पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत करायची झालेली भारताला घाई

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
30 Aug 2010 - 11:59 am
गाभा: 

पाकिस्तानात पुर आला. आतोनात नुकसान झाले. आपण माणुसकी म्हणुन ५० लाख डॉलर्स मदत देऊ केली आहे. गेले एक महीना भर आपण प्रयत्न करत आहोत की पाकिस्तान ने भेट कबुल करावी म्हणुन. पाकिस्तान कधी म्हणते कि त्याला भारताकडुन भेट नको. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच्या वेष्टणावरचे भारताचे चिन्ह काढुन मग ते पुर ग्रस्ताना वाटतानाची चित्र दुरदर्शन वर दाखवली जात होती ती सगळ्यानी पाहीलीच असतीलच. मदत मिळणा-यांना समजु नाही की भारताने मदत दिली आहे त्यापेक्षा भारताचा अपमान कसा होईल ह्यातच पाकिस्तानी नेत्यांना स्वारस्य आहे असे दिसते. आपण फारच आग्रह धरला म्हणुन त्यानी भेट कबुल करायचे ठरवले. आपल्या परोपकारी सरकारला अगदी हायसे वाटल्या सारखे झाले की पाकिस्तान एकदाची आपली भेट कबुल करता होत आहे म्हणुन. तेवढ्यात पाकिस्तानात माशी शिंकली. पाकिस्तान आता म्हणतो की जे काही भारताला द्यायचे आहे ते त्याने संयुक्त राष्ट्रला द्यावे व ते मग ती मदत संयुक्त राष्ट्राकडुन आली असे समजुन कबुल करतील. आता म्हणे भारतीय बाबु लोकं संयुक्त राष्ट्राकडे डोळे लावुन बसले आहेत.
ह्या गोष्टीवरुन कोणाला असे वाटेल कि पाकिस्तानला कोणत्याही मदतीची गरज नाही. कारण ज्याला गरज असते तो ती कशी येत आहे ते बघत नाही फक्त स्वीकार करतो.
आपण देतो ते दान आहे कि मदत. दान म्हटले तर आपल्या शास्त्रातुन लिहीले आहे की – दान देताना आधी घेणा-याची पात्रता बघायची असते. अशी पात्रता न बघता दिलेले दान हे अघोरी ठरते व अशा दानाला तामसी दान म्हणतात. असे दान देण्याने ना देणा-याचे पुण्य वाढते, ना घेणा-याचे कल्याण होते. मदत म्हंटले तर ती मित्रांना, शेजा-याला किंवा अडलेल्याला असते. पाकिस्तान मित्र नाही. अडलेला नाही. असता तर त्याने गप्प बसुन मदत घेतली असती. आता तो शेजारी राष्ट्र म्हणुन आपण मदत द्यायची पण लोटांगण नाही घालायचे किंवा गळ्यात थोडेच पडायचे हे आपल्याला समजायला पाहीजे एव्हाना. पाकिस्तान प्रत्येक गोष्टीत भारताचा अपमान कसा होईल हेच बघत आला आहे व आपण डोळ्यावर पट्टी बांधुन तिकडे दुर्लक्ष करत आलो आहे. ह्यात आपल्याला काय मिळणार आहे. अंतर राष्ट्रीय सभे मध्ये काय कोणी आपली पाठ थोपटणार आहे की संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्याला कायमचे स्थान मिळायला मदत होणार आहे, का पाकिस्तान अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायचे थांबवणार आहे, का पाक व्याप्त काश्मिर आपल्यासाठी सोडुन देणार आहे.

राष्ट्रार्पण

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

30 Aug 2010 - 1:07 pm | क्लिंटन

अगदी असेच.

त्या हलकटांना अजिबात मदत करायला नको होती.तिथल्या सामान्य जनतेला पुराचा त्रास सहन करावा लागत आहे आणि तिथले सगळे सामान्य लोक दहशतवादाला समर्थन देत नाहीत असे अनेक लोक म्हणतील. पण आपण अशा सामान्य लोकांपर्यंत पाकिस्तान सरकारला डावलून पोहोचू शकत नाही.त्यामुळे अशा निरपराध सामान्य लोकांचे काहीही झाले तरी त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही. दुसरे म्हणजे २००५ मध्ये पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भूकंप होऊन हजारो लोक ठार झाले.त्यावेळी भारताने पाकिस्तानला मदत केली होती.पण त्यानंतरच २० दिवसात काय झाले? दिल्लीत ऐन दिवाळीच्या दिवशी बॉम्बस्फोट. त्यानंतर ७/११, २६/११ हे मोठे हल्ले झालेच.अशा सापांना कितीही मदत करा ते डंख करायचे थांबत नाहीत.आणि यावेळी तर त्यांना आपल्याकडून मदत घ्यायची नव्हती तरी आपणच घ्या घ्या करत मागे लागलो होतो.काय गरज होती असे करायची काय माहित.खरे म्हणजे त्यांनी मदतीची विनंती केली असती तर आपण मदत करायचा विचार करायला हवा होता.इथे उलटाच प्रकार चालू होता.

