मी परत असं वागावं का ?

जिप्सी's picture
जिप्सी in काथ्याकूट
12 Oct 2010 - 11:18 pm
गाभा: 

आज कधी नाही ते पी.एम.टी. नं प्रवास करायचा योग आला,नेहमी प्रमाणं गर्दी होतीच. नियमाप्रमाणं काही सीट महीलांसाठी राखीव असतात. गर्दीमुळं बरेच लोक उभेच होते,त्यात बायकाचं जास्त होत्या.एका राखीव सीटवर ३ पुरुष बसून होते.मी बसमधल्या एका बाईंना म्हणालो की त्यांना उठायला का नाही सांगत नाही? त्यावर उत्तर मिळालं की,अहो हे रोजचंच आहे.
मग मी त्यां तिघांना उठायची विनंती (खरचं !) यावर त्यांनी माझ्याबरोबर बरच भांडून घेतलं,अगदी 'बा'चा'बा'ची झाली.तू उतर तुला बघून घेतो इथवर झालं. कंडक्टरसाहेब 'नरो वा कुंजरो वा' होते.पण आमच्या भांडणात बसमधली एकसुद्धा बाई मधे पडली नाही, ज्यांच्यासाठी भांडत होतो. आणि बहुसंख्य बायका सुशिक्षित होत्या,कॉलेजातल्या मुली होत्या.

ज्यांच्यासाठी आपण भांडतो त्यांनाच त्याचं काही देणंघेणं नसेल तर आपणं परत त्यांच्यासाठी असं काही करावं काय?

प्रतिक्रिया

करू नये.
याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे म्हणतात. त्या बायका पाहून घेतील.

जिच्याकरता भांडत आहात ती स्त्रीतरी तुमच्याबरोबर हवी असे वाटते. पण मला जर कोणी गरजु दिसले तर मी स्वतःहुन बर्‍याचदा भांडतो, त्यामुळे तुम्ही असे करु नये असे म्हणवत नाही.

पुण्यात पीएमटीत असे वाद मी बर्‍याचदा घातले आहेत. खरं तर ही जबाबदारी कंडक्टरची आहे. कोणी कंडक्टरचे ऐकत नसेल तर तो त्या व्यक्तीला उतरवुन देउ शकतो.

तू उतर तुला बघून घेतो इथवर झालं.
हे असं बायकांनाही म्हटलं जातं. काहीजण म्हटल्याप्रमाणे 'बघून' घेत नाहीत पण नेमका आपल्याच वाट्याला बघून घेणारा आला तर पंचाईत म्हणून बायकाही जात नाहीत सांगायला.
कंडक्टरसाहेब 'नरो वा कुंजरो वा' होते
कंडक्टरबुवांना हे रोजचे आणि बसच्या प्रत्येक फेरीला अनुभवायला मिळत असणार. डेपोपर्यंत जाउन त्यांना रोजच जर चार दोन जणांनी 'बघून' घेतले तर हॉस्पिटलच्या वार्‍या नक्की!;)
सध्यातरी तुम्ही राखीव जागी न बसणे याशिवाय काहीही करू शकत नाही.

मला वाटते की पुरुष पण माणसेच असतात.

यावरुन ती कुठल्यातरी बिस्कीटांची जाहिरात आठवली. एक मुलगा (बिचारा!) दमुन रिकाम्या सिटवर बसतो. शेजारची स्त्री बिस्कीट खात बसलेली असते. एक अशीच खडुस बाई त्या मुलाला बोलायला लागते आणि उठवायचा प्रयत्न करते. तेव्हा बिस्कीटवाली म्हणते तरूण मुलगा बसला म्हनुन जळु नकोस वगैरे वगैरे...

तेव्हा जाम आवडली होती हि जाहिरात, कारण मी पण असा अनुभव घेतलाय. फार कसे तरी झाले होते कारण मला माहित नव्हते की असे आरक्षण असते. आणि आपल्याला जागेवरुन उठवलेल कोणालाच आवडत नाही. अगदी ध्रुव बाळाला पण नव्हते आवडले आणि इतिहास घडलाय........

जिप्सी's picture

12 Oct 2010 - 11:38 pm | जिप्सी

याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे म्हणतात >>>> म्हणजे आजूबाजूला काही चुकीचं/नियमाविरुद्ध चालले आहे हे दिसत असूनपण गप्प बसायचं?

मग जरूर लढा द्या पण त्या बायकांनी साथ द्यावी ही अपेक्षा कशाला? तुम्ही चालू केला आहे तुमच्या बळावर तडीस न्या.

