अफजल- कसाब पेक्षाही भयावह

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
25 Aug 2010 - 9:50 pm
गाभा: 

संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधार मोहमद अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहितीच्या अधिकाराचा वापर करून पत्रकार अमन शर्मा यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे.काही प्रमुख वृत्तपत्रातून या बाबत छापून आले आहे.समस्त भारतीयांची क्रुर चेष्टा अशा भाषेत या घटनेकडे पाहावे लागेल. दिल्लीच्या राज्यपालांनी अफजल गुरु याचा दयेचा अर्ज २ महिन्यापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविला.यात अफजलची याचिका रद्द करून फाशीच द्यावी अशी शिफारस राज्यपालांनी केली.परंतू अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नाही.२००६ सालापासून अफजल गुरुची फाईल दिल्ली सरकारकडे पडून होती.ज्या अफजल गुरुच्या दयेच्या अर्जावरून राजकारण चालले आहे.जनता भडकलेली आहे.त्याची सत्यस्थिती जनतेपुढे इतकी वर्षे का आली नाही कि तशी जरूरी कोणत्याही सरकार अथवा राजकारण्यांना वाटली नाही.संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधारालाच पाठीशी घालणारे खरे सुत्रधार संसदेत, विधानभवनात तर नाहीत ना ?.अफजल गुरुची फाईलसंदर्भात गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारकडे १६ वेळा स्मरणपत्रे पाठविली.याबाबत शिला दिक्षित यांनी तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटिल यांच्या सुचनेनुसार फाईल केल्याने विलंब झाला असे उत्तर दिले.याच शिवराज पाटिलांनी वृत्तवाहीन्यांजवळ बोलतांना अफजल गुरुच्या अगोदरही अनेक अर्ज राष्ट्रपतींकडे असल्याचे सांगितले होते.त्यांना अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचलेला नाही हे माहीत नसावे का ?. अफजलनंतर कसाब ...या सर्वांपेक्षाही भयावह अशी आपली राजकीय व्यवस्था झालेली आहे. ही तुम्हा आम्हा भारतीयांची चेष्टा नाही का?

प्रतिक्रिया

अनाम's picture

25 Aug 2010 - 10:09 pm | अनाम

आता तर अस वाटतय की त्या अफजल्गुरुला उगाच पकडलय.
त्वरित सोडुन द्याव त्याला. जेणे करुन तो परत संसद भवनावर हल्ला करेल आणि तिथली घाण साफ करेल.

गांधीवादी's picture

26 Aug 2010 - 8:15 am | गांधीवादी

+१००१ टक्के शयमत
पण तो संसदेवरच हल्ला करेल ह्या बोलीवरच सोडला पाहिजे. नाहीतर करायचा लफडा इथे येऊन पुण्या मुंबईत.

अहिओ, फायील पोचली तरी आपल्या पाटील बाईंना वेळ तर मिळाला पाहिजे ना.
त्या सत्कार समारंभात इतक्या व्यस्त असतात कि काय सांगू,
ते आणि त्याचे सत्कार समारंभात, त्यांची माहेरची पुरण पोळी, त्यांचा विमान प्रवास एवढाच त्यांचा इतिहास आहे.
http://www.esakal.com/esakal/20100825/5028390788599414365.htm

हुप्प्या's picture

26 Aug 2010 - 7:40 am | हुप्प्या

जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे, राष्ट्रकुल स्पर्धा तोंडावर आली आहे. हे सगळे असताना कुठल्याशा किरकोळ अतिरेक्याच्या फाशीच्या मुद्द्याचे भांडवल केले जाता कामा नये.
भावनेला हात घालायचे हे प्रकार थांबलेच पाहिजेत. दिल्ली सरकार काय आणि केंद्र सरकार काय. महागाईच्या प्रश्नामुळे कामात इतके गढलेले आहे की असल्या फालतू गोष्टींकरता वेळ घालवायची त्यांची इच्छा नाही.
कुठलाही जागरूक नागरिक अशा दिशाभूलीला विरोधच करील.

