मोती साबण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
28 Oct 2010 - 1:43 pm
गाभा: 

दिवाळी म्हटली कि अभ्यंग स्नान आले..कारखान्यात ला कामगार वर्ग याला पहिली अंघोळ.. दुसरी अंघोळ असे म्हणायचा तर गावाकडे पुरुषाचे नहाणे???..व बायकांचे नहाणे असे म्हणायचे..
दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबण साधारण पणे वापरला जातो....दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? हे पण एक कोडे आहे....
एक खरे....... हि परंपरा वर्षानु वर्षे चालत आली आहे व त्यात खंड नाहि ...
आपल्याला मोती साबण आवडतो का?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Oct 2010 - 1:49 pm | प्रचेतस

आम्ही तर म्हैसूर सँडल चंदनी साबण वापरतो.
इतर साबणांपेक्षा हे साबण महाग आणि अस्सल चंदन अर्क असल्याने ही प्रथा पडली आहे.

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 11:53 pm | पिवळा डांबिस

आम्ही पण म्हैसूर सॅन्डल सोप वाले!!!

शिल्पा ब's picture

28 Oct 2010 - 11:55 pm | शिल्पा ब

हॅ...आम्ही तर रोजच म्हैसुर संदल साबण वापरतो....म्हणून दिवाळीत मोती.

पिवळा डांबिस's picture

29 Oct 2010 - 12:01 am | पिवळा डांबिस

आम्ही तर रोजच म्हैसुर संदल साबण वापरतो....
तुम्ही काय ब्बाबा!!
मज्जा आहे तुमची!!!
:)
आम्हाला बापडा तो दिवाळीतच मिळतो!!!
:(

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 12:05 am | प्रियाली

वीरप्पन तुमच्या ओळखीचा होता का हो? ;) ह. घ्या हं!

शिल्पा ब's picture

29 Oct 2010 - 1:20 am | शिल्पा ब

ओळखीचा म्हणजे...नात्यातलाच होता म्हणा ना...कोणाला सांगू नका हं.

आता कळलं तुम्ही इतक्या पाशवी का ते. रक्तातच आहे ते तुमच्या, तुमचा दोष नाही.

शिल्पा ब's picture

29 Oct 2010 - 3:08 am | शिल्पा ब

काय करणार? नाईलाज आहे.. पण तुम्ही अवांतर आणि खोडसर आहात असे कुठेशी ऐकु आले...

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Oct 2010 - 3:11 pm | ब्रिटिश टिंग्या

>>तुम्ही अवांतर आणि खोडसर आहात असे कुठेशी ऐकु आले...

ते निरमा लावतात ना म्हणुन :)

नितिन थत्ते's picture

29 Oct 2010 - 8:55 pm | नितिन थत्ते

खोडसर हा शब्द आवडला. :)

शिल्पा ब's picture

29 Oct 2010 - 8:59 pm | शिल्पा ब

छान...पण तो शब्द माझा नाही ... कोणाचा ते स्वतः धुंडाळावे. ;) एखाद्या काय आहे च्या धाग्यावर सापडतोय का बघा

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2010 - 1:53 pm | अप्पा जोगळेकर

अरे वा एका ओळी वरुन सहा अओळींवर मजल गेली हे काही थोडे नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Oct 2010 - 2:45 pm | ब्रिटिश टिंग्या

हो

लहानपणी गावी दिवाळिची भेट म्हणून एका पतसंस्थेतर्फे काही साखर, तूप, खोबरे ई. वस्तुंसोबतच २-३ मोती साबणही मिळत.. ईतर वेळेस मोती साबण बघायलाही भेटत नसत..फार आनंद व्हायचा. मजा यायची. कुठे गेले ते दिवस ?

सध्या इतरही साबण दिवाळीत वापरणारे लोक आहेत पण पूर्वी मोती हा दिवाळी स्पेश्शल असायचा आणि दिवाळीसाठीच त्याचे उत्पादन होत असे (ऐकीव माहिती). एक दोन किराणा दुकानात मला आठवतय, दुकानदार आधी विचाराय्चे कि यावर्षी तुमचा मोती 'बुक' करायचा का? ऐनवेळी म्हणे मिळत नसे.

