लॉगच्या वाचक वर्गात मिपा वरील बहुसंख्य लोक नव्हते असे सहज गृहीत धरत येईल. त्यांनी ते प्रथमच वाचले असल्यामुळे त्यांच्या साठी ते नवीनच ना ?

यावरून आठवले, परवा पुस्तकांच्या दुकानात गेलो होतो. तिथे तो हरामखोर चक्क १९६० च्या दशकातले एक शिळे पुस्तक विकत होता, "बटाट्याची चाळ" असे काहीसे नाव होते. मी माझ्या पदरचे १५०-२०० रु घालून ५० वर्षांपूर्वी चे लिखाण विकत घेईन असे त्याला का वाटले कुणास ठावूक. मी सदर प्रकाशक आणि विक्रेता यांच्या नावाने विविध फोरम वर टीका करणार आहे. त्या विरुद्ध कांगावा करण्याचा हक्क त्यांना नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे :-)

जाता जाता :- बटाट्याची चाळ हे पुस्तकरूपात प्रसिद्ध होण्यापूर्वी दिवाळी अंकात लेखांच्या स्वरुपात प्रकाशित झाले होते असे वाचल्याचे स्मरते. याचा अर्थ त्याची पहिली आवृत्ती पण शिळी होती. डॅम इट !!!

माफ करा, पण मला अजूनही मूळ मुद्दा कळला नाही. म्हणजे भाजी शिळी होऊ शकते पण लेखन शिळे कसे काय होईल?

जर लेख वर्षभरापुर्वी लिहीला असेल , आणि मी तो ४ महिण्यांपुर्वी वाचल्या असेल तर तो माझ्या साठी ४ महिणे शिळा झाल्या असेल आणि त्यावर मी तशी प्रतिक्रीया देऊ शकेल , आणि त्यावर शिळा लेख पाडणार्‍याला ऑब्जेक्शन नसेल .

- शिळानाथ घेहिंदोळे

ते मूळ मुद्दा कळला आहे हे मी पिडांकाकांच्या शेवटच्या परिच्छेदावरुन म्हणालो होतो. बाकी भाजीचे उदाहरण त्यांनी उगीच हलकेफुलके दिले आहे अशी समजूत आहे.

त्यांचा मूळ मुद्दा म्हणजे, एखाद्याला ते शिळे वाटले तर त्याने काही बोलल्यास माझी (कोणत्याच लेखकाची) हरकत नसावी.

...तसेही एकूणच ताजेही लिहिलेले कोणाकोणाला शिळे, बेकार, भिकार वाटले तरी आपण काय हरकत घेणार. ज्याचे त्याचे मत..

बाकी..

तुमच्या ब्लॉगच्या वाचक वर्गात मिपा वरील बहुसंख्य लोक नव्हते असे सहज गृहीत धरत येईल. त्यांनी ते प्रथमच वाचले असल्यामुळे त्यांच्या साठी ते नवीनच ना ?

अगदी हेच समजून घेऊन असेच लेख इथे टाकले की ज्याला माझ्या ब्लॉगवर (स्टॅट पेजवर पाहून) निदान गेले सहा महिने मिळून एकूण एक किंवा दोन हिट्स होत्या. म्हणजेच रिसेंटली ते कोणीच वाचले नव्हते. आणि माझ्या मिपा प्रवेशानंतर तर नाहीच नाही.

विजुभाऊ's picture

11 Jun 2011 - 7:50 am | विजुभाऊ

शिळे लेखन हा काय प्रकार आहे?
आपण "अक्षर" वापरून लिहीतो. अक्षर या शब्दाचाच अर्थ आहे की ज्याचे क्षरण होत नाही ते. म्हणजे ज्याचा नाश होत नाही ते.
बर्‍याचदा आपण आपली आवडती पुस्तके पुन्हा पुन्हा वाचत असतो. ती कधीच शिळी होत नाहीत.
अनेकदा पुस्तके वाचून वाचून पाठ झाली तरिही त्यातील वाचनाची गम्मत संपत नाही.
लेख शिळा /चांगला/वाईट हे वाचक ठरवतील. वादग्रस्त आहे किंवा नाही संपादक ठरवतील

नीलकांत's picture

10 Jun 2011 - 11:47 am | नीलकांत

लेखकाने आपल्या दोन लेखांत किती अंतर ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे. अर्थात लेख किमान आकाराचा असावा अशी अपेक्षा व्यवस्थापनाकडून केली जातेच.

एखाद्या लेखकाचे लेखन उत्तम असेल तर लोक स्वतःहून क्रमशः साठी लेखकाला शिव्या घालताना व आग्रहाने पुढचा भाग लवकर टाका असे म्हणताना मी पाहिले आहेत. आणि काही लोक पुढचा भाग टाकायला विसरलेले सुध्दा आहेत ;)

मात्र तुम्ही लिहीलेले लेखन चांगले नसेल तर दिवसातून एक लेख टाका किंवा महिन्यातून एक टाका अन्य सदस्यं त्यावर विशेष प्रतिक्रिया देतील असे नाही. मुक्तपिठ असण्याची हीच खासीयत आहे की चांगलं वाईट ठरवण्याचा अधीकार वाचकांचा. ते डोक्यावर घेतील किंवा पाठ फिरवतील.

