चिकन साहित्यः
५०० ग्रा साफ करून , तुकडे केलेले चिकन
१/२ वाटी प्रत्येकी लाल, पिवळी व हिरवी भोपळी /ढब्बु मिर्ची
१ बारीक चिरलेला कांदा
२-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून
१/२ कप टोमॅटो सॉस
१/२ कप पेरी-पेरी सॉस (हा जर नाही मिळाला तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिर्ची किंवा हॅलेपिनो मिरची वापरू शकता, हा सॉस ऑपशन्ल आहे )
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
१ वाटी पाणी
२ टेस्पून ऑलिव ऑइल
तयार टॉरटीला
पा़कृ:
प्रथम साफ केलेल्या चिकनला थोडे मीठ्+मिरपूड लावून १/२ तास ठेवावे.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे साधारण तळून घेणे. (सीयर करणे)
तळलेले चिकन बाजुला काढून त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेले लसुण व कांदा घालून चांगले परतणे.
कांदा गुलाबीसर झाला की त्यात टोमॅटो सॉस व पेरी-पेरी सॉस घालावे.
त्यात मग चिरलेल्या ढब्बु मिरच्या घालाव्यात व सगळे नीट एकत्र करावे.
त्यात मग एक वाटी पाणी घालून एक उकळी आणावी.
त्यात तळून ठेवलेले चिकन, मीठ घालावे. (चिकनला आधीच थोडे मीठ लावले आहे त्याप्रमाणे मीठ घालणे)
चिकन मंद गॅसवर झाकून शिजवावे. पाणी आटले आणी चिकन शिजले की गॅस बंद करावा.
स्मोक्ड टोमॅटो -गार्लिक सॉस साहित्यः
२ टोमॅटो
१ लसुण (इकडे लसुण पाकळी मोठी असते म्हणून पुरते, जर का पाकळ्या लहान असतील तर २-३ घ्याव्यात)
१ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
मॅगी सीजनींग क्युब
पाकृ:
टोमॅटोंना सुरीने चिरा देऊन , थोडे तेल लावून गॅसवर भाजून घ्यावे, तसेच लसुण ही भाजून घ्यावे.
गार झाले की टोमॅटो, लसुण व वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे.
आता महत्वाचे काम ...खाण्याचे हो :)
बाजारात तयार टॉरटीला मिळतात हो.. हो अगदी भारतात ही मिळतात...त्यातून पण जर का तुम्हाला नाही मिळाले तर अंतरजालावर घरी कसे बनवता येतील अशी पाकृ आहेत, अतिशय सोप्पी पाकॄ आहे.
हां तर तयार टॉरटीला घेऊन मायक्रोव्हेव मध्ये ३० सेकंद भाजून घ्यायचा, त्यावर थोडा टोमॅटो -गार्लिक सॉस लावावा, त्यावर तयार चिकन मधोमध घालावे आणी बंद करावे.
मस्त कोबी-गाजरच्या सॅलॅड आणी स्मोक्ड टोमॅटो -गार्लिक सॉस बरोबर खायला द्यावे.
आवडत असल्यास ह्यात चिकनबरोबर थोडा भात ही घालू शकता.
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 5:29 pm | गणपा
एकदम झक्कास.
24 Apr 2011 - 5:34 pm | रेवती
फारच छान! याचा शाकाहारी पर्याय दिलात तर पाकृ उपयोगात येइल.
फोटो आणि पायरी पायरीने दिलेली पाकृ पाहून तुमचे कौतुक वाटते.:)
24 Apr 2011 - 5:38 pm | स्वाती२
रेवती, चिकन ऐवजी पिंटो किंवा ब्लॅक बिन्स वापर. एक चमचा जीरे पूड आणि अर्धा चमचा स्मोक्ड पॅप्रिका टाक.
25 Apr 2011 - 4:42 am | रेवती
धन्यवाद स्वाती!:)
24 Apr 2011 - 5:34 pm | स्वाती२
छान!
24 Apr 2011 - 5:36 pm | यशोधरा
मस्त! :)
24 Apr 2011 - 8:17 pm | कच्ची कैरी
मस्त पाकृ.आणि फोटोही !!!!! सनिका तुहि गणपाच्या पोटावर आय मीन पाऊलावर पाऊल टाकत मस्त रेसेपीज आणि स्टेप बाय स्टेप फोटो टाकुन स्सर्वांचीच जळजळ वाढवत आहेस ,कीप ईट अप !!!!!!!!!
26 Apr 2011 - 4:32 am | सानिकास्वप्निल
असेच प्रोत्साहन मिळु देत :)
26 Apr 2011 - 4:32 am | सानिकास्वप्निल
असेच प्रोत्साहन मिळु देत :)
25 Apr 2011 - 7:25 am | खादाड_बोका
मी हे आठवडयात कमीत कमी एकदा तरी बनवतो. इथे अमेरिकेत "रिफ्राएड बेक्ड बिन्स" ("जायन्टला")मिळतात. मी त्याचा लेप तोरतीया वर लावतो आणी जीरा राईस घालून बनवतो. खूप छान आणी शरीरा करीता "हेल्थी" आहे. चिपोटले आणी "टाको बेल" पेक्षा चांगला इंडिअन उपाय आहे. मी चीकन खात नाही...व्हेजीटेरीयन आहो.
25 Apr 2011 - 11:47 am | स्पंदना
जबरदस्त!! कलरफुल!!
25 Apr 2011 - 11:52 am | मराठमोळा
खल्लास...
कसले क्लास फोटु आलेत.. :)
बाकी वेगवेगळ्या मेक्सीकन पद्धतीचे श्रिंप मला खुप आवडतात.. :)
25 Apr 2011 - 12:12 pm | उदय के'सागर
कसले भारी फोटो आहेत. tempting :)
26 Apr 2011 - 8:16 pm | प्राजु
क्लास!! करेनच हा प्रकार!
मेक्सिकन डिशेस खूप आवडतात.
परवा नवर्याने एन्चिलाडा केला होता. चांगला केला होता. :)
1 May 2011 - 3:08 am | स्मिता.
कसले सुरेख फोटो आहेत! पाकृ बद्दल तर काही बोलायची गरजच नाही. मस्तच...
हा धागा कसा काय सुटला नजरेतून?
मला मेक्सिकन पदार्थ आवडतात. आणखी पाकृ द्या इथे :)