पालकभात

मितान's picture
मितान in पाककृती
5 Sep 2010 - 5:33 pm

आमच्या गावात आपल्या हिरव्या पालेभाज्यांपैकी पालक ही एकच भाजी मिळते. ती पण कमीत कमी अर्धा किलो चे पॅकेट घ्यावे लागते. एवढा पालक न कंटाळता संपवायचा म्हणजे फारच सुगरणपणा दाखवायला लागतो ;) मग पालक पराठे, सूप, पालकभात असे भरपूर पालक लागणारे पदार्थ केले जातात. त्यातला एक प्रकार पालक भात.
लागणारा वेळ - ३० मि.
दोन फुल एक हाफ व्यक्तींसाठी.
साहित्य -
तांदूळ - १ मोठी वाटी
पालक - १ मोठी जुडी
कांदा - १ लहान ( ऐच्छिक )
लसूण पाकळ्या - ३ - ४
मटार - पाव वाटी
जिरे - अर्धा चमचा
दालचिनी - एक इंच
तमालपत्र - १
हिंग - पाव चमचा ( छोटा )
तूप किंवा लोणी - २ मोठे चमचे ( यापेक्षा जास्त घालू शकता )
मीठ चवीपुरते
सजावटीसाठी - काजू, टोमॅटो, कोथिंबीर, तीळ वगैरे ( ऐच्छिक )
कृती -
तांदूळ थोडे मीठ घालून मोकळा शिजवून घ्या.
पालक धुवून गरम पाण्यात ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. पाणी निथळून घ्या.
कांदा, लसूण बारीक चिरून घ्या.
पालक मिक्सरमधून वाटून घ्या.
शिजलेला भात थोडा गार व्हायला ताटात पसरून ठेवा. म्हणजे तो मोकळा होईल.
एका कढईत लोणी किंवा तूप टाका. गरम झाले की हिंग आणि जिरे घाला. जिरे लालसर झाले की तमालपत्र आणि दालचिनी घाला. वर लसूण आणि कांदा घाला. कांदा लसूण गुलाबी झाला की मटार घाला. गॅस बंद करा. आता पालकाची पेस्ट घाला. २ मिनिटे परतून घ्या. कांदा लसूण चांगले मिसळले गेले पहिजे. आता हे मिश्रण भातावर घालून चांगले मिसळून घ्या. पालक भात तयार.
Bhat
आवडत्या भांड्यात भात ठेवून आवडेल तशी सजावट करा.
या भातासोबत नुसते लोणचे तोंडीलावणे म्हणून असले तरी छान. किंवा कढी, टोमॅटोचे सार किंवा ताक पण भाताची लज्जत वाढविते.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

5 Sep 2010 - 5:42 pm | श्रावण मोडक

आनंदयात्री? कुठं आहात? ही तुमची खास डिश!!!

तो 'बिझी' असणार सध्या! ;)

श्रावण मोडक's picture

5 Sep 2010 - 6:03 pm | श्रावण मोडक

काल जीटॉकवर साहेब "अव्हेलेबल" स्टेटस लावून होते... ;) त्यामुळं वाटलं परतले असावेत. मग पूनमवर नेता येईल त्यांना. तिथंच हा पालकभात त्यांनी दोन-तीनदा चापला होता!!!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

काल जीटॉकवर साहेब "अव्हेलेबल" स्टेटस लावून होते...

अव्हेलेबल नसेल MBA असेल. मॅरीड बट अव्हेलेबल ;)

मितानबै आजकाल सगळ्याच आघाड्यांवर लेखन चालु आहे का काय ? काय मस्त दिसतोय तो भात. वाह !!

सुनील's picture

5 Sep 2010 - 5:49 pm | सुनील

पाकृ मस्त. फोटोतर जबराच!

अवांतर - अर्ध्या किलोचे पॅकेट संपवायला (दोन फुल एक हाफ व्यक्तींसाठी) यातायात करावी लागते हे आश्चर्यच! पालक नुसता वाफवला तरी त्याचे आकारमान अर्ध्यावर येते. मला एकट्याला एक पॅकेट लागते!

बरोबर आहे सुनील,
पण दरवेळी पालक भाजी म्हणून किंवा नुसता वाफवून खाऊन कंटाळा येतो.. मग हे असे प्रयोग !

चतुरंग's picture

5 Sep 2010 - 5:56 pm | चतुरंग

फोटोही सुरेख आलाय. आवडेश! :)
(सजावटीत भांड्याच्या कडेकडेने पांढर्‍या रंगाचे दाणे दिसताहेत ते काय आहे? खोबरे असावे असे वाटले पण दिसत तसे नाहीये..)

(पालकप्रेमी बालक)चतुरंग

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2010 - 6:05 pm | स्वाती दिनेश

तीळ वाटत आहेत ते,
पालक भात मस्तच ग माया.
स्वाती

दिसताना अंमळ मोठे वाटताहेत त्यामुळे शंका आली..

पिंगू's picture

5 Sep 2010 - 6:08 pm | पिंगू

>> (सजावटीत भांड्याच्या कडेकडेने पांढर्‍या रंगाचे दाणे दिसताहेत ते काय आहे? खोबरे असावे असे वाटले पण दिसत तसे नाहीये..)

चतुरंगराव, ते तीळ आहेत हे नीट पाहील्यावर ध्यानात येईल... तशी पालकभात लई भारी डिश आहे...

-(पालकप्रेमी) पिंगू

पैसा's picture

5 Sep 2010 - 6:36 pm | पैसा

मस्त! बघूनच तों पा सु! बरोबर दही, पापड लोणचं काही असावं. क्या बात है!

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 8:38 pm | मस्त कलंदर

मस्तच दिसतोय भात..

फोटो पण जबरा आलाय!!!

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 11:07 pm | शिल्पा ब

मस्त दिसतोय भात...करुन बघेन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त दिसतोय. मी आणि माझी एक बहीण तिच्या गावात गर्ल्स नाईट आऊट करायचो, तेव्हा पालक भात, दाल फ्राय आणि दही अशी 'ऐष' करायचो. गेले ते दिन गेले ... हुश्श! आता ऑर्डर देऊन पालक भात खाता येतो.

पण आम्ही मटार घालायचो नाहीत आणि (मला कांदा आवडत नाही म्हणून) कांद्याचं प्रमाणही बरंच कमी असायचं. आणि बर्‍याचदा भात पातेल्यात शिजवून वरून फक्त पालक प्योरी घालायचो.

मला पालक भात हा प्रकार माहीत नव्हता. पालक माझ्या फार आवडीचा. एकदा करून पाहीन. पाककृती खूप चवीष्ट वाटतेय.

मस्त पाकृ आणि फोटो तर अप्रतिम :)

निखिल देशपांडे's picture

6 Sep 2010 - 11:12 am | निखिल देशपांडे

वा वा छान
खायला आवडेल..

रेसिपी आणि डेकोरेशन दोन्ही आवडले.

सहज's picture

6 Sep 2010 - 3:41 pm | सहज

हेच म्हणतो.

मदनबाण's picture

6 Sep 2010 - 4:29 pm | मदनबाण

अजुन पाभा खायची वेळ आली नाहीये,पण आता चव चाखायला हवी असे वाटत आहे... :)

खादाड's picture

6 Sep 2010 - 4:43 pm | खादाड

मस्त !!! फोटो तर फारच छान !