बाकी प्रकाशित करण्यात येणारं लेखन हे लेखकाचं स्वत:चं असावं हा नियम आहे. ते पुर्वप्रकाशित असेल तर त्यांनी तसं नमुद करावं ही सुध्दा विनंती असते. पण पुर्वप्रकाशित आहे म्हणून मिपावर प्रकाशित करू नका असं बंधन जरा अव्यवहार्य होईल असे वाटते.

- नीलकांत

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 11:59 am | पिवळा डांबिस

पुर्वप्रकाशित आहे म्हणून मिपावर प्रकाशित करू नका असं बंधन जरा अव्यवहार्य होईल असे वाटते.
सहमत आहे. असं बंधन नकोच. पण जर कुणी असं दाखवून दिलं तर त्याबद्दल लेखकाची तक्रार नसावी इतकंच म्हणणं...

लोक स्वतःहून क्रमशः साठी लेखकाला शिव्या घालताना व आग्रहाने पुढचा भाग लवकर टाका असे म्हणताना मी पाहिले आहेत. आणि काही लोक पुढचा भाग टाकायला विसरलेले सुध्दा आहेत
भावना पोहोचल्या.
तरी लोभ असावा ही विनंती.
:) (जीभ काढून दाखवणारी स्मायली उपलब्ध कर आधी!!!)

मृत्युन्जय's picture

10 Jun 2011 - 12:14 pm | मृत्युन्जय

:P

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 12:21 pm | पिवळा डांबिस

अरे मृत्युंजया, पण कशी टाकली स्मायली त्याचा कोड दे ना!!!!:)
बाकी नीलकांता सिरियसली....
लोकांनी कितीही तक्रार केली किंवा तुझ्या म्हणण्यानुसार शिव्या दिल्या तरी वाचकांच्या आग्रहाला बळी पडायचं की नाही हा निर्णयही सर्वस्वी लेखकाचा असावा, वाचकांचा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे....

मृत्युन्जय's picture

10 Jun 2011 - 12:24 pm | मृत्युन्जय

तरी वाचकांच्या आग्रहाला बळी पडायचं की नाही हा निर्णयही सर्वस्वी लेखकाचा असावा, वाचकांचा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे....

शमत. हा नियम तुम्हाला आणी रामदासकाकांना लागू होत नाही असे माझं प्रामाणिक मत आहे.... :P

नीलकांत's picture

10 Jun 2011 - 2:00 pm | नीलकांत

१००% सहमत !
:)
- नीलकांत

प्यारे१'s picture

10 Jun 2011 - 12:19 pm | प्यारे१

:P अशी जीभ बाहेर काढायची असेल तर, : + P आहे. :P

आम्ही लेखावर/कवितेवर/विडंबनावर/ इ.इ.इ. वर प्रतिक्रिया देतो. लेखक/कवी/विडंबक/ इ.इ.इ. वर नाही.
बाकी 'चालू द्या.' :P

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

जर लेखकाने काय आणि किती लेखन दिवसातुन कितीवेळा प्रसिद्ध करावे ह्यावर आडकाठी नसेल तर मग प्रतिक्रियांवर देखील नसावी. जर लेखकाने काय आणि किती लिहावे हे वाचकाने ठरवायचा अधिकार नाही, तर वाचकाने किती आणि कशी प्रतिक्रिया द्यावी ह्यावर लेखकाने रडगाणे गाऊ नये.

Nile's picture

10 Jun 2011 - 12:29 pm | Nile

सहमत.

"जाहीर धागा काढणे म्हणजे पब्लिक मध्ये नागडं होण्यासारखं आहे, मग इतरांनी हसल्यावर तक्रारी करू नयेत" ह्या आमच्या मताची पूनरूक्ती करतो. प्रतिसाद न पचल्याने संपादकांकडे रडत जाणार्‍या लोकांची कीव येते.

वेताळ's picture

10 Jun 2011 - 7:33 pm | वेताळ

सहमत आहे

रामदासांचे दहा नविन लेख आम्ही एका दिवसात वाचू. वर्षानंतर का असेना लेखन सूमार असेल तर त्यात मला रस निर्माण होणारच नाही(पण म्हणून मिपावर ते प्रकाशित करू नका असे म्हणण्याच्या हक्क कोणाही सदस्याला नाही) क्वॉलीटीला क्वाँटीटीपेक्षा नेहमीच जास्त महत्त्व देतो.

मुळात लेखनासारख्या कलेला असल्या वायफळ नियमांत बांधणे हा निव्वळ बालीशपणा आहे. समाजात मूर्ख लोक असतात म्हणून तूम्ही घराबाहेर पडणे थांबवत नाही. व्यवस्थापकांनी सर्व सूरळीत चालले आहे याची काळजी घेतली तर पूरे, अनेकदा हूकूमशाही आणि सू-व्यवस्था यामधली रेघ पूसट असते पण म्हणून सरसकट हूकूमशाही लादू नका. (हाच मूद्दा नव्या सदस्यांच्या लेखनावर टिका करू नका वगैरे मागण्याबद्दलही आहे)

स्मिता.'s picture

10 Jun 2011 - 2:16 pm | स्मिता.

लेखकाने किती तासांनी/दिवसांनी लेख पाडावे याबाबत मिपाने बंधन घालण्यापेक्षा लेखकानेच स्वतःवर काही नियम ठेवायला काही हरकत नसावी. तसे झाले तर वाचकांची काहीच तक्रार असणार नाही आणि प्रशासनालाही वाईटपणा घ्यावा लागणार नाही.

