फेसबुकचा चेहरा

स्वैर परी's picture
स्वैर परी in काथ्याकूट
3 Mar 2011 - 12:50 pm
गाभा: 

आंतरजालावर भटकणे हा माझा आवडता उद्योग. त्यातही संगणक सुरु केला कि पहिले काम म्हणजे मिपा आणि ई-सकाळ उघडणे. आज ई-सकाळ मध्ये आलेला हा लेख आवडला. म्हणुन त्याचा दुवा इथे डकवीत आहे.
विषय कदचित आधी देखील काढुन झाला असेल, परंतु सहज एकदा वाचावा असा हा लेख वाटला. :)

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

3 Mar 2011 - 1:05 pm | इंटरनेटस्नेही

धन्यवाद, स्वैर परी ताई.. लिंक http://www.facebook.com/rishikesh.chindarkar इथे शेअर करत आहे!

छोटा डॉन's picture

3 Mar 2011 - 1:20 pm | छोटा डॉन

>>धन्यवाद, स्वैर परी ताई.. लिंक http://www.facebook.com/rishikesh.chindarkar इथे शेअर करत आहे!

=)) =)) =))
च्ययाला, ह्याला काय अर्थ आहे राव, इथे पण स्वतःच्या प्रोफाईलची जाहिरात ?
उद्या दिवसाच्या अखेरीस लॉग्गाउट करताना "चला, निघतो आता. मला आता फ्लॅट नंबर ५, अलाणाफलाणा काँप्लेक्स, विविक्षित गल्ली, क्ष नगर इथे जायचे आहे" असे म्हणाल, नव्हे तुम्ही 'घरी जातो' एवढ्याच वाक्याला संपुर्ण पत्ता देऊन 'इथे जातो' असे म्हणताल असे वाटते, असो.
लाईटली घ्या किंवा घेऊ नका, कसेही.

बाकी लेख वाचला, छानच आहे.
लेखात बरेच छान छान मुद्दे कव्हर केले आहेत, मिपावरही ह्या बाबतीत चर्चा झाली होती, सापडली तर इथे लिंक देईन..

- छोटा डॉन

कुंदन's picture

3 Mar 2011 - 1:29 pm | कुंदन

पण ते त्याचे घरच असेल कशावरुन ?
आभ्यासिकाही असु शकेल.

लाईटली घ्या किंवा घेऊ नका, कसेही.
डॉन्या कहर रे कहर

उगा काहितरीच's picture

3 Mar 2011 - 1:33 pm | उगा काहितरीच

मला कळत नाही की लोक अती व्यक्तिगत गोष्टी कशा काय चव्हाट्यावर मांडतात ?
- फेसबुक वापरणारा

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद, स्वैर परी ताई.. लिंक http://www.facebook.com/rishikesh.chindarkar इथे शेअर करत आहे!

कित्ती कित्ती सुंदर :)

अजुन दोन प्रकार करता येतील बघ :-

१) धन्यवाद, स्वैर परी ताई.. लिंक (तुझा फोन नंबर) इथुन मित्रांशी शेअर करत आहे!

२) धन्यवाद, स्वैर परी ताई.. लिंक (तुझ्या घराचा पत्ता)इथे प्रिंटाऔट काढुन घराबाहेर चिटकवुन शेअर करत आहे!

कित्ती कित्ती सुंदर

हॅ हॅ हॅ

इणत्या "प्रगल्भ" काय झालाय
अमुलाग्र बदलच झालाय....
इणत्या तू MBA IN ADVERTISING कर रे

अविनाशकुलकर्णी's picture

3 Mar 2011 - 1:58 pm | अविनाशकुलकर्णी

७-८ वि तल्या मुलाम्ची शाळा घ्यावि तसा लेख आहे...साधारण लेख..

चिरोटा's picture

3 Mar 2011 - 2:02 pm | चिरोटा

छान माहिती. सध्या गूगल्,याहूच्या तोंडाला फेसबूकने थोडा फेस आणला आहे.जगातले सर्व कठिण प्रश्न अमेरिकन सॉफ्टवेयर/आय्.टी. कंपन्याच सोडवत असल्याने फेसबूकला सध्या महत्व आहे.

