आंतरजाल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
22 Jul 2010 - 7:55 am
गाभा: 

जेम्स लेनवरचा धागा आता अप्रकाशित केला गेलेला आहे. या निमित्ताने काही प्रश्न पडतात :

- राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे विषय आणि त्यावरील चर्चा - मग त्या चर्चा कितीही नियंत्रित वातावरणामधे चालवल्या गेलेल्या असोत - या गोष्टी आंतरजालावर पूर्णपणे वर्ज्य आहेत काय ?

- आंतरजालीय चावड्यांवर व्यक्त केली गेलेली राजकीय मते आणि चावडीच्या मालकाचा अजिबात संबंध नाही असा वेगळा "श्रेयअव्हेर" करणे आवश्यक आहे काय ? असल्यास नक्की कुठे ? आणि कुठल्या संदर्भात आवश्यक आहे ?

- उपरोक्त श्रेयाव्हेर केला गेलेला आहे असे धरून चालल्यावर, आधीच संपादित/नियंत्रित केल्या गेलेल्या राजकीय चर्चा मुळापासून उडवणे कितपत श्रेयास्पद आहे ?

असो. अलिकडचे बरेच धागे हे संपादकांवर निशाणेबाजी केलेले असतात. या असल्या वातावरणात आणखी संपादनाबद्दल प्रश्न उपस्थित करणे - विशेषतः त्याच चमूचा एक सभासद असताना - हे काही फारसे शहाणपणाचे नाही हे मला पटते. पण प्रश्न इथे वैयक्तिक हेव्यादाव्यांचा नसून , संवेदनशील विषयांबद्दलच्या प्रस्तुत संस्थळाच्या भूमिकेबद्दल आहे, आणि तो वैयक्तिक बाबीच्या कक्षेबाहेर येऊ शकतो असे मला वाटते. तेव्हा आपल्यापैकी ज्यांना कुणाला संपादकांबद्दलच्या वैयक्तिक कडवट भावना आहेत त्या व्यक्त करण्याकरता हा धागा नव्हे असे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

ज्यांना जेम्सलेन संबंधीच्या धाग्यावर पडदा टाकलेला योग्य आहे असे वाटते/वाटत नाही - ज्यात संपादकही आले - त्यांनी या चर्चेत भाग जरूर घ्यावा असे सुचवतो.

संपादनाविषयी जाहीर चर्चा अनावश्यक वाटल्याने सदर धागा वाचनमात्र केला जात आहे याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी. - संपादक मंडळ.

प्रतिक्रिया

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 8:14 am | आमोद शिंदे

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे विषय आणि त्यावरील चर्चा - मग त्या चर्चा कितीही नियंत्रित वातावरणामधे चालवल्या गेलेल्या असोत - या गोष्टी आंतरजालावर पूर्णपणे वर्ज्य आहेत काय ?

अजिबात नाहीत. सर्वसामान्य सभ्यतेच्या मर्यादेत केलेल्या चर्चा इथे चालाव्यात असे वाटते.

ज्यांना जेम्सलेन संबंधीच्या धाग्यावर पडदा टाकलेला योग्य आहे असे वाटते/वाटत नाही - ज्यात संपादकही आले - त्यांनी या चर्चेत भाग जरूर घ्यावा असे सुचवतो.

जेम्स लेनचा धागा उडवणे मला योग्य वाटत नाही. (विचारले आहे म्हणून वैयक्तिक मत)

संपादकांनी मात्र खाजगीत एखादी इ-बैठक घेऊन अशा गोष्टींवर निर्णय घ्यावेत असे वाटते. आपण संपादक असूनही ह्या सगळ्या प्रकाराशी अनभिज्ञ आहात हे साईटच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले नाही. ज्या कुणी संपादकाने हा निर्णय घेतला त्याने सर्वांशी (इतर संपादक) सल्लामसलत करुन हा निर्णय घेतला असता तर एक कलेक्टीव निर्णय दिसला असता. कुणासही संशय घेण्यास वा गैर समज करुन घेण्यास वाव राहणार नाही.