वर क्वालिटीचा मुद्दा चर्चिला गेला की लेख जर उत्तम दर्जाचा असेल तर लोक प्रतिक्रिया देऊन त्याला डोक्यावर घेतात अन्यथा पाठ फिरवतात. परंतु एखाद्याने आपल्या लेखाला भरपूर प्रतिसाद मिळतो म्हणून अतिउत्साहाने रोजच लेख (गद्य लेख, कविता, पाकृ, कौलं, इ. सगळेच) पाडल्याने वाचकांचा विरस होतो. मिपावर अनेक लोक दर्जेदार लिखाण करतात पण रोज एकच नाव समोर दिसत असेल तर त्या नावाला 'अतिपरिचयात् अवज्ञा' हा नियम लागू होणारच.
याला अपवाद म्हणून 'क्रमशः' फेम कथा आणि लेखमाला आहेतच.

उदाहरणादाखल वर रामदास काकांचे नाव आले म्हणून तेच वापरते, व्यक्तिशः मी त्यांच्या लिखाणाची फॅन आहे. पण त्यांनी जर रोजच लेख पाडायला सुरूवात केली तर जेवढं त्यांचं कौतुक आज आहे तेवढं तेव्हा नक्कीच राहणार नाही.

आपण सर्व मिपाकर समंजस आहोतच. सध्या होणार्‍या चर्चांमधून प्रत्येकजण योग्य ते समजेल अशी आशा आणि विश्वास आहे :)

एकंदरीत तारतम्य ही गोष्ट सगळ्या सदस्यांमध्ये हवी आहे. मग तो लेखक असो वा प्रतिसादक ...

अवांतर : कवितेबद्दल नेहमी बोलले जाते की रतिब असतो त्याबद्दल :
कविता ही काही क्षणात येते आणि लेख लिहायला वेळ लागतो त्यामुळे कविता भरमसाट येतात. पण एका कवीने ही कीती कविता टाकाव्यात हे कळले पाहिजे. तरीही मी असा आक्षेप घेत नाही . पण तो जर रोज रोज २-३ कविता टाकत असेन तर तो इतरांच्या कविता का वाचुन रिप्लाय देत नाही..? त्यामध्ये असमर्थता का ? जर आपले लिखान/कविता इतरांनी वाचावे असे वाटत असेन तर इतरांचे लिखान वाचण्याची लायकी आपल्यात हवीच हवी. (फक्त वाचक असे नाहि प्रतिसादक असा अर्थ घ्यावा)

कवितेच्या थ्रेड बद्दल असे बघितले तेथील कवीच इतरांच्या कवितेला रिप्लाय्देत नाही .. तर मग उगाच येणार्या त्यांच्या कविता ह्या त्रासदायक आहेत.. याला एक अपवाद आहे.
प्रकाश जी रोज एक कविता देत होते तरीही त्यांचे रिप्लाय सगळ्यांना होते. तर त्यांना अधिकार आहे, त्यांचे लेखन देण्याचा.

असो हे सर्व वयक्तिक आहे.. स्वता तारतम्य बाळगावे बस्स
मी स्वता बरेच रिप्लाय देतो म्हणुन रोज कविता/लेख पाडणे मला स्वताला आवडत नाही.. आपले लिखान हे आपल्या भावनांचे .. विचारांचे प्रामाणिक प्रतिबिंब असावे असे मला वाटते. उगाच रिप्लाय .. प्रसिद्धी साठी रतिब हे चुकीचे आहे.

अतिअवांतर :
सध्या खुप बिझी आहे, त्यामुळे रिप्लाय कमी/बंद झाले आहेत.. आणि त्याचबरोबर माजेह थ्रेड ही कमी झालेत ( तसेही ते कमीच असतात) जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा चांगल्या कवितांना/लेखांना पुन्हा वाचुन काढण्यात येइन

मृत्युन्जय's picture

10 Jun 2011 - 2:32 pm | मृत्युन्जय

पण तो जर रोज रोज २-३ कविता टाकत असेन तर तो इतरांच्या कविता का वाचुन रिप्लाय देत नाही..? त्यामध्ये असमर्थता का ? जर आपले लिखान/कविता इतरांनी वाचावे असे वाटत असेन तर इतरांचे लिखान वाचण्याची लायकी आपल्यात हवीच हवी. (फक्त वाचक असे नाहि प्रतिसादक असा अर्थ घ्यावा)

पुर्ण अनुमोदन

नरेशकुमार's picture

10 Jun 2011 - 3:31 pm | नरेशकुमार

मि काही लेख वाचतो आनि झोपेत विसरुन पन जातो. दुसर्या दिव्शी मला सगळंच नविन असतं.

तिमा's picture

10 Jun 2011 - 6:30 pm | तिमा

टंकू द्यात की पाहिजे तेवढे! आपल्यालाही म्हणता येईल चि.वि. जोश्यांसारखे,

पाजी पाजी कितीतरी पाजी
ज्ञानामृत सर्वांना!

