झाशीची राणी - मूळ छायाचित्र (??)

यकु's picture
यकु in काथ्याकूट
17 Dec 2010 - 4:21 am
गाभा: 

आंतर्जालामध्ये फेरफटका मारत असताना एका ब्लॉगवर हे छायाचित्र दिसले. हे झाशीच्या राणीचे मूळ छायाचित्र आहे असा दावा इतिहासाचा विद्यार्थी असलेल्या त्या हिंदी ब्लॉगलेखकाने केला आहे. कलकत्त्यात राहाणारे इंग्रज फोटोग्राफर जॉनस्टन आणि हॉटमनकडून 1850 मध्येच हे छायाचित्र काढण्यात आले होते आणि अहमदाबादचे रहिवासी चित्रकार अमित अंबालाल यांच्या संग्रहात उपलब्ध आहे असेही तो म्हणतो. याच ब्लॉगवर आणखी एका ब्लॉगकर्त्याने हे छायाचित्र झाशीच्या राणीचे नसून भोपाळची राणी सुलतान जहां बेगमचे आहे असा आक्षेप घेतला आहे आणि "भोपाळचे नवाब" असा सर्च मारण्याचा सल्ला दिला आहे. पण तसा सर्च मारून पाहिला असता असे कोणतेही छायाचित्र दिसले नाही.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 5:41 am | शिल्पा ब

मुसलमान राण्या असे कपडे घालायच्या का? वाटत नाही...अभ्यासुंच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत..

हो. ते तर आहेच. पण त्या काळातील मुसलमान राण्या सख्तीने पडदानशीन असायच्या हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
त्यात आजारी असताना मनगटाला दोरा बांधून वैद्याने त्यावर नाडीचे ठोके मोजणे वगैरे प्रकार (डॉक्टरलाही जवळ येऊ न देणे) वाचल्यावर मुसलमान राणी छायाचित्र काढायला तयार झाली असेल असेही वाटत नाही.

हे आपले उगाच एक मत... आपण काही इतिहासाचे जाणकार नाही. :)

ए.चंद्रशेखर's picture

18 Dec 2010 - 4:29 pm | ए.चंद्रशेखर

फोटो शक्य तेवढा एनलार्ज करून पाहिला. फोटोतल्या व्यक्तीच्या कपाळावर कुंकु असल्यासारखे वाटते आहे तसेच नाकात सुद्धा एक दागिना आहे. मुसलमान बेगमा कुंकु तर लावत नसतच पण नाकात असा नथी सारखा दागिना घालत असत का? फोटोतली व्यक्ती मुस्लिम नसावी.

मिपा विश्राम अवस्थेत गेले असताना मिमवर झालेल्या चर्चेत राज जैन यांनी हा व्हिडिओ दिला होता.
यात त्या मूळ फोटोवर " झासी की रानी " असे हिंदी आणि उर्दू मध्ये लिहीलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा मूळ फोटो संग्राहकाने दीड लाख रूपये खर्चून १९६८ मध्ये विकत घेतल्याचा दावा आहे.

अवांतरः प्रियालीताईंनी दिलेल्या लिंकमध्ये दिलेल्या माहितीनुसार "१८५७ चे स्वातंत्र्यसमर " या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर लिखित पुस्तकात हाच फोटो झाशीचा राणीचा म्हणून देण्यात आला होता. पण नंतरच्या आवृत्तीत तो झाशीच्या राणीचा नसल्याबद्दल टीप टाकण्यात आली होती; कारण तोपर्यंत विदेशात तो फोटो झाशीच्या राणीचाच आहे असे मानले जात होते.

टीप टाकताना मूळ फोटो पाहाण्यात आला होता का, तेव्हा त्या फोटोवर "झासी की रानी " असे नाव हिंदी आणि उर्दू मध्ये लिहीलेले होते की नव्हते, कोणता पुरावा पाहून टीप टाकण्यात आली होती हे मुद्दे सध्यातरी गुलदस्त्यात आहेत. सावरकर डॉट ऑर्ग कडे संपर्क साधून या फोटोबद्दल काही माहिती मिळते का तो प्रयत्न करीत आहे.

