महामानवाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

chipatakhdumdum's picture
chipatakhdumdum in काथ्याकूट
21 Jan 2011 - 10:01 pm
गाभा: 

महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ?

प्रतिक्रिया

जोशी 'ले''s picture

22 Jan 2011 - 11:02 am | जोशी 'ले'

इथे पहा ....

स्वानन्द's picture

23 Jan 2011 - 7:08 am | स्वानन्द

आंबेडकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान असं फारसं ऐकलं नाही आहे. तसंही ते स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले ही जात नाहीत. त्यांना समाजकारणी / राजकारणी म्हणता येईल.
बाकी, विकीपेडीयावरील माहीती मध्ये तरी फारसं स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग यावर काही मिळालं नाही. मागे एक - दोन पुस्तके वाचली होती, त्यांच्या विचारांच्या संदर्भात होती असे काहीसे आठवते. त्यातही त्यांची स्वातंत्र्य चळवळीवरील विचारांबद्दल ( तसे काही असलेच तर )काही उल्लेख आढळला नाही.

पाहिजे तर विकीवरील संदर्भ ग्रंथ चाळून बघा. काही मिळते का ते.
http://en.wikipedia.org/wiki/Bhimrao_Ambedkar

नरेशकुमार's picture

22 Jan 2011 - 12:18 pm | नरेशकुमार

गांधी नेहरु सावरकर भगतसिंग झाले,
आता पुढील लक्ष्य आंबेडकर.

ठॅक ठॅक.... आंबेडकर, जनता की अदालत मे हाजीर हो ≈≈≈≈≈≈≈≈

चिंतामणी's picture

22 Jan 2011 - 12:26 pm | चिंतामणी

From Drop Box" alt="" />

घेउन येतो परत. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2011 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

हायला भारत कधी स्वतंत्र झाला?
ऐकावे ते नवलच.

अप्पा जोगळेकर's picture

22 Jan 2011 - 2:41 pm | अप्पा जोगळेकर

भारत कधी परतंत्र होता ते बोला पयले. ऐकावे ते नवलच.

प्रचेतस's picture

22 Jan 2011 - 2:49 pm | प्रचेतस

तुम्ही बहुधा एम. डी. रामटेकेंचा स्टार माझा विजयी पुरस्कारपात्र ब्लॉग वाचलेला दिसतोय.

मृत्युन्जय's picture

23 Jan 2011 - 1:51 am | मृत्युन्जय

आयला वायझेड आहे ते. कशाला असल्या लिंका तरी देता. गाढव . शुद्ध गाढव. किंबहुना त्याला गाढव म्हणणे हा गाढवाचा अपमान आहे.

अर्धवटराव's picture

23 Jan 2011 - 2:56 am | अर्धवटराव

रामटेकेंचा ब्लॉग वाचला मी. अपेक्षेप्रमाणे थोडंफार वायझेड मटेरियल आहे त्यात... पण संपूर्ण ब्लॉग वयझेड नाहिये. बरेचसे मुद्दे लॉजीकल भाषेत मांडलेत.

वैचारीक मतभेद, मान्यता, समज-गैरसमज हे चर्चेतून सुटतील आणि समाज भविष्यात येणार्‍या संकटांचा सामना करायला एकजूट होईल तो सुदीन.

(प्रतिक्षेत) अर्धवटराव

भडकमकर मास्तर's picture

24 Jan 2011 - 4:48 am | भडकमकर मास्तर

ब्लॉग इन्ट्रेष्टिंग आहे... जवळपास सग़ळा वाचून काढला..

अस्ले प्रकार वाचायला मज्जा येते...
...
बाकीचं सारं नेहमीचंच असलं तरी आठवणी सेक्शन भन्नाट आहे त्यांचा...

च्यायला रामटेके नावाचा माणूस जो हे भिकार ब्लॉग लिहतो.. त्याला काही धरबंध नाही. त्या ब्लॉगला मी केव्हाच "abuse report" केलाय.