मुक्तसुनीत's picture

22 Jul 2010 - 8:21 am | मुक्तसुनीत

संपादकांनी मात्र खाजगीत एखादी इ-बैठक घेऊन अशा गोष्टींवर निर्णय घ्यावेत असे वाटते. आपण संपादक असूनही ह्या सगळ्या प्रकाराशी अनभिज्ञ आहात हे साईटच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले नाही. ज्या कुणी संपादकाने हा निर्णय घेतला त्याने सर्वांशी (इतर संपादक) सल्लामसलत करुन हा निर्णय घेतला असता तर एक कलेक्टीव निर्णय दिसला असता. कुणासही संशय घेण्यास वा गैर समज करुन घेण्यास वाव राहणार नाही.

संपादकमंडळामधे सल्लामसलतीच्या स्वरूपाचे काम चालते. जेम्सलेनधाग्या संबंधी झालेल्या प्रकाराबद्दल मी अनभिज्ञ आहे/नाही याबाबत मी काहीही बोललेलो नाही. जेम्सलेनधाग्या संबंधी झालेल्या प्रकारात साबोटाज नाही हेही नमूद करतो.

मात्र धोरणाबाबत अनिश्चिती जरूर आहे असे दिसते. ती दूर व्हावी म्हणून हा धागा.

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 8:32 am | आमोद शिंदे

संपादकमंडळामधे सल्लामसलतीच्या स्वरूपाचे काम चालते. जेम्सलेनधाग्या संबंधी झालेल्या प्रकाराबद्दल मी अनभिज्ञ आहे/नाही याबाबत मी काहीही बोललेलो नाही.

क्रेमर ह्यांच्या वहीत तुमची ही विधाने दिसल्याने माझा तसा समज असल्यास. चुकिचा असल्यास क्षमस्व!
"मी उडवला नाही. उडाला असल्यास मला खेद वाटतो. अप्रकाशित झालेला आहे. कुणी केला ते (सध्या) माहिती नाही. "

ऋषिकेश's picture

22 Jul 2010 - 9:46 am | ऋषिकेश

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे विषय आणि त्यावरील चर्चा - मग त्या चर्चा कितीही नियंत्रित वातावरणामधे चालवल्या गेलेल्या असोत - या गोष्टी आंतरजालावर पूर्णपणे वर्ज्य आहेत काय ?

अर्थातच नाहि.. गांधींचा ५५ कोटी देण्यामागच्या भुमिकेवर नुकतीच झालेली चर्चा याचे उदाहरण आहे.

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

Nile's picture

22 Jul 2010 - 9:47 am | Nile

तो धागा अप्रकाशित केला गेला याबद्दल खेद वाटतो. अनेकांनी विचारपुर्वक मुद्दे मांडलेले असताना, त्यावर वेळ खर्चला असताना धागा अप्रकाशित करणे त्रासदायक आहे. धागा जर आवाक्याबाहेर जात असेल तर तो वाचनमात्र करणे योग्य असे वाटते.

सद्ध्या तक्रारीकरता संपादक मंडळ या आयडीला संपर्क करा असे सांगितले जाते. असे जर असेल तर संपादक मंडळानेच निर्णय घेणे योग्य आहे, त्यामुळे, विशेषतः सदर धाग्यांसारखे महत्त्वाचे धागे अप्रकाशित करताना, किमान काही संपादकांनी एकत्र निर्णय घ्यावा.

-Nile

विजुभाऊ's picture

22 Jul 2010 - 10:08 am | विजुभाऊ

तो धागा अप्रकाशीत केला ते योग्य होते.
या असल्या वातावरणात आणखी संपादनाबद्दल प्रश्न उपस्थित करणे - विशेषतः त्याच चमूचा एक सभासद असताना - हे काही फारसे शहाणपणाचे नाही हे मला पटते.