शिल्पा, उत्तरं काहीही येवोत, मला तुझा तर्क आवडला. चांगली दिशा दिलीस.

प्रियाली's picture

17 Dec 2010 - 6:21 am | प्रियाली

भोपाळच्या बेगमा प्रसिद्ध आहेत. त्यांचे राज्यशासनही गोहर बेगमने आपल्या नवर्‍याच्या पश्चात गादी सांभाळल्यानंतर बेगमांचे राज्य सुरु झाले. बाकी माहिती येथे मिळेल.

बेगमांचे राज्य


एक बेगम येथे बघा.

आणि ही दुसरी


असो. बेगमांचे कपडे पाहता ते तुम्ही दिलेल्या वरील फोटोतील कपड्यांसारखे वाटतात पण वरील फोटोला मुंडावळ्या वगैरे आहेत तशा त्यांच्या फोटोंमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे नक्की सांगता येत नाही, तेवढी माहिती नाही.

मुसलमान राण्या असे कपडे घालायच्या या प्रश्नाला हिंदूंच्या राण्या असे कपडे घालायच्या का या प्रश्नाने बाद करता येते परंतु उत्तर असे आहे की झाशीच्या राणीला मर्दानी कपडे घालायला आवडत. त्याचप्रमाणे इतिहासात रझिया सुल्तानपासून चांदबिबीपर्यंत अनेक लढवय्या मुसलमानी राण्या झाल्या. त्यांना कसे कपडे घालायला आवडत त्याची नेमकी माहिती नसली तरी त्या बुरखे आणि शरारे घालून नक्कीच लढाईला जात नसाव्या. :-)

असो. आपण दिलेला फोटो झाशीच्या राणीचा नसल्याबद्दल आणखी एक लेख येथे वाचा.

प्रियालीताई,
तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये भोपाळच्या नवाबासोबतचा बेगमेचा हा फोटो :-

मी वर दिलेलं पहिलं मत हा फोटो आणखी ठाम करतो. विशेष म्हणजे १९३० मधला आहे. :)

असो. हिंदू-मुसलमान या सनातन वादाकडे न वळता चर्चा फक्त वरचा फोटो झाशीच्या राणीचा वाटतो का, वाटत असेल तर का? आणि वाटत नसेल, तरी का? हे शक्य झाल्यास वैध लिंक्स, अवतरणे, परिच्छेद, संदर्भ देऊन स्पष्ट करावे अशी धागाकर्ता म्हणून सर्वांना विनंती करतो.

प्रियाली's picture

17 Dec 2010 - 6:41 am | प्रियाली

ब्रिटिशांबरोबरही बेगमांचे बुरखाधारी फोटो आहेत पण त्याच बरोबर बुरखे न घातलेले फोटोही आहेत. जरा शोधून बघा. भरपूर मिळतील.

तुमचे मत ठाम होऊ शकत नाही कारण बेगमांचे बुरखे न घातलेले फोटोही त्याच दुव्यावर दिसतात. :) यावरून इतकेच सिद्ध होते की बेगमांचे फोटो काढले जात परंतु बाहेर पडताना किंवा सार्वजनिक जागी त्या बुरखा घालत.

राणीचा फोटो आहे की नाही त्याच्याबद्दल मत आणि दुवाही वर दिला आहे.

ओक्के ! बेगमांचेही फोटो निघत एवढंच मान्य.

पण वरच्या झाशीच्या राणीचा आहे असा दावा असलेल्या फोटोबद्दल काही मत.. ??

प्रियाली's picture

17 Dec 2010 - 6:49 am | प्रियाली

दिलं ना पहिल्या प्रतिसादात. :( आणि राणीच्या फोटोबद्दल ठाम मत देऊ नाही शकत. :( फक्त इतर दुवे देऊ शकते. राणीला मर्दानी कपडे घालून घोड्यावरून फेरफटका मारायची आणि व्यायाम करायची नित्य सवय होती असे विष्णूभट गोडसे हे राणीला प्रत्यक्ष भेटलेले एक लेखक "माझा प्रवास" या पुस्तकात लिहितात.

तुम्ही प्रतिसाद संपादन करून नंतर दिलेली लिंक वाचली.

