मस्त तोंडावर आलेला वीकेंड ..मस्त मोट्ठा मग भरून स्ट्रॉंग चहा आणि हे दोन अप्रतिम cinnamon rolls!
दालचीनीचा मस्त अरोमा..गरम गरम चहा..
नक्की काय कशाला compliment करतंय हे सांगणं मुश्किल!
आणि आगामी दोन दिवस सुट्टी.....
सू sssssssss ख...
बाकी चहाचं तुम्ही बघा! रोल्स कसे बनवायचे ते मी सांगते.!
enjoy माडी!
साहित्य :
मैदा : ४ कप
साखर : १ १/२ कप
वितळलेले लोणी ( बटर unsalted) : पाऊण कप
दूध : १ कप
इंस्टंट यीस्ट : १ छोटे पॅकेट (८ ग्रॅम्स)
मीठ : चिमुट्भर
अंडी : २
फिलींग साठी :
बटर : अर्धा कप
डार्क ब्राऊन शुगर : १ कप
दालचिनी पूड : ३ चमचे
कृती :
१) वितळलेले लोणी + अंडी + दूध एकत्र करुन त्यात यीस्ट विरघळुन घ्या.
२) मैदा + मीठ + साखर एकत्र करुन त्यात वरील मिक्श्चर घालुन मस्त मळुन घ्या. मस्त मऊ लुसलुशीत गोळा तयार होईल. तो गोळा किचन टॉवेल ने झाकुन ठेवा. काही वेळाने तो आकाराने दुप्पट होइल. साधारण एक तासाभराने.
३ ) तोपर्यंत सारण मिक्स करुन घ्या. लोणी + डार्क ब्राऊन शुगर + दालचिनी पूड छान मिक्स करा.
४) आता दुप्पट फुगलेल्या गोळ्याला मुठीने पंच करुन त्यातली हवा काढुन टाका. (मजा येते हे करताना :) )
४) ओट्यावरच मैदा भुरभुरुन हा गोळा लाटुन घ्या. मोठा आयत लाटुन घ्या.
५) त्यावर सारणाचा थर हाताने मस्त एकसारखा लावा.
६) तो एका बाजुने गुंडाळायला सुरुवात करा.
७) गुंडाळीचा शेवट छान पिंच करुन घ्या.आणि त्याचे साधारण २ इंचाचे तुकडे करा.
https://lh6.googleusercontent.com/_Rpkesq5CUy4/Tc_bK5CHfYI/AAAAAAAAAHo/f...
८) ते तुकडे बटर लावलेल्या बेकींग ट्रे वर ठेवा. मध्ये अंतर ठेवा. आणि कपड्याने झाकुन ठेवा.
काही वेळाने हे पण असे दुप्पट होतील.
मग हे मस्त सोनेरी होइ पर्यंत बेक करुन घ्या. साधारण १८० प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये १२-१५ मिनिटे ठेवा.
( अंदाजाने हलके ब्राऊन झाले कि बाहेर काढा.)
आणि हे दुसर्या दिवशी जास्त छान लागतात.
चहा आणि मस्त सिनामन रोल्स...!
प्रतिक्रिया
17 May 2011 - 7:01 pm | Mrunalini
तोंडाला पाणी सुटले. करुन बघायला पाहिजे...
17 May 2011 - 8:25 pm | सानिकास्वप्निल
मस्तच नक्की करून बघणार :)
18 May 2011 - 3:44 am | पियुशा
झक्कास ग !
:)
18 May 2011 - 4:34 am | मुलूखावेगळी
मस्त आहे ग
पन अवघड आहे थोडे
18 May 2011 - 9:50 am | रेवती
अरे वा!!
छान पाकृ.
18 May 2011 - 6:55 pm | आत्मशून्य
.
19 May 2011 - 1:42 pm | खादाड अमिता
सिनामन रोल बेक केल्या वर घरात दाल्चीनी चा लइ भारी घम्घमाट सूटतो ....
मस्त! पण ह्यावर फ्रोस्टीन्ग पाहीजे! :)
20 May 2011 - 11:21 am | रेवती
होय तर.....
फ्रॉस्टींगसकट रोल खाल्ल्यानंतर व्यायाम किती करायचा तेही सांगा.;)
19 May 2011 - 3:14 pm | प्राजु
मस्त मस्त मस्त!!
19 May 2011 - 4:52 pm | शुचि
मस्त!!!!!!!!!!!!!!!
20 May 2011 - 3:52 am | प्यारे१
कातील फटु.....!!!
20 May 2011 - 6:48 am | सूड
छान दिसतायत एकंदरीत, परदेशी बाकरवड्या !! ;)