एक निर्णय्...मदत न करण्याचा. माझा निर्णय चुकीचा आहे कि बरोबर?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in काथ्याकूट
4 Aug 2010 - 2:07 am
गाभा: 

एक निर्णय... मदत न करण्याचा.
...परवाचीच गोष्ट आहे. माझ्या शेजारी एक पाकिस्तानी कुटुंब राहते.अगदी well established...नवरा,बायको आणि तीन मुलं.रोजच्या बोलण्या- भेटण्यातून तिच्याशी छान मैत्री झालेली आहे. तिचं नाव लाईमा आहे. वयाने माझ्या एवढीच आणि अतिशय सुंदर! तिच्या सारखीच तिची मुलंही देखणी. एक मुलगी आणि दोन मुलं. ती सारी फलटण माझ्याकडे खेळायला,अभ्यासाला येते.अगदी रोज येते. लाईमा सुद्धा खूप प्रेमळ आहे.अतिशय हसरी,बोलकी आहे.तिच्या नवऱ्याला काही मी पाहिलेले नाही.कारण ती माझ्याकडे तो office ला गेल्यावरच येते. आमचे जे काही बोलणे-भेटणे होते ते तो गेल्यावरच. अर्थात माझ्या घरी जर माझा नवरा असेल तर ती फिरकतही नाही.मला आठवत सुरुवातीला एकदा ती आली होती.बेल दाबल्यावर माझ्या नवऱ्याने दार उघडले.तर अक्षरश: भूत बघितल्यासारखा तिचा चेहरा झाला..शॉक बसावा तशी ती गर्रकन वळली आणि शब्दश: पळत घरी गेली.म्हणजे परपुरुषा समोर जाण्या बद्दलची तिच्या मनातली धास्ती एवढे जबरदस्त होती ना.! तिच्यात आणि तिच्या नवऱ्या मध्ये १०-१२ वर्षांचे अंतर आहे. कुठे बाहेर जाण्याची परवानगी नाही. बिल्डींग मधल्या स्त्री वर्गाशी बोलण्याची मुभा तेवढी होती तिला.ते ही त्यांच्या घरातील पुरुष वर्गाच्या अनुपस्थितीतच हे वेगळे सांगायची गरज नाही. जे काही सामान हवे असेल ते home delivery ने मागवयचे.जमेल तितक्या दारा आडूनच ते घ्यायचे आणि त्याचे पैसे द्यायचे. तीन मुलांचे खाणे पिणे सांभाळता आणि घरकामा मध्ये तिचा दिवस निघून जातो.आणि या सगळ्याची इतकी सवय झाली आहे ना तिला कि तेच तिचे सारे आयुष्य आहे. सवय म्हणण्यापेक्षा संस्कृतीचा प्रभाव आणि त्याबद्दलची स्वीकृती इतकी रुजलेली आहे ना कि कशाही बद्दल तक्रार मनात येऊ द्यायचा विचारही तिनी केला नसेल. असो सांगायचा मुद्दा हा कि ती माझी छान मैत्रीण आहे.
परवा तिनी दुपारनंतर मुलीकडून निरोप पाठवला ती चिमणी आली सांगत सांगत "आंटी मेरी मम्मी आपको बुला राही हैं"
मी ५-६ मिनिटात गेले. कधी नव्हत ते ती प्रचंड टेन्शन मध्ये होती. मी तिला विचारले काय झाले. म्हणाले 'मुझे समझमे नाही आता मै आपसे कैसे कहू,आपसे हेल्प चाहिये थी| " मी म्हटले 'आप बोलो मै क्या कर सकती हु|
तीच्या डोळ्तातले पाणी आत्तापर्यंत वाहायला लागले होते. शेवटी कसेबसे हुंदके आवारात तिने बोलायला सुरुवात केली 'मुझे मेरे भाईजान को पैसे भेजने थे| उसको बडी जरुरत हैं..मुझे तो घर से निकलने के इजाजत नाही हैं.आप वेस्टर्न युनिअन से भेज सकते हो मेरे लिये?'आणि तिने पर्स उघडून काही पैसे काढून समोर ठेवले. लेकीन मेरे हजबंड को पता नाही चालना चाहिये.
माझ्या मनात आले हात तिच्या मारी ! एवढच होय? करून टाकू या ना तिचे काम. नाहीतरी तिच्या नवऱ्याला मी पाहिलेही नव्हते त्यामुळे त्याला मी सांगण्याचा संबंध च नवता. एक्स्चेंज ही चालत जाण्या इतक्या अंतरावर होता. आणि मी तिला तसे बोलूनही गेले कि मी पाठवते पैसे म्हणून. ज्याना पाठवायचे आहे त्यांचे नाव लिहून दे मी पाठवते.
मी तयार होऊन येते आणि जाताना पैसे आणि नाव वगैरे डीटेल्स घेऊन जाते.
मी तिच्या दारातून बाहेर पडले आणि माझ्या घरात शिरता शिरता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हिच्या भावाला पैसे पाठवायचे म्हणजे पाकिस्तान ला पाठवायचे. अरे बाप रे....मग माझ्या मनात इतके असंख्य विचार येऊ लागले ना. कि कशावरून हिचा भाऊ ही हिच्या इतकाच विश्वासार्ह असेल.मी लाईमाला ओळखते. तिचा भाऊ कसा आहे,कोण आहे आपल्याला काहीही माहिती नाही.आपण आपले documents देऊन हे पैसे पाठवणार. उद्या जर काहे वेगळे प्रकरण निघाले तर? तो भाऊ जर काही वेगळ्या गोष्टींमध्ये involved असेल तर? आणि मी कशात तरी अडकले तर?...नाही नाही ते विचारांनी डोक्यात थैमान घातले.एकीकडे तिची आगतिकता मला पाहवत नव्हती.वाटत होत कदाचित असे काही नसेल ही.काहीही होणार नाही. पण एक मन मात्र तयार होत नव्हते.
शेवटी मी निर्णय घेतला तो तिला मदत न करण्याचा.
आधी हो म्हणून बसले होते. पण मनाशी ठरवले कि जाऊन तिच्याशी स्पष्ट बोलायचे. मी तिला पटेल अशा कारणांची मनाशी जुळवा जुळव करायला सुरुवात केली.त्यातले एक final केल.तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलले आणि सांगितले कि आम्हाला कंपनी तर्फे पैसे पाठवावे लागतात आणि तिथून असे पैसे पाठवायला परवानगी नाहीये. तिला बिचारीला ते कारण पटलेही. तिच्या डोळ्यात परत तीच अगतिकता दाटली.पण वरकरणी हसून मला म्हणाली 'चलो ठीक हैं,कोई मुश्कील नाही.मै और कुछ रास्ता निकाल लुंगी|" छान कॉफी बनवली माझ्यासाठी .त्या कॉफीची चव मला मात्र नेहमी पेक्षा खूप वेगळी लागली. मन अतिशय अस्वस्थ,उद्विग्न झाल होत....आत्ताही आहे.ती दुसर्‍या दिवशी पासुन अगदी नेहमीप्रमाणे वागु लागली.पण माझ्या मनातला अपराधी पणा कमी होत नाहीये.
मी केल ते बरोबर केल कि चुकीच? तिला मदत करता येण्यासारखी होती,पण मी नाही केली. आपण खूप स्वार्थी आहोत का?
कि मी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला.स्वत:ला आणि माझ्या कुटुंबाला नको त्या प्रकरणाला कधीही सामोर जाव लागू नये याच हेतूने मी तो घेतला.
तुम्हाला काय वाटत? तुम्ही अशा situation मध्ये काय निर्णय घेतला असता?

