भ्रष्टाचार आणि सामान्य व्यक्ती. काय धोरण असावे?

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
8 Jun 2011 - 11:09 am
गाभा: 

नेहमीप्रमाणेच बुचकळ्यात पडलोय. (थोडक्यात अ‍ॅज युज्वल कन्फुझ्ड)

भ्रष्टाचारावर चाललेली/ल्या चर्चांना ऊत आलाय. नेहमीप्रमाणे कुणाला विरोध करण्याचा हक्क आहे, नाही, कोण काळा पैसा जनरेट करतो, कोण त्यात कसा सहभागी आहे, अमुक तमुक इ.इ.इ.

मुद्दा असा आहे :

माझ्या मते मी भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही.

थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी, काम झटपट करण्यासाठी, कामाची रक्कम वाढवण्यासाठी, झालेले/ दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे, भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो. अर्थात मी स्वतः कुणाला मागायच्या भानगडीत पडत नाही, लोकांनी आडून अथवा थेट विचारले तरी त्याचं योग्य प्रकारे उत्तर देऊन अशा गोष्टी टाळतो. क्वचित एखाद्या व्यक्तिबरोबर जवळचे/ मैत्रीचे संबंध झाले असतील त्यांच्याबरोबर जेवण वगैरे होते ;) मात्र त्याला आधी/ नंतर स्वखर्चाने माझ्यातर्फे त्याचप्रकारे जेवण वगैरे होते. ( घेतल्यापेक्षा दिलेली रक्कम जास्त)

लाच द्यायला माझी ना नाही (कॅल्क्युलेटेड आणि काही अटींवर) :

काही वर्षापूर्वी मी याच जागी टेबलाच्या विरुद्ध /दुसर्‍या बाजूला काम करत होतो. तिथे माझ्या झालेल्या कामाचे बिल लवकरात लवकर पास व्हावे म्हणून मी समोर काम करणार्‍या व्यक्तिला/ व्यक्तिंना सर्व प्रकारे नाही तरी बव्हंशी खूष ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझी रक्कम लवकरात लवकर कशी हाती येईल याचा विचार करत होतो. ती /त्या व्यक्ती याला आक्षेप घेत नव्हत्या. माझे काम लवकर होत होते.

अर्थात आजही मी कुणी मला काही देण्याचा प्रयत्न करत असला अथवा नसला तरी एखाद्याचे काम मुददाम अडकवणे, लटकवणे असे प्रकार करत नाही.

इतर बाबतीतही माझे वैयक्तिक काम देखील लवकर पूर्ण व्हावे म्हणून थोडाफार खर्च करण्याची माझी कॅल्क्युलेटेड तयारी (वेळ, पैसा, शक्ती जास्त कुठे वाचू शकेल) असते.

मी करतोय ते बरोबर करतोय असे मला वाटते. आपले काय मत आहे?

डिस्क्लेमरः लाच द्यायला होकार आहे असे मी फक्त म्हणतोय.
(लाच देणेसुद्धा गुन्हा आहे ना! ;) )

प्रतिक्रिया

मित्रा.. लाच मागणे, घेणे यामागे अडवणूकच असते. द्यायची तर द्या नाहीतर काही हरकत नाही, मी तरीही करतो तुमचं काम वेळेतच.. असं कोणी म्हणत नाही. तसं म्हटलं तर कोण पैसे देणार?

त्यामुळे लाच घेणे हा जबरदस्तीचा व्यवहार आहे. त्या केसमधे लाच देणार्‍याची काही चूक नाही.

पण सक्रिय भ्रष्टाचार, अर्थात आपण कोणालातरी अप्रोच होऊन आपल्याला अ‍ॅप्लिकेबल नसलेला लाभ /पुरस्कार / जमीन / सवलत मिळावी म्हणून ऑफर देऊ करणे हा सरळसरळ दुरित आहे.

त्याखेरीज अन्यत्र म्हटल्याप्रमाणे विनापावती व्यवहारातून छोट्या पॅकेटसमधे पण खूप मोठा काळा पैसा उभा राहतो.

मी खाली काही प्रश्न देतो. त्याची स्पेसिफिक उत्तरे सर्वांनी इथे किंवा मनाशी दिल्यास हे स्पष्ट होईल.

१) हॉटेलमधे / रिजॉर्टमधे रूम घेताना रिसेप्शनवरचा मॅनेजर म्हणाला की साहेब रिसीट हवी असेल तर साडेतीनशे जास्त पडतील. सर्व्हिस टॅक्स. तर अशा वेळी आपण काय म्हणाल ?

अ."राहू दे हो रिसीट. काय करायचीय ती मला?"
ब."नाही नाही. मला रिसीट हवी. तीही रीतसर, एसटी नंबरसहित. (आणि तुम्हीसुद्धा सरकरला हा टॅक्स भरलाच पाहिजे बरं का मॅनेजरसाहेब. हे मनात)"

२) क्रेडिट कार्ड स्वाईप केलेत तर दोन टक्के सर्व्हिस चार्ज पडेल साहेब, असे कोणी म्हटले (असा चार्ज केवळ कार्ड वापरले म्हणून लावता येत नाही) त्यापेक्षा कॅशच द्या ना साहेब.. ("कॅश" चा अध्या‍हृत अर्थ बेहिशेबी पैसा)

तर आपण काय म्हणता / म्हणाल.

अ. कार्ड स्वाईप करण्यासाठी असे पैसे एक्स्ट्रा घेता येत नाहीत. मी "व्हिसा" कडे तुमची तक्रार करीन.
ब. ठीक आहे. करा कार्ड स्वाईप
क. जवळचे एटीएम कुठे आहे. कॅशच देतो च्यायला..

