म्हणी व वाकप्रचार यांचा उगम.

गणपा's picture
गणपा in काथ्याकूट
13 May 2008 - 5:50 pm
गाभा: 

आपल्या नेहमीच्या बोलण्यात बरेच वेळा आपण म्हणी, वाकप्रचार याचां उपयोग करतो. बर्‍याच वेळा आश्या म्हणी व वाकप्रचार यांच्या मागे काही धटना, गोष्टी धडलेल्या असतात. आपल्या पैकी कुणाला जर आश्या गोष्टी आठवत असतील तर त्याची इथे देवाण-घेवाण करु.

(जर असा घागा आधीच कुणी चालू केला असेल तर सरपंचाना हा धागा उडवण्याची नम्र विनंती. )

सुरुवात मीच करतो.

ऊंटावरचा शहाणा.

एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती. ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्‍याची एकदम लाडकी होती. उकाड्याचे दिवस होते आणि म्हैस भलतीच तहानलेली होती. अंगणात एक भला मोठ्ठा रांजण होता जो त्या शेतकर्‍याच्या घरात पिढ्यांन पिढ्यां पासून होता. म्हैशीनं रांजणात डोकावून पाहील. तिला तळाशी पाणी दिसलं आणि कसबस तिने घातल डोक आतं. पाणी पिउन झाल्यावर डोक काही बाहेर येइना. बिचारी जोर जोरात हंबरायला लागली, शेतकरी धावत बाहेर आला. त्याने पण म्हैशीच अडकलेल डोक बाहेर काढायचा बराच प्रयत्न केला पण काही जमेना. रांजण फोडून म्हैशीला सोडवाव तर तो रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला. शेतकर्‍याच मन धजेना.

शेतकर्‍याची ही धडपड तिथून ऊंटावरून जाणार्‍या एका वाटसरूनं पाहिली. तो शेतकर्‍याला म्हणालाकी तो त्याला म्हैशीच डोक बाहेर काढायला मदत करेल. पण तो त्याच्या ऊंटावरून खाली येणार नाही. आणि अंगणातल दार छोट असल्याने ऊंट काही आत येइना. शेवटी शेतकर्‍यानं कुदळ फावडं घेउन भींत फोडली नि त्या शहाण्याला वाट करून दिली. वाटसरूनही वरून पाहिल म्हैशीच डोक बऱ्यापैकी अडकल होत. त्याने शेतकऱ्याला विचारल कि रांजण आणि म्हैस यात त्याला काय जास्त प्रिय आहे. शेतकर्‍याला बिचार्‍याला दोन्हीच प्रिय, पण त्यतल्या त्यात रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला त्यामुळे त्याने रांजण सांगितल.

झालं, या शहाण्याने शेतकर्‍याला म्हैशीची मान कापायला सांगितली. रांजण वाचावायचा म्हणून शेतकर्‍यानं जड मनाने म्हैशीला मारल. पण तिच डोक आतच राहील. शेवटी म्हैशीच डोक बाहेर काढण्यासाठी शहाण्याने तो रांजणही फोडायला लावला.

जर शेतकर्‍याने ऊंटावरच्या शहाण्याचा सल्ला न ऐकता आधिच तो रांजण फोडला असता तर, त्याला अंगणाची भींतही फोडावी लागली नसती आणि त्याची लाडकी म्हैस पण वाचली असती.

तेव्हा पासून जो कुणी असा सल्ला देउ लागला की ज्यात ऐकणार्‍याच फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आसेल तर तो सल्ला देणार्‍याला ऊंटावरचा शहाणा ही उपाधी मिळु लागली.

अजुन एक गोष्ट.
गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं

एका गावात एक कुंभार होता. त्याच्याकडे एक गाढव आणि एक शिंगरू होतं. उकाड्याचे दिवस होते, माठांना चांगलीच मागणी होती. त्यामुळे कुंभाराने गाढवाला जरा जास्तच कामाला जुंपल होतं. बिचार गाढव मातीसाठी सकाळ पासून खेट्या मारित होतं, त्या शिंगराला काही काम न धंदा, ते आपलं नुसतच गाढवासंगे फेर्‍या मारित होतं. (कुंभाराने काही त्याला कामाला जुंपलं न्हवत.) शेवटी अतिश्रमाने नि उकाड्याने गाढव नि शिंगरू दोन्ही मरतात. त्यातल्या त्यात गाढव निदान ओज्याने नि श्रमाने तरी मरतं पण शिंगरू मात्र नुसतच हेलपाट्यान मरतं.