तुम्हीपण कराल.. जर शहाणे असाल तर.

- (जातियवादविरोधी) पिंगू

आत्मशून्य's picture

23 Jan 2011 - 5:09 am | आत्मशून्य

अशा लोकांना स्वातंत्र्यवीर असे म्हटले गेल्याचे मला तरी ऐकीवात नाही, या सर्व लोकांचे कार्य हे भारतातील अनीश्ट, लज्जास्पद, घृणास्पद, पाशवी, अमानवी आणी अत्यंत नीदनीय अशा प्रकारच्या सामाजीक प्रथांच्या वीरोधात लढा देण्यामधे गेल्याने त्यांना जेष्ठ समाज सूधारक असे संबोधले गेल्याचे ऐकीवात आहे. जाणकार अधीक प्रकाश टाकू शकतील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Jan 2011 - 4:14 pm | निनाद मुक्काम प...

टिळक व आगरकर ह्यांच्या वादात मला नेहमीच आगरकर म्हणणे काही अंशी योग्य वाटले .
स्वराज्य म्हणजे काय ते कशाची खातात हे आजही भारतातील बहुसंख्य जनतेला माहित नाही .ते खादीधारी संस्थानिकांची अजूनही रयत म्हणून वावरते .अश्यावेळी .सामाजिक सुधारणा ह्यात निरक्षरता .अनिष्ट रूढी /प्रथा
परंपरा /सामाजिक विषमता ह्यांचा समूळ नाश झाल्याशिवाय स्वतंत्रता संग्रामाला अर्थ नव्हता.कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढे काय ह्या बद्दल तळागाळातील जनता त्यावेळी व आतासुद्धा अंधारात आहे .मुळात पादेशिकता जपताना राष्ट्रीयत्व जपायचे हे महारष्ट्र व काही अपवाद वगळता इतर प्रांत अजिबात करत नाही हे दुर्दैवी आहे .
ह्या महामानवाचे कार्य असो किंवा राजा राम मोहन रॉय किंवा दादाभाई नौरोजी ह्यांचे असो किंवा जमशेद टाटा असो ह्यांचे कार्य देखील तितकेच थोर आहे .
स्वतंत्रता संग्राम आवश्यक होता .पण तो करताना सामाजिक सुधारणेस अग्रक्रम देणे गरजेचे होते .
स्वतंत्रता मिळाली म्हणजे समाज एका दिवसात किंवा एका दशकात प्रगत होईल हि अशा बाळगणे म्हजे निव्वळ खुळचट पणा.
एक साधा उदाहरण सतीची चाल बंद झाली .तेव्हा तिचा जवळ जवळ समूळ नाश झाला .कारण कायदा सक्तीने राबविला गेला .
आज मात्र हरयाणातील खाप पंचायतीचे कायदे म्हणजे गावात लग्न म्हणजे स्वगोत्र लग्न त्याला शिक्षा म्हणजे देहांत शासन किंवा भ्रूण हत्या (त्यामुळे आता लग्नासाठी बाहेरील राज्यातील मुली लग्नासाठी आणाव्या लागतात .) ह्यांचे निर्मुलन स्वतंत्र भारतात मताच्या राजकारणासाठी निव्वळ अशक्य होऊन बसले आहे .परत सक्ती कोणी करायची म्हंटली तर बब्बर खालसा आहेतच कि फुटीरवादी चळवळ सुऊ करायला .
एक मात्र भारतासाठी खरी शोकांतिका आहे .
आपल्या भारतातील महापुरुष हे प्रांतीय /प्रादेशिक अस्मितेत अडकून पडले आहेत .
सर्व जाती जमाती मधील बेरके मुर्र्बी लोक त्या महापुरुषाच्या नावे मतांचे राजकारण करतात .गोर्या साहेबाकडून घेतलेली फोड आणि राज्य करा हि दीक्षा इतमाबारे वापरतात .तेव्हा त्या राष्ट पुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात हे वाक्य सार्थ ठरते .
आज बंगाल मध्ये सावरकर तर महारष्ट्रात नेताजी सारखेच लोकप्रिय आदराचे स्थान मिळवून आहेत का ?
हे कसब फार पूर्वी एका संधिसाधू राजकीय संताला बरोबर जमले होते ज्याला जनतेला वेगवेगळे स्टंट करून स्वताच्या कच्छपी लावणे व स्वताची विचारसरणी श्रेष्ठ त्यापेक्षा वेगळी दुय्यम व तिला अजिबात जनसामान्यात थारा मिळू नये ह्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करणारा ह्या आधुनिक रासपुतीन ह्याने कूट नीतीत चाणक्याला हि मागे टाकले .