सहमत. या बाबतीत जॉर्ज ऑरवीलचे म्हणणे "ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल "हेच खरे होते. असो त्याबद्दल बोलायचे नाहिय्ये.
कारण तसे केले तर हा प्रतिसाद कोनतेही कारण न देता संपादीत होईल असे वाटते
जेम्स लेनच्या पुस्तकात जे काही लिहिले ते योग्य अयोग्य याची शहानिशा करणे अवघड आहे. सहिष्णूता म्हणजे वाट्टेल ते चालवून घेणे/सहन करणे नव्हे.
धार्मीक मुद्दा उकरायचा म्हणून नव्हे पण एखाद्या विषिष्ठ धर्माच्या धर्माच्या धर्मसंस्थपकाच्या मतावर काही केले तर ते चालवून घेतले जात नाही.
मग जो राजा उत्तम होता त्याच्या राज्यकारभाराबद्दल बोलण्यापेक्षा त्याच्या हातात नसलेल्या काही गोष्टिंचा केवळ वाद्ग्रस्त ठरल्यामुळे खप वाढवण्यासाठी बेफात विधाने करणार्‍या लेखकाला/ पुस्तकाला का म्हणून सहन करायचे.
दुसर्‍यांच्या मताचा आदर राखा हे योग्य आहे. पण त्याला काहितरी मर्यादा आहेत.
धागा अप्रकाशीत केला याचे कारण जर धाग्याचा विषय अप्रस्तूत धोरणात न बसणारा असेल तर ते योग्य आहे. काहीवेळा धाग्यावरील चर्चा ही वहावत जाते त्यावेळेस ते विषिष्ठ प्रतिसाद त्या सदस्याना कल्पना देवून उडवणे योग्य. कोणीतरी अती अवांतर प्रतिसाद दिला म्हणून धागाच अप्रकाशीत करणे हे त्या धागा लेखकावर अन्याय करण्यासारखे आहे.
मात्र प्रतिसाद उडवताना संपदकानी वैयक्तीक सख्य /असख्य आड आणू नये. किंवा तो प्रतिसाद एखादा संपादक सदस्याचा असेल तरीसुद्धा त्यावर कारवाई करावी ही अपेक्षा. शेवटी संपादक हे देखील मिपा सदस्य आहेत.

चिंतातुर जंतू's picture

22 Jul 2010 - 10:41 am | चिंतातुर जंतू

मी धागा अप्रकाशित केला नाही. धागा काही ठिकाणांहून गायब झाला आहे, पण काही ठिकाणी दिसतो आहे. उदा: स्वगृह -> चर्चा इथे गेल्यास, म्हणजे या दुव्यावर धागा दिसतो आहे. काही तांत्रिक कारण असल्यास कल्पना नाही. अधिकृत धोरणानुसार संपादक मंडळाला व्यक्तिगत निरोप पाठवला आहे. उत्तर मिळाल्यावर उलगडा होईल, अशी आशा आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2010 - 10:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जंतू, तुम्ही दिलेल्या धाग्यावर धागा 'दिसतो' आहे, पण 'तुम्हाला या पानाशी पोहोचण्याची मुभा नाही' असाच संदेश क्लिक केल्यावर येतो आहे.

अनेक दिवस चांगली, आणि काही दिवस कीस काढणारी चर्चा झाल्यावर धागा अप्रकाशित करणे पटले नाही. फक्त धागाप्रवर्तकच नव्हे तर प्रतिसादकांनीही आपला वेळ खर्च करून तिथे काही चर्चा केली होती. या सर्वांचे कष्ट आणि वेळ फुकट गेला असंच समजायचं का?

विशेषतः धागा अप्रकाशित होण्याचं टायमिंग खटकलं

अदिती

वाहीदा's picture

22 Jul 2010 - 11:42 am | वाहीदा

फक्त धागाप्रवर्तकच नव्हे तर प्रतिसादकांनीही आपला वेळ खर्च करून तिथे काही चर्चा केली होती. या सर्वांचे कष्ट आणि वेळ फुकट गेला असंच समजायचं का?
असेच म्हणायचे आहे.
चिंतातूर जंतू यांचा लेख अन त्यावरील चर्चा , प्रतिसाद नेहमीच वाचनिय असतात. धागा फक्त वाचनमात्र केले असते तरी चालले असते असे वाटते .
धागा अप्रकाशित करणे खरेच पटले नाही बाकी संपादकांची मर्जी :-(
~ वाहीदा

राजेश घासकडवी's picture

22 Jul 2010 - 10:58 am | राजेश घासकडवी

राजकीय कारणांसाठी धागा अप्रकाशित झाला हे गृहितक वाटतं. मात्र तो का अप्रकाशित झाला हे कोडं राहातंच.