तेव्हा पासून गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं ही म्हण रुजू जाली.

कुणाला हातावर तुरी देणे का वाक्प्रचार कसा रुढ झाला याची माहीती आहे का?

प्रतिक्रिया

शितल's picture

13 May 2008 - 6:21 pm | शितल

मला म्हणी माहित आहेत पण त्या मागची स्टोरी ना बॉ सा॑गु शकत. :(

ऋचा's picture

13 May 2008 - 6:34 pm | ऋचा

आता म्हणींची ष्टोरी म्हणजे लै झाला बॉ!!! 8|

"भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" ही म्हण कशावरुन आली असेल याचे मला नेहमी कुतुहल आहे.
( यात काहीही जातिवाचक नाही )
वागायला भट असणारा विजुभाऊ

मन's picture

13 May 2008 - 9:10 pm | मन

"बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' हे कुठुन आलं?
कुअणाची शादी?
आणि कुठला वाला अब्दुल्ला नक्की/

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

गणपा's picture

14 May 2008 - 4:59 pm | गणपा

ओ विजुभौ हल्ली भैय्याला दिली मुंबई भैय्या हात पाय पसरी अस वाचलय ;)
(मुंबई ऐवजी ज्याला हव त्याने आप-आपल्या शहराच नाव टाकवं.)

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

उंटावरच्या शहाण्याची ष्टोरी आवडली रे गणप्या! मस्त आहे! :)

बाकी, म्हणींच्या उगमकथा हा काथ्याकुटाचा धागा छान आहे...

आपला,
उंटावरचा तात्या!

एक पुजारी असतो.
त्याची बायको त्याला तेल आणायला सांगते. पण तेल घेऊन येण्यासाठी एक धुपाटणं देते. (पुजारी नेहमी गरीब असतात. :) )
पुजारी दुकानात जातो आणि तेल घेतो तो दुकानदार त्याला सांगतो की तुप सुध्दा छान आहे.
पण त्याच्याकडे तुप न्यायला दुसरं भांड नसतं.

तेंव्हा तो दुकानदार त्याला सांगतो की धुपाटण्याची खालची बाजु वर करुन त्यात तुप घ्या.
आणि कसलाही विचार न करता पुजारी धुपाटणं उलटं करतो.

आणि घरी गेल्यावर बायको तेल मागते. तेंव्हा तो परत धुपाटणं सरळ करतो.

त्यामुळे तेल जातं तुप जातं आणि त्याच्याक्डे उरत धुपाटणं.

:) :)

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 2:39 pm | आनंदयात्री

छान धागा गणपाराव. दोन्ही गोष्टी आवडल्या.
बाकी आमच्या शरुबाबाची "मि नहि त्यतलि कडि घाल आतलि" ही अत्यंत प्रिय म्हण आहे, तो सांगेल त्याची श्टोरी :))

ह्याच काहीतरी लिवा :)

टांगा पलटी, घोडे फरार
या आशयाची म्हणं संस्कृत मध्ये होती - 'नष्टाश्वदग्धरथन्यास'- घोडा हरवलेला आणि रथ जळालेला.
तमोदीपन्याय - अंधार बधायला दिवा.

भटाच्या बायकोला स्वयंपाक करताना घरातली तुरीची डाळ संपल्याचे लक्षात आले. तीने भटाला बाजारातून डाळ आणायला सांगीतले. त्यावर भटाने तिला विचारले काय करणार ? ती म्हणाली आमटी, भट म्हणाला वरण. या वरुन दोधात जोरात भांडण झालं अगदी मारा-मारी पर्यंत....आणिम्हणं पडली - बाजारात तुरी भट भटीणीला मारी

परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नॄणाम् धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मन:
- लोका सांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.

न भूतपूर्व न कदापि वार्ता हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट: ।
तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धि ॥

न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे
आग लागल्यावर विहीर खणणे

नष्टाश्वदग्धरथन्यास- आवडल्या गेले आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 3:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त धागा सुरु केला आहे.

ब-याच म्हणींची स्टोरी आपल्याला माहित नसते, या निमित्ताने ब-याच म्हणींचा उलगडा होईल असे वाटते.
'गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट' याची स्टोरी कोणास माहित आहे का ?

प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे आभार...