३) तुम्ही फ्लॅट विकता आहात. फ्लॅटची मार्केट किंमत तीस लाख आहे. तर

अ.तुम्ही समोरच्या पार्टीसोबत केलेल्या सेलडीड /अ‍ॅग्रीमेंट मधे बरोब्बर तीस लाख लिहिलेले असतात.
ब त्यात पंचवीस लाख लिहिलेले असतात आणि रजिस्ट्रारसमोर पंचवीसच बोलायचं असं सगळ्या संबंधितांना सांगितलेलं असतं. उरलेले पाच लाख तर टोकन घेतलंय यार.. "कॅश"मधे.

४) तुम्ही फ्लॅट खरेदी करता आहात. (रिसेलमधे) त्यामुळे काही बिल्डर म्हणतात तशी १००% चेक पेमेंट सुविधा इथे नाही. मूळ मालक म्हणतो की चाळीस लाख कागदावर आणि दहा लाख हातात. अशा वेळी तुम्ही काय म्हणाल

अ. ठीक आहे. जशी तुमची इच्छा. करतो अरेंज.
ब. नको मला असे डील. शंभर टक्के रक्कम कागदावर दाखवा नाहीतर राहू दे. क्षमस्व. (फ्लॅट आवडलेला आणि बाजारभावापेक्षा थोड्याशा कमीच किंमतीत मिळत असला तरी)

मृत्युन्जय's picture

8 Jun 2011 - 11:50 am | मृत्युन्जय

मी काळा पैसा म्हणजे केवळ भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेला पैसा असे गृहीत धरतो. लाच देणे हा गुन्हा आहे हे मला मान्य. पण केवळ स्वखुषीने दिली तर. इतरवेळेस त्याला गुन्हा मानावे असे मला वाटत नाही.

उदाहरणच द्यायचे तर लाच न दिल्यामुळे अडकलेले अनेक पासपोर्ट्स मला महिती आहेत. लाच दिल्यानंतरच काम झाले. काही केसेस मध्ये लाच न देताही झाले. इथे लाच न द्यावी लागलेला माणूस म्हणेल की लाच न देता काम होते म्हणजे लाच देणारे गुन्हेगार. ते मला मान्य नाही.

गविंचे क्रेडिट कार्डचे उदाहरण मला मान्य नाही. क्रेडिट कार्डवरच्या बिलासाठी २% जास्त पडतील अश्या उघडउघड पाट्या कैक दुकानात दिसतात. त्यांना काय २% जास्त द्यायचे काय? त्यापेक्षा रोखीने केलेला व्यवहार बरा पडतो. पावती घेतली की झाले.

पेट्रोल पंपावर पावतीसाठी थांबण्या ऐवजी पेट्रोल भरुन सटकणे बरे पडते. हा भ्रष्टाचार आहे असे मला वाटत नाही.

आजकाल बर्‍याच फ्लॅट्सचे सौदे मूळ किंमतीवर होतात. बिल्डर्सदेखील कॅश मागत नाही आहेत. त्यामुळे कालांतराने हा प्रॉब्लेम कमी होइल असे वाटते,

क्रेडिटकार्डने पेमेंट करण्याऐवजी कॅशने करावे यासाठी केलेला हा डिसैन्सेंटिव्ह असतो. आणि नंतर पावती रीतसर घेतली तर ठीक हे तुमचे म्हणणे पटले. पण बहुधा ती तशी दिली / घेतली जात नाही.

फ्लॅटच्या किंमतींविषयी तुम्ही म्हणता तसे घडते आहे हे ऐकून बरे वाटले.

रूट कॉज असे आहे की आपल्याला उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो हीच एक लूट किंवा "तोटा" आहे अशी आपली साधार समजूत झाली आहे.

"पगार" या उत्पन्नावर तर (जबरदस्तीने !!! :) ) टॅक्स कापूनच तो हातात येतो.

मग अन्य मार्गाने पैसा (उदा. घरविक्रीतून) मिळाला आणि तोही पूर्ण व्हाईट, तर संपूर्ण रकमेवर (उत्पन्न समजून) जबरी टॅक्स बसेल ही जाणीव सामान्यजनांना जास्त अस्वस्थ करते. कारण आपण तेवढा प्रामाणिकपणे (?) टॅक्स भरायचा आणि अनेक मोठ्ठेमोठ्ठे मंत्री, नट, उद्योजक मात्र टॅक्सचोरी करतात. अनेकजण संपत्ती न दाखवता टॅक्स चुकवतात हा कोणता न्याय..? असे मनात येत असणार.

आपण नोकरदार वर्गच काय तो टॅक्स भरतो आणि त्यामुळेच आपली लूट होते आहे अशी काहीशी समजूत सर्वसामान्य नोकरदार टॅक्सपेयरची होते.

त्यामुळे आपण इतका टॅक्स भरतो तर निदान पाचेक लाख "असेच" घेतले तर काय बिघडेल्..तेवढीच "बचत" असा विचार दृढ झाला असावा.

इथे आप्पा जोगळेकर यांच्या अन्यत्र आलेल्या एका प्रतिसादातील सिस्टीमचा दोष दिसतो. (टॅक्सचे सदोष कलेक्शन)...

सुनील's picture

8 Jun 2011 - 12:32 pm | सुनील

गविंचे क्रेडिट कार्डचे उदाहरण मला मान्य नाही. क्रेडिट कार्डवरच्या बिलासाठी २% जास्त पडतील अश्या उघडउघड पाट्या कैक दुकानात दिसतात. त्यांना काय २% जास्त द्यायचे काय? त्यापेक्षा रोखीने केलेला व्यवहार बरा पडतो. पावती घेतली की झाले.

तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डावर १०० रुपयांची वस्तू विकत घेता तेव्हा दुकानदाराला बँकेकडून/क्रेडिट कार्ड कंपनीकडून १०० रुपये मिळत नाहीत तर, कमी मिळतात (भारतात ही रक्कम जास्तीत जास्त ३% कमी असते). म्हणून काही दुकानदार हे होणारे "नुकसान" भरून निघण्यासाठी/कमी करण्यासाठी २% रक्कम जादा आकारतात.

