बीजिंग/हाँगकाँग मध्ये शाकाहारी जेवणाची सोय ?

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
1 Sep 2010 - 10:31 pm
गाभा: 

बीजिंग / हाँगकाँगमध्ये शाकाहारी व्यक्ती साठी जेवणाचे काय पर्याय आहेत ?

दहा दिवस फक्त कोर्‍या नूडल्स खाऊन जगणे मला तरी अशक्य आहे.

भारतीय (उत्तर / दक्षिण) जेवण मिळाले तर उत्तम ! (त्यासाठी रोज १०-१२ मैल टॅक्सीने जाण्याची देखील तयारी आहे; पैसे मला भरावे लागणार नाहीत, त्यामुळे :-))

कृपया, माहिती असल्यास तातडीने सुचवा.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिभोकाका, माझी एक मैत्रिण बीजिंगमधे असते/असायची; ती चिनीच आहे. तीन वर्ष इंग्लंडात राहिल्यामुळे तिचे इंग्लिश उच्चारही आपल्याला समजण्याइतपत आहेत. तिला मी विचारते आणि तुम्हाला कळवते.
हाँगकाँगमधेमात्र माझ्या ओळखीचं कुणी नाही.

शुचि's picture

1 Sep 2010 - 11:55 pm | शुचि

http://www.echinacities.com/beijing/listing/dining/indian/
मिभो तुम्हाला जर तिथून ही लिंक उघडता येत नसेल तर खाली पत्ते देते आहे -

Hazara Indian Restaurant (inside Face Bar)
फोन - 010-65516788
Near the Cervantes Institute, Dong Cao Yuan, 26 Gongti Nanlu, Beijing

Chingari
फोन -010-84883690
4/F, 27 Dongzhimenwai Dajie, Beijing

Indian Kitchen
फोन -010-64609366
2/F, 2 Sanlitun Beixiaojie, Beijing

Mirch Masala
फोन -010 85636304, 64064347
130, No.2 Building, Ritan Shangjie, North Gate Of Ritan Park, 39 Shenlu Jie, Chaoyang District, Beijing

Raj Indian Restaurant & Bar
फोन -010-64011675
31 Gulou Xidajie , Beijing

The Tandoor
फोन -010-6597 2211
1F, Great Dragon Hotel, 2 Gongti Beilu, Chaoyang District, Beijing

Victor's Place and Curry House
फोन -010- 84701306
8 Laiguangying Donglu, Chaoyang District, Beijing

Ganges
फोन -010- 6587 2999
138A, B1/F, The Place, 9 Guanghua Lu, Chaoyang District

Taj Pavilion
फोन -010-65055866, 65052288-80116
L128,1/F,Guomao Xilou,1 Jianguomenwai Dajie,Chaoyang District,Beijing

चतुरंग's picture

1 Sep 2010 - 10:56 pm | चतुरंग

मिर्च मसाला, पंजाबी इंडिअन, प्युअर लोटस, समाधी इ. नावाने बरीच भारतीय रेस्टॉरंटे दाखवली बीजिंगमधे.

हाइदिआन डिस्ट्रिक्टमधल्या आमच्या ऑफिसपासून अंतरेही ~१२ ते १५ किमी अशी दाखवली त्यामुळे हाटेले मिळायला अडचण येऊ नये असे वाटते (अर्थात तुमचे राहण्याचे ठिकाण नेमके कुठले ह्यावरही अवलंबून आहे म्हणा)
अन्नाच्या क्वालीटीबद्दल मात्र काहीच कल्पना नाही. :(

चतुरंग

पुष्करिणी's picture

1 Sep 2010 - 10:58 pm | पुष्करिणी

http://www.khanakhazana.hk/home.htm ( मी इकडे जेवले आहे, चांगलं आहे )

http://thenewsangeet.com.hk/

http://www.jashan.com.hk/index.php

बीजिंगमधे जाउन आलेले माझे काही मित्र खाली दिलेली साइट वापरायचे (पहिला तक्ता बीजिंग मधलाच आहे )
http://www.indianembassy.org.cn/Indian_Restaurants.htm

बहुगुणी's picture

1 Sep 2010 - 11:11 pm | बहुगुणी

हाँगकाँगः
खाना खज़ाना,
Life Cafe,
Bookworm Cafe,
आसरा,
आणि इतर बर्‍याच खाद्य-गृहांची यादी इथे आहे.

