काही पैठिलीय शंका

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
15 Aug 2010 - 7:05 pm
गाभा: 

रावणी पिठल्यापासून सुरुवात होऊन आता मिपावर पिठल्याच्या पाकृंची रांग लागलेली दिसते. एवढ्या पिठल्याएक्स्पर्टांची मांदियाळी जमल्यावर, माझ्या काही बाळबोध शंकांची उत्तरे मिळणे कठिण जाऊ नये.

१) पिठले आणि झुणका यांतील सीमारेषा नक्की कोणती?

२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
ब) पीठाच्या गुठळ्या होत नाहीत?

३) चण्याच्या डाळीचे पीठ हे आरोग्यास चांगले नाही हे ठाऊक असूनही केवळ बेसन हाच मुख्य घटक (इन्ग्रेडियन्ट)असलेला हा पदार्थ लोक का खातात?

अवांतर - मला स्वतःला सिमला मिरचीची बारीक तुकडे, पातीचा कांदा (पातीसहीत) आणि टोमॅटो घातलेला झुणका फार्फार आवडतो!

प्रतिक्रिया

बरखा's picture

15 Aug 2010 - 7:23 pm | बरखा

तुमच्या काही प्रशना॑ची उत्तरे मी माझ्या "आधनाचे पिठ्ले "या पाकक्रुतित देण्याचा प्रयत्न केला आहे.तेल वत तुप घतल्याने ते बादत नाही.

सुनील's picture

15 Aug 2010 - 8:51 pm | सुनील

धन्यवाद!

पंगा's picture

15 Aug 2010 - 7:33 pm | पंगा

१) पिठले आणि झुणका यांतील सीमारेषा नक्की कोणती?

भारत आणि महाराष्ट्र यांमध्ये जी सीमारेषा आहे, तीच.

२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
ब) पीठाच्या गुठळ्या होत नाहीत?

पास.

३) चण्याच्या डाळीचे पीठ हे आरोग्यास चांगले नाही हे ठाऊक असूनही केवळ बेसन हाच मुख्य घटक (इन्ग्रेडियन्ट)असलेला हा पदार्थ लोक का खातात?

खावेसे वाटते म्हणून.

('आरोग्यास चांगले नाही' हे फारच सामान्य विधान झाले. काही तपशील?)

सुनील's picture

15 Aug 2010 - 8:59 pm | सुनील

भारत आणि महाराष्ट्र यांमध्ये जी सीमारेषा आहे, तीच.
म्हणजे पिठल्यात झुणक्याचा समावेश होतो पण झुणका म्हणजे पिठले नव्हे. असे की याउलट? आणि का?

पासखावेसे वाटते म्हणून.
ठीक ठीक.

('आरोग्यास चांगले नाही' हे फारच सामान्य विधान झाले. काही तपशील?)

तूर्तास तरी, "असे म्हटले जाते" यापलीकडे (माझ्या आरोग्यविषयक अज्ञानामुळे) तपशील देता येत नाही. त्यामुळे, ते जर आरोग्यास अपायकारक नसेल तर, त्यात असे कोणते घटक आहेत जे आरोग्यवर्धन करतात, हे कळले तरी पुष्कळ!

पंगा's picture

15 Aug 2010 - 9:18 pm | पंगा

म्हणजे पिठल्यात झुणक्याचा समावेश होतो पण झुणका म्हणजे पिठले नव्हे. असे की याउलट?

म्हणजे, झुणका हा पिठल्याचा एक उपप्रकार आहे, अशा अर्थाने.

पिठल्याचे इतर काही प्रकार (माझ्या माहितीप्रमाणे) म्हणजे पातळ पिठले आणि गोळ्यांचे पिठले.

त्यामुळे, ते जर आरोग्यास अपायकारक नसेल तर, त्यात असे कोणते घटक आहेत जे आरोग्यवर्धन करतात, हे कळले तरी पुष्कळ!