बिरुटेशेठ खरय तुमच म्हणणं, या म्हणी, वाक्यप्रचार आपण अगदी लाहान पणापासुन ऐकत आलोय. कधी काळी आज्जी आजोबा, आई बाबां कडुन या म्हणी कश्या पडल्या या सुसर कथाही ऐकल्या असतिल. हल्ली इंग्रजी माध्यमात जाणार्‍या आपल्या मुलांना या म्हणी नि वाक्यप्रचार तरी माहिति असतील का ही शंका आहे. आणि हल्लीची मुलं पण इतकी चौकस असतात (त्यामानाने आम्ही कीती बावळट होतो) कि विचारुनका. एखादा वाक्यप्रचार वा म्हण बोलता बोलता निघुन गेली की माझी ३ वर्षांची चीमुरडी तर इतके प्रश्न विचारुन भंडावुन सोडते कि बस. म्हणुन हा उपापोह. :)

माझ्या तर्फे अजुन एक गोष्ट.

खुप वर्षांपुर्वी एका लहान खेड्यात एक ब्राम्हण राहत होता. त्याच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य नांदत होतं. ब्राम्हणाची बायको या सर्वाला जाम वैतागली होती. रोज च्या रोज त्याची काही ना काही कारणांवरून भांडणं होत असत. ब्राम्हणाच भिक्षुकी हेच मुख्य उदरभरणाच माध्यम होतं, कधी काळी एखादी पुजा, मुंज वा एखादं लग्नाकार्य असलं तर तेवढेच चार दिवस काय ते बरे जायचे.

एकदा असच एका पुजेच आमंत्रण त्याला आल होतं. ब्राम्हण छान सत्यनारायणाची पुजा मांडली, उल्कामुक राजाची कथा सांगीतली, सगळ यथासांग पार पडलं. घरी जाताना यजमानाने पाच पुरणपोळ्या ब्राम्हणाला बांधून दिल्या. पुरणपोळ्या पाहुन ब्राम्हणाची बायको खुप खुष जाली. लगेच तिने दोन ताटं आणून एका ताटात दोन पुरणपोळ्या वाढून नवर्‍याला दिल्या, आणि स्वतः तीन घेतल्या. ब्राम्हणाला आला राग. म्हणाला मी जाउन पुजा सांगून आलो त्यामुळे मला तीन पुरणपोळ्या हव्या. तर बायकोच म्हणणं की मी धरात इतके कष्ट उपसते म्हणून मलाच तीन पुरणपोळ्या. होता होता त्यांच भांडण खुप वाढलं. शेजारी-पाजारी गोळा झाले. लोकांनी सांगीतलं की अरे भांडू नका, अडीच-अडीच पोळी घ्या. पण दोधे जाम हट्टाला पेटलेले, कुणाच ऐकतील तर शप्पथ.

शेवटी भांडून भांडून दोघे थकले व तसेच उपाशी पोटी झोपले. सकाळी जाग आल्यावर त्याना भांडणाचा पश्चाताप झाला आणि दोघांनी पोळ्या वाटून घ्यायच ठरवलं. ताटाकडे लक्ष गेलं, पाहातात तर काय, एक कुत्रं मजेत शेवटची पुरणपोळी हादडत होत. भांडणाच्या नादात ब्राम्हणाची बायको पोळ्या जाकून ठेवायला विसरली आणि ब्राम्हण दार लावायला. लागले परत भांडायला. ब्राम्हण बायकोवर खेकसला मला नं तुला, घाल कुत्र्याला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मराठी म्हणी व वाक्प्रचार कोश' हे स. ध.झांबरे......यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. त्याच्यात किती तरी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. पण गणपासेठ आपण देत आहात तशा कथा किंवा तशी माहिती त्याच्यात नाही. आपल्या म्हणींच्या निमित्ताने येणा-या कथा आम्ही आवर्जून वाचतोय. येऊ दे आणखी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खाई त्याला खवखवे
सुंठेवाचून खोकला गेला
अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून
कशात काय अन फाटक्यात पाय
घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या
पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा
पाटलाचं घोडं महाराला भुषण
पादऱ्याला पावट्याचे निमित्त

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 4:23 pm | आनंदयात्री

तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या

हा हा हा :)) :))

ऋचा's picture

14 May 2008 - 4:30 pm | ऋचा

पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा

म्हणजे काय?
जरा अर्थ तरी सांगा. :W

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 4:35 pm | आनंदयात्री

पुर आल्यावर गटारांमधले पाणी पहिल्यांदा न्हाणीतल्या आउट्लेट मधुन रिव्हर्स येउन घरात शिरते, म्हणुन ते अडवायला तिथे बोळा कोंबतात, पण दार तर उघडेच असते की हो, तिथुन पाणी शिरतेच. असा अर्थ असावा.