योगी९००'s picture

13 Oct 2010 - 10:07 am | योगी९००

मग जरूर लढा द्या पण त्या बायकांनी साथ द्यावी ही अपेक्षा कशाला? तुम्ही चालू केला आहे तुमच्या बळावर तडीस न्या.
जिप्सींनी केलेला प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. त्यांना अशी उत्तरे देऊन तुम्ही चांगलेच discourage केलेत. तुमचे अभिनंदन..(बाय द वे..उद्दा कोणी तुमच्यासाठी हक्का असे लढले तर त्यालाही लष्कराच्या भाकर्‍या भाजणेच म्हणणार का?)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2010 - 11:50 am | llपुण्याचे पेशवेll

मला तसे वाटत नाही. जर पूर्ण विचारानी लढायला गेलात ना! मग लढा ना रडायचं कशाला? बायका काही बोलल्या नाहीत. जर त्याना बसायचं असतं तर त्या लोकांशी भांडून बायका अगोदरच बसल्या असत्या त्या सीटवर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2010 - 11:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनोळखी स्त्रिया, तरुण मुलींसाठी [जर त्या सुंदर असतील तर] सज्जन पुरुषाने अन्य पुरुषांशी भांडण करु नये. तुझी ती कोण लागते? इथून भांडण सुरु झाले की, ओळख ना पाळख असलेल्या सुंदर स्त्रीला, तरुणीला आपल्याला 'बहीण' म्हणावे लागते. बरं ज्या बहिणीसाठी भांडतो ती बहीण जोरजोरात भांडण सुरु झाले की नंतर दिसत नाही. तिचा स्टॉप येऊन ती उतरुन गेलेली असते. आणि आपलं भांडन मात्र पुढे सुरुच असते. अशा प्रसंगी अपमान आपल्याच वाट्याला येतो. मानसिक ताप आपल्यालाच होतो. प्रवाशांची सहानुभूतीही आपल्याला मिळत नाही 'याला काय करायचा शहाणपणा” 'मोठा आला नियम पाळणारा' असे ते हळू आवाजात कुजबुजत असतात. तेव्हा या अशा भानगडीत पडू नये असा सल्ला मी तुम्हाला देईन.

समजा आपलं भांडण सक्सेस झाले तर 'एक मस्त स्माईल' आणि वरुन थँक्स' या पलीकडे आपल्या पदरात फारसे पडत नसते. पण भांडण जिवावर बेतू शकते. तेव्हा पुन्हा सांगतो अशा भानगडीत पडू नये.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

12 Oct 2010 - 11:56 pm | रेवती

'एक मस्त स्माईल' आणि वरुन थँक्स' या पलीकडे आपल्या पदरात फारसे पडत नसते.
यापेक्षा जास्त काय पदरात पडायला हवे आहे सर?;)
आणि खरोखरच अशी गळ्यात पडणारी एखादी भेटली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2010 - 12:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> यापेक्षा जास्त काय पदरात पडायला हवे आहे सर ?
हा हा हा .. 'एक मस्त स्माईल' आणि 'थँक्स' पदरात पडले तरी खूप झाले
तितकेच अपेक्षित आहे...! :)

>>>आणि खरोखरच अशी गळ्यात पडणारी एखादी भेटली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ?
उगाच भांडलो असा मनात विचार येईल.....! :)

-दिलीप बिरुटे

एकदम लॉजिकल अ‍ॅनॅलिसिस :)

मग जरूर लढा द्या पण त्या बायकांनी साथ द्यावी ही अपेक्षा कशाला? >>>>असं आहे तर मगं ती सीट रिकामी झाल्यावरं तिथं बसायला झुंबड का? म्हणजे आमचा संबंध फक्त फायद्यापुरता असं नाही काय होतं?

शुचि's picture

12 Oct 2010 - 11:53 pm | शुचि

प्लीज नोट् - एकही बाई तुमच्याकडे आली नव्हती "कृपया भांडा" म्हणून विनंती करायला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Oct 2010 - 3:00 am | विश्वनाथ मेहेंदळे

वरील उत्तर आणि खालील काही प्रतिक्रिया यावरून मी सध्या काढलेला निष्कर्ष....

१)पुण्यात असाल तर या भानगडीत अजिबात पडू नका, दोन्ही कडून अपमान होईल.
२)मुंबईत असाल तर एकवेळ विचार करता येईल. माझ्या काही मित्रांनी अशा उर्मट लोकांच्या कानाखाली नक्षी पण काढली आहे.
३)बाकीच्या शहरांचे माहित नाही.

अजून एक शंका.....
मुंबईत अपंगांसाठीच्या जागांसाठी इतर वेळी वृद्धांना अग्रक्रम मिळावा असा नियम आहे. अशावेळी वृद्धांसाठी भांडावे का?

