कोलंबस-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in पाककृती
24 Sep 2010 - 1:01 pm

ह्या पाक कृतीचा आस्वाद अगदी निवांत दिवशी च घ्यावा.
अर्थात ह्या दिवशी कुठल्याही अदर अ‍ॅक्टीविटीज ना थारा नसावा.
कुठल्याही नाही.
गरमागरम भात आणि आमटी बाबत मॅनियॅक असलेल्यांसाठीच ही पाकृ आहे.
दोन पेग घेतल्यावर जी नशा चढते त्याचा अनुभव येतो.
उगाच दोन मुद भात एक डाव आमटी वाल्यांनी वाटेस जाउ नये.
-----------------------------------------------------------------------------------------
"सिक्रेट काय"?
त्यात कसले आहे सिक्रेट?
" त्याशिवाय का १०००० लोकांसाठी वडाळ्याच्या गणपतीत बनणार्‍या कोलंबस ची चव फक्त १० लोकांसाठी बनवलेल्या पाकृ ला येते?"
१० नाही २०. तुम्ही दोघे ते दोन दिवसात संपवता.
"विषयांतर नको"
काहीही नाही हो तसे. फोडी शिजवायचे पाणी आणि तुरडाळ शिजवायचे पाणी वापरायचे. तुमच्या भाषेत पाकृ ला चव यायची असेल तर ..........
"च्यामारी एवढे सोप्पे"
-----------------------------------------------------------------------------------------साहित्यः तुम्हाला आवडते ती भाजी
१. बटाटा २. फरसबी ३.टॉमेटो ४.वांगे. ५. शेवग्याच्या शेंगा ६. कोहळा
२. तुरडाळ
भाजी चे आवडी प्रमाणे फोड्या (तुकडे) करावे. भाजी स्वच्छ धुवावी.
भांड्यात शिजवुन घ्यावी. शिजवलेले पाणी अजिबात टाकु नये.
साधारण ३ लिटर आमटी करता १ छोटा पेला तुऱडाळ कुकर मधे शिजवावी.
तुरडाळ शिजवताना त्याची एकदम पेस्ट होणार नाही आणि ती कोलंबस मधे तोंडाला लागणार नाही ह्या बेताने शिजवावी.
मोठ्या भांड्यात फोड्याच्या पाण्यात ही शिजवलेली डाळ त्यातील थोड्या पाण्यासकट टाकावी.
त्यात आपल्याला जी आमटीची क्वांटीटी हवी आहे त्या प्रमाणे पाणी टाकावे.
सांबार पावडर टाकावी. एक चमचा १ लिटरला ह्या मापाप्रमाणे. अर्थात ह्यात आपल्या आवडी नुसार फरक होउ शकतो.
चांगली उकळी आल्यावर घरच्या तुपात फोडणी द्यावी. राई, हींग, कडीपत्ता वाली. चांगला कडीपत्ता मिळाला तर भारी मौज.
___________________________________________________
गरमा गरम भाताबरोबर ओरपावी.
ही पाकृ चमच्यानी जेउ नये.
जेवता जेवता घाम आला की ओळखावे कोलंबसला भारत देश मिळाला.
----------------------------------------------------------------------------------------
जाता जाता: जवळ पास असलेल्या लोकांना एकदा घरी बोलावुन प्रॅक्टीकल दाखवावे काय?
म्हणजे ते ज्योत से ज्योत काहीसे म्हणतात ना ते होइल.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Sep 2010 - 1:03 pm | अवलिया

बर.. येतो पहायला आणि खायला.

काजुकतली's picture

24 Sep 2010 - 1:04 pm | काजुकतली

सांबार मसाला पाठवुन द्या... :) पाकृ मस्तच..

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Sep 2010 - 1:15 pm | ब्रिटिश टिंग्या

>>जेवता जेवता घाम आला की ओळखावे कोलंबसला भारत देश मिळाला.

हे वाक्य बर्‍याच ठिकाणी भिडले :)

प्रीत-मोहर's picture

26 Sep 2010 - 8:26 am | प्रीत-मोहर

अश्लील अश्लील.......