त्यात या फोटो बाबत

Savarkar had presumably also been misled. असे म्हटले आहे.

आमची सगळी मतं मागे - आणि आता हा फोटो झाशीच्या राणीचा आहे असे काही लोकांनी (त्या लिंक दिलेल्या ) मानले असले तरी प्रियालीताईंनी दिलेल्या सबळ पुराव्यांमुळे तो झाशीच्या राणीचा नाही असे सिध्द होते असे मला व्यक्तिशः वाटते, या पेक्षा वेगळे मत असलेल्या इतरांनीही कृपया आपली मते तेवढ्याच ठामपणे मांडावीत.

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 7:42 am | शिल्पा ब

मग असा बोंगा घालुन लढाईला जायच्या का? आणि मुख्य म्हणजे कोणत्याही संशोधनात किंवा त्याचा पुरावा म्हणून विकिपीडिया गृहीत धरले जात नाही....एखाद्या त्या क्षेत्रातल्या विद्वानाचा पेपर किंवा गेला बाजार ब्लॉग असेल तरी आम्हाला तो पुरावा म्हणून चालेल .

सुनील's picture

17 Dec 2010 - 8:01 am | सुनील

@यशवंत एकनाथ
असो. हिंदू-मुसलमान या सनातन वादाकडे न वळता चर्चा फक्त वरचा फोटो झाशीच्या राणीचा वाटतो का, वाटत असेल तर का? आणि वाटत नसेल, तरी का? हे शक्य झाल्यास वैध लिंक्स, अवतरणे, परिच्छेद, संदर्भ देऊन स्पष्ट करावे अशी धागाकर्ता म्हणून सर्वांना विनंती करतो.
ही सुचना तुम्ही ह्या धाग्याच्या पहिल्याच प्रतिसादाला दिली असतीत तर, विनाकारण धार्मिक वळण लागले नसते! असो.

@शिल्पा ब
मग असा बोंगा घालुन लढाईला जायच्या का?
अत्यंत निरर्थक मुद्दा!

तुम्ही जे कपडे घालून एखाद्या लग्न समारंभाला जाता; तसेच कपडे घालून कचेरीत जाता?

@यशवंत एकनाथ
ता हा फोटो झाशीच्या राणीचा आहे असे काही लोकांनी (त्या लिंक दिलेल्या ) मानले असले तरी प्रियालीताईंनी दिलेल्या सबळ पुराव्यांमुळे तो झाशीच्या राणीचा नाही असे सिध्द होते असे मला व्यक्तिशः वाटते, या पेक्षा वेगळे मत असलेल्या इतरांनीही कृपया आपली मते तेवढ्याच ठामपणे मांडावीत.

दुसरे मत नाही.

गोडसे भटजींचे "माझा प्रवास" ह्या पुस्तकात लक्ष्मीबाईंचे वर्णन केले आहे. कोणी ते पाहून पडताळून पाहू शकेल काय?

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 8:05 am | शिल्पा ब

तो माझा मुद्दा नाही...नीट वाचले तर समजेल.

पैसा's picture

18 Dec 2010 - 9:24 am | पैसा

१८५० साली झांशीचे महाराज हयात होते. त्यांचा मृत्यु १८५३ साली झाला. ते हयात असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी लक्ष्मीबाईनी स्त्रियांचे सैन्य तयार केले होते असा उल्लेख आहे. पण १८५० पर्यंत एकही प्रत्यक्ष लढाई झाली नव्हती.

विकिपेडियावर लक्ष्मीबाईंची म्हणून पुढील पोर्ट्रेटस उपलब्ध आहेत.

http://www.copsey-family.org/~allenc/lakshmibai/youngrani.jpg
http://www.copsey-family.org/~allenc/lakshmibai/rani.jpeg
http://www.copsey-family.org/~allenc/lakshmibai/rani-1860.jpg
http://www.copsey-family.org/~allenc/lakshmibai/ct61723.jpg

त्यात रंगवलेला चेहर्‍याचा आकार आणि फोटोतील व्यक्तीच्या चेहर्‍याचा आकार मिळता जुळता आहे. आणखी एक गोष्ट छायाचित्र पाहताच लक्षात येते, ती म्हणजे, जाकिटाच्या आत दिसणारा साडीचा पदर आणि कपाळावरचे कुंकू. भोपाळच्या बेगमने साडी नेसून फोटो काढणे हे मला तरी कठीण वाटते.