गांधीवादी's picture

26 Aug 2010 - 8:13 am | गांधीवादी

>> किरकोळ अतिरेक्याच्या फाशीच्या
हे हे हे हे हसून हसून मेलो ..............
वरील वाक्यावरून काढलेले निष्कर्ष
१) अतिरेकी हे किरकोळ सुद्धा असू असतात
२) अफजल- कसाब हे किरकोळ अतिरेकी आहेत.
३) जे अतिरेकी संसदेवर हमला करतात ते किरकोळ असतात
४) जे मुंबई मध्ये येऊन २०० लोक मारतात ते किरकोळ असतात
५) भारतात लोकांचा जीव किरकोळ आहे.
६) किरकोळ लोकांच्या जिवापेक्षा खेळ जास्त महत्वाचा आहे.
६) जिवापेक्षा खेळला जास्त महत्व देणारी माणसे भारतात आहेत.
७) जो जीवाला महत्व न देता खेळला जास्त महत्व देतो तो जागरूक नागरिक
८) केंद्र सरकार महागाई च्या प्रश्नांत गढले आहे.
अगयायाया किती निष्कर्ष, ढीगभर

जरा हे वाचा
हे मी नाही बोलत आहे
बोलतायेत खुद्द विप्रो चे अध्यक्ष अझीम प्रेमजी
Rs 28,000cr Games expense sounds like wrong priority: Premji

कापूसकोन्ड्या's picture

26 Aug 2010 - 12:40 pm | कापूसकोन्ड्या

सर्व निष्कर्श चुकिचे आहेत.
तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही.
संसदेवर हल्ला झाला तेंव्हा इतर अतीरेकी मारले गेले. त्यांच्या जीवाची किंमत काहीच नाही का?
खरं म्हणजे ते एक अत्यंत महत्वाचे काम करत होते. त्यांना जर यश मिळाले असते तर कित्येक खासदारांचा खातमा झाला असता ना? ते ( खासदारांचा खेळ खल्लास करण्याचे) काम ही एक महान देशभक्ती च नाही का ?

राहीला भाग ज्या जवानांनी आपल्या जीवांची बाजी लावून संसद वाचविण्याचा प्रयोग केला, त्यांच्या जीवाची किंमत ती काय? ते पोटार्थी सैनिक. मुर्ख कुठले.
हे अतिरेकी किरकोळच आहेत. लोकसभेचा एक सुध्दा खासदार मरत नाही म्हणजे काय?
तात्पर्य काय की तुम्हा आम्हा आम आदमी ला इथे जगायचे वांधे आहेत तिथे या अतिरेक्यां चा विचार कोण करणार?
राज्यकर्ते खुप कामात आहेत. त्यांना असल्या फालतू गोष्टीत वेळ घालवायला कसे परवडेल?

गांधीवादी's picture

26 Aug 2010 - 12:58 pm | गांधीवादी

माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा,

सूर कि नदिया .....
.........................
.........................
.........................

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Aug 2010 - 2:56 pm | llपुण्याचे पेशवेll

तोमार शूर ......

एके४७/५६ ने निशाना कसा साधता येईल ह्याचे शिक्षण घ्यावे. व फाशी साठी वेंटीग लिस्ट मध्ये असणार्‍या सर्वाना एकत्र बोलवुन आपल्या नेमबाजीचे प्रॅक्टीस करावे.म्हणजे खुप लोकाना राष्ट्रपती काहीतरी काम करतात ह्याचे समाधान मिळेल.