शिल्पा ब's picture

12 Oct 2010 - 11:53 pm | शिल्पा ब

एक स्त्री म्हणून सांगते...अशा भांडणात नकाच पडू...जर तुम्हाला "नियम मोडणे" या विषयावरून वाद घालायचा असेल तर गोष्ट वेगळी पण जर एखाद्या स्त्रीसाठी भांडणार असाल तर तिची साथ महत्वाची....आणि दुसऱ्या स्त्रीसाठी स्त्रिया कधीच वाद घालताना पहिल्या नाहीत...
जर तुम्ही अनोळखी स्त्रीसाठी भांडण ओढवून घेणार असाल तर ती स्त्री तुम्हाला साथ देण्याची शक्यता खूपच कमी आहे.

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 12:21 am | जिप्सी

शिल्पाताई तो वाद नियम मोडणे याच कारणावरून घातला होता ! कुणी बसावं यासाठी नाही.

दुसऱ्या स्त्रीसाठी स्त्रिया कधीच वाद घालताना पहिल्या नाहीत... >>>>>

असा 'पाशवीपणा' आम्ही दररोज बघतो

मस्त कलंदर's picture

13 Oct 2010 - 12:04 am | मस्त कलंदर

आम्ही मुंबईत झक्कपैकी अशा लोकांना (म्हातार्‍या-कोतार्‍यांना सोडून) उठवतो. आणि त्यांच्या जागी बसतो. पण त्याचवेळी एखादा वृद्ध उभा असेल तर त्यालाही ती स्त्रियांसाठीची राखीव सीट देतो. जर त्यांनी ती 'लेडिज सीट' आहे असं म्हटलं तर ,"ते आम्ही पाहून घेऊ असंही सांगतो"!!!

यात "पुणं ना, चालायचंच!!" हे आपलं उगाच, धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यासाठी. ज्यांच्यासाठी भांडलात त्या बायकाच चुकून मंद असतील अथवा आपले आजचे रूपांगी भविष्य चांगले नसेल!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 8:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला मुंबईत (बेस्टने दोन वर्ष सलग प्रवास केला तरीही) कधी असं करायची वेळ आलेली नाही. पण पुण्यात, हातात स्कूटर येण्याआधी जेव्हा कधी बसने प्रवास केला होता तेव्हा एकदा भांडणाची वेळ आली होती. भांडण मी माझ्यासाठी न करता एका आजींसाठी केलं होतं. त्यातून त्या आजी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या दिसत होत्या त्यामुळे तर त्या पुरूषाचं वागणं त्या आजींशी आणखी जास्त माजुर्डेपणाचं वाटलं. मी आजींच्या बाजूने बोलायला लागल्यावर तो पुरूष बर्‍याच बर्‍या शब्दांत बोलायला लागला होता.
थोड्या वेळात आजींच्या शेजारी बसायला जागा झाली; आजी खिडकीकडे न सरकता तिथे मला बसायला सांगायला लागल्या तेव्हा त्या माणसाच्या चेहेर्‍यावरचे भाव बघण्यासारखे होते.

आता तुमचा प्रश्न जिप्सी, मी कदाचित (अगदीच आजारी नसेन तर) स्वतःसाठी सुरूवात करणार नाही; पण कोणी म्हातारे-कोतारे, अपंग, गरोदर स्त्रिया असतील तर नक्कीच सुरूवात करेन. आणि तुमच्यासारख्या कोणी भांडण सुरू केलं तर (मला आरक्षण वापरण्याची गरज नसेल तरीही) नक्कीच साथ देईन.

मितान's picture

13 Oct 2010 - 1:05 pm | मितान

अदितीशी सहमत ! मी ही असेच करते.

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 12:05 am | जिप्सी

एकही बाई तुमच्याकडे आली नव्हती "कृपया भांडा" म्हणून विनंती करायला :- स्वातंत्र्यपूर्वकाळातसुद्धा कोणीही कुठल्याही स्वातंत्र्यसैनिकाकडं तुम्ही "कृपया भांडा" म्हणून सांगायला आलं नव्हतं,पण असो ज्याची त्याची समज असते.(हे कृपया वैयक्तिकरित्या घेउ नये)

आणि प्रतिसाद देताना,त्याबसमध्ये माझी म्हातारी आई,बाळाला घेतलेलीबहिणही असू शकते असं समजून बघा !
अवांतर :- ज्यांच्याशी मी भांडलो ते परप्रांतिय होते.(हे जर आधी सांगीतलं असतं तर?)

शुचि's picture

13 Oct 2010 - 12:09 am | शुचि

कुठे आरक्षण आणि कुठे स्वातंत्र्य . बरोबर आहे ज्याची त्याची समजच. (तुम्हीदेखील कृपा करून वैयक्तिक घेऊ नका). हे म्हातारी , गरोदर, बाळवाली वगैरे आधी स्पष्ट करायचत. कोडींग झाल्यावर स्कोप क्रीप इन होतोय ;)

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 12:14 am | जिप्सी

मनापासून ! आपले विचार पटले.