त्याचवेळी फोटोतील व्यक्तीने नाकात जो दागिना घातला आहे तशा प्रकारचा दागिना मराठी स्त्रियानी वापरलेला माझ्या पहाण्यात नाही. उत्तर भारतात याला "बुलाक" म्हणतात, तर दक्षिण भारतात "पुल्लाक्कु". राणी लक्ष्मीबाई या मराठी पद्धतीची नऊवारी साडी नेसून घोड्यावर बसलेल्या आहेत असे एका चित्रात दिसते. त्या अशा वेगळ्या प्रकारचे दागिने घालत असत का हा ही एक प्रश्न आहे. कोणी इतिहासाच्या जाणकारानी यावर प्रकाश टाकावा.

डावखुरा's picture

18 Dec 2010 - 12:09 pm | डावखुरा

पैसा ताई दुवे दिसत नाहीत..

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी,
बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।

वीर शिवाजी की गाथायें उसको याद ज़बानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़|

महाराष्ट्र-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में,
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में,
राजमहल में बजी बधाई खुशियाँ छाई झाँसी में,
सुघट बुंदेलों की विरुदावलि-सी वह आयी थी झांसी में,

चित्रा ने अर्जुन को पाया, शिव को मिली भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई,
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई,
तीर चलाने वाले कर में उसे चूड़ियाँ कब भाई,
रानी विधवा हुई, हाय! विधि को भी नहीं दया आई।

निसंतान मरे राजाजी रानी शोक-समानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया,
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया,
फ़ौरन फौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया,
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया।

अश्रुपूर्ण रानी ने देखा झाँसी हुई बिरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया,
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया,
डलहौज़ी ने पैर पसारे, अब तो पलट गई काया,
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया।

रानी दासी बनी, बनी यह दासी अब महरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात,
कैद पेशवा था बिठूर में, हुआ नागपुर का भी घात,
उदैपुर, तंजौर, सतारा,कर्नाटक की कौन बिसात?
जब कि सिंध, पंजाब ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात।

बंगाले, मद्रास आदि की भी तो वही कहानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार,
उनके गहने कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार,
सरे आम नीलाम छापते थे अंग्रेज़ों के अखबार,
'नागपुर के ज़ेवर ले लो लखनऊ के लो नौलख हार'।

यों परदे की इज़्ज़त परदेशी के हाथ बिकानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान,
वीर सैनिकों के मन में था अपने पुरखों का अभिमान,
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान,
बहिन छबीली ने रण-चण्डी का कर दिया प्रकट आहवान।

हुआ यज्ञ प्रारम्भ उन्हें तो सोई ज्योति जगानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी,
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी,
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थी,
मेरठ, कानपुर,पटना ने भारी धूम मचाई थी,

जबलपुर, कोल्हापुर में भी कुछ हलचल उकसानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम,
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अज़ीमुल्ला सरनाम,
अहमदशाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम,
भारत के इतिहास गगन में अमर रहेंगे जिनके नाम।

लेकिन आज जुर्म कहलाती उनकी जो कुरबानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में,
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में,
लेफ्टिनेंट वाकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में,
रानी ने तलवार खींच ली, हुया द्वंद असमानों में।

ज़ख्मी होकर वाकर भागा, उसे अजब हैरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार,
घोड़ा थक कर गिरा भूमि पर गया स्वर्ग तत्काल सिधार,
यमुना तट पर अंग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार,
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार।

अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी,
अबके जनरल स्मिथ सम्मुख था, उसने मुहँ की खाई थी,
काना और मंदरा सखियाँ रानी के संग आई थी,
युद्ध श्रेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी।

पर पीछे ह्यूरोज़ आ गया, हाय! घिरी अब रानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार,
किन्तु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार,
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गये सवार,
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार।

घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी,
मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी,
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी,
हमको जीवित करने आयी बन स्वतंत्रता-नारी थी,

दिखा गई पथ, सिखा गई हमको जो सीख सिखानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी।

तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

पैसा's picture

18 Dec 2010 - 10:26 am | पैसा

शुचि, वाहवा (सुभद्राकुमारींच्या पूर्ण कवितेसाठी)!

