हेमंत

मराठे's picture
मराठे in कलादालन
13 Oct 2010 - 9:17 pm

सप्टेंबर जाउन ऑक्टोबर येतो न येतो तोच थंडी जाणवायला लागली आहे. थोड्याच दिवसांत घराबाहेर फिरायला जाणं मुश्किल होइल. पण काल आमचे ग्रह एकंदरीत बरे असावेत. काल बर्‍याच दिवसानी थोडा निवांत वेळ मिळाला होता, आणि मुख्य म्हणजे थंडी बेताची होती. ऑफिसमधून घरी येतानाच ठरवलं की आजचा दिवस फुकट घालवायचा नाही . घरी आल्या आल्या मुलाला व हीला घेउन बाहेर पडलो. (ऑफिसमधुन येउन चहा पिउन, खाउन मग जाउया म्हटलं की निघे-निघेपर्यंत काळोख पडतो हा मागच्या वेळेचा अनुभव होता.) "हेरिटेज पार्कमधे जाउया" छोट्याची फर्माईश आली. आणि पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी त्यादिशेला वळवली. पार्कमधल्या नेचर ट्रेल्स (पाउलवाटा) प्रत्येक ऋतुमध्ये निसर्गाचं वेगवेगळं दर्शन घडवतात. वसंत जरी सर्व ऋतुंमधला राजा असला तरी हेमंत काही कमी नाही याची साक्ष तिथलं प्रत्येक झाड देत होतं.
पहिली सलामी पार्किंगलॉटच्या जवळच्या लहानच पण रुबाबदार अशा या झाडाने दिली.

शाळेत एखाद्या ॠतुचं आगमन म्हणजे एखाद्या तक्त्यावर दाखवण्यापेक्षा ह्या झाडांकडे बघायला शिकवलं तर? हळूहळू पण सातत्याने बदलत जाणारे रंग दररोज नविन वाटतात.

"हेमंतात फुलांपेक्षा पानांची मिजास" हे पुलंच वाक्य..

असेही रंगीत गालिचे

"मुठ्ठीभर आसमां" साठी आकाशापर्यंत पोहोचलेली ही झाडं..

सुर्यकिरणांबरोबर लपाछपी..

मोठ्या दिमाखात उभं असलेली ही झाडं.. नोव्हेंबर्/डिसेंबरपर्यंत पार उघडी-नागडी पडतात.

थंडीमधे मुळांना थंडीपासून वाचवण्यासाठी ही पानं जमिनीवर पांघरूण घालतात. वसंत येताच पुन्हा पालवी फुटते व हां हां म्हणता सगळीकडे हिरवळ पसरते. निसर्गचक्र कित्येक वर्ष अशा प्रकारे चाललंय. पण म्हणून त्यातलं नाविन्य कमी होत नाही. फक्त आपल्याला वेळ काढता यायला हवा.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

13 Oct 2010 - 11:05 pm | बेसनलाडू

दुसरे आणि तिसरे चित्र विशेष आवडले. शेवटून तिसरेही मस्त!
(प्रेक्षक)बेसनलाडू
आपण नॅशविल/अ‍ॅशविल किंवा स्मोकी माउन्टनच्या परिसरात गॅटलिनबर्ग वगैरे ठिकाणी (अमेरिकेत टेनसी राज्यात) असलात किंवा तेथे भटकण्याची संधी मिळत असेल, तर नक्की भटकून या, असे सुचवतो. तेथे फार छान हेमंतरंग (फॉल कलर्स) बघायला मिळतील.
(सूचक)बेसनलाडू

मस्तानी's picture

14 Oct 2010 - 8:35 am | मस्तानी

त्या पहिल्या छायाचित्रातल्या बाकावर जाऊन बसावस वाटतंय :)

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 9:01 am | नगरीनिरंजन

छान आहे. विशेषतः पहिल्या आणि तिसर्‍या चित्रातले रंग खूप आवडले.
हे असलं कधी आम्ही प्रत्यक्षात पाह्यलंच नाही. धन्यवाद.