झटपट ब्रेड पॅटीस...

गमत्या's picture
गमत्या in पाककृती
1 Aug 2010 - 11:57 pm

झटपट ब्रेड पॅटीस...

तसा मि मिपा चा नियमित वाचक आहे. पण वेळे आभावी व लेखानात धाडस नसल्याने लेख लिहायचा किंवा एखाद्या लेखाला प्रतीक्रिया देण्याचा कंटाळा करतो. पण माझे मिपा वर तेवढेच प्रेम आहे जेव्हढे तुम्हा सर्व अ‍ॅक्टीव सभासदांचे आहे. असो....

पाक कॄतीला सुरुवात करण्यापुर्वी थोडे ति बनवण्याची जी स्फुर्ती मिळाली त्यबद्द्ल थोडेसे लिहीण्याचे धाडस करतो.....

येथे सातासमुद्रापार आल्यापसुन आपल्याकडील पदार्थांची खुप आठवण येते त्याला बहुतेक बरीच कारणे असावीत त्यातील ठळक जाणवनारी खालील

१. एखाद्या गोष्टीच्या पासुन दुर गेल्याशीवाय त्याचे महत्व समजत नसते आणि दुसरे आणि महत्वाचे
२. घरी पुण्यात असलो म्हणजे बायकोच्या हातचे पचांगले चुंगले खाण्याची लागलेली सवय.

रवीवार होता सकाळ पासुन नुसता आळसात वेळ घालवत होतो (ओरडणारे कोणी नसल्याचा पुरेपुर फायदा घेत). मिपा वर बरेच लेख वाचुन झाले होते. दोन, तीनदा चहा पीउन झाला होता. इ पेपर हि वाचुन संपला होता. सहज बाहेरचा अंदाज घेण्यासाठि म्हणुन खीडकीचा पडदा जरा बाजुला सरवला आणि लक्षात आले कि, काळे कुट्ट ढगांनी आकाशात गर्दी केली आहे वीजा हि त्यांच्या जोडीने त्यांचे काम चोख बजावत आहेत. म्हणजे आता सुट्टी चे बाहेर भटकायच्या वीचारावर पावसाने सुरुवात करुन पाणि पडणार होते. पण येवढे छान वातावरण असताना मराठी माणसाच्या (नीदान माझ्या सारख्याच्या तरी बाकीच्यांचे मि कसे सांगु..........) मनात काय येणार...... गरमा गरम कांद्याचे भजे............

चांगला विचार न दौडवता लगेच उठलो आणि भजे बनवायचे साहित्य काढु लागलो. (आता तुम्ही विचार करत असताल कि ह्या लेखात नक्की कोणत्या पदार्थाची पाक कॄती देणार आहे हा का विषय सोडुन काहितरी लिहीतोय की काय? तसे नाहीये पण...) ..........हाय रे किस्मत.. कांदे संपलेले...

आता विचार आला कि हे हरबराच्या डाळिचे पिठ वैगेरे साहित्य काढले तर आहे ह्यचे करावे तरी काय? शित पेटी चा दरवाजा उघडला आणि ब्रेड बघुन ब्रेड पॅटीस बनवायची दुसरी चांगली कल्पना बाहेर पडणार्‍या वीजे सारखी डोक्यात चमकली आणि लगेच त्या कल्पनारुपी वीजेला खाली पडु न देता कॄती ला प्रारंभ केला.......

खाली दिलेल्या साहित्या मध्ये त्याचे प्रमाण मुद्दाम दिलेले नाही. कारण मला स्वताहाला कधिही प्रमाण वापरुन पाककॄती बनवता येत नाहि. माझे असे मत आहे कि प्रमाणाचा अंदाज ज्याचा त्याला आवडिनुसार बांधावा लागतो.