प्रतिक्रिया

अहो तिचा नवरा घरात नसताना तिलाच घेउन जयचत ना.
घरा जवळच एक्सचेंज आहे म्हणालात ना. या कामाला फार फार तर १५-२० मिनिटं पुरेशी होतात.
बाकी तुम्ही स्वत: पैसे नाही पाठवलेत ते बरच केलत.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 2:29 am | जाई अस्सल कोल्हापुरी

तिला बाहेर पडायचीच इजाजत नाहिये...त्यामुळे ती नसती आली. आणि यात practical problem म्हणजे तिची बच्चे कंपनी.
असुन पंचाईत आणि नसुन खोळंबा त्यातला प्रकार. म्हणजे त्यांना घेउन जावं तर प्रोब्लेम कि त्यातल एक तरी बोलणार आणि नाही घेउन जायचं तर ठेवणार कुठे? तिची एकटी जायची तयारी असती तर मी मुलांना माझ्याकडे ठेवून घेतले अस्ते.पण तिला तिथे जाउनही काही सुधरणारच नाही.अरे घराबाहेर नाही पडलेली आहे यार ती! आणि तिची दोन्ही पोरं जाम बड्बडी आहेत्.(तरी अजुन तिसर्‍याची वर्ड फाइल अजुन अ‍ॅक्टिव्हेट झाली नाहिये.) त्यामुळे हे सूम मध्ये झालंच नसतं.