अर्धवटराव's picture

23 Jan 2011 - 11:53 pm | अर्धवटराव

स्वातंत्र्यप्राप्ती हि इंस्टंटीनियस घटना आहे तर समाजसुधरणा हि कंटिन्युअस प्रोसेस आहे. भारताला स्वातंत्र्य अगदी योग्य वेळी मिळाले. इंग्रज आणखी काहि वर्षे या देशात टिकते तर पाकिस्तानसोबतच काश्मीर, पंजाब, आंध्र, द्रवीड, गोवा, नॉर्थ ईस्ट आणि उर्वरीत भारत असा काहिसा नकाशा तयार झाला असता. आज स्वतंत्र भारतात दलीत व्होट निर्णायक बनायच्या मार्गावर आहे. येत्या काहि दशकात दलीत व्यक्तीच भारताचा प्रधानमंत्री असेल. दोन-चार सुविचारी टाळकी त्यांच्यात आणि सवर्णांत निपजली तर सामाजीक एकजुटीची अजुनही आशा आहे. इंग्रजांनी हे कधीही होउ दिले नसते. त्यांनी ही सामाजीक आग सतत भडकवत ठेवली असती आणि त्यात संपूर्ण समाज होरपळून कोळसा झाला असता...

अर्धवटराव

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jan 2011 - 4:10 pm | निनाद मुक्काम प...

