माहिती हवी आहे..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
27 Aug 2010 - 10:14 pm
गाभा: 

राम राम,

ड्रुपलचा वापर करून मिपा, मीमराठी यांसारखी संस्थळे उभारण्याकरता आवश्यक ते तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तिंबद्दल कुणास काही माहिती असल्यास मला व्य नि ने अवश्य कळवावे.

मिपाच्या व्यवस्थापनासोबतच मिपाचा तंत्रविभाग नीलकांत पाहतो हे मला माहीत आहे. नीलकांत व्यतिरिक्त अन्य काही नावे आपल्या माहितीत असतील तर मला कृपया कळवावे ही नम्र विनंती..

धन्यवाद,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
(संस्थापक - मिसळपाव डॉट कॉम)

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

27 Aug 2010 - 10:18 pm | प्रियाली

ड्रुपलचा वापर करून मिपा, मीमराठी यांसारखी संस्थळे उभारण्याकरता आवश्यक ते तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तिंबद्दल कुणास काही माहिती असल्यास मला व्य नि ने अवश्य कळवावे.

जाहीर कळवले तर नाही का चालणार?

मिपाच्या व्यवस्थापनासोबतच मिपाचा तंत्रविभाग नीलकांत पाहतो हे मला माहीत आहे. नीलकांत व्यतिरिक्त अन्य काही नावे आपल्या माहितीत असतील तर मला कृपया कळवावे ही नम्र विनंती..

महेश वेलणकर
शशांक जोशी
चित्तरंजन भट
राजे

विसोबा खेचर's picture

27 Aug 2010 - 10:20 pm | विसोबा खेचर

जाहीर कळवले तर नाही का चालणार?

नक्कीच चालेल..

महेश वेलणकर
शशांक जोशी
चित्तरंजन भट
राजे

मनापासून आभार.. :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

27 Aug 2010 - 10:24 pm | विसोबा खेचर

एक खुलासा -

'काय तात्या, नवीन संस्थळ केव्हा काढताय?' या स्वरुपाचे काही व्य नि आले आहेत..प्रयेक व्य नि ला उतर देणे शक्य नाही म्हणून हा जाहीर खुलासा -

तूर्तास कुठलेही नवे संस्थळ काढण्याची माझी मानसिक/आर्थिक परिस्थिती नाही.. मी फक्त माहिती गोळा करत आहे..

धन्यवाद,

तात्या.

मिसळभोक्ता's picture

27 Aug 2010 - 10:32 pm | मिसळभोक्ता

तात्या,

तुझा कट किती ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2010 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>ड्रुपलचा वापर करून मिपा, मीमराठी यांसारखी संस्थळे उभारण्याकरता आवश्यक ते तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तिंबद्दल कुणास काही माहिती असल्यास मला व्य नि ने अवश्य कळवावे.

तात्या, मलाही डुपलचा वापर करुन संकेतस्थळ काढता येईल असे वाटते. गॅरंटीने होईलच असे काही नाही.
पण तो पर्यंत आमचे शिमगा संकेतस्थळ आवडले तर जरुर सांगा .! :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

28 Aug 2010 - 10:05 am | विसोबा खेचर

तात्या, मलाही डुपलचा वापर करुन संकेतस्थळ काढता येईल असे वाटते. गॅरंटीने होईलच असे काही नाही.

नक्की होईल.. प्रयन सुरू ठेवा. माझ्या मनापासून शुभेच्छा..

इतक्या मोठ्या दुनियेत ड्रुपलवर काम करणे ही काही मोजक्याच दोन-चार लोकांची मक्तेदारी नसावी..

पण तो पर्यंत आमचे शिमगा संकेतस्थळ आवडले तर जरुर सांगा .!

बिरुटेसर, शिमगा संस्थळ पाहिले.. खरोखरंच सुरेख आहे. आपण लौकरच हे स्थळ सुरू करावे अशी विनंती.. तिथे काही चांगले लेखन करण्याचा मानस आहे. आता मिपावर फक्त प्रतिसादापुरते राहायचे ठरवले आहे. येथे स्वत:चे काही लेखन करण्याची माझी लायकी नाही. मज पामराचे लेखन मिपाच्या थोर आणि उच्च संपादकीय धोरणात बसत नाही!

असो... अनेक आर्थिक अडिअडचणींमुळे माझं स्वत:चं नवीन संकेतस्थळ मला इतक्यात तरी सुरू करता येणार नाही.. तोवर आणि त्यानंतरही आपल्या शिमगावर लिहायला आणि तिथे वावरायला मला आवडेल..

(बंडखोर) तात्या.

अमोल केळकर's picture

28 Aug 2010 - 11:28 am | अमोल केळकर

आपण लवकरच नवीन संकेतस्थळ काढावे यासाठी आपणास शुभेच्छा !
अगदी खरे सांगतो. मिसळपावचे पुर्वीचेच स्वरुप जास्त चांगले होते. एक रुबाब होता. सध्याचा बदल इतर मराठी संकेतस्थळाशी मिळता जुळता ( सेम टू सेम कॉपी ) केल्यासारखा वाटतो.
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी.

अमोल केळकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2010 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>बिरुटेसर, शिमगा संस्थळ पाहिले.. खरोखरंच सुरेख आहे.

कौतुकाबद्दल धन्यु...! पण,संस्थळ चालू करण्याचा तुर्तास आणि भविष्यातही कोणताही इरादा नाही. असो, प्रेमापोटी सदस्यत्व घेणार्‍या सदस्यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच ते संस्थळ डिलीट केल्या जाईल. सध्या संस्थळ बंद केले आहे.

>>>>>मिपावर फक्त प्रतिसादापुरते राहायचे ठरवले आहे. येथे स्वत:चे काही लेखन करण्याची माझी लायकी नाही. मज पामराचे लेखन मिपाच्या थोर आणि उच्च संपादकीय धोरणात बसत नाही !

संपादकांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे, मग तो निर्णय पटणारा नसला तरी संपादकांच्या कृतीचे समर्थन करणार्‍यांना तात्यांना एखाद्या संपादकीय कृतीचा इतका राग यावा ? छ्या, हे काही पटले नाही.आणि आमच्या शिमग्याचं कौतुक केल्याबद्दल धन्यु...! पण मी काही संस्थळ वगैरे काढणार नाही.आणि तुम्हीही काही भानगडीत पडू नये असे वाटते. संकेतस्थळावर लिहिणार्‍या मराठी माणसाची संख्या ती किती ? तेव्हा कशाला मराठी संस्थळाची गर्दी वाढवायची. बंडखोर तात्याने मनात आणले तर तो संकेतस्थळही काढू शकतो हे मला माहित आहे, ते मी पाहिलेले आहे. असे असले तरी मिपा हे तुमचं दुसरं आणि मिपा हे आमचं पहिलं प्रेम आहे. तेव्हा काय लिहायचे ते आपण इथेच लिहावे ही नम्र विनंती....!

-दिलीप बिरुटे