सुनील's picture

4 Aug 2010 - 2:20 am | सुनील

किती रक्कम होती?

रक्कम फार मोठी नसेल (संबंधित सरकारी खात्यांच्या नजरेत भरण्याइतपत) आणि जर ती वेस्टर्न युनियन (अथवा कोणत्याही अधिकृत माध्यमातून) पाठवायची असेल, तर फारसा धोका नाही, असे वाटते.

अप्रिय पण योग्य आणि सावधतेने घेतलेला निर्णय.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 2:26 am | जाई अस्सल कोल्हापुरी

तिला बाहेर पडायचीच इजाजत नाहिये...त्यामुळे ती नसती आली. आणि यात practical problem म्हणजे तिची बच्चे कंपनी.
असुन पंचाईत आणि नसुन खोळंबा त्यातला प्रकार. म्हणजे त्यांना घेउन जावं तर प्रोब्लेम कि त्यातल एक तरी बोलणार आणि नाही घेउन जायचं तर ठेवणार कुठे? तिची एकटी जायची तयारी असती तर मी मुलांना माझ्याकडे ठेवून घेतले अस्ते.पण तिला तिथे जाउनही काही सुधरणारच नाही.अरे घराबाहेर नाही पडलेली आहे यार ती! आणि तिची दोन्ही पोरं जाम बड्बडी आहेत्.(तरी अजुन तिसर्‍याची वर्ड फाइल अजुन अ‍ॅक्टिव्हेट झाली नाहिये.) त्यामुळे हे सूम मध्ये झालंच नसतं.

मी नसती मदत केली.
नुसतच असं इथं लिहायचं म्हणून लिहित नाहिये तर आधी एकीला नाही असे सांगून झाले आहे.
माझ्या मुलाच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत बर्थडे गर्लच्या आजी आजोबांची ओळख करून देण्यात आली.
बरेचदा आजीआजोबा नातवंडांचे वाढदिवस बघायला मिळतील अश्याप्रकारे अमेरिकावारी करतात आणि त्यात काही वावगे नव्हते. या प्रसंगानंतर साधारण पंधरा दिवसांनी या छोट्या मुलीच्या आईने मदतीसाठी फोन केला. आजीचे पैसे वेस्टर्न युनियनकडून गुजराथेत कुठेतरी पाठवायचेत तर राइड मिळेल का? नंतर तिथे गेल्यावर हिने माझ्यानावाने पैसे पाठवण्याबद्दल विनंती केली. मी आश्चर्यचकित! माझे काम फक्त ड्रायव्हरचे आहे अश्या भ्रमात होते तोपर्यंत. खोदून चौकशी केल्यावर कळलेला प्रकार असा कि आजीबाईंच्या मुलाला (राहणार न्युजर्सी) हापिसात प्रमोशन मिळावे म्हणून त्यांनी घरातल्या पुरुषांच्या नकळत गुजराथेत एक रेकी देणारा बुवा पकडला होता. त्याला पैसे पाठवायचे होते. मला अतिशय राग आला. एवढेच नाही तर टिव्हीवर म्हणे जाहिरातीत येणार्‍या एका बुवालाही पैसे पाठवायचे होते. आम्ही तडक घरी! नंतर भारतवारीच्यावेळी पुन्हा विनंती पैसे घेउन जाण्याबद्दल! अजिबात नाही म्हणून सांगितले. (याघरातले सगळेजण उच्चशिक्षित आहेत. );)

इंटरनेटस्नेही's picture

4 Aug 2010 - 2:33 am | इंटरनेटस्नेही

तुम्हाला काय वाटत? तुम्ही अशा situation मध्ये काय निर्णय घेतला असता?

तुम्ही घेतला तोच. जर तिच्या भावाला पैसे पाठवायचे होते आणि जर ते ते इतकेच तातडीचे आणि आवश्यक होते तर ती हे काम आपल्या पतीला देखील सांगु शकली असती. पाकिस्तानशी आपले संबध विचारात घेता आपण असा धोका पत्करणे केव्हाही योग्य नाही. शिवाय पैसे इंटरनेट बँकिंग (विझा मनी ट्रान्सफर) ने देखील पाठवता येतात.

(चित्ती असावे सावध)

टिउ's picture

4 Aug 2010 - 2:39 am | टिउ

धोका नसेलही पण कशाला उगीच विषाची परीक्षा घ्या! एखाद्या अनोळखी व्यक्तीला परदेशात (तेही पाकिस्तानात) पैसे पाठवायचे? तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात.