धागा अप्रकाशित करण्यामागे कोणी एक संपादक आहे की बहुतांश संपादक मंडळ आहे या बाबतीतली संदिग्धता असू नये असं वाटतं. नुकतंच धोरण जाहीर झालं त्यातून संपादक मंडळ अथवा व्यवस्थापन पारदर्शकतेची हमी देत नसेल तरीही पूर्ण प्रयत्न करेल असं आश्वासन आहे असं वाटलं होतं.

हे खाजगी संस्थळ असल्यामुळे मला वैयक्तिकदृष्ट्या फारसा फरक पडत नाही. पण एखादा महत्त्वाचा (१४० प्रतिसादांचा) धागा अप्रकाशित करताना संदिग्धता असू नये असं वाटतं. निदान अपेक्षा काय ठेवाव्यात हे तरी निश्चित करता येईल.

सहिष्णुतेच्या संकल्पनांबाबत विजुभाऊंशी असहमत. धाग्यावरील चर्चा मर्यादेमध्येच होती. त्या संकुचित करणं हे असहिष्णु होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jul 2010 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे

धाग्यावरील चर्चा मर्यादेमध्येच होती. त्या संकुचित करणं हे असहिष्णु होईल.

सहमत आहे. चर्चेमुळे समुहमानसिकतेचा बाहेर जाउन वेगळ्या दृष्टीने स्वतःच्या डोक्याचा वापर करु इच्छिणार्‍यांना उपयुक्तच होती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

समंजस's picture

22 Jul 2010 - 11:09 am | समंजस

माझं वैयक्तीक मत आहे की, तो धागा अप्रकाशित व्हायला नको होता.
धागा लेखकानी आक्रस्ताळपणे लिखाण न करता, व्यवस्थित आणि संयमित शब्दात मुद्दे मांडले होते.
बर्‍याच सदस्यांनी त्यावर मुद्देसुद वाद/प्रतिवाद केला होता. काही सदस्यांनी टाकले असतील अवांतर प्रतिसाद किंवा गुद्यांवर येणारे प्रतिसाद तर असे प्रतिसाद अप्रकाशित करायले हवे होते किंवा शेवटी धागा वाचनमात्र करायला हवा होता.

परंतु संपुर्ण धागाच अप्रकाशित करणे हे म्हणजे रोगी उपचार करवून घेत नाही म्हणून रोग्यालाच मारून टाकण्या सारखे आहे.

[अवांतरः ज्यांना व्यासपिठावरील(कोणत्याही प्रकारच्या) चर्चा आणि रणांगणातील लढाई यातील फरक कळत नाही, त्यांनी चर्चे पासून लांब राहावे].