शुचि's picture

13 Oct 2010 - 12:22 am | शुचि

जिप्सी तसं नाही हो. आरक्षण (आता मी बोलायला कचरते) पण थोडं माझं मत आहे फक्त गरोदर स्त्रिया, अपंग आणि वृद्धांकरता असावं. त्यामुळे मी कधी कुणाला उठवायला जात नाही. त्यामुळे जर कोणी माझ्या बाजूनी भांडायाला लागलं तर मी नक्कीच दुर्लक्ष करेन.

दुसरं अनेक जण खरच सांगते खूप शांतताप्रिय असतात. त्यांना भांडणाची भयंकर भीती वाटते. आय अ‍ॅम वन ऑफ देम. मला कोणी मला भरीस पाडू लागलं एक बाजू घ्यायला तर नक्कीच नाही आवडणार....... मग कितीही ती व्यक्ती बरोबर असो. आय वूड रादर प्रिफर पीस.

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 12:31 am | जिप्सी

मान्य अंशत: मान्य ! पण शेवटी म्हातारी गेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकवतो याचं वाईट वाट्तं ! आपल्या हक्काची वस्तू घ्यावी आणि मग एखाद्या गरजवंताला द्यावी. दानात सुद्धा सत्पात्री दान होणं महत्वाचं आहे.

शुचि's picture

13 Oct 2010 - 12:38 am | शुचि

ते जे सीट मिळतं ते लिंगभेदावर आधारीत मिळतं. ते नको वाटतं मला तरी. हक्काची वस्तू ..... माझ्यापाशी काय समर्थन आहे त्या हक्काचं आदि मुद्दे मला सतावतात.
याउलट राखीव स्त्रियांच्या डब्याचं समर्थन सोपं वाटतं कारण खरच किळसवाणे धक्के खावे लागत नाहीत. पण सीट्चं समर्थन नाही करता येत मला तरी.
इतरांना येत असेल समर्थन करता मला येत नाही.
म्हणून मी बाजू घेणार नाही त्या पुरषाची जो या मुद्द्यावर लढेल.

सुहास..'s picture

13 Oct 2010 - 5:33 pm | सुहास..

अवांतर :- ज्यांच्याशी मी भांडलो ते परप्रांतिय होते.(हे जर आधी सांगीतलं असतं तर?) >>>

मग हे आधी नाही का सांगायच ? असो ..

तु जे केलयस त्याला १००% समर्थन , त्यात प्लीज बायकांचा रोल काय होता? कंडक्टरचा काय होता ? बाकीच्या प्रवाशांचा काय होता ? हे सगळ विसरून जा , तु जे काही केलस ते योग्यच होतं,पण दरवेळेला असेच होईल असे नाही, उलटेही होवु शकेल,म्हणुन तु ते परत करावस हेच सांगण आहे ..

एन्ड ,प्लीज डोन्ट फ्रीज युवरसेल्फ जस्ट बिकॉज समबडी एल्स ईज सेयींग सो.

मराठमोळा's picture

13 Oct 2010 - 12:11 am | मराठमोळा

पुण्यात पब्लीक ट्रान्स्पोर्टने प्रवास करु नये, अगदीच नाईलाज असल्याशिवाय.
स्वतःची बाईक्/सायकल्/कार घ्यावी. उत्तम उपाय.
बसमधे काही बायका सुद्धा गुंडांसारख्या वागतात, त्यामुळे नकोच हे प्रकार.. ;)

सुहास..'s picture

13 Oct 2010 - 5:36 pm | सुहास..

बसमधे काही बायका सुद्धा गुंडांसारख्या वागतात >>>

राक्या कोण होती रे ती ? मला सांगायच ना आपल्या लोहगाव शाखेची महिला आघाडीपण आहे ना ..बाकी तुझ्याशी कोणीतरी गुंडगिरी केली यावर माझाच काय समस्त मिपाकरांचा विश्वास बसणार नाही.

शिल्पा ब's picture

13 Oct 2010 - 12:45 am | शिल्पा ब

<<<बसमधे काही बायका सुद्धा गुंडांसारख्या वागतात,
त्याचे किस्से लिहाच तुम्ही..

धनंजय's picture

13 Oct 2010 - 2:55 am | धनंजय

नियम पाळले जावे म्हणून मत उघड-उघड व्यक्त करणे हे चांगले. आता लिंगभेदावर आरक्षण होते आहे, ही बाब तशी थोडी दुय्यम आहे. लिंगभेदावर आरक्षण अमान्य आहे, असे त्या स्त्रीने सांगितलेले नाही.

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 10:18 am | इन्द्र्राज पवार

".....दुसरं अनेक जण खरच सांगते खूप शांतताप्रिय असतात. त्यांना भांडणाची भयंकर भीती वाटते. आय अ‍ॅम वन ऑफ देम...."

~~ काऊंट माय नेम इन द सेम लिस्ट, शुचि. [खरं तर हा नियम इथे मिपावरदेखील लागू आहेच, निदान आमच्यापुरता तरी...]