बेभान's picture

26 Aug 2010 - 4:36 pm | बेभान

अफजल गुरूचे 'रंग दे बसंती' कशावरून झाले नसेल. कदाचीत काही भारतीय तरूण या राज्यकर्त्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून प्रशिक्षण न घेता या तथाकथित लोकशाहीच्या मंदीरालाच त्यांनी 'सीधा निशाना' बनविले असेल काही घाण साफ करावी, जीवन सार्थकी लावावे, असा त्यांचा मनसुबा असावा. जेव्हा पकडले तेंव्हा यांना अतिरेकी म्हणून घोषित केले असावे. आणि तथाकथित 'अफजल' 'गुरू' हे नांव जरा 'मुहंम्मद' 'जोशी' सारखे नाही वाटत? नाहीतरी ख-या अतिरेकी राजकारण्यांना मारतील एवढे ते 'शेखचिल्ली' नाहीत.
अवांतर: त्यातून ही बातमी हातात लागली. सरळ आहे जिथे पैसा तिथे साहेब. अरे इथल्या समस्यांच काय..? साहेबांच चप्पलफेकीपासून संरक्षण हो.

श्रीकृष्णानं अधर्म, पापाचा नाश करण्यासाठी पुन्हा अवतार घेण्याचं वचन काय दिलं. या राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना त्याची घाई झालेली दिसते.

कार्लोस's picture

26 Aug 2010 - 11:48 pm | कार्लोस

जरा स्वता कक्रूउरु श्कत अ तर करा

शेखर काळे's picture

27 Aug 2010 - 4:16 am | शेखर काळे

अफझल ला फाशी होईलच !
त्यात आपल्या निरनिराळ्या कल्पना लढवून स्वतःच्या मनाला आणि इतरांच्या मनाला त्रास नको ...

गांधीवादी's picture

19 Sep 2010 - 3:48 pm | गांधीवादी

कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत आपला हक्क बजावीत आहे.
कसाब उच्च न्यायालयात दाद मागणार

सुधीर काळे's picture

20 Sep 2010 - 4:53 pm | सुधीर काळे

सध्याचे सरकार आणखी एक 'कंदाहार' होण्याची वाट तर नाहीं ना पहात आहे? देव करो आणि असे न होवो! उगीच प्रवाशांचा जीव कशाला धोक्यात घालायचा?
सरकारच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा आधीचा चुकीचा निर्णय 'उदाहरण' म्हणून आहेच!

गांधीवादी's picture

18 Oct 2010 - 12:58 pm | गांधीवादी

Mumbai attacks: Kasab gets the death penalty

"In the court's opinion, Kasab has no chance to reform. Keeping such a terrorist alive will be a lingering danger to the society and the Indian government,"
The judge cited the example of the Kandahar hijack case in which arrested terrorists were swapped for the passengers held hostage. "If Kasab is kept alive, this situation may occur again," he said.

आणि हाच तो महान कायदा.
As per the law, the death penalty will have to be confirmed by the Bombay High Court. Kasab also has the right to move the high court against the trial court verdict. Even if the high court upholds the judgment, he can appeal to the Supreme Court. If the apex court too upholds the sentence, he has the option of filing a mercy petition before the President of India.

म्हणजे अजून २०/२५ वर्षे. हा धागा जिवंत राहणार.

आप्पा's picture

20 Sep 2010 - 5:31 pm | आप्पा

या धर्मनिरपेक्ष देशात अफजल, कसाब याना माफ करा. त्यांचे भरपुर लाड करा. त्यांच्यावर भरपुर खर्च करा.

गांधीवादी's picture

20 Sep 2010 - 7:24 pm | गांधीवादी

सारखे सारखे भरपूर खर्च काय म्हणता राव , ३१ कोटी काय लयी झाले व्हय ?
कसाब आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.
http://epaper.esakal.com/esakal/20091126/4706004645059903440.htm
http://72.78.249.126/esakal/20100507/4927382730813949100.htm