-सज्जनयात्री :)

अग ऋचा,
पुर्वी न्हाणीघर मुख्य घरात नसे, ते अंगणात असे. आणि सांडपाणी वाहुन नेण्या करता एक छोटा पाइप असे जो बाहेर रस्त्याच्या गटारा पर्यंत जात असे.
त्या पाइप मधुन एखादा किडा वा साप घरात येउ नये म्हणुन त्यात, बोळा कोंबुन ठेवत. पण एवढे प्रयत्न करुन अंगणाचा मुख्य दरवाजा मात्र सताड उघडा. त्यावरुन ही म्हण अस्तित्वात आली आसा कयास आहे.

--(शंकानिरसनी ) गणपा.

ऋचा's picture

14 May 2008 - 5:07 pm | ऋचा

बरं
कळाले.. #:S
धन्यवाद आनंदयात्री,गणपा .

अजुन कही म्हणी.

बैल गेला नी झोपा केला.
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तिथे येती रोगी नाना
नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

देवदत्त's picture

14 May 2008 - 7:23 pm | देवदत्त

कथा दिल्याबद्दल धन्यवाद...
चला आता म्हणींचे नेमके अर्थ ही कळतील :)

प्रकाश घाटपांडे's picture

14 May 2008 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे

पोटाला नाई आटा आन म्हन चोटाला उटन वाटा
ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं
मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली
शुभ बोल रे नार्‍या त म्हन मांडवाला लागली आग
ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाई पन गुन लाग्ला.

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली

हा हा हा! अश्या काही स्त्रिया माझ्या परिचयाच्या (म्हणजे फक्त ओळखीत बरं का!) आहेत! खूप छान आहे त्यांचा स्वभाव! आवडतो मला! त्याही आवडतात! :)

आपला,
(कडीकुलपातला) तात्या.

आधीच उल्हास अन् त्यात फाल्गून मास
आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं
बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ
काही नवीन.....
बायकोनी दिली झोळी अन् मेव्हणी दळण दळी
आयडिया केली आणि वाया गेली
ह्त्यार भारी तर गि-हाइक दारी
:)
- डोम

ऋचा's picture

15 May 2008 - 12:46 pm | ऋचा

अशीच १ फार टुकार म्हण आहे आमच्या कोकणात..

हागलं नाही पोट गेलं

अर्थ माहीत नाही :/

स्वाती दिनेश's picture

15 May 2008 - 12:54 pm | स्वाती दिनेश

म्हणी बर्‍याच माहिती आहेत पण त्यामागच्या गोष्टी मात्र सगळ्याच माहित नव्हत्या,त्या वाचायला मजा येते आहे..
स्वाती

मंडळी प्रोत्साहना बद्दल आभर, आज अजून एका म्हणीची उगम कथा सांगतोय पहा आवडते का,

आपण लाहान पणापासून बैल गेला नि झोपा (झापा) केला ही म्हण ऐकत आलोत.
पण लेको जर मी तुम्हाला आज अस सांगीतल की ही म्हण चुकीची आहे तर ?

गावी अंगणात (गोठ्याला) जे फाटक असायचं त्याला झापा म्हणत. त्यामुळे मला वाटायच कि कदाचीत गोठ्याला झापा नसावा आधी नी एखादा बैल पळून गेल्या नंतर मग झापा केला असेल.(हल्ली गावात गायी, बैल , बैलगाड्या राहील्याच कुठे, घोडे (दुचाक्या हो) आले नी गोठ्याची गॅरेजं झाली) पण खरी म्हण आहे बाईल गेलिया झोंपा केला. यामागची ही मजेशिर कथा .....

एका गावत एक तरुण राहत होता. त्याच एका सुंदर मुली (बाई)वर प्रेम जडलं. पण होता बिचारा गरिब. त्याने बरिच वचनं देउन तिला लग्नाला राजी केलं. बाईने काही महिने कळ काढली, पण निदान राहत घर(झोपा) तरी चांगल असाव म्हणून तिने त्याच्याकडे भुणभूण लावली की चांगल घर बांध. बिचारा तरुण पै पै साठवत राहीला. पण दरम्यान वैतागून बाई त्याला सोडून निघून गेली व तिने दुसरा घरोबा केला.
काही काळाने पैसे जमल्यावर त्या तरुंणाने चांगल घर (झोपा) बांधल. तेव्हा लोक म्हणाले की बाईल गेलिया जोपा केला.
सारः एखादी गोष्ट जर वेळिच नाही केली तर नंतर ती करुन सुद्धा तिच महत्व राहात नाही

काळाच्या ओघात 'बाईल'च बैल नि 'गेलिया'च गेला कधी झालं कळलच नाही. :))

लॉजिकल आहे एकदम :) मस्त माहिती.