इंग्रजांचा ह्या आपल्या देशात राज्य करायचा उद्देश अगदी उघड होता जे दादाभाई नौरोजी ह्यांनी त्यांच्या सिद्धांतात सांगितला होता .भारत कच्चा मालाची स्वस्त वसाहत व हक्काची व मालकीची बाजारपेठ .होती .
म्हणून राज्यकारभार करण्यासाठी कारकुनी पद्धतीचे शिक्षण व्यवस्था सुरु केली तर आय पी एस सारखी परीक्षा त्यांनी सनदी अधिकारी निर्माण करण्यासाठी केली .
भारतातील विविध जाती जमातीतील भांडणे त्यांनी व्यवस्थितपणे हाताळून फोडा आणि राज्य करा ह्या तत्वानुसार राज्य केले .मात्र त्या काळात प्रशासन व्यवस्था आजच्या पेक्षा नक्कीच चांगले होते
मुंबईची रचना करताना मल निस्सारण व्यवस्था त्यांनी पुढील १५० वर्षाचा विचार करून बांधली .(आजही मुंबईत तीच वापरली जाते ) तिचे आधुनीकरण करण्यासाठी २००० कोटी संमत झाले .पण योजना कागदावर आहे .
शहरासाठी अनेक मैदाने बांधली . आज भूखंडाचे श्रीखंड होरपणे चालले आहे .
सावित्रीबाई फुले ह्यांच्या स्त्री शिक्षणाला व आनंदी जोशी ह्यांच्या परदेशातील शिक्षणाला विरोध इंग्रजांचा नव्हता .
मुळात हा देश स्वतंत्र झाल्यावर त्यांची रूपरेषा काय असावी ह्या बाबत स्पष्टता नव्हती . ३५ कोटी जनता गरीब होती व निरक्षर आजही ती ११६ कोटी झाली पण हे दोन घटक सारखेच आहे .आपण मध्यमवर्गीय व आपल्यला फायदा झाला म्हणून आपण खुश.
देश स्वतंत्र झाल्याबद्दल खेड्यापाड्यात त्यांचे काहीही सोयरसुतक नाही .
जगातील पहिले कुटुंब नियोजन केंद्र लंडनला निघाले (पोप चा विरोध असल्याने बाकीच्या युरोपियन देशात ते लगेच निघाले नाही )पण र धो कर्व्यांनी गिरगावात दुसरे लगेच काढले .इंग्रजांचा त्यांना विरोध नव्हता .विरोध होता वैचारिक दृष्ट्या गांधी व इतर देशी विचार्वातांचा .गांधी ह्यांचा स्वसंयामावर भर होता .म्हणून भारतीय जनतेने स्वयं प्रेरणेने संयमाने लोकसंख्या भरमसाट वाढवली .
संधर्भ (ध्यासपर्व सिनेमा )नेहरूच्या सरकारमधील ख्रिस्ती महिला मंत्रीमुळे राधो कर्व्यांच्या कार्याला जी काही खिल बसली ती आजतागायत चालू आहे .संजय गांधी हि मोहीम राबवायला गेला तर जनतेने त्याचे सरकार पडले .त्यापासून कुठलाही पक्ष हि मोहीम थेटपणे चालू करत नाही .मग सुजलाम सुफलाम भूमी सुद्धा ह्या लेकरांना अपुरी पडते मग मागणी जास्त पुरवठा कमी म्हणून अन्न /वस्त्र /निवारा व शिक्षण व पर्ययाने समाजात वैचारिक प्रगल्भता निर्माण झाली नाही
.आज भारतात कायदे बनतात पण त्याची अंमल बजावणी होते का ? इन्कम टेक्स चे खाते असून प्रचंड काळा पैसा निर्माण होतो .पण सगळ्यात महत्वाचे सर्वसामान्य जनता त्या विरुद्ध रस्त्यावर येत नाही .कारण हे असेच चालत राहणार हे गृहीत घरून प्रादेशिक अस्मिता व जातीयता हिला राष्टापेक्षा जास्त महत्व दिले जाते .मग स्वतंत्र झाल्याचा अभिमान नक्की का बाळगायचा ?

अर्धवटराव's picture

24 Jan 2011 - 11:30 pm | अर्धवटराव

>> मग स्वतंत्र झाल्याचा अभिमान नक्की का बाळगायचा
अभिमान मानायला वेळ आहे कुणाकडे ? १७६० गंभीर समस्या आहेत देशापुढे, त्या मार्गी लावून मग अभिमान वगैरे गोष्टींकडे बघता येईल. पण... प्रोब्लेम्स असले तरी देश तर आहे. डोळ्यांपुढे धेय तर आहेत. इंग्रज असते तर हा देशच नसता उभा राहिला ना. इंग्रजांनी त्यांच्या सोईकरता म्हणुन या देशात सुधारणा केल्या. त्या आपल्या पथ्यावर पडल्या याबद्दल वाद नाहि. पण इक्वेशन सिंपल आहे... १९४७ मध्ये जन्मलेल्या आणि स्वकीयांनी चालवलेल्या भारत नामक राष्ट्राचे जे रूप २०११ मध्ये दिसतय ते २०११ पर्यंत इंग्रजांनी चालवलेल्या एका गुलाम, खंडप्राय राज्यसमुहापेक्षा निश्चितच चांगले असावे.

अर्धवटराव

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Jan 2011 - 12:11 am | निनाद मुक्काम प...