गवि's picture

8 Jun 2011 - 12:41 pm | गवि

या रकमेविषयी क्रेडिट कार्डचे यंत्र आणि गेटवे सुविधा घेण्यापूर्वी दुकानदारांना स्पष्ट कल्पना असते. नशापाणी न करता अक्कलहुशारीने त्यांनी ते स्वीकारलेले असते. अनेक ठिकाणी मोठ्या रकमेवर (४-५ हजार) सुद्धा हे "चार्जेस" गिर्‍हाईकाला लावले जातात.

नसेल परवडत तर नका असली सिस्टीम घेऊ.. घेऊन मग डिस्करेज कशाला करता? क्रेडिट कार्ड सुविधा दुकानात असल्याने अधिक गिर्‍हाईक, अधिक किंमतीची खरेदी ("स्पेंड मनी दॅट यू डोंट पझेस" लॉजिकने होणारी एक्सेस खरेदी), स्टेटस असे अनेक फायदे असतात म्हणूनच ही पेमेंट सिस्टीम घेतली जाते.

म्हणजे परवडेल तेव्हा ही सिस्टीम हवी आणि छोट्या खरेदीला मात्र नको. हा कसला सोयीस्करपणा ? विक्रीतल्या मार्जिनचे काय?

Nile's picture

8 Jun 2011 - 2:22 pm | Nile

नसेल परवडत तर नका असली सिस्टीम घेऊ.. घेऊन मग डिस्करेज कशाला करता?

विच काँप्रोमाईज इज बेटर? २% जास्त आकार पडेल पण क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकता ही सोय ग्राहकाला देणे (आणि त्यामुळे असा एखादा रोख नसलेला ग्राहक परत जाऊ न देणे) हे जास्त योग्य नाही का?

गवि's picture

8 Jun 2011 - 3:49 pm | गवि

सध्या या विषयाची व्याप्ती क्रेडिट कार्ड मशीन आणि सुविधा दुकानात ठेवावी की नाही आणि त्यातले फायदे तोटे अशी न वाढवता एवढेच म्हणू, किंवा म्हणतो.. की "कॅश" (जी पावतीशिवाय देणेघेणे सोपे असते..कार्ड स्वाईप केले की व्यवहार आपोआप व्हाईट होतो..) या प्रकाराकडे गिर्‍हाईकाला वळवणे (एन्करेज करणे), आणि कार्डचा वापर करण्यास डिस्करेज करणे यासाठी ही अधिकची २ किंवा ३ टक्के रक्कम (जी खरंतर कायदेशीर नाहीच आहे) तिचा वापर डिसइन्सेंटिव्ह म्हणून केला जाऊ नये.

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 12:00 pm | रणजित चितळे

ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते. लाचखोरी करुन कोणाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी मला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असता व हा निर्णय आपला स्वतःचाच असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो व लाच देतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.

ब-याच वेळेला लाच घेणे किंवा देणे हे स्पर्धेतून उत्पन्न होते. म्हणजे धंद्यात होणारी प्रगती लाच खाऊन किंवा देऊन दुस-या पेक्षा जास्त लवकर होते.

हे काही सत् युग नाही. सगळेच येथे संत होऊ शकत नाहीत. व्यवस्था अशी पाहिजे की अराजक माजता कामा नये.

हल्ली चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होऊ लागली आहे. पहिली चोरी करताना कदाचित चोराला चुकचूकल्या सारखे होत असेल. पण पहिली चोरी करुन काहीच झाले नाही तर त्याला अजून एक कराविशी वाटेल. हळू हळू चटक लागेल व मग चोरी साठी चोरी करायला लागेल. ह्यालाच मग जाणिव बोधट होणे म्हटले जात असेल.

पैसा's picture

8 Jun 2011 - 12:12 pm | पैसा

माझ्या सासर्‍यांची गावाला शेतजमीन आहे. नव्या कुळकायद्याचा फायदा घेऊन एक गावगुंड त्या जमिनीवर आपला हक्क सांगतोय. त्यासाठी त्याने गावच्या तीन "प्रतिष्ठित व्यक्तीची" पत्र ग्रामपंचायतीला दिली आहेत. पोलीस तक्रार करून या प्रतिष्ठित व्यक्तीना पोलीसानी चौकशीला बोलावलं, तेव्हा त्या गुंडाला घाबरून आम्ही अशी पत्रं दिली असं या प्रतिष्ठित व्यक्ती सांगतायत. त्यांच्यात गावचा पोलीस पाटील सुद्धा सामील आहे.

आता या गुंडाने मामलेदार कचेरीत आपले नाव कूळ म्हणून लागावे यासाठी अर्ज दिलाय. जरी जमिनीचं टायटल क्लिअर आहे, आणि आजपर्यंत कुठेही या माणसाची कूळ म्हणून नोंद झालेली नाही, तरी केस आमच्या बाजूने निकालात काढण्यासाठी मामलेदार १२०००/- रुपये मागतोय. नाहीतर दर महिन्याला केससाठी फेर्‍या माराव्या लागतात, त्यासाठी माझ्या नवर्‍याला गोव्यातून गावाला जावे लागते, त्याचा खर्च आम्ही विचारात घेत नाही, कारण एवीतेवी आईवडिलांसाठी तो गेलाच असता. पण सगळ्यानाच नाहक मनस्ताप आहे.

या परिस्थितीत आम्ही काय करावं? मामलेदाराला पैसे देऊन कटकट मिटवून टाकावी, की आणखी भानगडी करून हा गुंड सगळी जमीन घशात घालील याची वाट पहावी? आजतरी माझ्या सासर्‍यांच्या वयाचा मान ठेवून पोलीस त्यांची बाजू घेतायत, पण उद्या पैसे खाऊन ते बाजू बदलणार नाहीत कशावरून?

