मसालेदार हरबरा बटाटा उसळ.

कुंदन's picture
कुंदन in पाककृती
25 Mar 2011 - 5:30 pm

साहित्यः
१ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. )
१ वाटी सुके खोबरे.
१ मोठा कांदा.
२ मिरच्या
२ लसुण पाकळ्या ( सोलुन)
छोटा आल्याचा तुकडा
१ टि स्पुन लाल तिखट
१ टि स्पुन मसाला.

रात्र भर भिजत ठेवलेल्या हरबरे निथळुन घेणे.
सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे.
बटाटा धुवुन , सोलुन व कापुन घेणे.

एका कुकर मध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे.
मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा.
त्यात हरबरे व कापलेला बटाटा टाकुन पुन्हा एकदा नीट मिक्स करा.
आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कुकरचे झाकण नीट लावुन २-३ शिट्या मारा( काढा).

कुकर उघड्यायची जास्त घाइ करु नका , ते गार झाल्यावरच उघडा.

Harbara_batata_usal.jpg

पाहिजे त्या प्रमाणे हादडा , नुसते / चपाती बरोबर / ब्रेडबरोबर

प्रतिक्रिया

शेखर's picture

25 Mar 2011 - 5:33 pm | शेखर

वा वा कुंदन.... मस्त दिसते रे... तोंडाला पाणी सुटले...

प्रसन्न केसकर's picture

25 Mar 2011 - 5:36 pm | प्रसन्न केसकर

हरभरे फारसे आवडत नाहीत मला पण त्याऐवजी मटार घालुन ट्राय करुन पहायला हवी ही रेसिपी.

कुंदन's picture

25 Mar 2011 - 5:39 pm | कुंदन

धन्यवाद प्रसन्नदा.
मटारच काय , त्याच्याही ऐवजी जर शिजवलेले चिकन टाकुन अजुनही चविष्ट लागेल ही भाजी. ;-)

प्रसन्न केसकर's picture

25 Mar 2011 - 6:00 pm | प्रसन्न केसकर

काय बाटवतोस काय बामणाला?

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 5:37 pm | प्रीत-मोहर

पाकृविभागात पण वेंट्री?

मस्त य रे पाकृ

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2011 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी शेख साब !

हेच ड्राय बनवले तर वारुणी बरोबर पण साथ देईल ;)

चुकुन माकुन पाणी/रस्सा राहिलाच तर बचकाभर फरसाण टाकुन पन ए१ चखणा तयार होइल. तेव्हा वरी नॉट. ;)

कुंद्या (मजबुरीने का असेना पण) मार्गाला लागला एकदाचा. :)

काय आनंद झालाय या गणपाला!! वा वा!

कुंद्याभौ.. भाजी चांगली दिसतेय हो.. करा करा! अशाच छान छान भाज्या करा. :)

सुहास..'s picture

25 Mar 2011 - 5:43 pm | सुहास..

कुंद्या , लेका स्वंयपाक घरात काय करतो आहेस बे? ;)

हार्ट अटॅक यायचा बाकी होता ;)

पण हे { (१ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. ;) ) } वाचले आणि मग खात्री पटली की हा कुंद्या च आहे ;)

पाकृ बद्दल : फालतु पाकृ ;) (आमच्या रेसिपीवर प्रतिसाद दिले नाहीत म्हणुन ;) )

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Mar 2011 - 5:48 pm | llपुण्याचे पेशवेll

बघून बरी वाटते आहे पण प्रत्यक्षात चवीला कितपत चांगली लागेल याबद्दल साशंक आहे.

-बिलास मिंधे

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

बघून बरी वाटते आहे पण प्रत्यक्षात चवीला कितपत चांगली लागेल याबद्दल साशंक आहे.

चवीला अत्यंत थर्डक्लास लागणार, कारण पाकृ मध्ये मिठाचा बिलकुल वापर केलेला नाही =))

कुंदन's picture

25 Mar 2011 - 6:03 pm | कुंदन

अर्र ते विसरलोच की.
मिठ वरुन घे ते पर्‍या.