श्रावण मोडक's picture

22 Jul 2010 - 11:56 am | श्रावण मोडक

धागा अप्रकाशित करण्याचा निर्णय योग्य आहे, असे माझे मत आहे. त्या धाग्यावर मी स्वतः काही लेखन केले आहे, तरीही असे म्हणतोय. त्याची काही कारणे आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही वगैरे तत्वांचा एकूणच आदर आहे, ती असावीतच याविषयी दुमत नाही. मिपाच्या संदर्भात मी थोडा वेगळा न्याय लावेन. या धाग्यातील आणि धाग्यावरील काही लेखन असे होते, की त्यासंदर्भात कायदेशीर कारवाईची पावले उचलता आली असती. कायदेशीर कारवाई पूर्णपणे झाली असती की नाही, हा सारा न्यायालयीन प्रक्रियेच्या अखेरीस येणारा मुद्दा आहे. पण ती प्रक्रिया सुरू होण्याइतपत काही गोष्टी या धाग्यात होत्या. धागा आत्ता अप्रकाशित असल्याने त्या मी येथे सांगणार नाही. अशा प्रसंगी या कायदेशीर कारवाईला तोंड कोणी द्यावयाचे? कसे द्यावयाचे? हे प्रश्न असतात. मिपा ही काही रूढ माध्यमसंस्था (निदान अद्याप तरी) नाही. रूढ माध्यम संस्थांकडे अशा स्वरूपाच्या कारवायांना तोंड देण्याची व्यवस्था असते. ती मिपाकडे नाही हे उघड आहे. सबब अशी कारवाई ओढवून न घेणे हेच व्यवहारात शहाणपणाचे ठरते. मिपाकारांनी हा धागा काही दिवस राहू दिला, सदस्यांना त्यावर टिपणी करू दिली हेही पुरेसे बोलके आहे. त्यातूनच अशा विषयांवर सदस्यांना चर्चा करावयाची आहे हा आवाज उठलेला आहेच. हा धागा किंवा असाच आणखी एक धागा त्या धाग्याची आठवण जागी ठेवताहेतच. मूळ धाग्याचे धागेही मिपावर कायम आहेत.
हा धागा वाचनमात्र करता आला असता, पण म्हणून कारवाईची प्रक्रिया सुरू होणे टळले नसते. कारण, त्यासाठी आवश्यक तथ्ये दिसलीच असती.
लक्षात घ्या, मी कारवाईची प्रक्रिया सुरू होणे असे म्हणतो आहे. म्हणजे काय? मिपाचा हवाला देत एक छोटी घटना, चार दगडं इकडं-तिकडं आणि मिपाकडे साऱ्यांचे लक्ष. पाठोपाठ एक नोटीस, एक एफआयआर. पुढचे पुढे. कोर्टात तो टिकेल न टिकेल. आपले हितचिंतक असतातच एवढे उद्योग होण्यासाठी. पुढे ती कारवाई न टिकण्यासाठी त्याविरुद्ध आव्हान देत उभे रहावे लागतेच. तशी यंत्रणा मिपाकडे नाही, असे मला दिसते. तशी यंत्रणा असेल तर मिपाने हा धागा प्रकाशित करावा, काही झाले तर त्याचा सामना करावा, ती किंमत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या दृष्टीने मोजणे हिताचेच. पण यंत्रणा नसताना अशी पावले उचलू नयेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही वगैरे गोष्टी काही किंमत देऊनच मिळवता येतात. त्या अनिर्बंधही असत नाहीत. ती किंमत देण्याची तयारी साऱ्यांनीच करून मिपाकारांच्या पाठीशी उभी करावी आणि त्यानंतर या दोन्ही मूल्यांचा पूर्ण आग्रह जरूर धरावा. हे सहजशक्य आहे का? नाही. इथला प्रत्येक सदस्य आपापल्या जगण्याच्या अवकाशात पूर्ण गुंतलेला आहे. उद्या या धाग्याच्या अनुषंगाने काही झाले असते तर त्यावेळी आधी नीलकांत हा दृष्य स्वरूपात एकटाच आरोपी झाला असता. चिंतातूर जंतू हे दुसरे आरोपी असते. त्यापुढं इतर मंडळी. ही प्रक्रिया कशी असते हे मी सांगण्याची गरज नाही. ही बाब समजून घेतली तर हा धागा अप्रकाशित करण्याचा निर्णय मूल्यात्मक नसला तरी व्यवहारी नक्कीच आहे हे पटेल.
(आता पुन्हा मधमाशा उठतील. आधीच आळश्यांचा राजा यांची प्रतिक्रिया सरकारसाठी मार्गदर्शक म्हटल्याने उपरोध दिसत होताच. आता ही भर.)

समंजस's picture

22 Jul 2010 - 12:18 pm | समंजस

कायदेशीर लढाई लढायला अर्थातच पुरेसं पाठबळ/संपत्ती/साधनं यांची आवशक्यता आहेच आणि ती पुरेशी नसणे ह्या एका कारणामुळे जर तो धागा किंवा तत्सम धागे अप्रकाशित करण्यात येत असतील तर या निर्णयाला [मिपाचा हितचिंतक म्हणून] माझा वैयक्तीक पाठींबा आहे .