वाहीदा's picture

3 Mar 2011 - 4:28 pm | वाहीदा

या Roadies auditions मध्ये
फेसबूक वरुन व्यक्तीपरिक्षण करणारे जज काय काय प्रश्न विचारतात अन त्यांना अनुरुप अचंबित नमुनेदार उत्तरे ही पहायला मिळतात
त्यातलं ते 'रघुराम' जज एक नमुना आहे तो तर काय स्वतःला या पिढिचा आयकॉन च समजतो.
अन काही मुली पण त्याला भेटल्यावर अन पाहिल्यावर रडतात काय अन मिठ्या काय मारतात .. बघुन मजा येते. तो प्रोग्राम म्हणजे सगळा आनंदी आनंद आहे .
By no means M Tv -Raghu is a representation of today's youth (which is sensible and cool). This guy needs to take a chill pill...
हे रोडीज शो कसल्या शिव्या द्यायचे प्रशिक्षण देतात अन फेसबूक हा त्याचा गाभा आहे

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2011 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

फालतुगिरी आहे ते रोडीज.

एखाद्या लाचार्‍यासारखे पोरं पोरी त्या जजेसनी आई बहिणीवरुन दिलेल्या शिव्या आणि अपमान सहन करत असतात. जोवर अशा मुर्ख शो''ज ना खरे मानुन त्याची पारायणे करणारे मुर्ख लोक आहेत तोवर काही न बोलणेच योग्य. त्या जजना तरी 'रोडीज' म्हणजे काय याची कितपत अक्कल आहे देव जाणे.

बादवे, त्या ऑडिशन मधे एका दिड शाहण्याला मात्र 'अयोध्या व्हर्डिक्ट' वरुन बेक्कार घेतला होता ते जाम आवडले होते. मी हे फालतु कधीच बघत नाही पण चेपुवरच्या मित्राने आग्रहाने बघायला लावले. तो भाग जाम आवडला होता आणि चक्क शेअर देखील केला होता.

छोटा डॉन's picture

3 Mar 2011 - 4:36 pm | छोटा डॉन

बहुतेक तुमचा काहितरी भयंकर गैरसमज झाला आहे किंवा संपुर्ण गल्लत झाली आहे असे दिसते आहे.

रोडिज हा खरोखर चांगला शो आहे, मी त्याचे गेले ५ सिझन्स संपुर्ण पाहिले आहेत.
मी तर असे म्हणेन की फुटबॉलनंतर टीव्हीवर काही पाहण्यासारखे असेल तर ते म्हणजे 'एम टिव्ही रोडिज...'.

असो, विषयांतर होते आहे.
ह्या विषयाचा उहापोह करण्यासाठी नवा धागा काढा असे सुचवतो.

- डॉनविजय

डॉण्याशी त्रिव्र असहमत ... रोडिस काय , स्प्लिट व्हिला काय .. तो झिंगुर रघ्या माझ्या समोर आला तर त्याची फ्रेंची ( पक्षी दाढी) कापुन त्याच्या हातात देईन .. लोकं फेम साठी इतके वेडे असतात , जर आपल्या कोल्हापुराची आनबानशान ने जरी एखादा " कोदीज " म्हणुन प्रोग्राम काढला .. तर हे स्पर्थक .. " ओह कोल्हापुरची आनबान शान ... वी लव्ह यो ... " असे म्हणत मिठ्याही मारतील आणि रडतील बोंबलतील सुद्धा.
शिवाय ते सगळं स्क्रिप्टेड असतं ह्यात दुमत नाही ..

बाकी सकाळवरच्या ह्या लेखा पेक्षा अनावृत्त पत्र कितीतरी छाण लिहीलं होतं .. अगदीच बाळबोध लेखण ;)

छोटा डॉन's picture

3 Mar 2011 - 4:42 pm | छोटा डॉन

तुर्तास वेगळा धागा काढा इतकेच म्हणतो.
( मला वेळ मिळाला की मी ह्यावर एक सेप्रेट लेख लिहणार आहेच ) ;)

बाकी शोज आम्ही पहात नाही, पण रोडीजमध्ये धमाल आहे बॉस.
आजच्या यंग जनरेशनला एक सुयोग्य प्लॅटफॉर्म देणारा हा शो निश्चितच चांगला आहे पुन्हा एकदा सांगतो ;)

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2011 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे परममित्र श्री. टारझन... सध्या मुक्काम होनोलुलु ह्यांची तहेदिलसे शमत शमत शमत आहे !

