(एक प्रश्न)

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
17 Nov 2010 - 1:15 pm
गाभा: 

आज लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट यांची पुण्यतिथी.

डंबलडोरवधाबद्दल व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली. डंबलडोर हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद डंबलडोरवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. (आणि क्रुशिअ‍ॅटस कर्स ऐवजी स्टुपिफाय, किंवा एक्स्पेलिआर्मस वापरतात.)

अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली? तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही, पण एकाही ऑर्डर ऑफ फीनिक्स वाल्याने या हत्येला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. (वास्तविक व्हॉल्डेमार्टला अझकबानला पाठवता आले असते.)

आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन डंबलडोरवाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय हेडमास्तर असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला मिनिस्ट्री ऑफ मॅजिकचे ब्रीदवाक्य आठवले - "मॅजिक ईज माईट")

ही हत्या म्हणजे डंबलडोरवादाचा पराभवच नाही का?

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

17 Nov 2010 - 1:22 pm | डावखुरा

समजला तर गहन नाही तर गेला उडत....असा प्रश्न

झाला ह्यांचा हिरवटपणा सुरु! ;-)

सहज's picture

17 Nov 2010 - 1:40 pm | सहज

येथे 'मगल्स' लोकांची वस्ती आहे. 'मुघल्स'बद्दल लिहलेत तर अनेक प्रतिसाद मिळतील.

सहज न्युटन (ब्लुम्सबरी प्रकाशनवाले)

राजेश घासकडवी's picture

17 Nov 2010 - 1:56 pm | राजेश घासकडवी

मूळ लेखात जुन्या विषयाला रिनर्व्हेट चार्म वापरल्यावर खरं तर सायलेन्सिओ वापरला गेला असता तर बरं झालं असतं असं वाटत होतं. पण तुमचा रि़ड्डिक्युलस स्पेल पण चांगला जमलाय.

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 2:09 pm | मिसळभोक्ता

रिड्डिक्युलस हा स्पेल्स फक्त बोगार्टला घालवण्यासाठी वापरतात. (मराठीत : बागुलबुवा).

राजेश घासकडवी's picture

17 Nov 2010 - 2:16 pm | राजेश घासकडवी

बोगार्ट नाहीये होय? तुम्हाला खरे डिमेंटर आहेत असं वाटत होतं तर एक्स्पेक्टो पेट्रोनम म्हणायचंत ना!

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 2:18 pm | मिसळभोक्ता

एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हणून उगाच माकड वगैरे निघालं, तर काय घ्या ? त्यापेक्षा चॉकलेट खावं हेच उत्तम !

राजेश घासकडवी's picture

18 Nov 2010 - 10:02 am | राजेश घासकडवी

एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हटल्यावर काय बाहेर येईल याची भीती बाळगली तर बागुलबोवेच डिमेंटर बनून फिरणार नाहीत का?

आणि निघालं माकड तर बसवायचं त्याला टंकायला. :)

अवरंग's picture

17 Nov 2010 - 1:57 pm | अवरंग

मगलू समाजाच्या डोक्यावरून जाईल..
विडंबन भारी आहे....
हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध....
लुपिन उजव्या प्रवृत्तीचे हेर होते काय ???

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 2:12 pm | मिसळभोक्ता

हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध...

सहमत आहे. निषेध केला असता, पण आप्ल्या ऑर्डरमधले आहेत, आणि निंफाडोराचा नवरा आहे, म्हणून सोडले.

ऑर्डरपेक्षाही लुपीन हा निंफाडोराचा नवरा आहे या कारणास्तव आपण निषेध करत नाही असा एक समज ऑर्डरमध्ये पसरला आहे त्याचे काय?

आणि सिरिअस ब्लॅकच्या वेळी डंबलडोर कुठे होते? त्याना सिरिअसचे मरण थोपवणे शक्य असूनही त्यांनी त्यावेळी काहीच हलचाल का केली नाही? की सिरिअसच्या सो कॉल्ड 'हिंसात्मक' विचारांचा तिटकारा असल्यानेच डंबलडोर यानी ऑर्डरच्या सिरिअसला वाचवण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले काय?

-- आलहोमोरा

ममो बहुतेक इंपीरीयस कर्स खाली असावेत..

चांगभलं's picture

17 Nov 2010 - 8:58 pm | चांगभलं

चान चान............
काय मी .भो ......
हल्ली काही सुचत नाही असं दिसतंय.....

(मिसळपाव चा दर्जा घसरलाय याच उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा.......

निरर्थक पणाचा कळस............)

छोटा डॉन's picture

17 Nov 2010 - 2:11 pm | छोटा डॉन

कोण लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट ?

धन्यवाद !

