प्येरु..

गोगलगाय's picture
गोगलगाय in कलादालन
9 Oct 2010 - 2:03 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

जिप्सी's picture

9 Oct 2010 - 2:09 am | जिप्सी

कुटं ग्येला ? कापायच्या आधी धुवायला नेला काय?

गोगलगाय's picture

9 Oct 2010 - 2:18 am | गोगलगाय

काय बि कळत नाय्..पुर्व् द्रुश्य दाबले तर पेरु हातातुन सटकला..शोधतो आता..जरा दम धरा..

गोगलगाय's picture

9 Oct 2010 - 2:24 am | गोगलगाय

शिल्पा ब's picture

9 Oct 2010 - 2:46 am | शिल्पा ब

मस्त...तोंडाला पाणी सुटले...
हे पेरू लाल कशामुळे असतात?

गोगलगाय's picture

9 Oct 2010 - 2:59 am | गोगलगाय

| हे पेरू लाल कशामुळे असतात?
हाच प्रश्न मलाही पडला म्हणूनच थांबलो..ते रंगवलेले होते..पण त्यांचा उद्देश साध्य झाला आणि मी डझनभर तरी विकत घेतले...वेरूळ् - औरंगाबाद रस्त्यावर कुठेतरी..

बेसनलाडू's picture

9 Oct 2010 - 4:29 am | बेसनलाडू

काही जातींमध्ये आतील भाग लाल रंगाचा असतो. हे रंगवलेले असतील, मात्र निसर्गतःच गर लाल रंगाचा असलेले पेरू (ग्वावा) आहेत. ज्यांचा गर पांढर्‍या रंगाचा असतो ते ग्रीन अ‍ॅपल ग्वावा म्हणून ओळखले जातात.
अधिक माहिती - येथे आणि येथे
(माहीतगार)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2010 - 8:45 am | बिपिन कार्यकर्ते

पेरू मस्तच... पुण्याकडून एक्सप्रेस हायवेला लागताना दिसतात बरेच फळविके...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Oct 2010 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

'प्येरु' शब्द वाचला आणि एका 'प्यार्टी' वाल्या सदस्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

लगता है याराना भोत गेहरा हय

मराठमोळा's picture

9 Oct 2010 - 1:13 pm | मराठमोळा

पेरु म्हणजे माझे आवडते फळ...
दुखती रग पे हात रख दिया गोगलगाय!!!!!!! ओह्ह्ह नो.. इथे पेरुच नाहीत... तिखट मीठ लावलेले, पोपटी रंगाचे अप्रतिम पेरु...
:(

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Oct 2010 - 2:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...माझंही लहानपणापासून च आवड्तं फळ....
दुपारी आईची नजर चुकवून घारामागच्या झाडावर चढुन 'प्येरू" तोडायचे हा नेहमीचा उद्योग असे...
तसं करताना एकदा खालच्या तारेच्या कुंपणात पण पडल्याचं आठ्वतय्,..खरच्ट्लेले हात पाय्....आणि वर धपाटे...
पण तिखट -मीठ लावलेले अर्धे कच्चे पेरु वेगळेच लागत असत. :)

बरेच दिवसात हा असला लाल पेरु नाही खाल्ला.
फोटोतला जरा जास्तच भडक दिसतोय (नक्की रंग लावलेला असणार.)
हे पेरु नाशिकच्या पांढर्‍या पेरुंपेक्षा चवीला जरा जास्त गोड असतात.
आम्च्या वाडित याची झाड होती. (अजुनही असावीत.)

चिंतामणी's picture

10 Oct 2010 - 12:37 am | चिंतामणी

हे पेरु नाशिकच्या पांढर्‍या पेरुंपेक्षा चवीला जरा जास्त गोड असतात.

चुकिची समजुत आहे. पांढ-या पेरुची गोडी या कलमी पेरूला नसते.

मी पुण्याच्या आपसात मिळणा-या पेरुच्या खाद्य अनुभवावरून सांगत आहे.

टिउ's picture

16 Oct 2010 - 12:23 am | टिउ

उगाच नाशिकला काहीही बोलायचं काम नाय सांगुन ठेवतो! ;)

जयंत कुलकर्णी's picture

9 Oct 2010 - 6:36 pm | जयंत कुलकर्णी

आम्हाला तर पेरूची पानेच आवडतात. कारण का ते वाचा.....

जेव्हा मला वाईन कशी प्यायची हे माहीत नव्हते तेव्हाची गोष्ट. माझ्या एका भावाचा गोव्यावरून वाईन आणली आहे , ये चव घ्यायला असा फोन आला आणि मग काय संध्याकाळीच पोहोचलो त्याच्या घरी. बघतो तर काय एक वाईनचा टेट्रा पॅकच होता आणि त्याला चक्क एक नळ होता. तेव्हा संगणक नवीनच आले होते. १२ MB HDD, 520 kb RAM etc.....त्याचा संगणक बघता बघता किती वाईन प्याली हे कळालेच नाही. उशीर झाल्यामुळे लगेचच कावासाकीला किक मारली आणि निघालो. रात्रीचे ११ वाजले होते. म्हात्रे पुल पार केला आणि परिस्थिती फार बिकट झाली. काहीच सुधरेना. क्लच कुठल्या पायात आणि ब्रेक कुठल्या हेच समजेना. एटी फिट रोडला लागलो आणि तेथे एक पानाचे दुकान होते त्याच्या समोरच गाडी लावली आणि त्याच्या समोर त्याच्या एका खुर्चीवर बसकण मारली. त्या पानवाल्याल्याच्या अनुभवी नजरेस काय झाले असावे हे लगेच कळाले असावे. त्याने त्याच्या बायकोला हाक मारली " अगं ए जरा पेरूची पाने आण बरं"
मला देऊन तो म्हणाला " साहेब ही चघळा आणि चोथा थुंकून टाका. अशी ७/८ पाने खाल्यावर माझी सगळी चढलेली वाईन एका झटक्यात उतरली.

म्हणून पेरूपेक्षा आम्हाला त्याची पाने जास्त प्रिय............ :-)

शिल्पा ब's picture

10 Oct 2010 - 12:31 am | शिल्पा ब

हि बरीच उपयोगी माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद.

मिपावर एक पोपट आला होता काल.

हे पेरु पोपट आल्यामुळे आणण्यात आले आहेत का?

;) ;)

माजगावकर's picture

15 Oct 2010 - 11:38 pm | माजगावकर

मस्तच! सगळ्यात आवडत्या २/३ फळांपैकी एक..

पुर्वी माझ्या घरामागच्या अंगणात झाड होते.. अशक्य पेरु खायचो.. शेजार्यांबरोबर नेहमी भांडण व्हायचं, त्यांची मुलं आमच्या झाडाचे पेरु चोरायचे म्ह्णून.. मलाही त्या लाल कलमी पेरुंपेक्षा पांढरेच आवडतात..

परवाच इथे इंडियन स्टोअर मधे (दिसायला) अगदी आपल्याकडच्या सारखा पेरु दिसला.. दुकानदार म्हटला "फ्लोरिडा चा आहे". मोह न टाळता आल्यानं घाबरत घाबरत का होइना, १ डॉलरला घेतला.. पण चवीला अगदी माझ्या घरच्या झाडाच्या पेरुसारखा लागला!! मजा आली!