क्लिंटन

सापाला दुध पाजल्याने तो गरळ ओकायचे थांबवत नाही.

नितिन थत्ते's picture

30 Aug 2010 - 1:12 pm | नितिन थत्ते

कृपया सापांची बदनामी करू नये.

साप मुळीच दूध पीत नाही

वेताळ's picture

30 Aug 2010 - 1:12 pm | वेताळ

मी भिकार्‍या मदत केल्यानंतर तो त्या पैश्याचे काय करतो हे बघत बसत नाही.

रणजित चितळे's picture

30 Aug 2010 - 1:37 pm | रणजित चितळे

तो भिकारी जर मदत घेत नसेल तर... इथे प्रश्न हाच आहे...

मानवीय दृष्टीकोनातून भारताने ही मदत देऊ केली ते बरेच झाले. आता घेणार्‍याला मदतही घेता येत नाही हे त्याचे दुर्दैव!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Aug 2010 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

मिपादस्य श्री. कुंदन ह्यांचे ह्या विषयावरील मत वाचण्यास उत्सुक आहे.

हॅ हॅ हॅ...

कुंदन's picture

30 Aug 2010 - 4:06 pm | कुंदन

पाकसारख्या हरामखोर देशाला अजिबात मदत करायला नको होती.
च्यायला , इथे लोक कष्ट करुन - घाम गाळुन कर भरतात आणि आपले नाकर्ते सरकार हा कररुपी पैसा पाकला देत आहे.

तिमा's picture

30 Aug 2010 - 3:09 pm | तिमा

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घ्यावे वा न घ्यावे
देणार्‍याने एक दिवस
घेणार्‍याचे राज्यच घ्यावे

अवलिया's picture

30 Aug 2010 - 4:09 pm | अवलिया

मदत केली. योग्य निर्णय.

मृत्युन्जय's picture

30 Aug 2010 - 4:20 pm | मृत्युन्जय

आज वृत्तपत्रात अजुन वेगळीच बातमी वाचली आता पाकिस्तान म्हणे मदत घ्यायला तयार आहे. पण मदत भारताने स्वतः न देता युनो च्या माध्यमातुन द्यावी म्हणे. केवढा हा माज. च्यायला एकतर खायला पैसा नाही तुमच्याकडे आम्ही भीक देत आहोत तर माज करताहेत साले. ते वाचुन असे वाटले की जणु पैसे देण्यासाठी भारत लाचार झाला आहे. पाकड्यांना गरजच नाही जणु.

आपण पैसे देताना पण लाचार होणार आणि ते भीक घेताना पण माज करणार. कोणी सांगितला आहे हे उरफाटा कारभार? आपण देउ केले त्यांनी माज केला आत गप बसावे ना आपण. अशी मारुन घेण्यात कसली आले आहे डिप्लोमसी?

पाकडे राजकारणी आपल्या गाढवांना आंतरराष्ट्रीय राजकारणात भारी पडत आहेत हेच खरे.

चिंतातुर जंतू's picture

30 Aug 2010 - 4:21 pm | चिंतातुर जंतू

२००४ च्या सुनामीप्रसंगी भारताने श्रीलंकेला देऊ केलेली मदत: २०० मिलिअन डॉलर्स.
संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनानुसार पाकिस्तानला आता एकूण मदतीची गरज आहे: ४५९ मिलिअन डॉलर्स.
भारताने मदत देऊ केलेली आहे: ५ मिलिअन डॉलर्स.
थोडक्यात, किरकोळ मदत देऊ करून (म्ह्णजे जवळजवळ फुकटातच) भारताने इतर देशांसमोर पाकिस्तानचा खरा चेहेरा उघड केलेला आहे. राजनैतिक पातळीवर याला भारताची चलाखीची खेळी मानता येईल.

(आकड्यांचा संदर्भ इथून घेतलेला आहे).

सुनील's picture

30 Aug 2010 - 4:26 pm | सुनील

सहमत.

मी इथेच एका वेगळ्या धाग्यात लिहिले होते की ही मदत सर्व दृष्टीने फुटकळ असून चर्चा करण्याच्या विषय नाही!