श्री.जिप्सी यांना आलेला अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्वच शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत येतच असतो. 'स्त्रीच स्त्रीची बाजू घेत नाही' हेदेखील त्यांना आलेल्या अनुभवातून परत एकदा सिद्ध झाले इतकेच म्हणता येईल. रजकीकांताच्या दोन बहिणी हेमा मालिनी ("सीता और गीता") आणि श्रीदेवी ('चालबाझ') असल्या अन्यायाविरूध्द ज्या पद्धतीने त्या चित्रपटात लढा देताना दाखवितात त्याला टाळ्या वाजविणार्‍या प्राधान्याने मुलीच असतात. पण 'अलका', 'निलायम' मधून बाहेर पडल्यावर आणि पीएमटीत बसल्यावर वरील उदाहरणासारखा एखादा 'जिप्सी' कुणाशी वाद घालत असेल तर याच मुली 'मला काय त्याचे...' मनाशी म्हणत चूप बसतात. अर्थात हा त्यांचा दोष नाही, कारण त्यातील बर्‍याच वर शुचिताई म्हणतात त्याप्रमाणे 'आय वूड रादर प्रिफर पीस' या तत्वाशी बांधील असतात.

वरील अनुभवात 'वाहक' महोदयांची नरो वा कुंजरो या भूमिकेबद्दल श्री.जिप्सी यांनी लिहिले आहेच, पण इतर प्रसंगी 'चालक' राव देखील त्याच पुठ्ठ्याचे तणकट असतात. उदा. 'बस चालू असताना चालकाशी बोलू नये' अशी एक सूचना ठळक दिसेल अशी बसमध्ये असतेच. केएमटी (पीएमटीची कोल्हापुरी बहिण) तून एकदा शिवाजी विद्यापीठ ते रंकाळा प्रवास करीत असताना अगदी चालकाच्या पाठीला लागून असलेलीच सीट मला व माझ्या मित्राला मिळाली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर पुढच्याच सायबर स्टॉपवर पुढील बाजूनेच एक इसम वर आला आणि चक्क ड्रायव्हर केबिनमध्ये बसला (स्टाफ मेंबर असणार). प्रवास परत सुरू झाल्यावर दुसर्‍याच मिनिटाला "अरे, संध्याकाळी गेटवर थांबच, आज हिस्का दाखवूच शेक्रेटरीला..." आदी स्टाफच्या गप्पा आरामात आणि सहजगत्या सुरू झाल्या. मी जरी अस्वस्थ झालो होतो तरी श्री.जिप्सीसारख्या माझ्या त्या मित्राला उघडपणे चीड आली आणि त्याने जोरात आवाज दिला, "ओ, भाऊ, चालकाबरोबर बस चालू असताना बोलू नका, हा नियम तुम्हाला लागू आहे की नाही...? बस थांबल्यावर त्या शेक्रेटरीला हिसका दाखवायच्या गप्पा मारा...आम्हाला अगोदर घरी सोडा..." आता एवढे झाल्यावर गप्प बसतील तर ते केएमटी स्टाफ मेंबर कसले ! त्यांनी 'आमचं आमी बगून घेतो, लई फंटर हाया बस मारणात आमी...." इ. इ. ~ विशेष म्हणजे ही मजा बघणार्‍यात वाहक महोदयसुध्दा होतेच त्याचप्रमाणे बसमधील सीनिअर समजले जाणारे प्रवासीदेखील..."जाऊ दे रे, नेतोय तो बस व्यवस्थित..." अशी एका आजोबांची प्रतिक्रिया.....काय बोलायचे?

(च्यामारी, नावालाच आम्ही मांसाहारी....वेळ आली की, शेवग्याची शेंगच !)

इन्द्रा

स्पंदना's picture

13 Oct 2010 - 11:46 am | स्पंदना

हे अस विकतच भांडण बरेच दा आपल्या एकट्यावरच पडत.
मुंबईत फार भांडुन झाल्,प्रत्येकाचा स्वभाव असतो, अन नोट करा यशाची फळ चाखायला सारे तयार असतात पण अपयशाच्या बाजुने सावली सुद्धा नसते.
एकदा मुंबईत बस मधे चढताना मागे एक दोन मुल ' एक कडेवर अन एक मागुन चालणार जास्तीत जास्त दोन वर्षाच' घेवुन बाई होती. कंडक्टर न न बघताच बेल मारली अन एका हातान बस धरलेली ती बाई कोलमडली. अक्षय न असा धुतला त्याला, की बस!!
पण हा सारा वेळ ती बाई मत्र आप्ला संबध नसल्या सारखी गप्प्प उभी होती. माझा नवरा भांडतोय म्हणुन अर्थातच माझा पण सहभाग होताच.
अजुन ही अस काही बघीतल तर नक्की भांडेन.

