वर्ल्ड कप पेश्शल झटपट कोळम्बी

गोगोल's picture
गोगोल in पाककृती
2 Apr 2011 - 5:08 pm

|| श्री गणपाय प्रसन्न: ||

साहित्य:
१. ५०-६० मोठ्ठ्या कोलंबी
२. १.५ चमचा जिरा पाउडर
३. १.५ चमचा कोथिंबीर पाउडर
४. २.५ चमचा गरम मसाला.
५. एक मोठ्ठा कांदा
६. एक मोठ्ठा टोमॅटो
७. एक मिर्ची.
८. हळद, मोहरी ई
९. एक लिम्बू

कृती:

१. एका भांड्यात कोलंबी ठेवून त्यावर जिरा, कोथिंबीर पाउडर टाकून अख्खे लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करून दोन ते तीन तास मूरत ठेवा.

२. कोलंबी मुरेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्या.
३. एका मोठ्ठ्या जड बूडाच्या भांड्यात थोडे तेल तापवा. तेल तपल्यावर हळद आणि मोहरीची फोडणी करून घ्या.
४. मिरची टाका. कांदा चांगला परतवून घ्या. कांदा सोनेरी / लाल झाल्यावर टोमॅटो घालून परता. टोमॅटो + कांदा + मिरची चांगले परतून एकजीव झाले की गरम मसाला टाका. मस्त वाज़ सुटेल. एक २ मिनिटे परता.
५. कोलंबी टाका आणि झाकण ठेवा. १० मिनिटे शिजवून घ्या. कोलंबी पटकन शिजतात. वेळ लागत नाही.

६. एक बीअर चा प्याला भरून घ्या. एकेका घोटाबरोबर एकेक कोळम्बी तोंडात सोडा. श्रीसांत / लन्केला शिवी घालून घ्या. कोळम्बीत थोडास्सा रस्सा असल्याने बोटे ओली होतील. बीअर च्या ग्लास ला हात लावण्यापूर्वी तोंडात बोटं घालून रस्सा ओर्पून घ्या.

प्रतिक्रिया

ये हुईना बात. कॅन्स ओपन आहेच. ती कोलंबी डीश मध्ये टाकुन ये बर इकडे लगेच.

गोगोल's picture

2 Apr 2011 - 5:23 pm | गोगोल

हा हा आलो आलो :)

प्रशु's picture

3 Apr 2011 - 1:43 pm | प्रशु

अहो नाव झटपट आणि २-३ तास कोलंबी मुरत ठेवताय...

बाकि डिश मस्त...

गोगोल's picture

4 Apr 2011 - 2:05 am | गोगोल

मुरत ठेवणे हा वेळ काऊंट केलेला नाही. कोलंबी फ्रिज मधून काढून मसाला टाकून, लिम्बू पिळून ठेवायला पाच मिनिटे पण लागत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Apr 2011 - 1:52 pm | निनाद मुक्काम प...

मस्त झकास रेसिपी
आता आय पी एल आहेत
परत बायर्न म्युनिक चे सामने होतील
तेव्हा हा प्रकार सासऱ्या सोबत बसून खाईन