साहित्य

१. ब्रेड (अर्थातच ब्रेड पॅटीस बनवायचे म्हणजे हे लागनारच..)
२. हरबराच्या डाळिचे पिठ -आपल्याला किती ब्रेड पॅटीस बनवायचे त्याच्या अंदाजानुसार.
३. हिरवी मिरची - आपल्याला झेपेल एवढी
४. लाल तिखट - आपल्याला झेपेल एवढे
५. मिठ - चवि नुसार
६. धने जिरे पुड - असेल तर नसेल तरी ही काम अडनार नाही. हि पण चवि नुसार.
७. पाणि

कॄती

प्रथम एका भांड्यामधे हरबराच्या डाळिचे पिठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, मिठ, धने जिरे पुड एकत्र करुन ह्या मिश्रणात सावकाश अंदाज धेवुन पाणि टाकुन पिठ भिजवुन ध्या. साधारण पिठ जास्त पातळ अथवा जास्त घट्ट होणार नाहि ह्याची काळजी घ्या. अर्धि मोहीम येथे फत्ते होते.

नंतर तवा गॅस वर गरम होण्यास ठेवा. त्यावर २,३ चमचे तेल टाका. ते तव्यावर व्यवस्थीत पसरेल ह्या कडे लक्ष द्या. आता ब्रेड चे लहान आकाराचे तुकडे करुन हरबराच्या डाळिचे पिठात बुडवुन ते तव्यावर ठेवा.

तेल टाकुन दोन्ही बाजुंनी हे पॅटीस व्यवस्थीत फ्राय करा. आणि गरमा गरम टोमॅटे सॉस बरो बर पावसाचा आनंद घेत खा.
आणि हो आपल्या आवडीचे संगीत लावण्यास विसरु नका. मि भिमसेन जोशींचा भिमपलास, जोरदार पाऊस आणि गरम गरम ब्रेड पॅटीस चा आस्वाद धेतला..........

(फोटो टाकण्यास नवशिका असल्याने जमलेले नाही)

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत :) आणि पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.

फोटो नाहिये बहुतेक. पण वर्णनवरुन तरी ब्रेड पकोड्या सारखे वाटते आहे.

जाता जाता अजुन एक, मिपाकर खुप चोखंदळ झालेत. :)
बिना फोटुच्या पाककृतींना प्रतिक्रिया नाय देत हो. ;)

नुसत्या प्रतिक्रिया देत नाहीत इतकंच नाही तर पाकृ गच्चीवर वाळत टाकल्या जातात की गणपाभौ ;)

असो. प्रस्तुत सदस्याचं पहिलंच लिखाण असल्याने फाऊल माफ करावा काय या विचारात आहे. :D

पहिलंच लिखाण असल्याने फाऊल माफ केला आहे...
पण फोटू हवाच....... ब्रेड पकोडा, ब्रेड पॅटीस आपले आवडते पदार्थ....कॉलेजच्या टपरीवरचा एकमेव गरम पदार्थ असायचा...

मराठमोळा's picture

2 Aug 2010 - 12:20 am | मराठमोळा

>>बिना फोटुच्या पाककृतींना प्रतिक्रिया नाय देत हो
गणपाशेट,
खर आहे बर्र का..
नविन सदस्याला द्या एखादा फोटु तुमच्याकडे स्पेअर असेल तर, तेवढीच मदत आणी प्रोत्साहन. :)

फोटो आहेत.. पण कशे टाकायचे हे माहिती नाहीत...
कृपया मदत केल्यास फोटो टाकता येतील..........

आपल्या प्रतिक्रियें बद्दल धन्यवाद..............

बहुगुणी's picture

2 Aug 2010 - 4:34 am | बहुगुणी

व्यक्तिगत निरोप पाठवला आहे, त्यात फोटो अपलोड कसा करायचा त्याची सविस्तर माहिती आहे.

गमत्या's picture

2 Aug 2010 - 6:17 am | गमत्या

बहुगुणी आपल्या मदतीबद्द्ल धन्यवाद...व्यक्तिगत निरोप पाठवला आहे कृपया उत्तर देणे.

आनंदयात्री's picture

2 Aug 2010 - 7:40 am | आनंदयात्री

लै भारी. आम्ही कितीही मनात आले तरी तळायचे पदार्थ टाळतोच .. वजनबद्दल कॉन्शिअस असल्याचे दाखवता येते आणि महागडे तेल पण वाचते !!