तुला साला सगळेच सांगावे लागते. कसे होणार ब्वॉ तुझे पुढे ;-)

टारझन's picture

25 Mar 2011 - 5:50 pm | टारझन

आयला कुंद्या इकडे ? :) मस्त रे :) पाकृ कुंदु स्टाईल आहे काय ?

अवांतर : आपल्या कडे थंब स्कॅनर असलेला लॅपटॉप आहे हे दाखवायचा .. ... ... प्रयत्न :)

- वंदन

कुंदन's picture

26 Mar 2011 - 6:15 pm | कुंदन

अर्र बाजुचा ३७" एलसीडी टिव्ही र्‍हायलाच की फोटोत घ्यायचा.

गणपाने ह्या पुरुषांना बि-घडवुन टाकलं आहे ब्वॉ...

बाकी ती भाजी काय लॅपटॉपला खाउ घालत व्हता की काय?? आणी हो पेंटच स्कील सुधारायला वाव आहे... ;-)

अरे हो, पाकृ का.. चान चान.. :P

कुंदन's picture

25 Mar 2011 - 5:57 pm | कुंदन

भौ , तिथे माझ्या पायांचा फोटु होता.
काये नंतर तुम्ही लोके पायांच्या फोटुच्या झेरॉक्शी मागाल , म्हणुन ठेवला होता एकत्र.
पण नंतर सुधरवला.

हॅ हॅ हॅ, ते कळ्ळं की राव आम्हाला.. कॉमन मिश्टेक आहे ती आमची. ;-)

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2011 - 6:02 pm | नगरीनिरंजन

दिसतेय तर भारी.
>>कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजुन म्हणजे थोड्या तेलावर परतून असा अर्थ अभिप्रेत आहे ना इथे?

कुंदन's picture

25 Mar 2011 - 6:23 pm | कुंदन

मी नुसताच कांदा भाजला.
भारतात असाल तर गोडेतेलावर , अन हिरव्या अथवा तत्सम देशात असाल तर ऑलिव्ह तेलावर जशी चवा पायजेल तसा भाजु शकता तुम्ही कांदा.

चक्क कुंदनभाऊजींनी स्वयंपाक केला?
फोटू छान आणि पाकृही समजली.
ही उसळ माझ्या सासूबाई एकदम मस्त करतात. मला रेशिपी त्यांनी सांगितली नव्हती........मीही विचारली नाही हे वेगळे सांगत बसत नाही.;) तुम्ही वापरलेले हरभरे हिरवे दिसतायत. ते नाही कधी वापरले पण चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला अश्याच काळ्या हरभर्‍यांनी ओटी भरली जाते. आम्ही सासूसुना अश्या चार ठिकाणी हळदीकुंकवाला जाऊन आलो तरी बरेच हरभरे यायचे. आता याचे काय करावे? हा प्रश्न ही पाकृ चटकन सोडवते.

सहज's picture

25 Mar 2011 - 6:31 pm | सहज

कुकरमधे एकापेक्षा जास्त माणसाला पुरेल इतका स्वयंपाक होउ शकतो असे तर 'कोणाला' दाखवून द्यायचे नव्हते ना हो कुंदनभावोजी?

असो आता स्वतापुरते चार स्लाईस घेउन येईल.. कोणीतरी..

>>असे तर 'कोणाला' दाखवून द्यायचे नव्हते
नाही.

एकदा भाजी केली तर २-३ वेळा ओरपता यावी हा सेहेज सोपा उद्देश होता भरपुर भाजी करण्यामागे.
बाकी तुम्हाला खायची असेल तर स्वागतच आहे , फक्त नीट लायनीत यावे ही विनंती. ;-)

सहज's picture

28 Mar 2011 - 12:31 pm | सहज

सांभाळून घ्या 'गाववाल्यांना'!!