Nile's picture

22 Jul 2010 - 1:23 pm | Nile

त्या धाग्यातील काही प्रतिसाद, ज्यामुळे मिपावर कायदेशीर कारवाईची शक्यता येउ शकते, असे असतील तर ते माझ्या नजरेतुन सुटले असण्याची शक्यता आहे. (तसे असल्यास माझ्या यापुर्वीच्या प्रतिसादात बदल करावा लागेल)

(संस्थळावरील धाग्यातील प्रतिसादकांच्या मताची जबाबदारी संस्थळ मालक्/व्यवस्थापक्/संपादक यांवर राहणार नाही असे डिस्क्लेमर टाकल्याने हा (आणि असे)प्रश्न सुटतील का? याबाबत काही कायदेशीर खात्रीलायक मदत मिळु शकेल का? मी संपादक असलेल्या एक संस्थळावर अश्या प्रकारचे निवेदन आम्ही लावले होते. त्यावेळी त्या लोकांनी सल्लामसलत केली होती. असो.)

आता प्रश्न उरतो तो कुणी जाणुन बुजुन मिसळपाव संस्थळ, व्यवस्थापक वा संपादक यांस अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत का? अश्या परिस्थितीत मिसळपावचा एक सभासद म्हणुन जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न नेहमीच असेल आणि अशा प्रसंगांवेळी घेतले जाणारे निर्णय मान्य असतील. (पण याबाबत जमेल तेव्हढी पारदर्शकता व्यवस्थापनाकडून असावी अशी विनंती, जेणेकरुन परिस्थितीची जाणीव आम्हाला होईल).

-Nile

चिंतातुर जंतू's picture

22 Jul 2010 - 11:56 am | चिंतातुर जंतू

मला संपूर्ण धागा दिसतो आहे. त्यात मूळ लेख वाचनमात्र आहे, पण नवीन प्रतिसाद टाकता येत आहेत. मी एक चाचणी प्रतिसाद टाकून पहिला.

एक (फार तर्कदुष्ट नसणारी) शक्यता:
कदाचित संपादकांनी धागा वाचनमात्र करण्याचा प्रयत्न केला असावा, पण त्या प्रयत्नात काहीतरी तांत्रिक गडबड होऊन असं झालं असेल.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

श्रावण मोडक's picture

22 Jul 2010 - 12:32 pm | श्रावण मोडक

मालक, तुम्ही धाग्याचे मूळ लेखक असल्याने मला वाटतं तो धागा तुम्हाला दिसत राहणारच. ती काही तरी तांत्रीक 'करा-मत' स्थिती आहे.

यशोधरा's picture

22 Jul 2010 - 1:11 pm | यशोधरा

हा धागा अप्रकाशित झाल्याचे वाईट वाटले.

चर्चेमध्ये वेगवेगळी मते ही येणारच. सगळीच मते पटत होती असेही नाही आणि कधी कधी "मासे गळाला लावण्याचा" (आणि पर्यायाने चर्चा भरकटायचा धोका) उद्देश लक्षात घेऊनही चर्चा वाचायला आवडले होते. धाग्यावरच्या काही लेखनाने मिपाच्या अस्तित्वाला धोका झाला असता, हे एक मत वाचताना, ह्या अगोदर अशा चर्चा इथे झाल्याच नाहीत का, आणि तसेच होते, तर इतके दिवस हा धागा का चालू ठेवण्यात आला असा प्रामाणिक प्रश्न पडला. अर्थात, नीलकांत वा इतर कोणीही, ह्यांना कसल्याही प्रकारचा त्रास व्हावा असे वाटत नाही, झालाच, तर त्यांच्या पाठीशी सतत असण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी नाही हेही खरेच आहे; पण त्याच बरोबर मग हे पाऊल उचलण्यात उशीर झाला असे म्हणावेसे वाटते आणि पुन्हा त्या कृतीवरही एक धागा काढून हे केले ते योग्य की अयोग्य ह्याचा काथ्याकूट करायचे प्रयोजन तरी का?