बेजिंगः
खाद्य-गृहांची यादी १,
खाद्य-गृहांची यादी २
ताज
मिर्च मसाला

दहा दिवसांमध्ये इतके सगळे 'सॅंपल' करून होणं कठीणच आहे:-), पण जे कराल त्यांचा रिपोर्ट द्या आम्हाला म्हणजे झालं!

शाहरुख's picture

1 Sep 2010 - 11:18 pm | शाहरुख

इंटरेस्टिंग !

http://www.google.com/prc/report.html

सुनील's picture

1 Sep 2010 - 11:49 pm | सुनील

बीजिंग/हाँगकाँग मध्ये उत्तम मिसळपाव कुठे मिळतो?

(हाँगकाँगचे ठाऊक नाही पण पुढच्या सात पिढ्यातरी बीजिंगमध्ये जाईन असे वाटत नाही, पण (चांभार) चौकशी करायला काय हरकत आहे?)

चिंतामणी's picture

1 Sep 2010 - 11:52 pm | चिंतामणी

मिसळभोक्ता माणूस चिनमधे जाणार म्हणून शुभेच्छा.

हाँगकाँगबद्दल माहीत नाही. पण बेजिंग/शांघाय बद्दल जाउन आलेल्या खास दोस्तांचे अनूभव फार काही चांगले नाहीत.

वरती यादी दिली आहे ती भारतीय जेवण देणार्या उपहार ग्रुहात खाउन बघ. परन्तु माझा सल्ला आहे जाताना बरोबर लोणची, चटण्या घेउन गेल्यास ब्रेडबटरला लावुन काही दिवस चांगले जातील. तेथे जाम मिळेलच.

मधुशाला's picture

2 Sep 2010 - 4:01 am | मधुशाला

"मिसळभोक्ता माणूस चिनमधे जाणार म्हणून शुभेच्छा."
कदाचित चीन/हाँगकाँगला जाणार एवढंच सांगण्यासाठी हा धागाप्रपंच असावा. अन्यथा गूगलला सर्व माहीत असतंच. (वरती काही लोकांनी ते काम केलं आहेच) असो... चालू द्या...

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Sep 2010 - 9:38 am | ब्रिटिश टिंग्या

>>मिसळभोक्ता माणूस चिनमधे जाणार म्हणून शुभेच्छा.

माणुस ह्या शब्दावर आक्षेप आहे!

मिसळभोक्ता's picture

2 Sep 2010 - 4:51 am | मिसळभोक्ता

सर्वांना धन्यवाद. तिथे एकंदरीत खाण्याची आबाळ होणार नाही असे दिसते.

(अर्थातच, ह्या धाग्याचा *खरा* उद्देश अद्याप साध्य झालेला नाही. कुण्या मिपाकराने हा धागा वाचून "मी बीजिंग/हाँगकाँगला असतो, हॉटेल मध्ये जेवण्यापेक्षा घरीच ये." असा प्रतिसाद (किंवा व्यनि) द्यावा, असे वाटले होते. :-) असो. अजूनही वेळ गेलेली नाही ;-)

मी अगोदरच देणार होतो तसा प्रतिसाद, पण मी शांघाई ला राहतो,
जमत असेल तर,
घरीच या, हॉटेल ची वगेरे पण काही काळजी करू नका, चांगला २ BHK flat आहे माझा.
आणि आमच्या सौ. सुगरण आहेतच. महाराष्ट्रीय पद्धतीचे एकदम मस्त जेवण मिळेल.
कसलीच काळजी करू नका. आणि इथे शांघाई मराठी group आहेच सोबतीला.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

घरीच या, हॉटेल ची वगेरे पण काही काळजी करू नका, चांगला २ BHK flat आहे माझा.

अर्र ! १ BHK असता तर प्यार्टी तरी करता आली असती ;)

मीनल's picture

2 Sep 2010 - 5:54 am | मीनल

३ -४ वर्षा पूर्वी हा प्रश्न आला असता तर मी बोलावले असते माझ्याच घरी.