सोम्यागोम्या's picture

4 Aug 2010 - 3:37 am | सोम्यागोम्या

+१

चिन्मना's picture

4 Aug 2010 - 5:21 am | चिन्मना

+२. असेच म्हणतो.

कदाचित तिचा भाऊ हा सुजाण नागरिक असेलही. पण काहीच माहिती नसताना हा धोका पत्करणे बरोबर नाही. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत राहायचे कारण नाही.

अवांतरः तिच्या नवर्‍याने अमेरिकेत येऊनही (तुम्ही अमेरिकेत आहात असे अनुमान आहे, कदाचित चुकीचे असू शकेल) तिच्यावर अशी आणि इतकी बंधने का ठेवली होती हे समजायला वाव नाही. माझ्या ओळखीतील एका पाकिस्तानी कुटुंबात अशी तालिबानी बंधने अजिबात नाहीत. अर्थात असेच सार्वत्रिक असेल असा नाही; पण या बंधनांतून सुटण्यासाठी बरेच लोक देशांतर करत असावेत असा माझा समज होता. तो खरा दिसत नाही.

मधुशाला's picture

4 Aug 2010 - 4:02 am | मधुशाला

अगोदरच बाहेरच्या देशात आपल्यालाच काहीसं असुरक्षित वाटत असताना हे असलं लचांड गळ्यात घेतलच नसतं.

अभिरत भिरभि-या's picture

4 Aug 2010 - 10:09 am | अभिरत भिरभि-या

कटू असला तरी निर्णय योग्य वाटला.

सहज's picture

4 Aug 2010 - 10:13 am | सहज

बिग ब्रदर इज वॉचिंग यू!

ऋषिकेश's picture

4 Aug 2010 - 10:17 am | ऋषिकेश

भावनेच्या भरत आपले अवधान राखून घेतलेला निर्णय. छान!
बाकी मनाची टोचणी काढण्यासाठी एखाद्या विकांताला मस्त बेत करा तिला सहकुटुंब जेवायला बोलवा! बराचकाळ तिच्या सोबत राहिल्यावर आपोआप मोकळे वाटेल..
नाहितर काहिच करू नका तुमच्या मनाला होईल सवय ५-७ दिवसांनी :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा निर्णय पटला. मी कदाचित विचार न करता केलीही असती मदत.

धनंजय's picture

7 Aug 2010 - 2:06 am | धनंजय

जेवायला बोलावून घ्या. स्नेह राहील, पैशांचा व्यवहार न-केल्याबद्दल अपराधी भाव कमी होईल.

(पैशांचा व्यवहार करण्यास नकार दिला, हे ठीकच केले.)

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 7:59 am | आमोद शिंदे

(पैशांचा व्यवहार करण्यास नकार दिला, हे ठीकच केले.)

अनुभवाचे बोल दिसतात! :)

नितिन थत्ते's picture

4 Aug 2010 - 10:20 am | नितिन थत्ते

योग्य निर्णय आहे.

अर्धवट's picture

4 Aug 2010 - 10:39 am | अर्धवट

केली असती... मला इतकं सावध वागता येत नाही... पण नंतर मात्र प्रचंड धास्तावलो असतो.. पार फाटलीच असती..

(साधाभोळा) अर्धवट

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Aug 2010 - 10:45 am | लॉरी टांगटूंगकर

ती सारी फलटण माझ्याकडे खेळायला,अभ्यासाला येते

या मूळे तुमि फलटण ला राहाता आणि तिथ्लि घटना आहे असा समज झाला.

<तिच्या नवर्‍याने अमेरिकेत येऊनही (तुम्ही अमेरिकेत आहात असे अनुमान आहे, कदाचित चुकीचे असू शकेल> मुळे समज्ले

भडकमकर मास्तर's picture

7 Aug 2010 - 1:42 am | भडकमकर मास्तर

तुमि फलटण ला राहाता आणि तिथ्लि घटना आहे असा समज झाला.
फलटणहून पाकिस्तानला पैसे पाठवायची कल्पना इन्ट्रेश्टिंग आहे...

अनिल २७'s picture

4 Aug 2010 - 11:12 am | अनिल २७

योग्य निणय्....अतिशय योग्य निर्णय्..