इंग्रज हवे होते असे कोण म्हणतेय ?
त्यांना घालवण्यासाठी महताव्चे कारण दुसर्या महायुध्धात खिळखिळे झालेला त्यांचा प्रदेश अर्थव्यवस्था व त्यांच्या राजधानीत ३ महिने जमिनि खाली जीव मुठीत काढणाऱ्या जनतेच्या ढासळलेल्या मानसिकतेचा कारणीभूत होती .पानिपत मुळे जर आपल्याला हादरा बसू शकतो विचार करा त्यांच्या दुप्पट तिप्पट बळी त्यांचे गेले किंबहुना अर्ध्या युरोपचे गेले अंदाजे २ कोटी
तेव्हा स्वताचे राष्ट्र उभे करणे हि प्राथमिकता होती म्हणून भारतावर राज्य करण्याचा विचार सोडून दिला .बाकी नव बलशाली राष्ट्रे अमेरिका व त्यांच्या व्यापारी वर्गाला संतुलित व्यापार हवा होता म्हणूच वसाहत वादाला त्यांचा विरोध होता व त्यांच्या राष्ट्राध्याकाशांचा युरोपातील साम्राज्यवादी देशांना वसाहत सोडून देण्यास आग्रह होता म्हणच आफ्रिकेतील कितीतरी देश किंवा श्रीलानाका व १० ७० ला यु ए इ म्हणजे दुबई वैअगरे कोणत्याही चळवळ व क्रांतीशिवाय टप्या टप्याने स्वतंत्र झाले .
चळवळ व स्वतंत्र लढा आवश्यक होता पण सामाजिक सुधारणा ह्या आवश्यक होत्या म्हणूनच जपान व वेस्ट जर्मनी अगदी ज्यू राष्ट्रे राखेतून बलशाली झाले .त्या मानाने आपली लायकी असून आपण म्हणावी तशी प्रगती केली नाही .एक महत्वाचे उदाहरण जर इतर प्रगत राष्ट्रासारखी जर आपली जनता १९४७ वेळी अर्ध्याहून जास्त साक्षर असती तर ती प्रगल्भ असती व तुल्यबळ विरोधक जे हेल्दी लोकशाहीचे लक्षण आहे ते निर्माण झाले असते चीन सारखे किंवा त्यांच्या आधी आपण उदार अर्थव्यवस्था स्वीकारली असती १९८९ पर्यत वाट पाहत बसलो नसतो (चीन ने त्यांची अर्थ व्यवस्था १ दशक आधी मुक्त केली )

>>अनिष्ट रूढी /प्रथा परंपरा /सामाजिक विषमता ह्यांचा समूळ नाश झाल्याशिवाय स्वतंत्रता संग्रामाला अर्थ नव्हता

तुमच्या या वाक्यावर माझा प्रतीसाद सुरु झाला. सामाजीक विषमतेचा समूळ नाश होण्याची वाट बघतो म्हटलं तर स्वातंत्र्यसंग्रामाचा मुहुर्त सापडायचा नाहि.
बाकी इंग्रज आपल्या घरी जर्जर झाला आणि म्हणुन त्याने भारतातुन काढता पाय घेतला याच्याशी १००% सहमत. यदाकदाचीत साहेबांनी इथे आणखी काहि दिवस मुक्काम वाढवला असता तर भारतीय जनता अहिंसक आंदोलनापेक्षा रक्तपात करुन त्यांना हाकलायचा प्रयत्न करती, हा तर्क.

अर्धवटराव

अविनाशकुलकर्णी's picture

23 Jan 2011 - 7:01 pm | अविनाशकुलकर्णी

स्वराज्य म्हणजे काय ते कशाची खातात हे आजही भारतातील बहुसंख्य जनतेला माहित नाही...

पण काय नेमके खायच ते मात्र कळाले...

मुल निवासी प्रकरण भारी आहे...त्यांच्या मते ब्राह्मण युरोपियन आहेत बाहेरचे आहेत व ३% व्यवस्था हि मुळ निवासींच्या मुळावर आहे.. व बदलली पाहिजे...

http://www.mulnivasinayak.com/

वाचा

आशु जोग's picture

10 May 2012 - 9:46 pm | आशु जोग

chipatakhdumdum

तुमच्या आजोबांच्या स्वातंत्रयुद्धातील महान योगदानाबद्दलही
केव्हातरी लिहा

तेही फार महान होते असे ऐकले आहे

बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना लिहिताना जरा विचारपूर्वक असावे