युपीतल्या ह्या पदार्थाचे नाव काय?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in कलादालन
24 Oct 2010 - 8:39 am

गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता.
ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात.
मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे.
माहीतीगारांनी कृपया मदत करावी.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

पाणी पुरी सारखं काहीतरी दिसतंय.................

pramanik's picture

24 Oct 2010 - 8:49 am | pramanik

Channa Batura

शानबा५१२'s picture

24 Oct 2010 - 8:52 am | शानबा५१२
फोलपट's picture

28 Oct 2010 - 9:46 pm | फोलपट

हे तर गोल्गप्पे किन्वा पानी के बताशे, बन्गाल मधला फुच्का आणि आपली पाणीपूरी. असे आपले माझे मत. तोन्डाला पाणी सुटले खास. फोटो साठी धन्यवाद!

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 12:28 am | शानबा५१२

अरे हो गोलगप्पेच ते!!
पण तो पाणीपुरीवाल्याकडे असतात त्याला पण असच काही म्हणतात्,म्हणुन गोंधळ झाला.

धन्यवाद.

सुनील's picture

28 Oct 2010 - 9:53 pm | सुनील

खाल्ली तेव्हाचा का विचारले नाही तुमच्या गाईडला?

बाकी, तुम्ही यूपीला जाऊन आलात हे सांगण्याचा प्रयत्न आवडला!

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 12:30 am | शानबा५१२

युपीला जाउन काय मोट्ट.............................जे सांगत फेरु??
ह्याला पाच महीने झाले,आता एका मित्राने विचारल म्हणुन तुम्हास विचारल.

काय फालतु फोटो आहे, ५०% पेक्षा जास्त अंधारच आहे. *

चांगला फोटो कशाला म्हणतात मला माहीती नाही.
जे पहाणे अपेक्षीत आहे ते दाखवले,बाजुला उभा असलेल्यांचे फोटो बघुन काय करणार आहात??

सारखा फक्त अवांतर व खोडसर प्रतिसाद देणार!!!अभिव्यक्ती स्वातंत्र ह्यालाच म्हणतात का???

प्राजु's picture

28 Oct 2010 - 10:22 pm | प्राजु

आलू चाट! (शिणूमा लई भारि होता)

विसोबा खेचर's picture

28 Oct 2010 - 10:27 pm | विसोबा खेचर

यूपीच्या कोणत्या जिल्ह्यात गेला होतात?

(संपूर्ण उत्तर भारत फिरलेला) तात्या.

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 12:51 am | शानबा५१२

वाराणसीत तीन दीवस्, मध्यप्रदेश,जबलपुर,शक्तीनगर वगैरे नावे होती.

वाराणसीत तीन दीवस्, वाराणसीत तीन दीवस्, मध्यप्रदेश,जबलपुर,शक्तीनगर वगैरे नावे होती.वगैरे नावे होती.

शानबा, युपित वाराणसी ठिक. पण वाराणसीत तीन दीवस्, मध्यप्रदेश,जबलपुर,शक्तीनगर म्हणजे जरा ............................................

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 1:10 am | शानबा५१२

:bigsmile:

यला कचोरी चाट म्हणतात. अतिषय टेस्टी प्रकार असतो.
आता माझ्याच्याने फार बोलवणार नाही.;)
फोटू देवून तुम्ही मला इनो घ्यायला भाग पाडलत
निषेध!

अविनाशकुलकर्णी's picture

28 Oct 2010 - 11:31 pm | अविनाशकुलकर्णी

१] हा पदार्थ.व्हेज कि नॉन व्हेज?
२]पानात काय काय घातले होते?
३]पलंग तोड नावाचे पान यु पी ला मिळते ते तर आपण खाल्ले नाहि ना?
४]पलंग तोड नावाचे पान शक्य तो साथिदारीण बरोबर असेल तरच खावे असा नियम आहे..
नाहि तर काय होते ते आपण समजु शकालच..[म्हणजे साथिदारीण बरोबर नसेल तर]

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 12:48 am | शानबा५१२

तुम्हास कसे वंदन करु हे समजलेच नाही,.........

शानबा५१२'s picture

29 Oct 2010 - 1:05 am | शानबा५१२

सर्वांचे धन्यवाद!

सर्वांना येणा-या सणांच्या शुभेच्छा.

मला फोन नं. व्यनी कर. दिवस ठरवु आणि जाउ.

फक्त एक छोटासा फरक आहे. बटाटा कुठल्याही पारीत न भरता त्याची टिकी करून वरती वर्णन केलेले सगळे पदार्थ घालतात.

खाउन बघायचे असल्यास सांग.