कारागृहरक्षकावर कसाबकडून हल्ला

यावर माननीय वाचकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया :
On 29/09/2010 12:16 AM शिरीष said:
लोकशाही चा अतिरेक चाललाय इथे. सरकारला शहाबुद्दीन प्रकरणात तातडीने घटना दुरुस्ती आणि कायद्यात बदल करता येतो मग या राष्ट्रीय प्रश्नावर कायदा करून न थांबता (NON STOP) खटल्याची सुनावणी करणे का अशक्य आहे? सुनावणी करून ताबडतोब फाशी देवून टाकायला हवीय. शिवाय पुन्हा राष्ट्रपतींना दयेचा अर्ज वाचायला दहा-पाच वर्षे लागणारच ! त्यातून पुन्हा एखादे विमान किंवा जहाज ओलीस ठेवून कासाबची सुटका होणारच नाही याचा काय भरवसा? अत्यंत अकार्यक्षम सरकार आहे.


On 28/09/2010 08:23 PM Vinod said:
मी सरकारला दिलेल्या पैशातून (Tax etc ) इथून पुढे एक पै देखील त्या कसाब वर खर्च करायची नाही. माझ्या कष्टाच्या प्रत्येक पै चा वापर देश्साठीच व्हायला पाहिजे सर्व देशवासीयांनी एकत्र येउन कसाब वर पैसे कारचा करण्यापासून सरकारला रोखले पाहिजे.. माझ्या देशात खूप लोक गरीब आहेत... त्याचावर तो पैसा खर्च वाहयला पाहिजे......

On 28/09/2010 06:29 PM SHIVRAM VAIDYA said:
आता कसाबचे काँग्रेसी सासरे त्याची कारागृहात काही आबाळ झाली काय याची सी बी आय (काँग्रेस ब्युरो ऑफ इन्वेसटीगेशन) या मार्फत चौकशी करून त्याला पंचतारांकित सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आकाशपाताळ एक करतील. सासरे बुवा, खर्चाची शिणता करू नका, आम्ही करदाते कर कशाला झक मारायला भारत आहोत काय? असल्या अतिरेक्याना पोसण्यासाठीच तर!!!

On 28/09/2010 05:06 PM mayursawant said:
कसाब आणि अफझल गुरु हे सरकारचे आमरण पाहुणे आहेत! त्यांची अशीच बडदास्त ठेवली जाईल! हे सामान्य माणसा तू फक्त सहन कर! -- भारतमाता की जय!


On 28/09/2010 03:45 PM anand said:
अरे कशाला या कासाबला जिवंत ठेवता ? त्याला अटक करण्यापुर्वीही त्याने भारतीयांना मारले व अटक झ्हाल्यानातरही पोलिसांना मारतो आहे !!! हीच का आपली वीरता आहे ? एका फालतू गुन्हेगाराला 'अतिथी देवो भाव' सारखी त्रेअत्मेनेत दिल्याचे हे परिणाम आहेत. आता कसबच खेळ पुरे करा. खूप झले आता

पोलिसांकडे हत्यारे नसल्यानेच कसाब जिवंत.

पोलिस निरीक्षक आणि त्यापुढील अधिकाऱ्यांकडे हत्यारे असतात, अन्य कर्मचाऱ्यांना लाठी दिलेली असते, असे निकम यांनी सांगितले. हल्ल्यानंतर यामध्ये काही सुधारणा केली का, या न्यायालयाच्या प्रश्‍नावर, आता पोलिसांना लाकडी लाठीऐवजी प्लॅस्टिकची काठी दिली जाते, असे निकम म्हणाले. यावर, प्लॅस्टिकपेक्षा लाकडी लाठी चांगली होती, अशी प्रतिक्रिया न्यायालयाने व्यक्त केली.

गांधीवादी's picture

23 Oct 2010 - 10:23 am | गांधीवादी

माननीय कसाब साहेबांना भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.

पुढील कारवाई साठी ते आंतरराष्ट्रीय न्यायालय इथे जाऊ इच्छितात.

त्यांच्या पुढील (न्यायालीन)लढाई साठी त्यांना शुभेच्छा.

मेरा भारत महान.