या मूर्खासारख्या कूळकायद्याला विरोध कोणीच कसा करत नाही? उद्या कोणीही गावगुंड २/४ लोकाना हाताशी धरून कुठचीही जमीन घशात घालू शकेल, नव्हे, अशा केसेस होतच असतील, इथे माझे सासरे गावात रहातात आणि सारा भरून नीट पावत्या आणि सातबाराचे उतारे घेतात म्हणून हे सगळं कळलं. पण जे लोक गावात रहात नाहीत त्यांच्या जमिनी हातातून गेल्यानंतर त्याना कळत असेल. हा सरकारने स्पॉन्सर केलेला भ्रष्टाचार नाही का?

पैसाताई.. माझंही अगदी तंतोतंत अश्शाच प्रकरणात अक्षरशः जगणं हराम झालंय. अन्यत्र हीच कहाणी मी लिहीली होती. अशाच लाचविषयक चर्चेत. इथेही परत त्यातला भाग देतोय.. विशेषतः चितळेसाहेबांच्या आयडियलिस्टिक प्रतिक्रियेवर प्रतिसाद म्हणून.
.......
तीस वर्षांपूर्वी माझ्या आजोबांच्या शेतीच्या सातबार्‍यावर पीकपाणी लावायला तलाठ्यानं पैसे मागिंतले. ताठ मानेच्या आजोबांनी ते नाकारलं. त्यात आमच्या बाजूने चूक अशी होती की हार्ट ट्रबलमुळे आजोबांना एका मोसमात नवीन पीक लावायला जमलं नाही. कोरडवाहू आणि चार पावसाच्या थेंबांवर शेती येणार्‍या त्या भागात एक मोसम म्हणजे पूर्ण वर्षच. कारण इतर महिन्यांत फुफाटाच असतो.

तेव्हा तलाठ्याने कायद्यातले लूपहोल शोधले. तुमच्या जमीनीवर पीकपाणी लावतो, पैसे द्या.

तेव्हा आजोबांनी ते नाकारलं. अरे बाबा, माझ्या जमिनीवर असलेल्या पिकाची कायदेशीर नोंद करण्याचे कसले पैसे ? जेवढे थोडेफार आहे त्याची नोंद घे किंवा माझे कारण समजून घे. त्यांनी जणू याविरुध्द झगडा करायचं ठरवलं. सनदशीर मार्गानं.

तलाठ्याने पिके लावली नाहीत. जमीन पडित दाखवली गेल्यानं जप्त झाली (कूळकायदाच बरं का.. !!!).

तीस वर्षं झाली. आजोबांची कोर्ट केस खालपासून वरपर्यंत कोर्टांमधून तारखा घेत राहिली. आजोबा मयत. त्यांचे दोन्ही पुत्र मयत. तलाठी मयत. मग मयताच्या मयत मुलाचा मुलगा असा मी त्या अर्जावर अवतरेपर्यंत ही विटंबना चालूच राहिली. जमिनीवर अतिक्रमणं झाली.

तीस वर्षांनी (!!) निकाल लागला.

म्हणजे या थोर न्यायव्यवस्थेत दोन पिढ्या मयत झाल्यावर तिसर्‍या पिढीतला मी "मयत" व्हायच्या आधी का होईना आजोबांच्या त्या "संघर्षाचं" फळ मला मिळालं. जमीन परत मिळाल्याचा हायकोर्टाचा हुकूम घेऊन मी जमीन ताब्यात घ्यायला गेलो. पण विटंबना संपली नव्हती. या अगदी कायदेशीर आणि तीस वर्षांच्या सचोटीने मिळालेल्या "न्याय्"युक्त हुकूमाच्या नुसत्या अंमलबजावणीसाठी खालपासून वरपर्यंत सगळे पैसा मागायला लागले.

आता? मी पुन्हा ताठ मानेने लाच देणे नाकारु शकतो..

पण तसं केल्यास (लाच न दिल्यास) मला अजून खूप वर्षं अडकवण्यात येईल. (फाईल दोनदा "हरवून" "गहाळ होऊन" सापडली आहे..!! वारसतक्त्याचे घोळ करण्यात येत आहेत. त्यांच्याकडे कालापव्ययाची अनेक "हत्यारे" आहेत..)

किंवा पुन्हा आदर्शवाद बाळगून मी "कोर्टाच्या हुकूमाच्या अवमानाची" केस संबंधित अधिकार्‍यांवर दाखल करून मी स्वतः मयत होइपर्यंत वाट बघू शकतो. पण अवमानाच्या केसचा निकाल घेऊनही मला परत तिथेच जायचे आहे, त्यांच्या टेबलाशीच.

त्यात तीस वर्षे अजून जातील.. मग माझा मुलगा खेटे घालेल. मग नवा तलाठी माझ्या मुलाकडे पीकपाणी लावण्याचे पैसे मागेल.

एकीकडे दहावीस हजार लाचेचे आणि दुसरीकडे आयुष्यच निरर्थक ठरते आहे इतका इंबॅलन्स असताना कसली हो तत्वे? ही असमानांची लढाई आहे.

लाच देणार्‍यालाही फट्टकन "बरोबरीचा दोषी" ठरवण्यापूर्वी "लाच घेणार्‍याची" न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य बघायला नको ?

प्रमोशनसाठी बॉसबरोबर शय्यासोबत करायला तयार असलेली बाई अनैतिक. दोषी..

आणि एकटेपणाचा, अंधाराचा फायदा घेऊन अडवणार्‍या गुंडाकडून जीव वाचवण्यासाठी आणि इलाजच नाही म्हणून बलात्कार करून घेणारी बाईही बलात्कार करणार्‍याइतकीच दोषी?