रणजित चितळे's picture

18 Dec 2010 - 12:03 pm | रणजित चितळे

बरेच दिवस ही कविता शोधत होतो

शुचि's picture

18 Dec 2010 - 5:52 pm | शुचि

ही कविता येथून - http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82...
घेतली आहे.

वेताळ's picture

18 Dec 2010 - 9:50 am | वेताळ

खुपच सुंदर कविता केली आहे तुम्ही.
तुम्ही एक नामवंत तत्ववेत्या आहातच तसेच एक सुंदर कवियत्री देखिल आहात हे आज कळाले.

मृत्युन्जय's picture

18 Dec 2010 - 10:26 am | मृत्युन्जय

अहो ती कविता सुभद्राकुमारी चौहानांनी केली आहे आणि तसे शुचितै नी सुचितही केलेले आहे.

वेताळ's picture

18 Dec 2010 - 10:30 am | वेताळ

गफलत झाली ,मला वाटली वरील कविता झाशी कि रानी व सुभद्राकुमारी चौहान दोघीना विभागुन लिहली आहे.

सुनील's picture

18 Dec 2010 - 4:45 pm | सुनील

गोडसे भटजींचे "माझा प्रवास" उतरवून घेतले होते पण सध्या हाताशी नाही. पण त्याचा इंग्रजी तजुर्मा जालावर मिळाला, ज्यात झाशीच्या राणीचे वर्णन केले आहे. राणीला प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाने केलेले वर्णन असल्यामुळे, हे अधिकृत मानण्यास हरकत नसावी!

Moro-pant Tambe and his family lived under the patronage of the late Peshwa at Brahmavart. Tambe worked under me (Uncle said) at Hom-shala; he was my apprentice. Tambe's wife passed away when their daughter, the (future) Queen of Jhansi, was five years old. Tambe raised her by himself. She had no companion at home, hence she would come to Hom-shala with her father. She studied letters, both Dev-nagari and cursive. She was a darling of her father's. A bustling, bubbly girl. Everyone in the Peshwa's palace pampered her, because she was a mother-less child. She had fair complexion, straight nose, high forehead; she was well-endowed and had a small waist.

When she was eleven, her father started looking for a groom. It was a bit difficult, because Tambes were Karha-de Brahmin, there were few of them in the area. He grew anxious.

The rulers of Jhansi belong to the same sub-caste. Years ago, when Mahadaji Scindia was installed at Gwalior as the regent of Peshwa in the North India, the Peshwa carved out province of Bundel-khand for himself. (Rest of the North was governed by Scindia, and Peshwa wanted a foothold for himself.) Jhansi became the headquarters of this province, and Shivrao Parolkar was sent as Peshwa's deputy there.
...
...
...
Lakshmibai wrote well; she drafted her own ordinances. She habitually dressed like a man: a pair of trousers, a tunic or a jacket, a topee. She always carried a sword. After her husband's demise, she stopped wearing jewelery; except a couple of bangles and a pearl around the neck. Hair would be tied in a bun.


In the morning, after the bath, she would do pooja, wearing a white sari and a white blouse. There was a basil plant, and a lingam. There would be a recital of Puran, and noblemen would come to offer respects. There were around a hundred and fifty who came to pay court daily; if one of them was absent, she would ask him the next day why you were not there.

The Queen came to her office around noon. Dressed in man's outfit sometimes, sometimes in woman's. Secretary Lakshmanrao would be there, alongwith seven-eight clerks. This is how she went about her administration.

The Ladyship loved working out. She got up at dawn, to do malla-khamb, followed by an elephant ride, and a nutritious breakfast with milk, before the bath.

She had her own ways, but never crossed the line.

On Fridays and Tuesdays she visited the Mahalaxmi temple.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2010 - 5:06 pm | बिपिन कार्यकर्ते

पुस्तक माझ्याकडे आहे, हाताशीही आहे. जमल्यास मूळ मजकूर टंकून टाकेन.