लेखकाला कोणत्याही अटी घालू नयेत याच्याशी सहमत होतानाच मला प. रा. चे म्हणणेही पटते आहे.
चांगल्या लेखकांचे लेख वाचायला कोणाला नको असतील? पण तसे लेख येतातच बर्‍याच अंतराने. रात्री झोपताना सुचलेली कविता, लंचब्रेकमध्ये सुचलेला लेख, हापिसातून घरी जाताना घेतलेले फोटू यांना कितीवेळा छान म्हणणार? बरं, तसे काही ग्रेट असेल तर ठिके.......रतिबाचं दूध पाणचटच असल्याचा अनुभव आहे. हे फक्त लेखाचच नाही तर पाककृतींबाबतही असंच आहे. घरात रोज शिजणार्‍या प्रत्येक पदार्थाचा फोटू जगाला दिसलाच पाहिजे का? एखादा प्रकार स्पेशल असतो.....त्याचं ठिक आहे. मध्यंतरी आलेल्या काही पाककृतींना तर आक्षेपच घेतला पाहिजे.
याचा दुष्परिणाम असा झालाय की या गदारोळात लेख टाकायला चांगले लेखक फारसे उत्साही नसतात्.........वाट बघून टाकतात बिचारे त्यांचे लेख!;) स्वातीताईसारख्या सुगरणी त्यांच्या पाकृंच्या उत्कृष्ट फोटोंबरोबर मिपावर यायला कचरतात असे पाहिले आहे (डिट्टेलवार सांगत बसत नाही.).
एखादा विचार डोक्यात आल्यावर पाडलेले कितीतरी अधमुरे लेखन आपण पहात असतो. त्यावर येण्यार्‍या प्रतिक्रियांवरून "आता बास!" हा संदेशही मिळत असतो तरीही घोडदौड चालू राहते आणि काही काळाने हे धागे दंगा करण्यासाठी वापरले जातात. नंतर आलेले त्याच लेखकांचे चांगले लेखही फारसे वाचले जात नाहीत. ज्यानेत्याने आपापल्या लेखनातले अंतर ठरवावे. मालिकावाल्यांनी मात्र फार वेळ न लावता पटापट पुढचे भाग लिहावेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.

धमाल मुलगा's picture

10 Jun 2011 - 6:59 pm | धमाल मुलगा

>एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.

"जय हिंद जय महाराष्ट्र" कोन म्हन्नार? सबेला बोलावल्याली जन्ता? ;)

म्हणते रे बाबा!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
आता सभा संपल्याची घोषणा होत आहे........प्रत्येकानं घरी जाताना एकेक वडापाव घेऊन जाणे!

स्मिता.'s picture

10 Jun 2011 - 9:17 pm | स्मिता.

प्रत्येकानं घरी जाताना एकेक वडापाव घेऊन जाणे!

पण इथे तर मिसळपाव दिसतंय... आम्हाला काय, मिसळपाव घेऊन जातो! खायला मिळाल्याशी कर्तव्य ;)
भाषण पटले हे वे सां न ल

विकास's picture

10 Jun 2011 - 8:08 pm | विकास

जय मिसळ जय पाव! ;)

नरेशकुमार's picture

11 Jun 2011 - 7:38 am | नरेशकुमार

एक घाव वडा पाव
दोन घाव मिसळ पाव
देवा मला पाव.
.
.
माझी ताजि ताजि तिरोळी

विजुभाऊ's picture

11 Jun 2011 - 7:54 am | विजुभाऊ

एक घाव वडा पाव
दोन घाव मिसळ पाव
पोटात कावळे काव काव
देवा मला पाव.

ही तर तीनोळी झाली.
यात एक ओळ अ‍ॅड कर
एक घाव वडा पाव
दोन घाव मिसळ पाव
पोटात कावळे काव काव
देवा मला पाव

विकास's picture

10 Jun 2011 - 8:06 pm | विकास

नीलकांत, पिडांशी सहमत.

(पिडां: भेंडीची भाजी मला कधीही शिळीच वाटते. ;) )

काही मुलभूत नियम आणि सभ्यतेचे निकष लक्षात ठेवून मिपा हे एकंदरीत मुक्त संस्थळ आहे. ते चालू करताना तसा उद्देश होता आणि आजतागायत, एकंदरीत तो तसाच राहीला आहे असे वाटते. स्वातंत्र्य हे सर्वांनीच सारखे उपभोगायचे ठरले की स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीपण येते. जर एखादा लेख आवडला नाही अथवा मते पटले नाहीत म्हणून त्यात या मर्यादा पा़ळून पण सहभागी होत वाद घालता येतो अथवा त्या लेखकास नामोहरम करणारे प्रतिसाद देखील दिले जाऊ शकतात. पहीला चॉईस अर्थातच श्रेयस्कर आहे. दुसरा चॉईस हा जर प्रतिसादकर्ता स्वातंत्र्य म्हणून वापरायला लागला आणि त्याचा परीणाम हा संस्थळावर लेखनात सक्रीय असणार्‍या सभासदांवर होऊ लागला तर ते अयोग्य ठरते. असे वाटते. कारण शेवटी संस्थळ हे तिथे येणार्‍या आणि सहभागी होणार्‍या सभासदांवरच चालणार/मोठे होणार. तेच जेंव्हा कधीकधी धाग्यात विषयांतराने गाडी घसरू लागते या संदर्भात...