असो..

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2011 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा

दिल की बात कह दी तुमने,पढकर आँख रोने लगी....मित्रा काय विदारक अनुभव आहे रे तुझा.....हे असं काही वाचलं,की मला आमच्या एका मित्राचं (एरवी न पटणारं)वचन खरं वाटायला लागतं...तो नेहमी म्हणतो---जगात सगळ्यात भयंकर व्यसन पैशाचं,त्या पुढे ईतर असुन नसल्यासारखी....

गवि's picture

8 Jun 2011 - 3:23 pm | गवि

कदाचित ही उपरोधिक प्रतिक्रिया असू शकेल. किंवा नसेल. ५० ५० % शक्यता दिसते.
याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की जमीनमालकाला (पक्षी) मला त्या पैशांचा लोभ आहे आणि त्यापायी मी एवढा त्रास करुन घेतोय.

जर असं असेल तर..

"एका बाजूला लाच आणि एकीकडे आयुष्यालाच अर्थ न राहणे" हे मी लिहून गेलो असलो तरी त्यात "आयुष्याला अर्थ" हे आयुष्याचा पूर्ण काळ जाऊनही न्याय न मिळणे, या अर्थाने आयुष्य(काल) या गोष्टीबाबतीत वाया जाणे अशा अर्थाने आहे.

जमीनप्रकरणाचा मनस्ताप बराच असला तरी त्या जमिनीअभावी आयुष्य निरर्थक होतेय असे काही म्हणायचे नाही. आयुष्यात इतर चांगल्या गोष्टीही आहेतच. तसंच त्या जमिनीतून काही फारसा पैसा अजिबातच मिळणार नसला तरी या गलिच्छ व्यवस्थेमुळे वाडवडिलांनी ठेवलेली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी असलेली जमीन मी सोडून देऊ शकत नाही. त्याला फक्त पैसा एवढेच महत्व नाहीये.

अर्थात तुमचा तसा रोख नसला तरी हे एकूणच स्पष्ट करावेसे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2011 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा

आपण सांगितलेल्या एकुण प्रकरणात,प्रतिक्रीयेचा रोख आपल्यावर अजिबात नाही,सरकारी यंत्रणा-अधिकारी,पैशाच्या व्यसनानी किती लाचार मग्रुर झालेले आहेत,यावर ती सर्व प्रतिक्रीया आहे...तरी आपल्याला तसे वाटलेले असल्यास क्षमस्व.

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 3:36 pm | रणजित चितळे

आपला हा अनूभव मी दुस-या संकेत स्थळावर वाचला होता व तेव्हाही आजच्या एवढेच वाईट वाटले होते.

नुसते वाईटच वाटले होते असे नाही पण लाच देणे व घेणे ह्यावर माझे जे विचार आहेत ते बरोबर आहेत का ह्या मुद्या बद्दल माझ्याच मनात शंका निर्माण झाली. त्या विचाराने मी जास्त अस्वस्थ झालो.

माझे म्हणणे फक्त एवढेच आहे ते वर स्पष्ट केले आहे की लाच घेणे वा देणे ह्याची सवय लागल्या सारखे काही लोकं व्यवहार करतात. व्यसन लागल्या सारखे त्याचा (दू)उपयोग करतात. लाच खायची सवय होते त्यांना (जशी दारुबाजांना दारु प्यायल्याविना चैन पडत नाही तसेच) कारण एकदा फुकटचा पैसा मिळतो ह्या उबेची सवय झाल्यावर मग थांबणे नाही. कोणी पकडत नाही, काही वचक नाही मग काय एका पिढी साठी, सात पिढ्यांसाठी का ७० पिढ्यांसाठा (मधू कोडांसारखे) त्याला काही अंतच नाही. एकदा अटल बिहारींचे डोंबिवलीला भाषण झाले होते स्वामी विवेकानंदांचा पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते. त्या भाषणात ते म्हणाले होते की ब-याचदा लाच खाणारा गरज आहे म्हणून लाच खात नाही तर सवय आहे म्हणून खातो. ब-याचदा श्रीमंत माणूस लाच खातो तेव्हा ती जास्तच विकृती असते व कलमाडींसारखे खात्यापित्या घरचे जेव्हा लाच खातात तेव्हा त्यावर आग नाही पाखडायची तर काय करायचे. आपला अनुभव व कलमाडींची परिस्थीती तराजूत तोलताच येणार नाही. एरव्ही आपल्या शास्त्रातूनही सांगितले आहे भूकेल्यांने पोट भरण्यासाठी चोरी केली तर त्याला पाप लागत नाही. मी शास्त्राचा आधार ह्या साठी दिला की खुप पूर्वीच्या काळी तुमच्या आमच्या सारख्या माणसानीच ती बनवलेली होती व त्यात लॉजीकल व रॅशनल थिंकींगचा भाग शेष होता. अर्थात त्याला देश काल पात्राची बंधने आहेतच. काही लाच खाऊ तर करोडपतीही असतात.

शिवाजी जेव्हा आग्र्याच्या तुरुंगात होता तेव्हा त्याने पण मोंगलांच्या ब-याच सरदारांना लाच दिली होती माहीती काढण्यासाठी. असे बमो पुरंद-यांच्या पुस्तकात म्हटले आहे. पण म्हणून तिच प्रथा रायगडावर आल्यावर चालवली नाही त्याने.

माझा सगळा रोख लाच खोरीचे व्यसन, सवय असणा-यांवर आहे किंवा सगळी कडे लाच देऊन, घेऊन आपण कीती स्मार्ट आहोत हे दाखवणे हे काही लोकात असते त्या मनोवृत्तीच्या विरुद्ध आहे.