विकास's picture

28 Oct 2010 - 4:33 pm | विकास

दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का?

मला वाटते तसे करावे असे ऋग्वेदातील आठव्या सुक्तामधील त्रेपन्नाव्या ऋचेमधे त्याचे स्पष्ट कारण दिलेले आहे. ;) कृ. ह.घ्या. :)

अभ्यंगस्नानाच्या वेळी उटणे लावण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा हमाम/लाईफबॉय आणि गिचका होणारे लक्स वगैरेच आयताकृती साबणे होती तेंव्हा मोती साबण हा जरा गोल असल्याने तसे नाव, जाहीरात, किंमतीने पेश्शल वाटायला लागला असावा.

तेच म्हैसूर सँडल सोप संदर्भात.

स्वतन्त्र's picture

28 Oct 2010 - 4:53 pm | स्वतन्त्र

आधी दिवाळी म्हंटला कि वर्षातून एकदाच कपडे मिळायचे,त्याचच अप्रूप असायचं ...असही त्यावेळी कदाचित Lifebuoy चा जमाना असल्यामुळे मोती साबण जरा महागतला वाटायचा शिवाय सुगंधही चांगला ....म्हणून मोती साबण वापरात असावे कदाचित, आणि पुढे तीच प्रथा पडली !

मोती साबण मस्तच.
पण म्हैसूर चंदन अहाहा .... ब्रम्हानंदी टाळी लागते माझी.

आम्ही पण मैसूर सॅंडल सोप च. :)

प्रियाली's picture

28 Oct 2010 - 11:58 pm | प्रियाली

+१

पक्या's picture

28 Oct 2010 - 11:20 pm | पक्या

जी काय प्रथा पडली ती मस्तच.
दिवाळी म्हटले की इतर अनेक गोष्टींबरोबर अभ्यंग स्नान , उटणे आणि मोती साबण हे हवेच.

शिल्पा ब's picture

28 Oct 2010 - 11:23 pm | शिल्पा ब

अय्या!!!! बरी आठवण केलीत..विसरलेच होते मी.

अपूर्व कात्रे's picture

28 Oct 2010 - 11:39 pm | अपूर्व कात्रे

दिवाळी आणि मोती साबण हे नाते अतूटच. मागच्या वर्षी दुसरा एक साबण आणला, पण अभ्यंगस्नानाला मात्र हट्टाने मोतीच आणायला लावला. बाकी मैसूर सोप वापरला नाही कधी. यावेळी वापरून बघतो.

नितिन थत्ते's picture

28 Oct 2010 - 11:51 pm | नितिन थत्ते

आपुन कोन्ताबी साबन लाव्तोय.

(रिन साबणाने ग्रीजचे हात धुणारा)

रेवती's picture

29 Oct 2010 - 12:30 am | रेवती

मला पिअर्स आवडतो. अगदी सणासुदीलाही!
मोती साबण वजनाला जड असतो तसेच तो हातातून घसरून पायावर पडल्यास इजा होइल कि काय असे लहानपणी वाटत असे.;) तसाही तो फेकून मारला तर कपाळमोक्ष होण्याची भिती. हेच मत दिवाळीतल्या बिघडलेल्या लाडवांच्या बाबतीत आहे. ;)

आमच्या घरी चार दिवसासाठीचे चार साबण : मोती, मैसूर.डव्ह आणी पिअर्स...
हॉस्टेलवर एकमेव : मेडिमिक्स.. :)

डावखुरा's picture

29 Oct 2010 - 1:08 am | डावखुरा

आमच्याकडे तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थॉडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण.. वापरतो..
हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम..
खरे अभ्यंग हेच..
आधी हे भिजवलेलं उटण लावुन घ्यायचे वरुन तीळीचे तेल लावुन ४-५ मिनिट तसेच राहु द्यायचे..
थोडा घाम आला कि ते रगडुन काढावे,,,(ही संकल्पना नरक काढणे अशीही ओळखली जाते...)
नंतर कोम्हट पाण्यात गुलाब पाकळ्या किंवा आवडता अत्तर फ्लेव्हर टाकुन मस्त अंग शेकुन..
यानंतर बाहेर येण्याच्या आधी कण्केच्या दिवल्यांनी औक्षण....
अशी थोडी वेळ्खाउ आहे पण दिवळीतच ४ दिवस चान्स असतो अशा अंघोळीचा....दवडु नका..

