ही पाककृती नाही..

महेश काळे's picture
महेश काळे in पाककृती
17 Feb 2011 - 12:36 pm

सहजच यु ट्युब वर काहीतरी शोधत होतो..आणी हे सापडले..

अता हे यंत्र कोठे सापडेल?? ते शोधावे लागेल..

मला खुप आवडले.. तुम्हाला पण आवडेल आशी आशा आहे..

प्रतिक्रिया

रेवती's picture

17 Feb 2011 - 9:20 pm | रेवती

डोनटस आहेत काय ही? तशीच दिसताहेत.
बाकी अंजलीचे मेदूवडा यंत्र मिळते. तेलात शेव पाडल्यासारखे सोर्‍याने वडे करता येतात.
मी कधी वापरले नाही पण ऐकीव माहितीनुसार वडे बरे होतात.

चित्रा's picture

18 Feb 2011 - 1:05 am | चित्रा

इथे एक हनी ड्यू म्हणून डोनटच्या दुकानांची साखळी आली तिथे पहिल्यादिवशी प्रचंड गर्दी झाली होती, डोनट खायला. आम्ही कौतुकाने काय म्हणून पहायला गेलो होतो कोणीतरी सांगितले म्हणून, तेव्हा असे तुपात तळलेले आणि साखरेच्या पाकात तरंगत असलेले डोनट पाहिले होते.

चित्रा's picture

18 Feb 2011 - 1:07 am | चित्रा

बापरे..

बेगल्स वाटताहेत.. कारण त्यात मऊपणा थोडा कमी असतो डोनट्स पेक्षा... पण फ्लिक चे नाव 'मेदू वडा मशिन' असं आहे..

अहो म्याडम, डोनट खूप मऊ असतात आणि बेगल्स बर्यापैकी जाड असतात...

पंगा's picture

18 Feb 2011 - 10:27 am | पंगा

शिवाय, बेगल्स बहुधा तळत नसावेत.

कच्ची कैरी's picture

17 Feb 2011 - 10:41 pm | कच्ची कैरी

ते डोनटस आहे असे वाटते .

दिपाली पाटिल's picture

18 Feb 2011 - 12:31 am | दिपाली पाटिल

हे तर डोनट्स मेकर... बेगल तळत नाहीत. हे मशिन बर्‍याच डोनट शॉप्स मध्ये असतं... फुडनेटवर्क आंणि ट्रॅवल चॅनलवर पाहीलंय बर्‍याचदा. पण या मशिनपासून वडे बनवायची आयडीया छान आहे.

चिंतामणी's picture

18 Feb 2011 - 10:40 am | चिंतामणी

Medu Vada mc.flv असे स्पष्ट म्हणले असताना सुध्दा (तु नळीवर प्रात्यक्षीक दिसत असताना)

डोनटस आहेत काय ही?
बेगल्स वाटताहेत
ते डोनटस आहे असे वाटते .
हे तर डोनट्स मेकर.

असे कॉमेंटस पाहून बिरबलाच्या गोष्टीची आठवण झाली. आमच्या लहानपणी या गोष्टी वाचल्या होत्या. (त्यामुळे थोडा नोस्टालजीक झालो).

बादवे- महेश काळे, आपण वैशाली, रूपाली, वाडेश्वरशी स्पर्धा करणार आहात का हे मशीन घेउन?

तसे करणार असाल तर मशीन शोधायला मदत करू.

आपणास शुभेच्छा.

निवेदिता-ताई's picture

18 Feb 2011 - 10:18 am | निवेदिता-ताई

खुपच छान...........अमेझिंग...