किंबहूना माझ्या आयुष्यात असा भयंकर अनूभव आला नसेल म्हणून माझा दृष्टीकोन असा असेल.

ब-याचदा श्रीमंत माणूस लाच खातो तेव्हा ती जास्तच विकृती असते व कलमाडींसारखे खात्यापित्या घरचे जेव्हा लाच खातात तेव्हा त्यावर आग नाही पाखडायची तर काय करायचे.

पाखडायचीच.. मी फक्त आणि फक्त "लाच देणे" याविषयी बोलतोय. तुमच्या मूळ प्रतिसादात अगदीच होलसेलमधे घेणारा आणि देणारा यांच्यात केसभरही फरक न करता एकाच वाक्यात एकत्र आणून भ्रष्टाचारी देशद्रोही ठरवले होते. केवळ म्हणूनच.

किंबहूना माझ्या आयुष्यात असा भयंकर अनूभव आला नसेल म्हणून माझा दृष्टीकोन असा असेल.

या प्रांजळपणामुळे तुमच्याविषयी आधीच असलेला आदर आणखी वाढला..

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2011 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

गवि सध्या काय टंचनिका टंकनिका वैग्रे ठेवली आहेत का काय ? ;)

गवि's picture

8 Jun 2011 - 3:51 pm | गवि

वेळ मोकळा आहे..म्हणून.. ;)

(मला या वयात कुठून मिळणार *चनिका)

पण बराच चावट आहेस की रे..गुपचूप सुममधे वाचत असतोस ते सगळं.. ;)

वाचनिका ठेवली आहेस का ?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2011 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या वयात काय करायची आहे वाचनिका? ;)

वाचत सगळेच असतो पण आजकाल मनापासून प्रतिक्रिया द्यावी असे काही सापडतच नाही :) ह्या विषयावर पण येवढी धुळ उडाली आहे की मनात असुन लिहायची इच्छा नाही. आणि खरे सांगायचे तर पैसे देउन काम होत असेल तर मी उगाच कष्ट घेत नाही आणि कोणाचे काम करताना चार पैसे मिळत असतील तर मी नाही म्हणत नाही. त्यामुळे ह्या विषयावर लिहा-बोलायचा अधिकार नाही.

बाकी तुमचे चालु द्या ;)

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 4:01 pm | रणजित चितळे

..............तुमच्या मूळ प्रतिसादात अगदीच होलसेलमधे घेणारा आणि देणारा यांच्यात केसभरही फरक न करता एकाच वाक्यात एकत्र आणून भ्रष्टाचारी देशद्रोही ठरवले होते. केवळ म्हणूनच.

हा प्रतिसाद (काही भाग) माझ्या एका लेखा मधून घेतला व येथे छापला होता, आणि त्याला एक कारण आहे हल्ली ब-याचदा एलीट अर्बन यंग (मुद्दामून इंग्रजी मध्ये लिहिले आहे) दुस-यांना ते किती स्मार्ट आहेत हे दाखवता दाखवता लाच दिली घेतली जाते. ते सगळे खात्यापीत्या (शब्द पण सुचक आहे) घरचे असतात. त्यांना हे लागू होते. माझा सगळा रोख लाच खोरीचे व्यसन, सवय असणा-यांवर आहे किंवा सगळी कडे लाच देऊन, घेऊन आपण कीती स्मार्ट आहोत हे दाखवणे हे काही लोकात असते त्या मनोवृत्तीच्या विरुद्ध आहे.

हा तो लेख

http://www.misalpav.com/node/14780

या क्षेत्रात टेबलच्या दोन्ही बाजुनं काम केलेलं आहे करतो आहे, पण एक निश्चित,भ्रष्टाचार निपटुन काढला तर तुम्ही आणि मी आपण सगळॅच सुखानं जगु शकणार नाही हे खरं आहे मान्य करा किंवा करु नका. ही समांतर अर्थव्यवस्था फार फार मजबुत आहे तिला संपवणं सोडाच हलवणं पण फार फार अवघड आहे. अगदि या सिस्टिमच्या प्रत्येक घटकानं जरी ही सिस्टिम तोडायचं ठरवलं, जे फार सोपं आहे तरी ते होणार नाही. आणि माझ्या मते ह्या सिस्टिमना संपुन चालणार नाही, आग के लिये पानी का डर बने रहेना जरुरी है| ही भ्रष्टाचाराची सिस्टिम संपवली ना तर शिष्टाचाराची सिस्टिम फार माजेल जगात आणि तिला आवर घालणं जास्त अवघड होईल.

प्रश्न भ्रष्टाचार करण्याचा, ही बाब फक्त पैशाभोवती फिरत नाही हिला अनेक पैलु आहेत. जेंव्हा मला घरातला संगणक वापरण्यासाठी माझ्या मुलानं गेम खेळ्णं सोडुन द्यावं म्हणुन त्याला टिविवर कार्टुन बघायची परवानगी देतो तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, जेंव्हा माझी बायको मला आवडणारी भाजी करुन संध्याकाळी घरी जेवण करण्याऐवजी बाहेर जेवायला जायचा घाट घालते तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, हाच प्रकार जेंव्हा मी घरी जाताना गजरे घेउन जातो तेंव्हा. आम्हाला दोघांना रजा काढुन पोराला सांभाळावं लागु नये म्हणुन आम्ही माझ्या आईला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतो. तेंव्हा पण हा भ्रष्टाचार असतो.

नोकरीच्या ठिकाणी केला जाणारा (स्वखुषीने) करावा लागणारा ( साहेबाच्या / सहका-याला वाचवण्यासाठी) किंवा करवला जाणारा(साहेबाच्या भितिने, कारण वर्षाच्या शेवटी तोच माझ्या वार्षिक अहवालावर सहि करणार आहे, मला पगार वाढ किंवा पदोन्नती त्यावरच मिळणार आहे,) भ्रष्टाचार ही बाब वेगळी. त्यावर वेगळी चर्चा करेन.