क्रांतीवीर मधील नाना आठवला 'जगाया तो जींदोंको जाता है मुर्दोंको नहि| '...
ज्यांना आपण स्वतःहुन प्रयत्न न करता त्रास सहन करायचा असतो ते लोक अशा पद्धतीने वागतातच...

कुणी टारगट बेस्ट मधे दारु पिऊन सहप्रवाशांना, कंडक्टरला त्रास देत असेल तर प्रत्येक जण नजर चुकवत तेथुन निसटण्याचा प्रयत्न करतो हे मी कित्येकदा पाहिले आहे, मी बर्‍याच वेळा वाद घातला आहे पण कुणी पुढे येत नाही. परवाच एकाला कंडक्टरच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात दिले तेंव्हा त्याची पुर्ण उतरली... :)

चुकिच्या गोष्टीविरोधात उभे राहण्यात काहीही गैर नाही...असे माझे मत आहे.

समंजस's picture

13 Oct 2010 - 1:33 pm | समंजस

जिप्सी छान केलंत. तुम्हाला पुर्ण पटलं असल्यास पुढेही करत रहा. एखाद वेळेस हे धोकादायक ठरू शकतं(ज्याच्या/जीच्या करीता भांडतोय ती व्यक्ती समर्थन करत नसल्यास) त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या.

मुंबईत काही घटनांमध्ये आपणहून मदत करणार्‍यालाच नुकसान करून घ्यावे लागल्या मुळे सावधानता म्हणून मी मदत करताना किंवा एखाद्या व्यक्तीकरीता दुसर्‍याशी भांडताना हे बघतो की संबंधीत व्यक्ती नाकारलेल्या अधिकारा करीता किंवा अन्यायाविरूद्ध स्वतः भांडायला तयार आहे का? जर असल्यास त्या व्यक्तीकरीता भांडतो, मदत करतो अन्यथा नाही.

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 1:50 pm | जिप्सी

शिक्षणामुळं विचार करण्याची सवय लागते,निर्भयता अंगी येते असं म्हणतात.जर शिकूनही आमच्यातली बोटचेपी वृत्ती तशीच रहात असेल,जर शिक्षण आम्हाला सगळ्यातून अलीप्त रहायला शिकवत असेल तर शिक्षणाचा उपयोग काय ?
(इंद्रा आणि शुचीताई कृपया वैयक्तिक घेउ नका) मग यातूनच आपण शांतताप्रिय आहोत वगैरे लॉजिक डेव्हलप होतात. आणि जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडू शकत नाही,तर मग तुम्ही इतरांसाठी काय करणार?
मला काय त्याचं? ही वृत्ती आपल्या समाजाला खरच एक दिवस महागात जाणार आहे.

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 1:51 pm | जिप्सी

शिक्षणामुळं विचार करण्याची सवय लागते,निर्भयता अंगी येते असं म्हणतात.जर शिकूनही आमच्यातली बोटचेपी वृत्ती तशीच रहात असेल,जर शिक्षण आम्हाला सगळ्यातून अलीप्त रहायला शिकवत असेल तर शिक्षणाचा उपयोग काय ?
(इंद्रा आणि शुचीताई कृपया वैयक्तिक घेउ नका) मग यातूनच आपण शांतताप्रिय आहोत वगैरे लॉजिक डेव्हलप होतात. आणि जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडू शकत नाही,तर मग तुम्ही इतरांसाठी काय करणार?
मला काय त्याचं? ही वृत्ती आपल्या समाजाला खरच एक दिवस महागात जाणार आहे.

मितान's picture

13 Oct 2010 - 2:00 pm | मितान

अगदी खरं आहे जिप्सी !
आधी शांतताप्रिय म्हणून घ्यायचं, थंड रहायचं, मग हळुहळू त्याचीच सवय होते आणि तो स्वभाव बनतो. स्वतःच्या हक्कांची जाणीवही रहात नाही.
दुसर्‍याला मदत वगैरे सोडा पण निदान स्वतःवर वेळ आली तर आवाज उठवण्यासाठी तरी या गोष्टी केल्या पाहिजेत.
एकदा पी एम टी मध्ये माझा दीर, सासू-जाऊ सगळे सोबत होतो. अशीच आरक्षित जागा साबांना मिळवून देण्यासाठी मी एकटी भांडत होते. कंडक्टरही वारंवार सांगून लक्ष देत नव्हता. शेवटी कंडक्टरविरुद्ध तक्रार करायची धमकी दिल्यावर काम झाले. पण तोवर आमचा स्टॉप जवळ आला होता. हाईट म्हणजे हे सगळं मी करत असताना सासू नि दीर अनोळखी असल्यासारखे दुरून तमाशा बघत होते. घरी आल्यावर मला हे वरच्यासारखे शांतताप्रियतेचे, अ‍ॅडजस्ट होण्याचे वगैरे डोस मिळालेच. ! संताप येतो अशा वेळी. पण जे बुद्धीला पटतं ते करायचे सोडू नये हे मात्र नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जिप्सी, तुमचे विचार १००% पटले.