जेवायला यायला हरकत नाही.

सहज's picture

24 Sep 2010 - 1:38 pm | सहज

फटु नसलेल्या पाकृ म्हणजे अपूर्ण भरलेला अर्ज, अर्धवट सोडवलेली उत्तरपत्रीका मास्तर. :P

कोलंबस कोलंबस छुट्टी है आयी.
आओ कोइ नया मुल्क ढुंढे भाई!

प्रेरणा - सौ. उर्फ सौजन्य भडकमकरमास्तर

मस्त कलंदर's picture

24 Sep 2010 - 3:03 pm | मस्त कलंदर

काकूंच्या पाककौशल्याचा अनुभव एकदा घेतला आहेच.. आता परत घ्यायला मिळत असेल तर मी लगेच यायला तयार आहे. आणि वर काकू कोलंबस कसा/कशी बनवतात याचा आँखो देखा हालही पाहायला मिळेल.
आणि हो.. काकूंच्या पाकृचा इथे फोटो नसेल तरीही चालेल. तेवढाच इनोचा खप कमी होईल.

चालले सगळे लगेच उठुन पाहुणाचाराला.

काकु आयटित नाहीत म्हणजे त्या उत्तम सुगरण असणारच.
शिवाय मास्तरही आयटीत नाहीत. म्हणजे त्यांचा स्वयंपाक गृहात वावर फक्त खाण्यासाठीच ;)
त्यामुळे मास्तर काय, आमंत्रण देउन पसार होतील हो पालकांची साळा घायला.
पण बिचार्‍या त्या माऊलीला एकटीला सगळी उठबस करावी लागणार. ;)

स्वगत: लेका किती ती जळजळ रे, पाहुणाचाराला जाता येत नाही म्हणुन :)

ती सांबार पावडरची रेसिपी द्या ना. त्या शिवाय कसे करणार हे कोलंबस?

ते परभु मास्तरला काय इचारते कोण्या उडपीला विचार ने. ;)
फॅमिली शिक्रेट हाय हो. ;)

उडपीच्या सांबाराबद्दल मास्तर म्हणतात-
मी इडली हॉटेलमधे खात नाही.
कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्‍या सांबाराचा अपमान आहे.
ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो.

तेव्हा उडप्याचा उपयोग नाही. आणि तसाही इथे उडपी नाही. असो. इनो आहे भरपूर ; )

पैसा's picture

25 Sep 2010 - 12:03 am | पैसा

वैनीक ना जाल्यार, तांगेल्या आवयीक विचारून सांबार मसाल्याची रेसिपी सांगता मरे?

(की "सारस्वत चंद्रिका" पळोवन हांव दिऊ?)

प्रीत-मोहर's picture

26 Sep 2010 - 8:28 am | प्रीत-मोहर

दी गो तु...तुवें दिली किदे आनी मास्तरान दिली किदे...एकुच न्हय तें.....आमका खावपाक मेळ्ळ्या पुरो....:)

ह्या ला आमच्या ईथे ढकु म्हणतात

>>>ह्या ला आमच्या ईथे ढकु म्हणतात...................................कुणाला ? मास्तरला का?

ढकु मास्तर फोटो काढायला कधे येऊ ?

@ जयपाल
ढकु या रेसिपिला म्हणतात

जबराच...आता ठाण्यात असायला हवा होतो.. :)

हम्म! पाकृचा फोटू नाही तो नाही निदान इनोचा तरी द्यायचा!
पाकृ लेखनाची नवी पद्धत आवडली.
गरमागरम भात आणि आमटी बाबत मॅनियॅक
मी तरी अगदी आहेच! मस्त लसणीची फोडणी दिलेली, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घातलेली आमटी......
हे असं काही जेवल्यावर झोप काढण्याशिवाय पर्याय नसणार असा अंदाज आहे.:)

चिंतामणी's picture

25 Sep 2010 - 12:01 am | चिंतामणी

कुरिअर कराल का सांबार पावडर आणि पावडरीची कृतीसुद्धा.

कुरिअर चार्जेस दिले जातील.