मृत्युन्जय's picture

4 Aug 2010 - 12:08 pm | मृत्युन्जय

मला तरी वाटते की तुम्ही योग्य तेच केले. मागे एकदा मि सुद्धा चेन्नई च्या एका मुलाचे सामान माझ्या नावाने चेक इन करण्यास नकार दिला होता. कदाचित ती पाकिस्तानी बाई खरे बोलत असेलही पण ग्यार्ंटी काय? योग्य तेच केलेत आणि जे काही केलेत ते सुद्ध त्यांना न दुखावता.

जिप्सी's picture

4 Aug 2010 - 12:20 pm | जिप्सी

जाईताई, आतिशय योग्य निर्णय घेतला तुम्ही. कारण आपण कोल्हापूरी लोक एखाद्याला मदत म्हणून हौसेने एखादी गोष्ट करायला जातो,आणि नंतर तेच आपल्या अंगाशी येत. हा अनुभव मी स्वत: अनेकदा घेतलेला आहे. आणि नंतर त्रास होण्यापेक्षा आधी थोडस वाईट वाटलेलं कधीही चांगलं.

कारण आपण कोल्हापूरी लोक एखाद्याला मदत म्हणून हौसेने एखादी गोष्ट .......

वाक्यातला ठळक शब्द खटकला.

(वाक्य/शब्द तुमचच. मी फक्त ठळक केल. कोल्हापूरी च्या ऐवजी मराठी जरी असत तरी हेच म्हटल असत. गरज नव्हती या विशेषणाची)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 5:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

गणपा,

२००% मान्य!

स्वछंदी-पाखरु's picture

4 Aug 2010 - 1:44 pm | स्वछंदी-पाखरु

कारण आपण कोल्हापूरी लोक एखाद्याला मदत म्हणून हौसेने एखादी गोष्ट करायला जातो,आणि नंतर तेच आपल्या अंगाशी येत.

कृपया उद्या कोल्हपुरात उभे राहुन "कोल्हापुर हे एक स्वतंत्र राज्य आहे "असे म्हणु नका........ ;)

मितान's picture

4 Aug 2010 - 12:28 pm | मितान

जाई, योग्य निर्णय घेतलास. मी पण असाच निर्णय घेतला असता.

मनातली अपराधी भावना पण समजू शकते. ती जाईल हळुहळू..

मराठमोळा's picture

4 Aug 2010 - 1:16 pm | मराठमोळा

मी तर अशा कुटुंबाशी मैत्री सुद्धा करणार नाही. उद्या तिचा खुन बिन झाला/गायब झाली तर नसते लफडे गळ्यात. पाकिस्तानी राक्षस काहीही करु शकतात. आणी अपराधी वाटण्यापेक्षा योग्य निर्णय घेतल्याने आनंदी/मोकळे वाटायला हवे.

विसरुन जा सगळं. :)

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 1:44 pm | इन्द्र्राज पवार

"तो" निर्णय घेतल्यानंतरही तुम्ही लाइमाशी स्वतःहून भेटून तिला पटेल असे कारण सांगितले (काही वेळा "चांगल्यासाठी खोटे बोलले तर ते त्या खात्यात पडत नाही" असे साधुसंत म्हणतातच) हे फार चांगले केले, शिवाय त्या तीन मुलांच्या समवेत राहुन तिला तुम्ही एकटेपणा जाणवू देत नाही हीदेखील एक मोठी आणि उपयुक्त अशी मदतच आहे. दोन देशांमध्ये सद्या जे काही अविश्वासाचे वातावरण आहे त्याचा लेखाजोखा पाहता तुम्ही पैसे न पाठविण्याचा निर्णय अगदी अचूक आहे.

मला वाटते अगदी असाच नाही पण याच धर्तीचा अनुभव "कुर्बान" या नव्या चित्रपटात "करिना कपूर" ला येतो. चित्रपटात अमेरिकेत तिचीही अशीच एक पाकिस्तानी मैत्रीण दाखविली आहे. लाइमासारखी घरी एकटीच राहणारी... संशयास्पद वावर असलेल्या नवर्‍याची प्रचंड भीती... आणि ती एकदा घाबरत घाबरत शेजारी राहणार्‍या "अवंतिका" (करिना कपूर) चे दार ठोठावते.... मदतीची याचना करते, तो पर्यंत त्या स्त्रीची सासू तिथे येते त्यामुळे घाबरून करिनाच्या दारातून निघुन जाते. करिनाला मदत करायची इच्छा होते... आणि पुढे ती स्वतःच त्यामुळे कशी संकटात सापडते.... इ. इ.