सुहास..'s picture

13 Oct 2010 - 5:38 pm | सुहास..

अगदी खरं आहे जिप्सी !
आधी शांतताप्रिय म्हणून घ्यायचं, थंड रहायचं, मग हळुहळू त्याचीच सवय होते आणि तो स्वभाव बनतो. स्वतःच्या हक्कांची जाणीवही रहात नाही. >>>

+१ ग मितान !!

योगी९००'s picture

13 Oct 2010 - 2:00 pm | योगी९००

जिप्सी
+ १ सहमत..

मला काय त्याचं? ही वृत्ती आपल्या समाजाला खरच एक दिवस महागात जाणार आहे.
अगदी बरोबर..

ठीक आहे जिथे तिथे तलवार उपसायची मला तरी गरज वाटत नाही. कोणी धक्का* दिला तर तर मी सोडत नाही आणि लिंगभेदावर आधारीत सीट्साठी मी भांडत नाही. पिरीअड.
*फक्त निसटता स्पर्श नव्हे तर लोचट अंगचटीला येणं.

>शिक्षणामुळं विचार करण्याची सवय लागते,निर्भयता अंगी येते असं म्हणतात

निदान यायला हवी. एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य अंगी हवेच, आणि ते तुम्ही केलेत हे उत्तमच आहे. मला काय त्याचे किंवा झुंडशाहीविरुद्ध मी कसे बोलू ही वृत्ती वाईटच आणि बरेचसे लोक असा विचार करत असल्याने निष्क्रिय समाजमन तयार होते.

माझ्या मते तरी तुम्ही उत्तम केलेत, आणि तुमचा स्वतःच्या विचारांवर विश्वास असेल, तर पुन्हा मी असंच वागू का हा प्रश्नदेखील तुमच्या मनात येणार नाही.

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 5:18 pm | इन्द्र्राज पवार

"....तर शिक्षणाचा उपयोग काय ?"

आत्यंतिक अलिप्तता पाळायची म्हणजे मला पुढे श्वासदेखील घेता येणार नाही अशी अवस्था येईल हे सत्यच आहे, त्यामुळे उद्या बसमध्ये माझ्या धाकट्या बहिणीबरोबर केएमटीचा कंडक्टर सीटबाबत वाद घालू लागला तर बाजूला अलिप्ततेने उभे राहून ते दृष्य मी 'शांतताप्रिय' माणूस म्हणून पाहू लागलो तर भाऊच काय पण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचाच मी नाही. त्यामुळे अलिप्ततेला भेकडपणाचे रूप येणार नाही हे मी नक्कीच पाहिन याबद्दल दुमत होऊ नये.

शिक्षणामुळे विचार करण्याची सवय लागते,निर्भयता अंगी येते असं म्हणतात हे खरेही आहे; फक्त त्या 'निर्भयते' ची व्याख्या आगीत हात घालणे होणार नाही. मी भ्रष्टाचार, काळा बाजार, दादागिरी, दोन नंबरचे धंदे याविरुद्ध आवाज उठवेन यात शंका नाही (उठवित असतोही), पण म्हणून उद्या मला 'जा, आणि अरुण गवळीच्या मुस्काटात मारून दाखव...' असे कुणी सांगितले तर त्या सांगणार्‍याला माझा कोपरापासून नमस्कार असेल. भ्रष्टाचाराचा विरोध तशा अ‍ॅक्शनमधून ज्याना मान्य असेल तो त्यांना मुबारक...आम्ही सनदशीर मार्गानेच जिल्हाधिकारी कचेरीचे दार ठोठावणार्‍यापैकी आहोत.

जिप्सी.... वैयक्तिक वगैरे घेत नाही, पण अमुक एका रस्त्याने जाणे पसंत करतो म्हणूनच मी शांतताप्रिय आणि जे वाकडा मार्ग अनुसरतात ते क्रांतीकारी हा प्रमेय कसा सुटतो हे जाणून घेणे मला आवडेल. निसर्गाची रचना होताना ती जशी निव्वळ हिंसेवर झालेली नाही तद्वतच ती तशाच पातळीच्या अहिंसेवरदेखील झालेली नाही हे तुम्ही जाणत असालच. सबब अमुक एका प्रसंगी अमुकाने शांती दाखविली आणि तमुक एका प्रसंगी तमुकाने तलवार उपसली म्हणजे वर्षातील उरलेले ३६४ दिवस दोघे तीच भूमिका जगत असतील असे कधीच होत नाही.