आमंत्रणाबद्दल धन्यवाद! :-)

निवेदिता-ताई's picture

25 Mar 2011 - 6:33 pm | निवेदिता-ताई

आम्ही ही भाजी फक्त चैत्र महिन्यातच करतो...चैत्रगौरीचे हळदीकुंकू अस्ते,त्यातले बरेच हरबरे शिल्लक राहतात.(मुद्दामच जास्त टाकलेले असतात)..पण चटपटे हरबरे करतो.....अशी रस्सा भाजी नाही आवडत.

असे भिजवलेले हरबरे..वांग्याच्या भाजीत एकदम छान लागतात.करुन पहा..

कच्ची कैरी's picture

25 Mar 2011 - 7:21 pm | कच्ची कैरी

पाकृ छान वाटतेय ,अजुन येऊ द्या.
बाकी ती उसळ कूकरमधुन काढुन घेऊन फोटो काढण्याची कृपा मिपाकरांवर का नाही केलीत ?;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2011 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी दिसत आहे. [पण रस्सा तांबंड फुटायच्या आत उठवणारा दिसतोय. ]
अजून येऊ दे भावा.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

25 Mar 2011 - 9:01 pm | कुंदन

एव्हरेस्ट चे "तिखा लाल" वापरल्या गेले आहे.रस्सा चा रंग फक्त तांबडा आहे, जास्त तिखट नाहिये.
अन्यथा मी तसा योग्य तो वैधानिक इशारा दिला असता.
तेव्हा तांबड फुटायच्या आत उठायची काळजी न करता मनसोक्त ओरपा.

अवांतर : हल्ली "घड्याळा"त तांबड फुटल्या शिवाय तुम्ही उठत नाही म्हणे. किती हा वक्त्शीर पणा गुरुजी. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2011 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एव्हरेस्ट चे "तिखा लाल" वापरल्या गेले आहे.रस्सा चा रंग फक्त तांबडा आहे, जास्त तिखट नाहिये.
अन्यथा मी तसा योग्य तो वैधानिक इशारा दिला असता.

माहितीबद्दल आभारी.

काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

सहमत आहे. ;)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

25 Mar 2011 - 11:41 pm | पैसा

मीठ घालून खाण्यात येईल!

इंटरनेटस्नेही's picture

26 Mar 2011 - 4:54 am | इंटरनेटस्नेही

कुंदनदादा, तुमच्या लॅपटॉपलाच कुकिंग रेंज आहे हे माहित नव्हतं.. मस्त लॅपटॉप, आवडला, काय कॉन्फ्युगिरेशन आहे?
-
चंदन.

विसोबा खेचर's picture

26 Mar 2011 - 5:53 pm | विसोबा खेचर

क्लास.!!

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Mar 2011 - 9:15 pm | ब्रिटिश टिंग्या

क्या बात क्या बात!

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 7:28 am | प्रीत-मोहर

मी आज करनारे

पैसा's picture

27 Mar 2011 - 10:37 am | पैसा

येऊ का खायला?

प्रीत-मोहर's picture

27 Mar 2011 - 10:41 am | प्रीत-मोहर

स्वतःच्या रिस्कवर येणे!!!! इन्श्योरेन्स आहे ना काढलेला?

पैसा's picture

27 Mar 2011 - 10:43 am | पैसा

आणखी बरेच जण येतील मग!

sneharani's picture

28 Mar 2011 - 12:37 pm | sneharani

मस्त आहे रेसिपी!
:)

दीप्स's picture

5 May 2011 - 11:37 am | दीप्स

कुंदनभाऊ,

मि आधि चने कुरला शीजवुन घेते. आणि नन्तर फोडनी घालते. बाकि भाजिचा रन्नग सेम आहे.

एक एक दिवस मन्तरलेला | नव्या पदाथाने भरलेला
खावुन घ्यावे सारे सारे | मिसळ पाववरील सर्व पादार्थ