गॅंजेस रेस्टोरंट चे मालक लक्ष्मण हेमनानी आहे. पक्का जैन. परंतू त्याच्या ३ ही शाखात तूम्ही मागितले तर शाकाहारी (वेगळ्या पातेली/ कढईत) करून देईल. बस्स, मेरा नाम बोल देना.
138A, B1/F, The Place, 9 Guanghua Lu, इथेच जा. रेस्टो बेसमेंट ला आहे.तिथे मॉलच्या बाहेर डोक्यावर उंच स्क्रीन आहे . किती मोठा असले??????? २ ड्राईव्हे इतका मोठा. पहात रहाल ! कदापी पाहिलेले. आय गॅरेंटी!

लिडो हॉटेल मधे एक ताज नावाचे ईंडिंयन रेस्टो आहे. चांगले असते जेवण. त्याचीच वल्ड ट्रेड सेंटर पाशी ही अजून एक शाखा आहे.

लिडो (चीनी लोक लिदू असे म्हणतात ) हॉटेल मधेच लोटस नावाचे माँक रेस्टो आहे. कांदा/ लसूण विरहीत उत्तम शाकाहारी मिळेल. प्युअर शाकाहार. तोफु पासून बनवलेले सर्व मांसाहारी नावे असलेले पदार्थ आहेत. प्रेझेंटेशन बरोबर चव ही उत्तम असते . अ मस्ट असे रेस्टो. तिथले वातावरणच एक सुखद आहे.
लिडो मधे दुस-या मजल्यावर थाई रेस्तो आहे. तिथे ही मागितल्यास शाकाहारी मिळेल मला तिथला पायनॅपल राईस आवडायचा. तिथे जाच. तिथली बैठक ही अफलातून आहे. आई शप्पथ!

खिश्यात पैसा असेल ( अर्थात कंपनीत बिल पाठवायचे असल्यास) तंदूर ला जाऊन या. काय सॉलिड अँबियन्स आहे. अमेरिकन हाय फाय रेस्टोच्या तोंडात मारेल असे !

अजून किती आणि काय सांगू आमच्या बिजिंग बद्दल???
खिसा पाकिट तेवढे संभाळा हं!

मिसळभोक्ता's picture

2 Sep 2010 - 6:16 am | मिसळभोक्ता

धन्यवाद. वेंजिन हॉटेल (हायडियान) च्या जवळच गँजेस आहे असे दिसले. तिथे नक्की जाईन.

गँजेस हॉटेल ओनर हेतल हेमनानी ही माझी मैत्रिण.
Haidian मधले गँजेस फारच छोटे आहे. ते फारसे सुखद नाही.
The Place हे तर खरोखर the place आहे. तो स्क्रिन, बाहेरचा माहोल वगैरे. तिथला कूक तीन्ही गँजेस मधला बेस्ट होता.. तेव्हा तरी! विकएंडला आणि फेस्टिव्ह सिझनला धमाल असते तिथे.

Haidian हे बिजिंग ( चीनी मँडरिन भाषेत बै Sजिंग.... `ज` रे जहाजातला) मधले District ऑफिसेस, चीनी युनिव्हर्सिटीज ने भरलेले आहेत. तिथे ऑफिस अवर्सला खूप ट्रॅफिक असतो.

आमच्या भिंतीला भेट द्यालच.

हे ही वाचून बधा.
अस्सल चायनीज हे कदाचित उपयोगी होईल.

मन१'s picture

2 Sep 2010 - 11:58 am | मन१

"मी बीजिंग/हाँगकाँगला असतो, हॉटेल मध्ये जेवण्यापेक्षा घरीच ये."
--उद्देश साध्य झाला?

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Sep 2010 - 12:01 pm | llपुण्याचे पेशवेll

त्यासाठी जेव्हा हाँगकाँमधे जाल तेव्हा.
मिसळभोक्ता
(सध्या बिजिंगमधे, पुढच्या आठवड्यात हाँगकाँगला)

अशी सही घ्या. त्यातून बरेच साधते.

"मी बीजिंग/हाँगकाँगला असतो, हॉटेल मध्ये जेवण्यापेक्षा घरीच ये." असा प्रतिसाद (किंवा व्यनि) द्यावा, असे वाटले होते.
स्वतःच्या आनंदावर विरझण घालुन घ्यायला कोण निमंत्रित करणार तुम्हाला ? ;)

प्रियाली's picture

2 Sep 2010 - 5:13 am | प्रियाली

बीजिंग / हाँगकाँगमध्ये शाकाहारी व्यक्ती साठी जेवणाचे काय पर्याय आहेत ?