तुकारामाने म्हटलेच आहे की,
"विंचू देव्हार्‍यासी आला | देवपूजा नावडे त्याला |
तेथे पैजाराचे काम | अधमासी व्हावे अधम ||"

हा न्याय देण्याची वेळ आली की माणूस कितीही शांतीप्रिय असला तरी असे वागणारच.... तेथे शिक्षण, स्वभाव वगैरे बाबी दुय्यम होतील. केवळ एक-दोन फुटकळ प्रसंगावरून स्वभावाची अंतीम पारख होत नसते.

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यावरुन आमच्या टिंग्याच्या मित्राने लिहिलेल्या अनुभवाची आठवण झाली.

ऋषिकेश's picture

13 Oct 2010 - 5:47 pm | ऋषिकेश

तुम्हाला एखादी गोष्ट भांडण्याइतकी महत्त्वाची वाटली म्हणून तुम्ही भांडलात.. योग्यच आहे ते.. मात्र ती गोष्ट प्रत्येकाला (किंवा अगदी ज्यांच्यासाठी भांडतोय त्यांनाही) भांडण्याइतकी महत्त्वाची वाटावी हा तुमचा अट्टाहास चुकीचा वाटतो

धमाल मुलगा's picture

13 Oct 2010 - 7:05 pm | धमाल मुलगा

तुम्ही कशाला बोंबलत गेल्ता तिथं?
आणि असं काही होत असेल तर त्या स्त्री मुक्ती आणि स्त्रीहक्कवाल्यांना सांगायचं. ;)

साहेब,
सत्कार्य करावं, जरुर करावं. पण ते योग्य तेच पाहून करावं असं आमचं सपष्ट मत आहे.
दान असावं ते सत्पात्री असावं.

असो. हा आमचा विषय नाही. केवळ तुम्ही काहीतरी विचारलंत म्हणुन दोस्तासाठी म्हणुन तोंड खुपसलं. :)

वाहीदा's picture

13 Oct 2010 - 7:45 pm | वाहीदा

बसमधील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या कडे लक्ष देऊ नये जिप्सी
व्यक्ती तितक्या प्रकृती . हे खरे आहे
और ऐसे बुझदिल लोगोंसे क्या उम्मिद करती हो ?? यह लोग तो लानत के भी काबिल नहीं

But have we became immune to these kind of "Care a Damn" Disease of society ??
I appreciate you were sensitive to other person’s problem rather than your own .

मला कितीही कोणी ही मुर्खात काढले तरीही मी मात्र परत तशीच मदत करणार
अशीच मी एका मुलीची तिची पर्स वाचविण्यासाठी भर गर्दितल्या ट्रेनमध्ये मदत केली होती
तर मला त्या पाकिटमार बाईने हातावर अन मनगटावर ब्लेड मारुन रक्तबंबाळ केले होते
जिची पर्स वाचविली होती ती तर साधे धन्यवाद न म्हणता मस्त स्वतःच्याच धुनकीत निघुन गेली पण मी त्याचे वाईट अजिबात वाटून घेतले नाही .
मला जे योग्य वाटले ते मी केले .
अन जिप्सी तुझ्या समोर जे अयोग्य दिसले ते तू थांबविण्याचा प्रयत्न केलास

And Believe me , जब तुम किसी मुसिबत में होगी तो खुदा तुम्हें कोई ना कोई, किसी ना किसी जरीये से मदत जरूर पहोंचायेगा.
जब तुम किसीको मदद करते हो तो, बुरे वक्तमें, तुम्हें मदद अपने आप मिलेगी किसे के सामने गिडगिडाना नहीं पडेगा.. लाचार और बेबस नहीं होना पडेगा... तुम्हें मोहताज नहीं होना पडेगा
खुदा से उम्मिद रखो बुझदिलोंसे नही :-) This is my own experience

जिप्सी's picture

13 Oct 2010 - 8:49 pm | जिप्सी

अमुक एका रस्त्याने जाणे पसंत करतो म्हणूनच मी शांतताप्रिय आणि जे वाकडा मार्ग अनुसरतात ते क्रांतीकारी हा प्रमेय कसा सुटतो हे जाणून घेणे मला आवडेल >>>> शांतताप्रिय मी सुद्धा आहे, मलापण ते आवड्तं पण जर आपल्या बाजूला काही चुकीचं/नियमाविरुद्ध चालले असेल तर मला आपली शांतता थोडावेळ का होईना सोडली पाहीजे, आणि वाकड्या मार्गानं नं जाता प्रश्न नेहमीच सोडवता येतात. आपण नियमासाठी/कायद्यासाठी भांडतो यातून आपल्या बरोबर इतरांचाही फायदा असतो. आणि दरवेळी धाडस कुणाच्या मुस्काटात मारून सिद्ध होत नसतं. आणि या सगळ्या फार किरकोळ गोष्टी आहेत्,क्रांतिकारी वगैरे काही नाही.