स्टफ्ड मशरूम्स

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
4 Oct 2010 - 5:41 pm

साहित्य
१२ मोठे बटन मशरुम्स
२ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा
२ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर
६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या
१/२ टी स्पून मिरे बारीक करुन
१/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड
२ टे. स्पून परमेजान चीज
१/२ कप मोत्झारेला चीज
१ टी स्पून तेल

कृती
ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता. बारीक चिरलेली कोलंबी घालून १-२ मिनिटे परता. मिरे पावडर, इटालियन सिझनिंग,परमेजान चीज घालून नीट ढवळा आणि आचेवरुन बाजुला काढा.
मिश्रण थोडे गार झाले की एका बेकिंगडिश ला तेलाचा हात लावून घ्या. मशरुम मधे तयार केलेले मिश्रण भरुन
डिश मधे ठेवा.

डिश तापलेल्या ओवनमधे ठेवून १५-२० मिनिटे बेक करा. बाहेर काढून मशरूम्सवर मोत्झारेला चीज भुरभुरवा आणि परत डिश ३-४ मिनिटांसाठी ओवनमधे ठेवा. चिज वितळले की बाहेर काढून गरमच वाढा.
वरील प्रमाण ३ जणांना अपेटाइझर म्हणून पुरेसे आहे.

प्रतिक्रिया

योगप्रभू's picture

4 Oct 2010 - 5:49 pm | योगप्रभू

ही सुंदर डिश माझ्यासारख्या मश्रुम आणि कोळंबी दोन्हीचाही चाहता असणार्‍यासाठी आनंदाचा ठेवा. वॉव :)
हावरट म्हणा नायतर काहीही. पहिली मी प्लेट समोर धरलीय.
बाकीच्यांनी माझ्यामागे रांग लावावी.

फोटो आणि सजावट मस्तच.
जियो.

विनायक प्रभू's picture

4 Oct 2010 - 6:02 pm | विनायक प्रभू

भारी.
कोळंबी एवजी बाकी दुसरे काही?

स्वाती२'s picture

4 Oct 2010 - 6:15 pm | स्वाती२

शौकिन असाल तर क्रॅब मीट.
सामिश नको असेल तर मश्रुमचे देठ जास्त घ्यायचे आणि जोडीला बारीक चिरुन पालक घालायचा. क्रिम चिजही घालतात. पण आमच्या कडे लेकाला कोलंबीवालेच लागतात.

रेवती's picture

4 Oct 2010 - 6:30 pm | रेवती

हां! हेच विचारायचे होते.
कोलंबीच्याच प्रमाणात आणखी देठ चिरून घालायचे.

सुनील's picture

4 Oct 2010 - 6:08 pm | सुनील

सुंदर!

मास्तर, कोळंबीऐवजी कलेजीचे (कुणाच्या ते विचारू नका!) बारीक केलेले तुकडे घालून बघा.

सहज's picture

4 Oct 2010 - 6:16 pm | सहज

आवडले.

विंजिनेर's picture

4 Oct 2010 - 6:16 pm | विंजिनेर

मस्तच दिसतायेत मशरूम्स!
अवांतरः अ‍ॅपेटाईझरच्या निवडीवरून तिकडे फॉलची थंडी+पावसाची रिपरिप सुरू झालेली दिसतेय :)

यम् यम्

१ शंका: या पाककृतीत मिठ वापरलेले दिसत नाही. अळणी होणार नाही का? की इटालिय सिझनिंग ब्लेंड आणि परमेजान चीज मध्ये मिठ असत?
मश्रुम्स ना मॅरिनेट करायची गरज नाही का?

चिझ मधे मीठ असते. पण हवे असेल तर चिमुटभर घालायला हरकत नाही.

विसोबा खेचर's picture

4 Oct 2010 - 7:07 pm | विसोबा खेचर

अरे वा..!

--
लाखाची गोष्ट, अवघाची संसार, पेडगावचे शहाणे, आम्हा जातो आमुच्या गावा, वरदक्षिणा, सुवासिनी, यासारखे सुंदर चित्रपट कुठे गेले आता?

कौशी's picture

4 Oct 2010 - 8:19 pm | कौशी

खुप मस्त....
करून बघते तर आज.. साहित्य तर आहेच घरात

कौशी's picture

4 Oct 2010 - 8:19 pm | कौशी

खुप मस्त....
करून बघते तर आज.. साहित्य तर आहेच घरात

सविता's picture

4 Oct 2010 - 8:38 pm | सविता

तो.पा.सु.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2010 - 10:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भूक लागली. मश्रूम्स तर फारच आवडतात मला! आणि कोलंबीच्या जागी पालक आणि मश्रूमची देठं हाही उपाय चांगला आहे. मश्रूमच्या देठांचं काय हा प्रश्न पडला होताच मला!

स्वाती२'s picture

5 Oct 2010 - 11:34 pm | स्वाती२

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

शिल्पा ब's picture

6 Oct 2010 - 1:20 am | शिल्पा ब

छान वाटतात...मश्रुमची शाकाहारी पाकृ द्या कि एखादी..