सारासार विचार करता, त्यामुळे "नकोच तसला शेजारधर्म".

भारी समर्थ's picture

4 Aug 2010 - 5:15 pm | भारी समर्थ

तुम्ही तो चित्रपट पहाण्यास धजावलात, या बद्दल तुमच्या प्रयोगशीलतेचे जाहीर कौतुक!!!

बाकी, ताईंचा निर्णय योग्य. आपल्याला पटेल असं प्रत्येकच माणूस करत असतो, तुम्हीही केलत. त्यामुळे तिला आता काय वाटत असेल या चिंतेपेक्षा आपण आपल्या विवेकाची कास धरल्याबद्दल घरी गोडाधोडाचं करून मनातली सल संपवावी.

भारी समर्थ

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 6:42 pm | इन्द्र्राज पवार

"तुम्ही तो चित्रपट पहाण्यास धजावलात, या बद्दल तुमच्या प्रयोगशीलतेचे जाहीर कौतुक!!!"

नाही नाही. पूर्ण पाहु शकलोच नाही. तो "सारेगामा" चा महाअंतीम सोहळा झी मराठीवर चालू असताना त्यावेळच्या जाहिरातीच्या धबधब्याला वैतागून इकडील-तिकडील चॅनेल्स पाहताना एका ठिकाणी हा 'कुर्बान' चालू होता व नेमकी सुरुवातच होती. सुरुवातीला अमेरिका आणि मुस्लीम अतिरेकी यावरील कथानक आहे असे दिसत होते, पण नायिकेचे नाव "अवंतिका" म्हणून थोडे कुतहुल जागृत झाले. बस्स इतकेच.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2010 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार

पकिस्तान ह्या आपल्या लहान भावा विषयी व पाकिस्तानी नागरीकां विषयीचे लोकांचे धोरण व मानसीकता बघुन वाईट वाटले.

ल्हान काहुन भाय.
ते १४ ऑगस्ट १९४७ ला जलमल नी आपुन १५ ऑगस्टला. म्हंजी ते थोरलं नव्हं का?

जुळ्या भावंडात बी १ सेकंदाचा फरक असीन तरीबी थोरलं धाकलं कर्त्यात.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Aug 2010 - 5:51 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मी वाटच बघत होते..
अरे कोण आहे रे तिकडे?....ते कोपर्‍यातलं नोबेल काढा रे...
चहानल चवाच्याभा चगेमा चकए चशेषणवि चवायलाला चसरलावि चहेसका चरे चराप?
"चख्यातकु"
म्हणुनच्..तुला कुठं न्याय्ची सोय नाही...

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2010 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या सारख्या लोकांमुळेच आज दोन देशात येवढी दरी निर्माण झाली आहे. तुमचे हेच विचार नवनवीन अतिरेक्यांना जन्माला घालत असतात.

असो..

वैषम्य वाटले येवढेच म्हणतो.

जिप्सी's picture

4 Aug 2010 - 7:35 pm | जिप्सी

कारण आपण कोल्हापूरी लोक एखाद्याला मदत म्हणून हौसेने एखादी गोष्ट .......

वाक्यातला ठळक शब्द खटकला -------

वरील वाक्यातील कोल्हापूरी या शब्दाबद्दल जाहीरपणे माफी मागत आहे, पण तसे लिहिण्यात कोणताही हेतू नव्हता. जाईताई,गणपा आणि स्वच्छंदी पाखरू माफ करा,याच बरोबर आणखीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफ करा.

(एकदा परोपकार करायला जाऊन दीड लाखांना फसलेला)जिप्सी

माफीची गरज नाही आणि अपेक्षा ही.
आपण सगळे या सर्वजनीक फोरम वर चार घटका विरंगुळ्यासाठी येतो तेव्हा उगाच वादाला कारणीभुत होणारी वक्तव्य टाळावीत, इतकच म्हणण आहे.
तुमची चुक तुम्हाला उमजली हेच खुप आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 8:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चूक उमजली एवढंच नाही तर जाहीरपणे मान्यही केली आहेत... विषय संपला! :-)

गणपा, तुझ्याशीही अंमळ असहमती आहे. मराठी लोकंच का, मदत करणारे लोकं सगळ्या भाषा बोलतात! पण हे 'भांडण' इथे नको, नाही का!

मैडम भावनाओं को समझो.
मला मराठी / अ-मराठी म्हणायच नव्हत. कोल्हापुरी काय, मराठी काय, भारतीय काय, की इतर देशीय काय कुठल्याच विषेशणाची गरज नव्हती.