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 1:42 pm | रणजित चितळे

प्रश्न भ्रष्टाचार करण्याचा, ही बाब फक्त पैशाभोवती फिरत नाही हिला अनेक पैलु आहेत. जेंव्हा मला घरातला संगणक वापरण्यासाठी माझ्या मुलानं गेम खेळ्णं सोडुन द्यावं म्हणुन त्याला टिविवर कार्टुन बघायची परवानगी देतो तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, जेंव्हा माझी बायको मला आवडणारी भाजी करुन संध्याकाळी घरी जेवण करण्याऐवजी बाहेर जेवायला जायचा घाट घालते तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, हाच प्रकार जेंव्हा मी घरी जाताना गजरे घेउन जातो तेंव्हा. आम्हाला दोघांना रजा काढुन पोराला सांभाळावं लागु नये म्हणुन आम्ही माझ्या आईला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतो. तेंव्हा पण हा भ्रष्टाचार असतो.

...................... मुळीच पटला नाही साहेब हा मुद्दा.

गवि's picture

8 Jun 2011 - 1:56 pm | गवि

ही भ्रष्टाचाराची सिस्टिम संपवली ना तर शिष्टाचाराची सिस्टिम फार माजेल जगात आणि तिला आवर घालणं जास्त अवघड होईल.

हे नुसतेच गोंधळात टाकणारे शब्दचमत्कृतिपूर्ण आणि गिमिकल विधान वाटले.

नगरीनिरंजन's picture

8 Jun 2011 - 1:08 pm | नगरीनिरंजन

जेंव्हा मला घरातला संगणक वापरण्यासाठी माझ्या मुलानं गेम खेळ्णं सोडुन द्यावं म्हणुन त्याला टिविवर कार्टुन बघायची परवानगी देतो तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, जेंव्हा माझी बायको मला आवडणारी भाजी करुन संध्याकाळी घरी जेवण करण्याऐवजी बाहेर जेवायला जायचा घाट घालते तेंव्हा ते पण लाच देणंच असतं, हाच प्रकार जेंव्हा मी घरी जाताना गजरे घेउन जातो तेंव्हा. आम्हाला दोघांना रजा काढुन पोराला सांभाळावं लागु नये म्हणुन आम्ही माझ्या आईला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेतो. तेंव्हा पण हा भ्रष्टाचार असतो.

हा भ्रष्टाचार कसा हे मला कळलं नाही. ही तर सामान्य देवाणघेवाण झाली. तुम्हाला संगणक हवा आहे, मुलाला संगणक किंवा कार्टून पाहण्याची परवानगी चालेल. तुम्ही परवानगी देता आणि संगणक घेता. हा सामान्य व्यवहार आहे. आता समजा तुम्ही आणि मुलाने ठरवलं आहे की तुम्ही संगणक वापरताना त्याने शांत बसावं या कामासाठी तुम्ही त्याला एक चॉकोलेट देणार. जेव्हा ते चॉकोलेट घेऊनही मुलगा तुम्हाला शांतपणे संगणक वापरू देत नाही तेव्हा तो भ्रष्टाचार. आणि असा भ्रष्टाचार केल्याबद्दल मुलाला फटका मिळणार की हा भ्रष्टाचार आवश्यक आहे म्हणून आणखी एक चॉकोलेट?
बायकोचा आणि तुमचा अलिखित करार आहे की रोज बायकोने घरी स्वयंपाक करायचा आणि तुम्ही ऑफिसचे काम. या करारात बायकोच्या सुट्ट्यांबद्दल काहीच बोलणे नाही. मग एक दिवस सुट्टी घेताना बायकोला अपराधी वाटणे आणि त्यापोटी तुमच्या आवडीची भाजी करणे हा भ्रष्टाचार?
तुमच्या मुलाची काळजी आईने घेणे आणि तिची काळजी तुम्ही घेणे हा सामान्य व्यवहार. तुमच्या मुलाचा सांभाळ तुमची आई प्रेमाने करते आणि तरीही तुम्ही तिची काळजी केली नाही तर तो भ्रष्टाचार (मिळालेल्या मोबदल्याचे काम न करणे). तसंच तुम्ही आईची काळजी घेता पण त्या बदल्यात ती तिचे कर्तव्य करत नसेल तर तो भ्रष्टाचार.
मिळालेल्या फायद्याचा मोबदला देणे हा भ्रष्टाचार नाही पण कामाचा ठरलेला मोबदला मिळाला तरी काम न करणे हा भ्रष्टाचार आहे.

विनायक बेलापुरे's picture

8 Jun 2011 - 1:18 pm | विनायक बेलापुरे

लाच मागायची पद्धत "वरुन" सुरु झाली आहे आणि आता ती अगदी गवताच्या मुळी पर्यन्त पोहोचली आहे.
त्यामुळे भ्रष्टाचार कमी करावयाचा असेल तर तो ही "वरुन "च बन्द व्हायला हवा. सामान्य माणूस आपोआप बंद करेल.

रणजित चितळे's picture

8 Jun 2011 - 1:50 pm | रणजित चितळे

बेलापुरे साहेब खरे आहे.

तानपू-याचे कान वरुन पिरगटल्याने खाली असलेल्या तारांमधून सुरेल आवाज निघतो तसे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Jun 2011 - 6:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे तर्कशास्त्र अजिबात पटले नाही. सगळे खापर राजकारण्यांवर फोडण्याची जी मनोवृत्ती आपल्या नसानसात भिनली आहे तीच आपला घात करते आहे. उलट लोकशाहीत हे प्रकार खालून वर जाण्याची शक्यता नसते का? सगळेच साले हरामखोर मग त्यांच्यावर राज्य करणारे सज्जन कुठून मिळणार?