अजून एक विचार करता येऊ शकतो की आपण काय वाचायचे आणि कशावर कॉमेंट करायची ह्यावर देखील आपण निवड करू शकतो. आपण कशाला प्रत्येकाचे ट्रॅकींग करायचे? जर एखादा लेख चांगला नसेल आणि त्याला प्रतिसाद केले नाहीत तर आपोआप खाली जाईल की निघून. नाहीतर मग लेखकांवर दिवसाकाठी किती लेख पाडायचे ह्यावर मर्यादा तशाच ओळीने एखादा सभासद कितीवेळा टिका करू शकेल यावर देखील मर्यादा आणि पुढे प्रत्येक सभासदाने किती प्रतिसाद टाकले याचे कोणीतरी ट्रॅकींग करणार...

बाकी या संदर्भात अजून एक: बिरूट्यांनी या संदर्भातील आधीच्या (नीलकांतच्या) धाग्यात म्हणल्याप्रमाणे उगाच जयंत्या मयंत्याचे धागे पण काढू नयेत असे वाटते. गांधीजयंती, सावरकर जयंती, टिळक पुण्यतिथी, वगैरे नुसते न म्हणता जर त्यावर कोणी काही त्यानिमित्ताने लेख लिहीला तर ते योग्य वाटते. नाहीतर उगाच सादर प्रणाम म्हणत बसायचे, हे काही पटत नाही. (आत्ताचे एकशब्द नसताना देखीलचे चांगले उदाहरण म्हणजे - शिवराज्याभिषेकानिमित्ताने मालोजीरावांनी टाकलेले फोटोज!). तेच कौलांच्या संदर्भात...

असो.

धमाल मुलगा's picture

10 Jun 2011 - 8:19 pm | धमाल मुलगा

विकासराव,
हेच जर का कळत असूनही वळलं तर प्रश्नच उरत नाही ना. आणि मग सवंग लोकप्रियतेचे काय?

आनंदयात्री's picture

10 Jun 2011 - 8:55 pm | आनंदयात्री

सहमत.

व तरूण तूर्क खरच म्हातार्‍या अर्कांना सामोरा जाइल (लेख लीहणे व प्रतीक्रियां सहन करण्याच्या बाबतीत) याची व्यवस्थापकांना जाणीव/खात्री झाली की मगच त्यांचे लेखन सर्वांना खूले करा. सगळेच खूष.

विकास's picture

10 Jun 2011 - 11:35 pm | विकास

सगळेच खूष.

असं कधी असतं का? :-)

आत्मशून्य's picture

13 Jun 2011 - 8:10 am | आत्मशून्य

एखादी डी.एन.डी. लीस्ट टाइप सूविधा द्यावी त्यात तूम्हाला नको असलेल्या व्यक्तीना अ‍ॅड करता येइल, झालं ... तूमच्या डी.एन.डी. लीस्ट मधील लोकांचे लेख तूमच्या पानावर दीसणार नाहीत.

गवि's picture

13 Jun 2011 - 8:18 am | गवि

jhakas Idea. +1000

भडकमकर मास्तर's picture

11 Jun 2011 - 12:20 am | भडकमकर मास्तर

आम्हास भेंडीची भाजी आवडते... पण ड्राय हवी.. ती कस्ली ग्रेवी करून, ताकातली , लस्सीमधली वगैरे वाईट लागते असे आमचे वैयक्तिक मत आहे.....

नरेशकुमार's picture

11 Jun 2011 - 7:43 am | नरेशकुमार

मी ग्रेवी वालं काहिहि चालवुन घेतो.

नरेशकुमार's picture

11 Jun 2011 - 7:46 am | नरेशकुमार

किति अंतर पायजे काहि फायनल झाले असे तर कोनितरी सांगा.
लेखन तय्यार आहे.

सूर्यपुत्र's picture

12 Jun 2011 - 11:03 am | सूर्यपुत्र

आपले लेखन स्वःतापेक्षा दुसर्‍यांना जोपर्यंत आवडत आहेत, तोपर्यंत रतीब घातला तरी चालेल; पण तक्रारीचा सूर वाढला, तर... ;)

-सूर्यपुत्र.

शिल्पा ब's picture

12 Jun 2011 - 11:39 am | शिल्पा ब

तुम्ही का हो थांबवलेत तुमचे लेख?

टारझन's picture

12 Jun 2011 - 11:48 am | टारझन

त्यांचा रतिब कधी सुरु होता ?

- ओ'बामापत्र

अहो प्राणप्रिय, त्यांनी एवढा प्रतिसाद लिहिलाय वरती म्हणुन विचारलं. बाकी सुर्यपुत्र असल्या कारणाने त्यांची लेखणी विरोधकांना जाळुन टाकु शकेल का असा एक विचार मनात येउन गेला. पण मग ते स्वता:च नाव कसं लिहीतात ते पाहीलं. ;)

सूर्यपुत्र's picture

14 Jun 2011 - 10:57 am | सूर्यपुत्र

तुम्ही तुमचे लेख थांबवले म्हणून.... :)

-सूर्यपुत्र.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jun 2011 - 4:55 am | निनाद मुक्काम प...