भाषेत अजुन कच्चाच आहे ;) त्यामुळे मनातल्या भावना नीट मांडता नाही आल्या.
असो तसा अर्थ प्रेरीत झाल्या मुळे मी पण आपला क्षमाप्राप्ती आहे.
:)

(स्वगत : गण्या २ दिवस इतक भंडलोय की आता २ आठवडे सौजन्य सप्ताह पाळावा की काय ):?

अर्धवट's picture

4 Aug 2010 - 8:43 pm | अर्धवट

अगदी अगदी......... पाळच तू सप्ताह.......... म्हणजे प्रॉडक्टीव काहीतरी करशील.... चांगल्या पाकॄ वगैरे........

स्वगत - आयला... मला पण टिंब व्हायला लागली रे.. मेलो..

>> असो तसा अर्थ प्रेरीत झाल्या मुळे मी पण आपला क्षमाप्राप्ती आहे.

शुद्धलेखन.

असो तसा अर्थ प्रतीत/ध्वनीत/बोध झाल्या मुळे मी पण आपला क्षमेच्छुक आहे.

अर्धवटराव अशुद्ध लिहिल्या बद्दल मी आपला क्षमेच्छुक आहे ;)

आयला उच्चार करताना जीव्हेला गाठी पडल्या राव ;)

कुठे लिहिलंयस तू अर्धवटराव अशुद्ध आहेत म्हणून? बघू दे तरी जरा आम्हाला! ;)

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 8:24 pm | इन्द्र्राज पवार

"जाहीरपणे माफी मागत आहे"

श्री. जिप्सी, तुमच्या मनाचा हा उमदेपणा (आणि तोही स्वच्छ स्पष्ट शब्दात) तुम्ही दाखविला याबद्दल एक "कोल्हापूरकर" म्हणून नव्हे तर "मिसळपाव" चा सदस्य म्हणून तुमचे अभिनंदन करतो.

इथले सर्वच लोक मनाने मोठे आहेत. केव्हातरी विचारात, स्वभावात भिन्नता येते म्हणून दोनचार शब्द इकडेतिकडे होतात, पण दुसर्‍या दिवशी आपली पाटी कोरी करून इथे प्रवेश केला तर मार्लेश्वरच्या धबधब्यातून पडणारे स्वच्छ, निखळ पाणी प्राशन केल्यासारखे वाटते. तुमच्या येथील पुढील सहभागासाठी शुभेच्छा !

इन्द्र

मीनल's picture

4 Aug 2010 - 9:04 pm | मीनल

मी मदत केली नसती.
कशाला नसता व्याप? लपवा छपवी वगैरे म्हणजे नसती भानगड!
पैशाच्य व्यवहारात कधी कधी मैत्री, नात दुखावलं जातं.

वाहीदा's picture

5 Aug 2010 - 3:36 pm | वाहीदा

बाहेरदेशात असताना असेच मला देखिल तिथल्या पैशांची चणचण भासली होती. कोणाला सांगू हे ही सुचत नव्हते.

एका इजिप्शियन कुटुंबाने जे मला कधिच आवडायचे नाही त्यांनी माझी मदत केली. That Egyptian Lady gave me the money and told me "Don’t bother to return it back if you can’t". Believe me I was shocked and Stunned by their Gesture. God Bless her always. I did return back the money. but Till date she has not disclosed how she came to know about my problem Which I never discussed with her.

फिर बादमें मै अपने आपको बहोत कोसती रही, बेवजेह मैंने अपने दिल में इन भले लोगोंके लिए कितना मैल पाल रखा था जिस बारेमें यह लोग बेखबर थे. मै अपने आपसे सचमें शर्मसार हो गई.

टिउ's picture

7 Aug 2010 - 2:45 am | टिउ

एव्हड्याश्या प्रतिसादात मराठी, हिंदी आणि ईंग्रजीचा इतका खुबीने केलेला वापर बघुन डोळे पाणावले. शिवाय तुम्हाला तिन्ही भाषा येतात हे पण समजलं...

बाकी तुमच्या मते त्यांनी काय करायला हवं होतं? अनोळखी पाकिस्तानी व्यक्तीला पाकिस्तानात पैसे पाठवायला कुणीही भारतीय व्यक्ती दहादा विचार करेल (तुमच्या शब्दात skeptical होईल)...तुमचं काहीतरी वेगळं मत दिसतंय.