तुर्तास वेगळा धागा काढा इतकेच म्हणतो.
( मला वेळ मिळाला की मी ह्यावर एक सेप्रेट लेख लिहणार आहेच )

वायदेआझम फोकलिच्या डान्रावांवर विश्वास न ठेवता टार्‍या तू ह्यावर लगेच धागा उघड. मी आलोच उड उड उडायला. उगा असले काही तरी बघायचे आणि आपण हुच्चभ्रु असल्याचा आव आणायचा.

वाहीदा's picture

3 Mar 2011 - 5:25 pm | वाहीदा

सहसा आम्ही टारझन च्या धाग्यावर काही खरडत नाही पण या विषयावर नक्कीच खरडणार
त्या स्टुपिड राघुला स्वतःचा राग कसा आवरायचा हे कळत नाही अन आजच्या पिढीचं कसलं डोबलांच प्रतिनिधित्व करतो ?? तो आया बहिणीवरुन शिव्या घालायला शिकवतो काय ??
Can't believe MTV choose people like THIS to represent today's youth ??
these guys are nothing but a disgrace to the nation. shouting..screaming.. screeching at the top of their lungs .

स्वैर परी's picture

3 Mar 2011 - 5:31 pm | स्वैर परी

नाही का?

वाहीदा's picture

3 Mar 2011 - 6:45 pm | वाहीदा

टार्‍या काय म्हणतो ते म्हणू दे , आपण या धाग्यावर गोंधळ घालायचा म्हणजे घालायचाच. तू पण ये ! :-)

निखिल देशपांडे's picture

3 Mar 2011 - 8:01 pm | निखिल देशपांडे

( मला वेळ मिळाला की मी ह्यावर एक सेप्रेट लेख लिहणार आहेच )

डॉनरावांनी लेख जरुर लिहावा.. आम्ही खास वेळ काढुन प्रतिक्रिया देउच..

बाकी शोज आम्ही पहात नाही, पण रोडीजमध्ये धमाल आहे बॉस.

रोडीजचे पहिले ५ सिझन ठीक होते हे आमचे मत आहे...
तरीही आम्ही रोडीजचे पि आय आवडीने बघतो... वर पराने फेसबुकावर शेअर केलेला व्हिडो नक्कीच पहावा...
रोडीज बणण्या साठी लोक वेडे का असतात ते आम्हाला फारसे कळत नाही. फक्त रोडीज मधे बडबड केल्याने लोक व्हि. जे बनु शकतात हे आम्हाला कळते. उदा. रणविजय, बानी, आयुष्यमान ई.
आता रोडीज स्क्रिप्टेड आहे असे म्हणुन त्यावर आक्षेप घेण्यात काहीच अर्थ नाही. WWE स्क्रिप्टेड असुनही किती लोक पहायचे/पहातात. असो अजुन काही लिहिले तर डानरावांचा धाग्यावर लिहायला कमी मुद्दे मिळतील.

(रोडिज या शोला डोक्यावर घेउन न नाचणारा आणि त्याला पायाखाली न तुडवणारा)
निखिल

>>>> मला वेळ मिळाला की मी ह्यावर एक सेप्रेट लेख लिहणार आहेच )

>>डॉनरावांनी लेख जरुर लिहावा.. आम्ही खास वेळ काढुन प्रतिक्रिया देउच..

डान्यानी यावर लेख जरुर लिहावा म्हणजे आम्हाला डान्याचा रोडीज करता येईल.

बाकी हे वाचताना डानराव आपला केशसंभार सांभाळत रोडीजमध्ये गेले आहेत आणि तिकडे त्यांना त्यांच्या केसांवर प्रश्न विचारले जात आहेत असा प्रसंग डोळ्यासमोर तरळुन गेला. प्रश्न आम्ही डान्याच्या धाग्यात मांडुच.

झोडीच.

बापरे! काही तरी चूकतय.. कदाचीत फेस्बूकवर कोणी मॉडरेटर अथवा लेख, लेखन व त्यांच्या प्रतीक्रीया संपादीत करणार्‍यांची कमतरता असावी.....