ही चौकशी नेमकी कोणाबद्दल आहे? किंवा तुम्ही कधीपासून शाकाहारी झालात?

दहा दिवस फक्त कोर्‍या नूडल्स खाऊन जगणे मला तरी अशक्य आहे.

तिथे कोर्‍या न्यूडल्स(च) मिळतात हा शोध तुम्ही कसा लावलात?

भारतीय (उत्तर / दक्षिण) जेवण मिळाले तर उत्तम ! (त्यासाठी रोज १०-१२ मैल टॅक्सीने जाण्याची देखील तयारी आहे; पैसे मला भरावे लागणार नाहीत,

ते तुमचे जुने मित्र, तेच हो क्रांतीकारी देशभक्त वगैरे ते हल्ली बिजिंगला नसतात का?

कृपया, माहिती असल्यास तातडीने सुचवा.

बायदवे, माहिती असती तरी तुम्हाला दिली नसती. विरजण काय तुम्हालाच लावता येते काय?

विनायक प्रभू's picture

2 Sep 2010 - 4:19 pm | विनायक प्रभू

चिनी लोकांनो सांभाळुन राहा.

अत्यंत फुटकळ धागा. गूगलबाबा झोपले की काय?

>>कदाचित चीन/हाँगकाँगला जाणार एवढंच सांगण्यासाठी हा धागाप्रपंच असावा. अन्यथा गूगलला सर्व माहीत असतंच. (वरती काही लोकांनी ते काम केलं आहेच) असो... चालू द्या...
- सहमत

वेताळ's picture

2 Sep 2010 - 10:37 am | वेताळ

चीन्याच्या आनंदात जर विरजण घालता आले तर घाला.शक्यतो पातळ विरजण घाला.
विकसित चीन खाण्याबाबत इतका अविकसित पाहुन वाईट वाटले.

पप्पुपेजर's picture

2 Sep 2010 - 10:21 am | पप्पुपेजर

me navin sadyasa ayhe tasa vachanmatra 2 varsha purvi pasun ayhe pan ha maza pahila pratisad krupaya maf kara marathi madhe type karyala jamat nahi shikto ayhe.

me sudcha pudche 2 week HK madhe ayhe IFC area javal mala sudhha ha prashna padla hota tyamule ata prashna thoda far tari sutla ase watte.

दाद's picture

2 Sep 2010 - 12:40 pm | दाद

काय पण चौकशी !काय पण प्रतिसाद ! हसुन हसुन माझ पोट दुखायला लागल! एवड मिभोच पोट दु़खल नसेल फक्त कोर्‍या नूडल्स खाऊन दहा दिवसात ! मस्त !

चिरोटा's picture

2 Sep 2010 - 10:55 pm | चिरोटा

स्वाद ए हिंदुस्तान . हे पण एक हॉटेल आहे. वडापावही मिळेल.अर्थात परदेशातली भारतिय पद्धतीचे जेवण देणार्‍या उपहारगृहांचा दर्जा यथा तथाच असतो असा माझा अनुभव आहे.चीनी लोक काहीही('साप्,झुरळे..) खातात असे म्हणतात त्यापेक्षा हे बरे!

अमेरीकेतल्या चीनी हॉटेलात बेडकाचे पाय "डेलिकसी" म्हणून पाहीले आहेत. स्क्विड्स (ऑक्टोपस) खाल्ले आहेत पण बेडकाचे पाय खायची अजून तरी हिम्मत झली नाहीये.

विंजिनेर's picture

3 Sep 2010 - 9:43 am | विंजिनेर

वा! वा! शुची तै, लसूण, हिरव्या चहाची पाने आणि लाल मिरचीची झणझणीत फोडणीवर तळलेला बेडूक म्हणजे अगदी चविष्ट असतो. असा मस्त कुरकुरीत तळतात पण आतून मुलायम असतो बघा.
बायदवे ही अस्सल ग्वांन्डाँग ची डिश. मिभोंना हाँगकाँग मधे सहज मिळेल ;)

ए प्रसन्ना , चित्रात तुच हा का ?