तुमचे डोळे पाणावण्यांशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही
या पुढे आमच्या प्रतिसादास कोणताही प्रतिसाद दिला नाही तर बरे होईल
दिला तर, तो आम्ही नक्कीच दुर्लक्षित करु कारण तुम्ही तुमचा वैयक्तिक राग माझ्यावर काढत आहात अन वैयक्तिक चिखलफेक करणे तुम्हाला छान जमते हे आम्ही जाणून आहोत
~ वाहीदा

टिउ's picture

9 Aug 2010 - 7:47 pm | टिउ

टिउ, हा प्रतिसाद तुमच्या साठी नाही

सगळा प्रतिसाद मला लिहिला आणि माझ्यासाठी नाही म्हणता?

तुमचे डोळे पाणावण्यांशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही

धन्यवाद!

या पुढे आमच्या प्रतिसादास कोणताही प्रतिसाद दिला नाही तर बरे होईल

कोणाला प्रतिसाद द्यायचा ते आम्ही ठरवू. तरीही आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. तुम्हाला प्रतिसाद नको असतील तर एक काम करा...स्वत:चा 'ब्लोग' चालु करा आणि तिथे लिहीत चला. म्हणजे नको असलेले प्रतिसाद आले की लगेच 'डिलीट'. काय म्हणता?

दिला तर, तो आम्ही नक्कीच दुर्लक्षित करु

ते काय ते तुम्ही तुमचं ठरवा.

तुम्ही तुमचा वैयक्तिक राग माझ्यावर काढत आहात अन वैयक्तिक चिखलफेक करणे तुम्हाला छान जमते हे आम्ही जाणून आहोत

माझ्या प्रतिसादात वैयक्तीक राग आणि चिखलफेक कुठे दिसली बॉ? साधा सरळ प्रश्न तर होता.

शरयुप्रितम२०१०'s picture

5 Aug 2010 - 3:38 pm | शरयुप्रितम२०१०

तू जे हि केल ते योग्यच केल...
आज तुला थोडा वाईट वाटेल पण उद्या जाऊन काही प्रोब्लेम झाला असता तर अवघड झाल असता तुला....

शरयुप्रितम२०१०'s picture

5 Aug 2010 - 3:40 pm | शरयुप्रितम२०१०

तू जे हि केल ते योग्यच केल...
आज तुला थोडा वाईट वाटेल पण उद्या जाऊन काही प्रोब्लेम झाला असता तर अवघड झाल असता तुला....

अवलिया's picture

5 Aug 2010 - 4:09 pm | अवलिया

अतिशय योग्य निर्णय.

शहराजाद's picture

7 Aug 2010 - 12:28 pm | शहराजाद

तुम्ही स्वतः पैसे न पाठवण्याचा निर्णय मला योग्यच वाटतो आणि मीदेखील असाच विचार केला असता.
पण खरोखरच तिची काही अडचण असेल तर? तुम्ही लिहिले आहे त्यावरून सकृतदर्शनी तरी काही संशयास्पद वाटत . ती तुमची मैत्रिण आहे, आणि तुम्हालाही तिच्याबद्दल आपुलकी आहे. धोका न पत्करताही तुम्ही तिला काही मदत करु शकाल. उदाहरणार्थ १) पाकिस्तानी समाजाचे एखादे मंडळ तुमच्या भागात असल्यास तिथे सम्पर्क साधून निदान स्त्रीवर्गाशी ओळखी करून घेणे . २) घराजवळच्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांचे फोन नं/ पत्ते तिला मिळवून देणे. काउंटीच्या सोशल सर्व्हीस डिपार्टमेंटकडून ही माहिती मिळू शकेल. हे सर्व अशासाठी की ती सर्वच बाबतीत नवर्‍यावर अवलंबून आहे. बाहेरचे जगच माहीत नाही. आज भले ती सुखी असेल, उद्या समजा नवर्‍याची मर्जी फिरली, तर तिला आधार कोणता? त्याने तिचा पासपोर्ट काढून घेतला की ती अडकली.
ऐश्वर्या रायचा अशाच स्त्रीवरचा ' प्रोव्होक्ड' चित्रपट आठवला. भारत सरकार आता परदेशी डिपेंडंट वीसावर जाणार्‍या बायकांना दोन पासपोर्ट देऊन एक तिथल्या भारतीय वकिलातीत जमा करायला लावण्याचा नियाम कारणार आहे असे ऐकून आहे.

सुप्रिया's picture

7 Aug 2010 - 5:46 pm | सुप्रिया

अतिशय योग्य निर्णय.