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 2:13 pm | मिसळभोक्ता

खरा प्रतिसादः

कोण डंबलडोर ?
धन्यवाद.

असा हवा. दहा पॉईंट कमी करण्यात आले आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2010 - 4:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉन्याच्या पॉईंट्स कमी करा पण पाईंट्स कमी नका हो करू! वाळून जाईल बिचारा!!

भारी समर्थ's picture

17 Nov 2010 - 2:14 pm | भारी समर्थ

नक्की काय आहे हे?
:O

प्रशु's picture

17 Nov 2010 - 3:02 pm | प्रशु

धमाल विडंबन..

चेतन's picture

17 Nov 2010 - 3:09 pm | चेतन

विडंबन ठीक

आता या विडंबनाचे संपादन होणार का?

(सर्वसामान्य सदस्य )चेतन

अवांतरः (मला दिलेली कारणे ईथे लागु होतात का?)

धोरण क्र. १ प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

सदर लेख व्यक्तीचे विडंबन करणारा नव्हता, परंतु दुसर्‍या संकेतस्थळावरील लेखाचा संदर्भ न देता, कसले विडंबन आहे हे स्पष्ट न करता लेख लिहीला गेला. तसेच, लेख हा दुसर्‍या संकेतस्थळावरील (उपक्रमावरील) वैचारिक लेखाला प्रत्युत्तर म्हणून देताना त्यात ओढूनताणून आणलेल्या संख्या, काल्पनिक संस्थांचे काल्पनिक संशोधन असे लेखन योग्य वाटले नाही.

आमोद शिंदे's picture

23 Nov 2010 - 1:06 am | आमोद शिंदे

मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,

लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

विषय संपला! चियर अप!!

आमोद शिंदे's picture

23 Nov 2010 - 1:06 am | आमोद शिंदे

मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,

लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

विषय संपला! चियर अप!!

प्रीत-मोहर's picture

17 Nov 2010 - 4:17 pm | प्रीत-मोहर

विडंबन ठीक ठाक....

पैसा's picture

17 Nov 2010 - 4:24 pm | पैसा

ह्या निमित्ताने हिंसा म्हणजे काय, हे कळले तर उत्तम.

(उदाहरणार्थः अँटिबायोटिक घेणे म्हणजे हिंसा आहे का ?)

-- पैसाभोक्ता
(आमच्याकडे फक्त दुधाला विरजण लावून मिळेल)

प्रीत-मोहर's picture

17 Nov 2010 - 10:18 pm | प्रीत-मोहर

अहो व्याख्या तिकडे ,इकडे फक्त काकु! ;)

-शिळे

नंदन's picture

17 Nov 2010 - 4:57 pm | नंदन

विंगार्डियम लेव्हिओसा ;)

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2010 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार

एका जेष्ठ सदस्याने दुसर्‍या जेष्ठ सदस्याच्या धाग्याच्या असे विडंबन करावे काय ?

परालिया थत्ते

विकास's picture

17 Nov 2010 - 8:46 pm | विकास

अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली?

एका खुन्याला "लॉर्ड" असे म्हणणारी प्रक्षोभक विधाने करून आपल्याच लेखांना शेकडो प्रतिसाद मिळवत स्वतःच्या टॉप २५ च्या यादीत घुसण्याचा ह्यात छुपा हेतू दिसत आहे. ;)

अवांतरः सीएनएनवर कृष्णशुक्रवारासंदर्भातील बातमी आधी वाचनात आली असल्याने, व्हॉल्डेमार्ट च्या ऐवजी वॉलमार्टच वाचले.

शिल्पा ब's picture

18 Nov 2010 - 11:31 am | शिल्पा ब

काय तिच्यायला वैताग ए ...फार झाली विडंबनं
अति झालं अन हसु आलं त्यातली गत :(

गोगोल's picture

18 Nov 2010 - 11:45 am | गोगोल

बस्स ईतकच.

तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही,
नाही तो व्हॉल्डेमार्टचा गाढवपणा होता.

मूळात प्रश्न हा आहे की व्हॉल्डेमार्टचा हा जीवन्त होता काय ? तर त्याचे उत्तर नाही असेच देता येइल, मी आठवा भाग वाच्लेला आहेत त्यात असे स्पश्ट लिहले आहे कि १ ते ७ या भागामधे जे लीहले आहे ते एक हॅरी पॉटरला पडलेले स्वप्न होते.

राजेश घासकडवी's picture

22 Nov 2010 - 10:37 pm | राजेश घासकडवी

आणि ते स्वप्नसुद्धा दोन भागांत आहे म्हणतात...

नावातकायआहे's picture

22 Nov 2010 - 9:56 pm | नावातकायआहे

आयला 'पावटा' स्वस्त झाला का काय?