कल्पना नाही. पण आरोग्यास अपायकारक नसलेली वस्तू ही आरोग्यवर्धक असलीच पाहिजे, असेही नसावे असे वाटते.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Aug 2010 - 7:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

१) पिठले आणि झुणका यांतील सीमारेषा नक्की कोणती?
उ. जर्रासा घट्ट आणि मस्त तेल सुटेपर्यंत कढईत परतुन परतुन गोळ्यावर (गोळ्यासारखे texture) जातो तो झुणका.
पातळसर पण फार पातळ (माझी आजी याला 'डोह पातळ" असे म्हणते) पण नाही.पण जे पोळी/भाकरी/चपाती किंवा गरम
गरम भातासोबतही खाता येते ते "पिठले"

२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
उ. मसालेदार आणि खळखळुन उकळलेल्या पाण्याला जर पीठ भुरभुरुन लावले तर ते जास्त चविष्ट होते.*
* पाण्याची उकळी + पिठ भुरभुरवायची पद्धत + नंतर झाकण ठेऊन दिलेली 'दण्दणित' वाफ = sucsessfull आधणाचे पिठले.
पिठात पाणी घालणे : पाण्यात पिठ कालवून घालणे .(ओतलेले पिठले). यामध्ये logically होतं काय्...तर आपण कढई मस्त तापवून्,चर्चरीत फोडणी करतो. आणि पिठात साधे पाणी घालून कालवतो.यामध्ये गुठळ्या तर होत नाहीत पण फोडणी + कढई चे tempreture हुकते. आणि कढई सकट सगळे परत गरम व्हायची वाट पहावी लागते.आणि चव जाते.
त्यामुळे मला तरी personally वरून पिठ लावलेले आधणाचे पिठलेच आवडते.

आधणाच्या पिठल्यात गुठळ्या जरी झाल्या तरी मस्त दणदणित वाफा काढल्या तर त्या मस्त आतपर्यंत शिजुन छान विरघळतात.

तब्येतीला चांगले नाही असे तरी म्हणता येणार नाही (आणि जरी असेल तर तरी तमान बेसन प्रेमी जमात हे मान्य करणार नाही).कारण चणा डाळ्/बेसन वापरून केलेले तमाम पदार्थ चवीला उत्तम च लागतात. उदा. पुपो (पुरणपोळी, चरचरीत कांदा भजी, बेसन लाडू,ढोकळा, फाफडा, फरसाण,सोन हलवा,मोहनथाळ इ.इ.इ..)

सुनील's picture

15 Aug 2010 - 9:49 pm | सुनील

धन्यवाद. पण मला वाटते, खरपूर भाजलेल्या बेसनात उकळलेले पाणी घातले तर, फोडणी + कढईचे तापमान हुकणार नाही. (मी स्वतः असेच करतो!)

मधुशाला's picture

19 Aug 2010 - 2:31 am | मधुशाला

वाक्यावाक्याशी सहमत.
पिठलं + भाकरी + खरडा + सायीचे दही = स्वर्ग
(फक्त पाण्यात कालवून केलेल्या पिठल्याला आम्ही "पोटीस" म्हणतो :) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Aug 2010 - 9:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चणा डाळ (पक्षी बेसन) पचण्यास थोडे जड असते, कदाचित वाताचा त्रास होऊ शकतो आणि बहुदा चण्यातून जास्त कॅलरीज मिळतात.
उलटपक्षी चणाडाळीतही इतर डाळींप्रमाणे प्रोटीन्स आणि व्हीटॅमिन्स बी आणि सी असतात.

पण बेसनात (किंवा चण्यात) तेल्/तूप घालणे म्हणजे आमच्यासारख्या बैठ्या नोकर्‍या करणार्‍यांना आणखीनच "औषध".

मला पिठलं फारसं आवडत नाही आणि झुणक्यातला कांदा, त्याची कन्सिस्टंसी पाहूनच खाण्याची इच्छा मरते; पण कुळथाचं पिठलं बेसनाच्या पिठल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असावं.

२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
ब) पीठाच्या गुठळ्या होत नाहीत?

अ. ज्या प्रकारे पदार्थ कमी कष्टांत आणि वेळात शिजतो त्या पद्धतीचं पिठलं मला चवीला चांगलं लागतं.
ब. पदार्थ शिजल्यावर गुठळ्या असल्या काय नसल्या काय मला काही फरक पडत नाही.

पूर्वी बाहेर खाण्यापिण्याची जास्त सोय नव्हती आणि पूर्वीचे सगळेच (आणि अलिकडचे बरेचसे) पुरूष स्वयंपाक करणं निषिद्ध समजत असल्याने* आजारपणात, दिवसभर काम करून दमून गेल्यावर रात्रीच्या जेवणासाठी पिठलं-भाकरी हा मेन्यू बायकांसाठी जास्त सोयीचा असतो.

*ठिणगी पडल्यास दिनेशदादा खाद्यजीवनाचा पुढचा भाग टाकेल म्हणून हा प्रयत्न! ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2010 - 9:13 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय. तेवढीच ज्ञानात भर.

१) पिठले आणि झुणका यांतील सीमारेषा नक्की कोणती?