अभिता's picture

17 May 2008 - 7:28 pm | अभिता

"म्हणीच्या गोष्टी "असे अनमोल प्रकाशनचे पुस्तक आहे यात खुपगोष्टी आहेत म्हणीवरुन.

प्रा सुरेश खेडकर's picture

19 May 2008 - 2:25 am | प्रा सुरेश खेडकर

बैलगाडीच्या चाकांच्या आंसावर ल्युब्रिकेशन साठी वंगण( तेल)लागते. ते ठेवण्यासाठी एक बांबूची ( किंवा पत्र्याची) नळी व त्यांत ,तेल लावण्यासाठी चिंधी बांधलेली तार
( किंवा काडी)असते. गाड्याबरोबर त्या नळ्याची पण यात्रा होत असते.
तसेच एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर साधारण माणसाला आवश्यक नसतांना यात्रा घडणे वा मान मिळणे, म्हणजे "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा."

पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं आहे.
म्हणजे गाडीशी नाही तर तिचा संबंध घोड्याशी आहे.
घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते.
ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात.
आणी पुर्वीच्या काळी जेव्हा घोडे घेउन लोक यात्रेला जायचे त्यावेळी,
घोड्यासोबत नाळंची यात्रा अशी म्हण रुढ झाली.

पंगा's picture

25 Feb 2011 - 9:00 pm | पंगा

घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते.
ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात.

त्या पट्टीस 'नाल' असे संबोधतात. 'नाळ' असे नव्हे.

'नाळ' या संज्ञेचा अर्थ खूपच वेगळा आहे. त्याचा गाडी किंवा घोडा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही.

वर प्रा. म्हणतात ती व्युत्पत्ती सयुक्तिक वाटते.

मस्त कलंदर's picture

26 Feb 2011 - 11:18 am | मस्त कलंदर

माझ्या घरी माझ्या लहानपणी उद्गमकथा नावाचं पुस्तक होतं. त्यात अशा बर्‍याचशा म्हणींचे अर्थ दिले होते. आता जसे आठवतील तसे ते इथे लिहिते.

१. घोडं पेंड खातं..
ही पेंड नाही, तो पेण या शब्दाचा अपभ्रंश आहे. पेण म्हणजे टप्पा. जुन्या काळी साधारणपणे तळकोकणातून मुंबईला बैलगाडीने थवा मुख्यतः घोड्यावरून येणार्‍या लोकांना टप्पा घ्यावा लागे. कधी कधी काही कारणाने हा टप्पा इतका लांबे की प्रवास लवकर संपतच नसे. म्हणून एखादं काम अडलं की "अरे काय करू, तिथंच तर माझं घोडं पेण(टप्पा) खातंय" असं म्हणण्याची पद्धत रूढ झाली. त्या पेणचाही अपभ्रंश होऊन आणि घोडा प्राणी आहे तर तो काहीतरी खाण्याचीच वस्तू खाणार म्हणून त्या पेणचं पेंड झालं. पेण हे गाव मुंबई आणि कोकणास सोयीस्कर पडत असल्याने त्या ठिकाणी आधी असे टप्पे घेतले जात, यावरूनच त्याचं नांव पेण असं पडलं असावं.. (असं त्या पुस्तकात लिहिलं होतं :-) )
असो, पेंड खाणारा घोडा अजूनतरी माझ्या ऐकण्यात नाही.

२. रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी..
इथे वरती दिलेली गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे. मी वाचलेली कथा अशी की, तुंबडा/ड्या हे तुंबा=गडूचं अपभ्रंशित रूप. एका गावच्या न्हाव्याला सतत काही काम हवं असे. तेव्हा तो रिकामा असेल तर कुडाच्या भिंतींना भोपळ्याचे केलेले तुंबडे सतत अडकवत व काढत बसे..