क्लिंटन's picture

30 Aug 2010 - 5:28 pm | क्लिंटन

अहो पाकिस्तानचा असा ’खरा चेहरा’ भारताने आजपर्यंत कमी वेळा उघड केला आहे का?कारगीलच्या वेळी तेच. नवाझ शरीफ तेव्हा रातोरात खऱ्या बिल क्लिंटन यांची भेट घ्यायला वॉशिंग्टनला पळाले होते. सौरभ कालिया आणि इतर ५ सैनिकांना संभाजीराजांप्रमाणे अमानुषपणे हालहाल करून मारले तेव्हा आपण प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीपुढे नेऊ अशी डरकाळी फोडून झाली. त्याचे पुढे काय झाले?आज म्हणे सरकार सौरभ कालियाच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रांना साधी पोच द्यायचे सौजन्य दाखवत नाही असे वाचले आहे. २००४ मध्ये सरकार बदलूनही त्यात काही फरक नाही. संसद हल्ला झाल्यावर काय आपण ’खरा चेहरा’ कमी उघडा पाडला होता का? पण दोन-तीन महिन्यांतच सुषमा स्वराजांना सार्क देशांच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या बैठकीसाठी इस्लामाबादलाही आपण पाठवले. पुढे मे २००२ मध्ये वाजपेयींनी कुपवाराला जाऊन "मेरा यहा आना आपनेआप मे एक प्रतिक है. इसे दुनियावाले समझे ना समझे हमारा पडौसी समझे ना समझे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" अशी डरकाळी फोडली.सध्याच्या परिस्थितीत काय आणि २००२ च्या परिस्थितीत काय पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असताना पाकिस्तानशी युध्द करू नये असेच मला वाटते. पण नुसत्या डरकाळ्या फोडून काहीही न करता आपले जगापुढे झालेच तर हसे होते ही गोष्ट मात्र पक्की.

बास झाला आता खरा चेहरा उघडा पाडायचा उद्योग.आज जगाला भारताची गरज आहे आणि त्यामानाने पाकिस्तानची गरज तितक्या प्रमाणावर नाही.याचा आपण पुरेपूर फायदा कधी घेणार?एकीकडे पाकिस्तानविरूध्द डरकाळ्या फोडायच्या पण दुसरीकडे मधूनमधून वाटाघाटींचे पिलू सोडून द्यायचे, संसदभवनाइतक्या महाभयंकर हल्ल्यातील सूत्रधाराला बिर्याणी भरवत राहायचे, अनेक दहशतवादी हल्यांमधील एकाही हरामखोराला आपण कधी फासावर लटकवले आहे आजपर्यंत? अशा प्रकारांमुळे उलट जगाला असे वाटले की "पाकिस्तान हे रोग स्टेट आहे असे मुळात भारताला वाटतच नाही मग आम्ही तरी पाकिस्तानशी संबंध का बिघडवा" तर त्यात दोष कोणाचा?

बास झाला हा उद्योग.

रणजित चितळे's picture

30 Aug 2010 - 8:19 pm | रणजित चितळे

खर आहे दोष आपलाच

आता अजून २० मिलियन डॉलर्सची मदत भारत सरकारने पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी जाहिर केली आहे. हे बघा: http://timesofindia.indiatimes.com/india/India-announces-additional-USD-... याच बातमीत म्हटले आहे की पूर्वीची ५ मिलियन डॉलरची मदत पाकिस्तान UN करवीच स्विकारणार आहे. काय त्या ह***** मदत करायची हौस आली आहे कोणास ठाऊक!

मागच्यावेळी उघडा पाडला तेवढा खरा चेहरा पुरेसा नव्हता का? ही आणखी वरची दक्षिणा कशाबद्दल दिली आहे?

पाकिस्तान मध्ये झालेल्या पुराच्या नुकसानी मुळे तो देश आजकाल भिक मागु लागला आहे. चक्क रोज्याच्या महिन्यात पाकिस्तानी नेत्यांना कटोरा घेवुन गल्लोगल्ली भिक मागावी लागते हे किती दुर्दैवी आहे. आपण त्याचे शेजारी असल्या मुळे आपण त्याना जरुर मदत केली पाहिजे. त्याना जर पैशाच्या स्वरुपात मदत हवी असेल तर आपल्या नाशिक च्या प्रेस मधुन हवी तेवढी पाकिस्तान करन्सी छापुन तिथल्या लोकांमध्ये फुकट वाटली पाहिजे.जर तिथले लोक श्रीमंत बनले तर ते आपल्या का म्हणुन परत त्रास देतील? इतके तरी सौज्यन्य भारत सरकार दाखवत नाही ह्याचे दु:ख वाटते.

मृत्युन्जय's picture

31 Aug 2010 - 12:08 pm | मृत्युन्जय

:)

पाकिस्तानला इतका पैसा देण्यापेक्षा, आपल्याच देशातल्या गोरगरिब जनतेला पैसा द्या म्हणा सरकारला..