ईतर वेळी फक्त उटण्याचा वापर साबणाऐवजी वापरुन अपण दुधाची तहान ताकावर भागवु शकतो...
आयुर्वेदिक स्नान..
संस्कृतीलालसा....

वर्णन असं केलयत कि पुन्हा इनो घ्यावा लागणार!;)

डावखुरा's picture

29 Oct 2010 - 8:16 am | डावखुरा

काकु मला एकदा ईनो कशासाठी नेमकं वापरतात हे तरी सम्जवुन सांगा..
धन्यवाद...

इनोचं जाऊ द्याहो!
एकतर तुम्ही मला काकू म्हणालात्?ऑ?
चित्तरंजन वाटिकेत आपण भेटलो होतो.
प्राजुच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनावेळी.
तुम्हाला मी काकू वाटते का?
आजकाल सगळे काकू आणि आज्जी का म्हणतात तेच कळत नाही बुवा!
तुम्ही तुमचे 'लालसा' हे नाव बदलणार असल्याचे सांगितले होते तेंव्हा!
हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो!
पूर्वी अभ्यंगस्नानानंतर बाथरूमध्येच आम्हा लहान मुलांचे अश्या दिव्यांनी औक्षण व्हायचे. त्याची आठवण झाली.

प्रियाली's picture

29 Oct 2010 - 8:30 pm | प्रियाली

रेवती तू एक टकाटक नाव (आयडी) घे त्या आयेशा टकिया सारखं मग बघ तुला कोण काकू आणि आज्जी म्हणतं का ते. ;)

तरीही मी आज्जी म्हणणारच.. ;)

लालसा नाव बदलायचं होतं पण कसं ते काही जमलं नाही..
तसं काही वाईट नाहीये..
बरीच विशेषणे पुढे लावली की ते चांगले वाटते..(असे मला वाटते..)
प्राजुतै च्या सीडी प्रकाशनाला ही यायचे होते पण नाही जमले..
तुम्हाला काकु नको म्हणु चालेल पण तुम्हीच सुचवा मग काय म्हणु ते...

हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो!
हे मात्र अस्सल...

अनिता's picture

29 Oct 2010 - 5:12 am | अनिता

मोतीचा च्॑दन साबण्...आता मिळतो की नाही माहित नाही..

अवा॑तर : लालसाच्या प्रतिक्रियेत उटण च्या जागी मट्ण वापरले तर काहीतरी छान पदार्थ होइल असे वाटते...

विकास's picture

29 Oct 2010 - 6:28 am | विकास

मोतीचा च्॑दन साबण्...आता मिळतो की नाही माहित नाही..

हा घ्या! :-)

डावखुरा's picture

29 Oct 2010 - 8:46 pm | डावखुरा

अनिता तै मटण..अन् ते पण दिवाळीच्या शुभ्मुहुर्तावर....
नका आठवण देउ...
आणि मट्नात दुध्,मध छे काहीतरीच काय...

(झाडपालाहारी)..लालसा

काका नॉस्टॉल्जीक केलेत हो तुम्ही. :(

लहानपणी अभ्यंगस्नानासाठी उटणे वापरायचो ते आठवते. उटणे धुवून काढायला दुधात कालवलेले बेसन-पीठ वापरत असू, असे सुद्धा आठवते.

साबणाचे काही आठवत नाही.

मोती /लाइफबॉय्/जीवा/चंद्रिका/हमाम्/राम्देवबाबा -आसारामबापू आश्रमाचे साबण (१०/१२ रु. नग)

बाहेर नळाखाली तिथं जो पडला असेल तो साबण लावून आंघोळ उरकतो.

(त्वचेवरुन उम्र ओळखू येणारा ) अडगळ.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2010 - 3:05 pm | विसोबा खेचर

'सासासासा रे गप पधपगरेग
धधध ध मध ......'

तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय..!

आम्ही नेहमी लाईफबॉय वापरतो.. स्वस्त अन् मस्त..! :)

तात्या.