दोन लेखांमधील अंतर... हा प्रश्नच गैरलागू आहे .
एखादा सकस लिखाण करतो तर भले त्याने रोज लेखांचा रतीब पाडला तरी वाचक त्याला प्रतिसाद देतात व .एखादा टुकार लिहित असेल तर मग त्याने महिन्यातून एकदा लिहिले किंवा नाही लिहिले तरी वाचकांना फरक पडत नाही .अनेक सदस्य हे स्वतःच्या ब्लॉगवरुन मिपावर वाचनाचा रतीब टाकतात ह्यात गैर काय आहे हेच मुळी मला समजत नाही .( स्वतःचे लिखाण कुठेही प्रकाशित करायला कुणाची परवानगी कशाला हवी? ) एका उदाहरण एकेकाळी डेविड धवन चे गोविंदा सोबत सिनेमे हिट जायचे म्हणून त्यांनी वर्षभरात सिनेमाचा रतीब टाकला . ( बहुसंख्य प्रेक्षकांनी सिनेमे डोक्यावर घेतले )
तेव्हाच मणी चा बॉंबे आला . त्याला हि रसिकांनी उचलून धरले .( तेव्हा सिनेमाचा प्रेक्षक असो नाहीतर मिपाचा वाचक तो सुज्ञ आणि सुजाण आहे .त्यामुळे दर्जेदार लेखन अथवा सिनेमा नेहमीच उचलून धरले जाते .) उद्या अरमान कोहिली किंवा सुनील शेट्टी ह्यांनी आमीर सारखे वर्षभरातून एकच सिनेमा करायचा ठरवला म्हणून काही प्रेषक त्यांच्या सिनेमांवर उडी टाकणार नाहीत .)

दुसरा मुद्दा म्हणजे एखादे लेखन दर्जेदार किंवा सकस आहे हे कुणी ठरवायचे ?
एका मिपाकराला जर एखाद्याचे लेखन आवडले नाही तर त्याने सर्व मिपाकरांच्या वतीने ते लेखन भिकार आहे अश्या थाटात का प्रतिसाद द्यावे हेच मला काळात नाही .व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या उक्तीनुसार आपल्याला जे आवडले नाही ते कदाचित इतरांना आवडले असण्याची शक्यता असते .
किंवा आपल्याला जर एखादे लेखन आवडले नाही तर ते दर्जेदार असू शकत नाही असे म्हणणे पोरकट पणाचे ठरते .
अवांतर ( चित्रकला हि एक उत्कृष्ट कला आहे .पण मला त्यातले ओ का ठो कळत नाही .एवढ्यासाठी जर मी ह्या कलेला दूषण दिले तो माझा कर्म दरिद्री पणा ठरेल . .तस्मात आपण जेव्हा एखाद्याच्या लेखनावर टीका करतो तेव्हा आपण स्वतः अत्रे आणि देशपांडे किंवा कुलकर्णी नाही आहोत . ह्याचे भान बाळगणे गरजेचे आहे . आपल्याला जर एखाद्याचे लिखाण आवडले नाही तर त्यावर लिहिणे शक्यतो टाळावे .
उगाच माधव आपटे च्या थाटात मिपावरील सर्व भिकार लेखनाचा पंचनामा करण्याचा नैतिक अधिकार स्वतःला आहे किंबहुना ह्यासाठी मिपावर आपण अवतार घेतला आहे .अश्या भ्रमात उठसुठ
टीकेचे शाब्दिक फुलोरे फुलवू नये असे माझे मत आहे .( व्यनी आणि खरडवही ह्यांचा वापर करावा. )

शिल्पा ब's picture

18 Jun 2011 - 6:22 am | शिल्पा ब

बै बै !!! कधी आलात? आठवण यायची हो तुमची.
<<<टीकेचे शाब्दिक फुलोरे फुलवू नये असे माझे मत आहे .( व्यनी आणि खरडवही ह्यांचा वापर करावा. )

बाकी व्यनी किंवा खरड केली तरी तुम्ही त्यांचा धागा काढता त्याचे काय? एक आपलं समोर दिसलं म्हणून विचारलं इतकंच.

अवांतरः टीकेचे शाब्दिक फुलोरे वगैरे छान शब्द.

आत्मशून्य's picture

18 Jun 2011 - 6:49 am | आत्मशून्य

हा हा हा.

टारझन's picture

18 Jun 2011 - 9:13 pm | टारझन

बै बै !!! कधी आलात? आठवण यायची हो तुमची.

आगायायाया =)) =)) मार्मिक टिपण्णी :) हळवा झालो

-

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार

बै बै !!! कधी आलात? आठवण यायची हो तुमची.

=)) =))

भिकार लेखनाला मुकले होते मिपा.

Nile's picture

18 Jun 2011 - 5:59 pm | Nile

भिकार लेखनाला मुकले होते मिपा.

