चार वाट्या पुरणावरील कट--आपण आज जे पुरण केले त्यावरील जेवढा कट आधीच बाजूला काढून ठेवला असेल तो घ्या.व थोडेसे तयार पुरण पण घ्या,
गुळ पाव वाटी, एक लींबाएवढी चिंच भिजत घालून ठेवा व त्याचा कोळ काढा, सुक्या खोबर्याचा एक छोटा तुकडा गॆसवर भाजून घ्या म्हणजे तो तुकडा गॆसवर धरा तो पेट घेइल तो खाली काढून ठेवा व तो पुर्ण काळा झाला की फ़ुंकर घाला...करपु देउ नका, आता त्याचे बारीक तुकडे करुन ते वे जिरे चमचाभर घेउन मिक्सरवर
वाटून घ्या, गोडा मसाला एक चमचा (टे. स्पुन.),
आता तेल गरम करुन घ्या , त्यात मोहरी टाका, तडतडली की हिंग घाला, हळद घाला, कढीपत्ता टाका,
आता आपण जे खोबर्याचे वाटण करुन ठेवले ते टाका, चांगले परतुन घ्या, त्यातच गोडा मसाला टाका, पुन्हा परतुन घ्या, आता त्यात पुरण कट घाला, चिंच कोळ घाला, थोडे गरम पाणी घाला, गुळ घाला, मीठ चविनुसार घाला,पुरण पण त्यातच घाला, मस्त भरपुर वेळ उकळू द्या,वरुन कोथींबीर पण घाला.ही थोडी काळपट दिसते पण चव मात्र मस्तच्..!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जास्त वेळ उकळल्यामुळे कटाची आमटी जास्त चविष्ट होते,आणी गरम गरम घ्या आता पुरणपोळी बरोबर खायला.
अस्सा भुरका मारा की आहा आहा......:) :p
प्रतिक्रिया
19 Mar 2011 - 8:13 pm | स्नेहश्री
मला जाम आवडते..
आज जरा जास्तच भुरकीन..
19 Mar 2011 - 8:18 pm | पैसा
ही खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजायची आयडिया छान आहे. मस्त खमंग होत असणार!
20 Mar 2011 - 11:54 pm | शुचि
मी पहील्यांदाच ऐकते आहे.
20 Mar 2011 - 12:55 am | प्राजु
आज केली होती मी .
20 Mar 2011 - 1:24 am | रेवती
मीही केलिये.
मला वाटतं रामदासांनी 'करी ऑफ कॉन्सिरसी' ची पाकृ दिली होती.
फॉटू नसलेल्या पाकृंना आम्ही प्रतिसाद देत नाही पण आज दिला.;)
20 Mar 2011 - 11:16 am | निवेदिता-ताई
अग फोटो काढेपर्यंत आमटी शिल्लकच राहिली नाही...भुरके मारले सगळ्यांनी...:p
20 Mar 2011 - 11:25 am | वाहीदा
या आमटीची चव कश्शा कशाला नाही..
21 Mar 2011 - 1:57 pm | दीविरा
मी पण केली होती पण फोटो काढला नाही :(
मी फोडणीत सुक्या खोब्र्याचे काप तळून टाकले होते छान लागतात.
:)
21 Mar 2011 - 2:32 pm | कच्ची कैरी
:(
21 Mar 2011 - 3:07 pm | जागु
मी पण केली होती होळीच्या दिवशी. मी खोबर्याबरोबरच लवंग, दालचिनी वाटून टाकते आणि शेवगेच्या शेंगाही टाकल्या होत्या.
22 Mar 2011 - 12:29 am | सानिकास्वप्निल
मस्तच :)
कटाच्या आमटीची तर बातच न्यारी :)
22 Mar 2011 - 9:47 pm | मदनबाण
परवाच चव चाखायला मिळाली... त्यात जर तमालपत्र आणि दालचिनी असेल तर चव अफलातुन लागते !!! :)
23 Mar 2011 - 10:47 pm | रश्मि दाते
म्स्त झाली होती ताई कटाची आमटी आप्ल्या रेसेपी प्रमाणे केली होती ,ध्न्यवाद :)
वेगळी चव होती