मासे २३) चिंबोरे/खेकडे
चिंबोर्यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अॅलर्जीहई असते चिंबोर्यांची.
नर व मादी चिंबोरे. मादी चिंबोर्यात लाख मिळते.
लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच. शिवाय ताटात हा पसारा होउन दोन हात खाण्यासाठी वापरावे लागतातच.
चिंबोर्यांचे अजुन सुप, सुके करता येते.चिंबोरा भाजता येतो, तसेच पिठ भरुन कालवणही करतात.
चिंबोर्या घेताना कडक बघुन घ्यायच्या. जर चिंबोरे दाबल्यावर आत जात असतील तर ते पोकळ असतात. भरलेल्या चिंबोर्यांमध्ये लाख (गाबोळी मिळते) ती मिळाली म्हणजे पर्वणीच.
दिवाळीच्या आसपास खाडीत तसेच खाडीलगतच्या शेतात छोटी छोटी चिंबोरी मिळतात त्यांना पेंदुरल्या म्हणतात. ह्या पेंदुरल्या आतमध्ये पुर्ण लाखेने भरलेल्या असतात. लाख म्हणजे ह्यांची गाबोळी.
लागणारे साहित्य:
४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन वाटावे
१ चमचा गरम मसाला.
थोडी कोथिंबिर
तेल
क्रमवार पाककृती:
चिंबोरे साफ करुन घ्यावे. साफ करुन म्हणजे चिंबोरीचे दोन मोठे नांगे काढुन घ्यायचे, बाकीच्या नांग्यांचे वाटुन गाललेले पाणि घ्यायचे त्यामुळे रश्शाला दाटपणा येतो पण हे ऑप्शनल आहे. नंतर चिंबोरे मधुन कापुन त्यातील काळी पिशवी काढून टाकायची. जर चिंबोरे छोटे असतील तर आख्खे टाकले तरी चालतील.
भांड्यात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे, मोठे नांगे टाकुन चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ, कोथिंबीर टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा. चिंबोरे शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणुन मिडीयम गॅसवर १५ मिनीटेतरी शिजु द्यावे.
हा घ्या रस्सा.
वाचने
21063
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
एक नंबर
छान दिसतंय. अजून एक उत्तम
आहाहा...
मी पूर्वी खाल्ल्या होत्या.
अरेरे!
खल्लास
मस्त एकदम झक्कास
In reply to मस्त एकदम झक्कास by वेताळ
हळद
व्वा
In reply to व्वा by कच्ची कैरी
हेच म्हणतो मी ए तू आम्ही सारे
जबरा! खेकडे फार आवडतात पण कसे
मस्तच!!
खेकडे माहिती :)
जागू, हे चिंबोर्या साफ कश्या
मस्तच दिसतंय!
नेहमीप्रमाणे छान.
अतिशय छान
खेकडे दळणे.
खेकड्याचा रस्सा, बाजरीचि
जगुताई सुन्दरच
एक तास जागु? आम्ही तासन तास
जागुताई
In reply to जागुताई by रामदास
अवांतर : अब्दुल कादीर/कादर
हां तोच तो
अती अवांतर
उच्च
चिंबोरीचा रस्सा मिळावा
दिपाली, दिविरा पुढच्या वेळी
धन्यवाद :)
व्वा ! काय मस्त फोटो आहेत.
जागु तुम्ही खरंच छान माहिती
खूप मस्त ...