असो.

आळश्यांचा राजा's picture

22 Jul 2010 - 2:23 pm | आळश्यांचा राजा

त्या धाग्यावर मी तरी माझा बराच वेळ खर्चलेला होता.

इथे शिकलेली आणि विचार करणारी मंडळी दिसतात, वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली असतात. त्यामुळे फार जण वाचत नसले तरी जे कुणी वाचतात ते आणखी कुठे कुठे लिहू/ बोलू शकतात. कुणालाही ऍक्सेस असल्यामुळे हे ठिकाण म्हणजे एक जाहीर व्यासपीठ आहे. माझ्या मते चर्चा ज्या प्रकारे चालली होती तशा प्रकारे ती फक्त खाजगीमध्येच होऊ शकते. जाहीरपणे नाही. (पुस्तकातील वादग्रस्त भागाबद्दलही माझे हेच मत मी व्यक्त केले होते.) चर्चेचे प्रस्तावक जो मुद्दा मांडू पहात होते तो योग्य असला तरी ज्या संदर्भामध्ये मांडत होते तो संदर्भ किती नाजूक आहे याचे भान किती जणांना होते याविषयी शंका आहे. समर्थन एका गोष्टीचे करायला जावे, त्या नादात आपण भलत्याच गोष्टीचे समर्थन करतोय याचेही भान काहींना नव्हते. मला वाटते, या धोक्याची ज्यांना कल्पना होती ते लोक शहाणपणाने या वादापासून दूर राहिले. काहींनी त्या ठिकाणी वाद घालण्यापेक्षा खाजगीमध्ये (इमेल इ.) चर्चा करणे पसंत केलेही असावे. असल्या गंभीर आणि नाजूक विषयांवर संयतपणे चर्चा करणे सर्वांनाच जमत नाही. काही अविवेकी डोकी भलत्याच गोष्टी बोलून जातात, (त्यांनाही बहुदा कळत नसावे काय बोलतात ते) आणि या स्थळाशी संबंधित/ जबाबदार लोक अडचणीत येतात/ येऊ शकतात. प्रस्तुत चर्चेत मी एक दोन ठिकाणी तसे सुचवले/ म्हटले होतेही.

लेखकाने हा धागा काढून टाकला असेल तर एवढेच म्हणणे आहे, की लेखनावर लेखकाचा हक्क; पण प्रतिसादांवर? अनेक प्रतिसाद हे मूळ लेखापेक्षा मोठे असतात, वाचनीय असतात, माहितीपूर्ण असतात, हजरजबाबी असतात. असो.

पण संपादक मंडळाने जर धागा काढून टाकला असेल, तर मी त्याला योग्य निर्णय म्हणेन. माझ्या नम्र मते तो धागा वाचनमात्र म्हणूनही ठेवणे योग्य नाही. विषाची परीक्षा.

(‘संस्थळ उडाले तरी बेहत्तर काय वाट्टेल ते लिहिणारच, माझा मूलभूत हक्क बजावणारच’ असा बाणा कुणाचा असल्यास त्यांना मन:पूर्वक वंदन आणि शुभेच्छा. संस्थळ उडण्यापेक्षा गंभीर परिणाम अर्थातच होऊ शकतात.)

टीप - मी हे चार तासांपूर्वी टंकून ठेवले होते. कनेक्टिव्हिटी नसल्याने आता टाकतोय. मधल्या काळात पुरेशी चर्चा इथे झालेली आहेच. माझे बरेचसे मुद्दे श्रामोंनी कव्हर केलेले आहेतच.

आळश्यांचा राजा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2010 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रामो आणि तुमचा प्रतिसाद वाचून तुमचं म्हणणं पटत आहे. संबंधितांना (ज्यांच्यामुळे अशी वेळ आली आहे) संपादक मंडळ, मालक, व्यवस्थापक कोणीतरी तंबी द्यावी असं मनापासून वाटत आहे.

अदिती