पातळसर असते ते पिठले.
घट्टसर असतो तो झुणका!

२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
पीठ भुरभुरवण्याच्या पद्धतीचे पिठले हे चविष्ट होते, त्याला टेक्श्चर असते. ताकातले बीनगुठळ्यांचे पिठलेही चविष्ट असते.
ब) पीठाच्या गुठळ्या होत नाहीत?
अतोनात गुठळ्या चांगल्या नव्हेतच पण एका हातात डाव घेउन घोटत रहावे व दुसर्‍या हाताने पीठ घालत रहावे अश्याने कमी व छोट्या गुठळ्या तयार होतात त्या शिजतात. पिठल्यात रवी घालून थोडे घुसळल्यासारखे केल्यास पिठले चांगले बनते.

३) चण्याच्या डाळीचे पीठ हे आरोग्यास चांगले नाही हे ठाऊक असूनही केवळ बेसन हाच मुख्य घटक (इन्ग्रेडियन्ट)असलेला हा पदार्थ लोक का खातात?
चण्याचे पीठ हे योग्य प्रमाणात वापरल्यास ते प्रथिनयुक्त असते म्हणून चांगले असते. पिठले करताना ते उकळी आल्यावर निदान पाचेक मिनिटे मंद आचेवर पाण्याचा हबका देवून शिजवले तर चण्याचे होणारे त्रास टळतात. शेवटी कोणत्याही पदार्थाचे प्रमाण आहारात किती असावे हे ठरलेले आहे. तो नियम आजकाल सर्रास वाकवण्यात येतो त्याचा नंतर त्रास होवू शकतो. ज्यांना चौरस आहार घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही त्यांची प्रथिनांची गरज कमी पैश्यात पूर्ण व्हावी म्हणून सरकारने झुणकाभाकर योजना सुरु केली होती असे वाटते.

संजय अभ्यंकर's picture

15 Aug 2010 - 10:23 pm | संजय अभ्यंकर

लॉजिकल प्रतिक्रिया!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

16 Aug 2010 - 12:28 am | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त ग रेवती ताई!

सुनील's picture

16 Aug 2010 - 8:01 am | सुनील

धन्यवाद!

तरीही, खमंग भाजलेल्या पीठात, (मीठ घातलेले) उकळ्ते पाणी घातले की पदार्थ खमंगही होतो आणि गुठळ्यादेखिल होत नाहीत, हा स्वानुभव!

बाकी सरकारने सुरू केलेल्या झुणका-भाकर योजनेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच! ती बहुसंख्य लोकांच्या प्रथिनांची कमतरता दूर व्हावी म्हणून होती की काही मंडळींच्या म-जीवनसत्वाची कमतरता दूर व्हावी म्हणून होती, हा वादाचा विषय!

पंगा's picture

16 Aug 2010 - 9:11 pm | पंगा

बाकी सरकारने सुरू केलेल्या झुणका-भाकर योजनेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच! ती बहुसंख्य लोकांच्या प्रथिनांची कमतरता दूर व्हावी म्हणून होती की काही मंडळींच्या म-जीवनसत्वाची कमतरता दूर व्हावी म्हणून होती, हा वादाचा विषय!

याचाच अर्थ, पिठले कोणाच्या ना कोणाच्या प्रकृतीला चांगलेच!

पुष्करिणी's picture

15 Aug 2010 - 11:09 pm | पुष्करिणी

बेसन अजिबातच खायचं नसेल तर बेसनाऐवजी मसूराच पिठ वापरा.

देवदत्त's picture

16 Aug 2010 - 3:07 am | देवदत्त

मूग डाळीचे पिठ ही चवीला चांगले लागते.

मदनबाण's picture

16 Aug 2010 - 8:22 am | मदनबाण

वा...छान माहिती मिळाली. :)

तिमा's picture

16 Aug 2010 - 7:45 pm | तिमा

अँकर ढवळ्या (स्टरर) लावला तर गुठळ्या होणार नाहीत.

पैसा's picture

18 Aug 2010 - 11:43 pm | पैसा

माझ्या सासूबाई कुळथाचेही घट्ट पिठले करतात. कुळथाच्या पातळ पिठल्याला माझा नवरा तोंड लावायला तयार नसतो.

विसोबा खेचर's picture

21 Aug 2010 - 10:39 am | विसोबा खेचर

अवांतर - मला स्वतःला सिमला मिरचीची बारीक तुकडे, पातीचा कांदा (पातीसहीत) आणि टोमॅटो घातलेला झुणका फार्फार आवडतो!

पूर्ण सहमती..! :)