मिपाचा सिंहगड कट्टा

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in काथ्याकूट
27 Apr 2008 - 1:46 am
गाभा: 

मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्‍या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी.

इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे.

:-C : ९३७२-९३७२-१८

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

27 Apr 2008 - 11:22 am | स्वाती दिनेश

कट्टे,ओसर्‍या जोरात चालू आहे... आम्ही मात्र शुभेच्छा देणे,कट्ट्याची चित्रे पाहणे आणि साद्यंत वृत्तांत वाचणे एवढंच करू शकतो :(
स्वगत-छे..आता एक जर्मनी कट्टा भरवला पाहिजे..
सिंहगड कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा!
स्वाती

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 11:36 am | वेदश्री

१-२ ( रजा )-३-४ सुट्टी.. लाँग विकेंड आहे. घरी जाणार असल्याने इच्छा असूनही कट्ट्याला येणे जमणार नाही. पुढल्या वेळी उपस्थिती लावायचा नक्की प्रयत्न करेन. तोवर मजा करा.. छायाचित्रांसोबत बखर येईलच, वाट बघतेय.

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 11:01 am | धमाल मुलगा

मी पण येणार!!!

इनोबा...मस्तच रे!!!
मुशायरा...क्या बात है!

इनोबा म्हणे's picture

28 Apr 2008 - 11:17 am | इनोबा म्हणे

मी पण येणार!!!
म्हणजे काय? लेका तुला यावंच लागेल. तूझ्याशिवाय कट्टा होईल का?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

केशवसुमार's picture

2 May 2008 - 2:12 pm | केशवसुमार

कुठं परेंत आली आहे?
कोण कोण येणार आहे?
केशवसुमार

केशवसुमार's picture

2 May 2008 - 3:19 pm | केशवसुमार

मिपा कट्टे बह्हादर,
सिंहगड चढायच्या कल्पनेने बिळात लपून बसलेले दिसतात.... * तुमच्या जिंदगीवर
असो..
केशवसुमार
(स्वगतः- मद्यपान करायला सगळे कसे ***** जमा होतील...)

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

आयला..
ओ शेठ...आपण आहे हे आधीच बोल्लोय...
मुशायर्‍याचा काय बंदोबस्त करायचा?
नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर!

केशवसुमार's picture

2 May 2008 - 3:37 pm | केशवसुमार

त्याला जिंदादिल लोक लागतात..
आरे बिळात लपलेल्यांना काय ऐकवायच्या गझला..

केशवसुमार

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 3:52 pm | धमाल मुलगा

खरंय!

अरे ए...ऐकताय ना....अरे मर्दासारखे मर्द तुम्ही, इथं केसुशेठ उघड उघड आव्हान देताहेत...बिळात लपणारे म्हणताहेत..
कुठं बसलाहात तोंडं लपवून?

वर आणि बदनामी होतीये ती वेगळी...म्हणे "दारु असती तर आले असते सगळे...."
अरे बोला की जरा...काय म्हणावं तुम्हाला?

इनोबा म्हणे's picture

2 May 2008 - 3:54 pm | इनोबा म्हणे

नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर!
अरे! धम्या, आपण तीघे असलो तरी बास ना! बाकीचे गेले टोकावर(दूसर्‍या गडाच्या).

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

इनोबा म्हणे's picture

2 May 2008 - 3:51 pm | इनोबा म्हणे

हेच म्हणतो....
च्यामारी दारुचं नाव काढलं तर सगळी लंगोट्यांवर पळत सुटतील. X( आता गड चढायचा म्हटलं तर सगळे गायब...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

तुम्ही व्हा म्होरं...
म्या निगतुच हायी हितुन..
सध्या "गड राखणे " महत्वाचे आहे, त्यामुळे आपण (सिंह गडावर)स्वारी कराच.
मी पोहोच्तोच आहे झेंडे गाडेस्तोवर...
काय?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)