३. तू तांडेल, मी तांडेल, तर घमत कोण सांडेल?
ही म्हण मी फक्त त्या पुस्तकातच वाचली.. पण मानवीस्वभावास लागू पडेल अशीच आहे.
तांडेल म्हणजे छोट्या नावेचा कप्तान. आणि घमत म्हणजे समुद्राचं नावेत झिरपून येणारं पाणी. हे पाणी काही काळानं काढून टाकावं लागतं, नाहीतर घमत साठून साठून नाव बुडण्याची वेळ यायची. घमत काढण्याचं काम खलाशी/तत्सम खालच्या दर्जाचे लोक करतात.
तर काही कारणांनी दोन बुडित तांडेलांनी एकत्र येऊन एक नाव घेतली व व्यवसाय सुरू केला. बाकी सगळं ठीक चालं होतं, पण नावेत घमत साठणं चालूच होतं. नावेवर दोघेच असल्याने दोघांचीही "मी तांडेल आहे, घमत काढणार नाही" अशी जुंपली. परिणामी नाव समुद्रात बुडाली.
खोट्या प्रतिष्टेच्या कल्पनांना बळी जाऊन लोक स्वतःचा र्‍हास होत असेल तरी त्यांना त्याची पर्वा कशी नसते, यासाठी हे म्हण अगदी चपखल उदाहरण आहे.

असो, आतापुरतं इतकंच... संध्याकाळी आणखी काही भर घालेन.

आनंदी गोपाळ's picture

16 Sep 2012 - 11:20 am | आनंदी गोपाळ

तुंबडी = जळू.
न्हावी हे हजामतीसोबत मायनर सर्जिकल वर्क करण्यासाठी प्रसिद्ध होते. (शिवकालीन सैन्यात जखमा धुणे, त्यांना ड्रेसिंग करणे, टाके घालणे इ. कामे न्हावी करीत.) जळू लावून हिमॅटोमा पक्षी मुकामार लागून साकळलेले रक्त काढून टाकीत. (आयुर्वेदात जलुकावतरण व रक्तमोक्षण इ. आहेत.)

रिकामा न्हावी काम नसले की ती जळू भिंतीला चिकटवीत बसतो, अशा अर्थाची ती म्हण आहे.

तुम्बा नव्हे

रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी, या म्हणीची पार्श्वभूमी अशी.
पूर्वी जखमा चिघळून पू झाल्यावर दूषित रक्त काढण्यासाठी जखमेवर जळवा लावत. त्या जळवांनी दूषित रक्त शोषून घेतल्यावर चुना लावून जळवा काढीत. हे काम न्हाव्याचे असे. न्हावी लोक यासाठी जळवा बाळगत.
या न्हाव्याला काम नसले, की बरणीतल्या जळवा काढून उगा आपलं भिंतीला चिकटवण्याचा रिकामा उद्योग. म्हणून ही म्हण.

सस्नेह's picture

16 Sep 2012 - 12:33 pm | सस्नेह

नाचता येईना अंगण वाकडे, चूल पेटेना ओली लाकडे.
का गं बाई रोड, तर हिला सासरची ओढ.
अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी.
छप्पन लुगडी अन भागाबाई उघडी.
हातच्या काकणाला आरसा कशाला ?
दिवस गेला रेटारेटी अन चांदण्यात कापूस पेटी.
काखेत कळसा अन गावाला वळसा.

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 1:17 pm | ज्ञानराम

मस्त धागा गणपा भाऊ .....

माहीती मिळाली ,,, आणी म्हणीच्या मागची पार्श्वभूमी कळाली...

सही... वाचतोय आम्ही,,, आणखी येऊद्यात. :)

बॅटमॅन's picture

16 Sep 2012 - 4:19 pm | बॅटमॅन

मराठी म्हणींचे एक अगदी वर्गीकरणासहित खंप्लीट कलेक्शन एका इंग्रजाने केलेले इथे बघा. अजून एक कलेक्शन कुणी भिडेशास्त्र्यांनी केलेले ऐसी/उपक्रमावरती वाचले होते, ते आठवले की टाकतो.

'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण' या म्हणीचा उगम काय असावा ?

ज्ञानराम's picture

17 Sep 2012 - 10:38 am | ज्ञानराम

वासरात लंगडी गाय शहाणी.. ! काय अर्थ आहे याचा?

वामन देशमुख's picture

17 Sep 2012 - 6:18 pm | वामन देशमुख

कानामागून आली अन् तिखट झाली-
गाई-म्हशींना जन्मत: कान असतात आणि ते शेवटपर्यंत नरम राहतात. शिंगे मात्र कानामागून येतात अन् तिखट होतात!
-इतरांच्या नंतर येऊन शिरजोर होणार्‍या व्यक्तींचे वर्णन