असो, हा युक्तिवाद करणारे तुम्ही पहिले नाही आणि शेवटचे पण असणार नाही. आपण सगळे दुसऱ्यांकडेच बोट दाखवत राहू. त्यायोगे भारताचे कल्याण होईल.

रणजित चितळे's picture

9 Jun 2011 - 8:48 am | रणजित चितळे

मेहंदळे साहेब,
आपले म्हणणे खरे आहे प्रत्येक माणूस जबाबदार आहे ह्या गोष्टीला पटले पण ...........
सगळे खापर राजकारण्यांच्या वरती मुळीच फोडले जात नाही. पण काय करणार 'खालच्यानी' लाच खाल्ली तर त्याचा इफेक्ट लोकल राहतो, त्या उलट 'वरच्याने' लाच घेतली की ग्लोबल होतो कारण व लाच घेण्याच्या मनोवृत्तीला एक प्रकारचा आधार मिळतो. म्हणतातना
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

म्हणून काळजी जास्त 'वरुन' होणा-या लाच खाऊपणाची वाटते

नितिन थत्ते's picture

9 Jun 2011 - 9:57 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

बेसिकली भ्रष्टाचाराविरुद्धची बोंब ही राजकीय मताचा भाग असते. ती काही व्यवस्था सुधारण्याची कळकळ नसते.

म्हणजे (आपला अजेंडा न पाळणार्‍या*) आपल्याला नको असलेल्या सरकारवर तोंडसुख घेण्याचे एक साधन म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धची ओरड असते.

त्याचमुळे मी करतो तो भ्रष्टाचार "नाइलाज म्हणून" करतो अशी शहामृगी भूमिका घेतलेली असते.

*आपला अजेंडा "बोलणारे" सरकार प्रत्यक्षात तो पाळत नाही असे दिसू लागल्यावर 'सगळे भ्रष्ट' असा साक्षात्कार बर्‍याच सुशिक्षित मध्यमवर्गाला झाल्याचे दिसले आहे.

मराठी_माणूस's picture

9 Jun 2011 - 11:06 am | मराठी_माणूस

यथा राजा तथा प्रजा

मंत्रि,पुढारी , भाषणात जे सांगतात तसे ते वागतात का ? लोकां कडुन तश्या अपेक्षा का ?

गांधीजींच्या वागण्यात / बोलण्यात विसंगती नव्हती त्यामुळेच लोक ते सांगतील त्यास पाठींबा द्यायचे.

प्रत्येक मंत्रि जेंव्हा नविन सरकारि निवासात रहण्यास जातो ,आधीची व्यवस्था कीतीहि चांगली असली तरी ती काढुन, कोट्यावधी पैसे खर्च करतो. बाहेर फिरताना, मोटारींचा तांडाच्या तांडा जवळ बाळगतो. परदेश वार्‍या करतो . स्वत;च्या नातेवाईकाना स्वस्तात घरे देतो. ही सुरुवातच भ्रष्ट्र राजकारण्यान पासुन झाली आहे.

अण्णांना मिळणारा भरगोस पाठींबा त्यांच्या आचार विचारांच्या सुंसगतीमुळेच आहे.

कीत्येक संस्था मध्ये वरचे लोक जसे वागतात त्याचेच अनुकरण खालचे लोक करताना आढळते

सगळ्या गोष्टी (चांगल्या/वाईट) वरुनच खाली पाझरतात

बाकीचे/ वरचे लोक खातात म्हणून मी 'पण' खातो हे तर्कशास्त्र मला तरी पटत नाही.
बाकीचे शेण खातात, तू खातो का?
प्रत्येकाने 'मी माझ्यापुरते बघतो, मी खाणार नाही, बाकीच्यांचं काय असेल ते असेल, मला घेणं देणं नाही' असे ठरवले तरी बरेच काम सोप्पे होईल.
मी खात नाही, माझ्याकडे काम असणाराला त्रास नाही. माझे ज्याच्याकडे काम आहे तो खात नाही, मला त्रास नाही अशी साखळी निर्माण झाली तर विषयच मिटेल ना?

नकार देताना उगाच तत्त्ववेत्ता, श्रेष्ठ, वेगळा असा आव आणू नये. समोरच्याला 'हे काम काहीतरी वेगळं आहे' ही जाणीव आपोआप होते. मला काम करण्याचा पगार मिळतो, तो मी स्वेच्छेने स्विकारलेला आहे, त्याच्या मोबदल्यात मला १००% काम केले पाहिजे आणि मी ते करेन एवढा साधा विषय असतो. उगाच मला कमी पगार आहे, तेवढ्यात कसं भागवू इ.इ. च्यु* गिरी डोक्यात जाते.
का डोकेफोड करतात लोक कोण जाणे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jun 2011 - 11:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

बरोब्बर. पटण्यासारखे मुद्दे आहेत.

>>का डोकेफोड करतात लोक कोण जाणे?
ही डोकेफोड नाही. याला पलायनवाद म्हणतात. माझी काहीच चूक नाही, सगळी चूक त्या बागुलबुवा ची आहे असे म्हटले की काम बरेच सोपे होते.

राही's picture

9 Jun 2011 - 3:26 pm | राही

भ्रष्टाचाराच्या बागुलबुव्याला धोपटणे ही एक वीरश्रीयुक्त गोष्ट असते. मग साप साप म्हणून भुई का धोपटली जाईना. स्वतःला बदलवणे, कुठल्याही प्रलोभन-दडपणाला बळी न पडता कर्तव्यपालनाची वाट एकाकीपणे चालत राहाणे यात कसली आली आहे इरेसरी आणि शौर्य (आणि ग्लॅमर,प्रसिद्धी)?ते तर अगदी शामळू काम!
आणि गंमत अशी की अशा या एकांड्या शिलेदारांना कुणी अनुयायी वा समर्थकच नसतात!