यकु's picture

18 Dec 2010 - 5:09 pm | यकु

सुनिलजी,
She always carried a sword
हे या फोटोच्या सत्यतेच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे आहे.
कारण इतर मुस्लिम बेगमांचे फोटो काढले जात असले तरी त्या तलवार घेऊन फोटो कशाला काढतील? मलातरी वाटते की नेहमी तलवार बाळगणारी सक्रिय मुस्लिम राज्यकर्ती त्या काळात तरी नसावी.

फोटु पाहुन गर्भगळित झालो .

तिमा's picture

19 Dec 2010 - 11:18 am | तिमा

'टारझन' ला गर्भ असतो हे वाचून गरभळलो.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला तर कुठेही छायाचित्र हा विषय निघाला की टार्‍याच्या वाहन परवान्यावरील छायाचित्राचीच आठवण येते.

आपलं काय ठरलंय ? तु माझ्या आणि मी तुझ्या ... :) :) :)

कवितानागेश's picture

18 Dec 2010 - 6:47 pm | कवितानागेश

बसण्याच्या 'पुरुषी' पध्दतीवरुन ही स्त्री लढवय्यी आहे, शिवाय 'राणी' आहे हे कळतंय.
या फोटोचे नक्की वय काढण्यासाठी अनेक पध्दती वापरता येतील. आता कुणाकडे आहे हा?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Dec 2010 - 6:30 am | निनाद मुक्काम प...

थोडे विषयांतर करतो
.मागच्या भारत भेटीत झी टीवीवर झासी कि राणी हा डेली सोप पाहायला मिळाला .सासू सुना विकृत खलनायक .ह्यांचा रतीब चालू असलेल्या आजच्या युगात मनुचे बालरूप व जीवनातील अनेक प्रसंग (थोड्या प्रमाणात मेलोड्रामा वापरून )दाखवत होते. .पण मालिका पाहायला मला आवडली. ह्या मालिकेत बहुतेक कलाकार मराठी आहेत. .मला विशेष भूमिका मनु ( बाल लक्ष्मी बाई) व तात्या गुरु ( तात्या टोपे ) ह्यांची आवडते . तात्या तोपेचे किरदार करणारा हा दूर दर्शनचा गुणी कलावंत .भूमिकेत शिरून काम करतो .. .हि मालिका पूर्ण देशात पहिली जाते ..त्यामुळे मराठी संस्कृती हि त्या निम्मिताने भारत भर दाखवली जाते . .व एकेकाळी उत्तरेत आपले राज्य होते .जे आपल्या पूर्वजांनी स्वकर्तुत्वावर मिळवले होते .ह्याचा प्रचार सुद्ध दणक्यात होतो . .(मराठी मानुष का मुद्दा असे हिंदी प्रसारमाध्यमे मराठी माणसाविषयी बोलत असतात त्यांना ह्या निम्मिताने मराठी माणसाचे भारतीय इतिहासातील स्थान कळून येईल) . वाहिन्यांचे अवार्ड सोहळे म्हणजे आपला तो बाळ्या ह्या नात्याने
लाडकी बहिण /भाऊ असे पुरस्कार देण्याची सोय असते .व जोडीला टुकार करमणुकीचे व नाचाचे कार्यक्रम .
पण त्यावेळी झी च्या अवार्ड सोहळ्यात झाशीची राणी )मनु ने एक जबरदस्त एन्ट्री घेतली .सगळे वातावरण भारावले होते. हि . .तिची हि क्लीप( ह्यात मनु सुरवातीला हर हर महादेव असे वीरश्री युक्त स्वरात म्हणते .तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात .तात्या गुरु चे पात्र करणारा प्रत्यक्ष स्टेज वर नसून प्रेक्षकात वेशभूषेसह आला होता .व तेथून त्याला नुसते पाहून तो किती भारला गेला आहे हे कळून येते. सर्वात शेवटी मनु भगवा फडकवते.
तो क्षण तर हदयात घर करून गेला .अश्याच मालिका अजून निधू दे
.मला ताराराणी वर मालिका पाहायला आवडेल .
http://www.youtube.com/watch?v=gArrs2GWyq4