अधोरेखित शब्द वाक्यात अस्थानी वाटतो. त्याऐवजी दुसरा योग्य शब्द योजावा असे 'प्रवक्त्यांना' 'सुचवतो'. ;-) आम्ही सुचवला असता, पण साली आपली जबान कधी सीधी चालेल तर ना! नंतर उगाच रडा-रड होऊन संपादकांना रुमाल घेऊन यावं लागायचं म्हणून सूचवत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

Nile दादा,

आम्ही फक्त (स्वयंघोषीत )सामान्य प्रवक्ते . त्याच्यापुढे जाऊन सुचवा सुचवी करणे तुमच्यासारखी आम्हाला शक्य नाही ..( तुमचेच एकेकाळी न-केलेले विधान आहे .)

हागणदारी हा शब्द आम्हाला सूचला होता, पण उगाच सभ्यतेचा राडा होऊन व्यवस्थापकांना पेश्शल आमच्यासाठी कष्ट घेउन निलंबनाचे धागे काढायचा त्रास होऊ नये म्हणून सूचवला नाही. ;-)

बाकी शेळीच्या लेंड्यांसारखे पुर्णविराम इतरस्त विखुरलेले असताना तो शब्द समर्पक नाही असे कोणी म्हणले तरच आश्चर्य! ;-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jun 2011 - 3:53 pm | निनाद मुक्काम प...

ब ताई.
आम्ही फक्त (खायची प्यायची मैत्री ) करणारे सामान्य मिपाकर .त्याच्यापुढे जाऊन मैत्री करणे तुमच्यासारखी आम्हाला शक्य नाही ..( तुमचेच एकेकाळी गाजलेले विधान आहे .)
म्हणून आमच्या वतीने, बाजुने कुणी फारसे लिहिणारे नाही .म्हणुनच खरडवही किंवा व्यनी मधून विंग्रजीत आपण जी मुक्ताफळे आमच्यावर उधळली त्यावर पूर्वी एक लेख पाडल्याचे स्मरते .

बाकी राजकुमारांना आमचे लेखन भिकार वाटते .पण ते भिकार आहे हे कळण्यासाठी ते ते वाचतात हे महत्वाचे .
मागे एकदा निलीकांत ह्यांना उद्देशून एका प्रतिसादात राजकुमारांनी स्वतःचे लेखन हे वाल्मिकी सारख्या महान लोकांसारखे महान नाही आहे ह्याची त्यांना जाणीव आहे असे लिहिल्याचे स्मरते .
बाकी राजकुमार स्वतःला स्वयंघोषित संपादक समजतात .म्हणून नवीन मिपाकराला नवीन लेखात कीती अंतर ठेवावे हे जाहीररीत्या सुनावतात. ( ह्यासाठी खास नियमावली बनविल्याचे ऐकिवात आहे .)

आणी आता तर ''संपूर्ण मिपा हे आमच्या भिकार लेखनाला मुकले'' असे एकट्याने जाहीर केले आहे .( ते मिपाचे स्वयं घोषित प्रवक्ते आहेत ही नवीन माहिती कळाली .)
उद्या राजकुमारांनी स्वयं घोषित मिपावर मालकी हक्क गाजवला तर त्यात मला नवल वाटणार नाही .

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी राजकुमारांना आमचे लेखन भिकार वाटते .पण ते भिकार आहे हे कळण्यासाठी ते ते वाचतात हे महत्वाचे .

छ्या ! अहो वाचायला कशाला हवे ? लेखकाचे नाव बघितल्या बरोब्बर लेख उघडायची इच्छा झाली नाही कि समजायचे लेखन भिकार आहे.

मागे एकदा निलीकांत ह्यांना उद्देशून एका प्रतिसादात राजकुमारांनी स्वतःचे लेखन हे वाल्मिकी सारख्या महान लोकांसारखे महान नाही आहे ह्याची त्यांना जाणीव आहे असे लिहिल्याचे स्मरते .

हो मग. अहो वाल्मिकींसारखे नाहीये, पण निदान तुमच्यासारखे देखील नाहीये हे कमी सुख आहे का ?

बाकी राजकुमार स्वतःला स्वयंघोषित संपादक समजतात .म्हणून नवीन मिपाकराला नवीन लेखात कीती अंतर ठेवावे हे जाहीररीत्या सुनावतात. ( ह्यासाठी खास नियमावली बनविल्याचे ऐकिवात आहे .)

अहो नुसते इथेच नाही काही, मी तर काही लोकांना फोनवर पण सुनावले आहे ;) ते पण त्या बिचार्‍यांनी मला फोन केलेला असताना. आता बोला.
पण कसे आहे ना, की सुचवणुकीचा फायदा व्हायला हवा ना :) आता काही लोकांना आडून आडून किंवा स्पष्टपणे सुचवले तरी ते समजुनच घेत नाहीत त्याला काय म्हणायचे ? (आता 'माकड म्हणते माझीच लाल' असे म्हणता येईल म्हणा, पण नकोच)

आणी आता तर ''संपूर्ण मिपा हे आमच्या भिकार लेखनाला मुकले'' असे एकट्याने जाहीर केले आहे .( ते मिपाचे स्वयं घोषित प्रवक्ते आहेत ही नवीन माहिती कळाली .)