बाकी Roadies वगैरे प्रकार म्हणजे एक मानसीक विकृती आहे की नाही याचा पोल मिपाने जो पर्यंत घेतलेला नसेल तो पर्यंत पटदीशी Roadies ला मिपा तर्फे कोणा कोणाला कँडीडेट म्हणून पाठवायचे यावर एक पोल व्हायला काय हरकत आहे ? तसबी तीथे नीव्वळ सर्वायवल साठी वेगवेगळे कंपूज म्यानेज करावे लागतात असे ऐकून है,अर्थात त्यात पून्हा पाठीत खंजीर लय लास्ट ला टाकत्यातच पण त्यो फक्स्त खेळ हाय... न्हाय का ?

तुम्ही Roadies 8 shortcut to hell चे auditions पाहीले आहेत का ?
पहा अन तुमचे मत तुम्हीच ठरवा
मी अन फेसबूक हा त्याचा गाभा आहे असे लिहीले आहे 'फक्त फेसबूक हा त्याचा गाभा आहे' असे नाही लिहीले.

स्पा's picture

3 Mar 2011 - 4:32 pm | स्पा

Roadies

सगळी विकृती आहे हि
अश्या कार्येक्रमांपासून लांब राहिलेलंच बरं

अर्धवट's picture

3 Mar 2011 - 6:53 pm | अर्धवट

कोण रोडीज.

धन्यवाद.

छोटा डॉन's picture

3 Mar 2011 - 7:00 pm | छोटा डॉन

ऑ ?
कोण रोडीज ?

व्याडेश्वरा !!!
मला आता वेळात वेळ काढुन 'रोडीज' वर एक लेख लिहावा लागणारच असे दिसते आहे.
असो, देवाक काळजी ...

- ( रोडीज फॅन ) छोटा डॉन

माझीही शॅम्पेन's picture

3 Mar 2011 - 7:29 pm | माझीही शॅम्पेन

तुम्ही लिहाच डॉन राव !

१००+ प्रतिक्रिया देणारे वाटच पाहतात सगळ्यनि आपल्या तलवारी परजून ठेवल्यात !

(रोदिज कशाशी खातात ते माहीत नाही अजुन)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2011 - 10:17 pm | निनाद मुक्काम प...

डॉन राव नक्की लिहा
ह्या शो मध्ये बहुतेक उत्तर भारतीय (म्हणजे पंजाब दिल्ली च्या गावाकडची व शहरा कडची मुले /मुली असतात )
बहुतेक हाय फाय संस्कृती गावात रुजवून बहु राष्ट्रीय कंपन्या आपली बाजारपेठ विस्तृत करण्याच्या प्रयत्नात आहेत असे वाटले . रघूच्या . मेजावरील तो कधी न पिणारी शीत पेयाची बाटली किंवा उगाच ओढून ताणून बाईक चे त्या कार्यक्रमात प्रयोजन
मी एकच सिझन पाहीला.त्यात तो विजेता... नाव विसरलो पण तो राहुल महाजन असलेल्या एका रियालटी शो मध्ये सुध्धा जिंकला होता (त्यात त्याचे पाल पुद ''ब्राम्हण बुद्धी चलायी'') त्यात त्यांच्या परम मित्राने एका पोरीस काय सणसणीत थोबाडीत मारली .( टीवीवर येण्यासाठी काय पण करतात राव ही लोक )
परदेशातले अश्या प्रकारचे शो म्हणजे अगदीच पुचाट.
आम्ही मात्र पाकिस्तानातील प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून असतो .(त्यांच्या देशातील गोष्टींवर चर्चा/वाद घालायला मग मजा येते .) तेही आपल्या कायर्क्रमावर लक्ष ठेवून असतात . त्यांना दुसरा पर्याय नाही
तर रोडीज ची पाकिस्तानी आवृत्ती
लिविंग
ऑन द एज

.त्यात रघूचा . पाकिस्तानी अवतार वकार व त्याच्या आधुनिक पोरी ( काय निखळ मनोरंजन आहे राव )
येथे वानगीदाखल एक उदाहरण

व्याडेश्वरा !!!
मला आता वेळात वेळ काढुन 'रोडीज' वर एक लेख लिहावा लागणारच असे दिसते आहे.
असो, देवाक काळजी ... >>>

आपल्या आगामी लेखाची 'प्रसिध्दी ' करण्याचे तंत्र आवडले . ;)

हलकेच घ्या किंवा कसेही ;)

धन्यवाद .