तुम्हाला न कसली माहितीच नसते. मग हे असे रोज नवे नवे शोध लागतात. कसे आहे ना, कधी कधी इतरांचे लेखन वाचायला, प्रतिसाद द्यायला, निदान जगात आपल्याशिवाय देखील दुसरे लिहिणारे आहेत (आणि त्यांना वाचणारे देखील आहेत) हे स्विकारुन जे जे मिपावर आले त्यांना त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. पण तुम्ही स्वयंभु असल्याने...

असो...

उद्या राजकुमारांनी स्वयं घोषित मिपावर मालकी हक्क गाजवला तर त्यात मला नवल वाटणार नाही .

अरे आहेच मी मालक :) प्रत्येक मिपाकर मिपाचा मालक आहे. (नीलकांतने चपला देईपर्यंत)

आणि मिपावर कोण काय गाजवतय ते बघायला मालक आणि संपादक मंडळ समर्थ आहे. तुम्हाला कोणाच्या हक्का बद्दल काय नवल वाटते ह्यानी शाट फरक पडत नाही. जे काय बोलायचे ते माझ्या लेखना संदर्भात बोलायचे, उगा मिपा आणि त्याची मालकी वैग्रे मध्ये आणण्याचे काम नाही. :) हिशेबात राहायचे आणि जागी खेळायचे.

आजवर मी फक्त आणि फक्त तुमच्या लेखनासंदर्भात माझी मते प्रदर्शीत केलेली आहेत. तुमचा मिपावरचा वावर, तुम्ही प्रवक्ते आहात का मालक आहात ह्यावर मी कधी वैयक्तिकरीत्या काही बोलल्याचे स्मरत नाही. पुन्हा वैयक्तिक पातळीवर घसरु अशी नम्र विनंती आहे.

बाकी अजुन काही वाद-प्रतिवाद असतील तर खरडवहीत करु :) इथे दंगा नको.

आणि हो ते नीलकांत आहे बरं का.

माझीही शॅम्पेन's picture

18 Jun 2011 - 6:43 pm | माझीही शॅम्पेन

:( मला अस वाटताय इथे (ह्या धाग्यावर) मत काय मांडलाय पेक्षा ते कोणी मांडलाय ह्या वर प्रतिक्रिया येता आहेत. असो

(मी शांती-दूत इत्यादी काही नाही) परंतु वर जो काही वाद चाललाय तो अस्थानि वाटतोय !!! माझ्या सारख्या सामान्य मीपाकराला तुमच्या सर्वांचेच लेखन प्रचंड आवडते मग उगा वैचारिक गोंधळ आणि रक्तबांबाळ शाब्दिक मारामारी कश्या साठी ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jun 2011 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...

@आजवर मी फक्त आणि फक्त तुमच्या लेखनासंदर्भात माझी मते प्रदर्शीत केलेली आहेत.

सुरवातीच्या काळात आपण माझ्या मिपावरील लेखनाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मग मात्र पुण्यातील एका प्रसिद्ध गोष्टीसाठी आपल्या काही जवळच्या मित्र मंडळींच्या सांगण्यावरून आपल्या प्रतिक्रियेतून आमचे लेखन तुम्हाला चक्क भिकार वाटायला लागले .( आपले हे मतपरिवर्तन असे अचानक का झाले? व कश्यासाठी ? ह्याचे उजळणी परत नको .)
आपले विदुषकी चाळे जुन्या जाणत्या मिपाकरांना चांगलेच माहीत आहेत .( दुर्दैवी विलास म्हणजे ज्यांच्याविषयी आपण राळ उडवली त्यांच्या सहवासात आपणस दिवस काढावे लागत आहेत .)
असो माझे लिखाण भिकार आहे की चांगले ह्याबद्दल आपले मत ह्या लेखात देऊन अवांतर करण्याचे प्रयोजन काय होते .( माझी प्रतिक्रिया लेखातील मुद्याला धरून होती )
ही माझी ह्या लेखातील शेवटची प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

18 Jun 2011 - 9:27 pm | शिल्पा ब

है शाब्बास!! आता कसं!!
आमच्या प्राणप्रिय मैत्रीवर तुमचा का रोष? बाकी आमचं कोणीतरी प्राणप्रिय आहे याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही तुम्हाला अशाच काही जाणीवा करून देऊ लागलो तर लग्गेच कसा राग येईल तुम्हाला. भारीच कोपिष्ट बै तुम्ही. बघा तुम्ही आल्याने या धाग्यावारचे प्रतिसाद कसे पटदिशी वाढले ते.

(बाकी तुम्हाला आधी खरोखरीच गंभीरपणे काही सांगितलं तर तुम्हाला ते पचनी पडलं नाही...त्यापेक्षा अशी राळ उडवून घेणे अन सगळ्यांचे टोमणे ऐकणे तुम्हाला जास्त आवडते हे समजून चुकलो आहोत. वैयक्तिक टीका करुन मग पुन्हा रडारडी करावी तर ती तुम्हीच. तुमच्यासारखं इथे कोणीच नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jun 2011 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...

@मला अस वाटताय इथे (ह्या धाग्यावर) मत काय मांडलाय पेक्षा ते कोणी मांडलाय ह्या वर प्रतिक्रिया येता आहेत. असो
+ १