संमोहन------ संदर्भः माइंडफ्रीक-क्रिस एंजल

भाऊ पाटील's picture
भाऊ पाटील in काथ्याकूट
13 Jul 2010 - 4:25 pm
गाभा: 

काल टीव्ही चाळतांना AXN वर 'माइंडफ्रीक-क्रिस एंजल' असा कार्यक्रम शेवटची ५ मिनिटे बघायला मिळाला. त्यात क्रिस एंजल एका रेस्तरॉ मधे जेवत असलेल्या लोकांना फक्त ४-५ वाक्ये बोलून संमोहित करतो आणि झोपण्यास सांगतो. अचंबित होण्याचि गोष्ट म्हणजे ४०-५० लोक त्याच्या एका चुटकीसरशी झोपी जातात. अगदी हातात ट्रे घेवुन चालणारा वेटर देखील चुटकी वाजताच झोपतो आणि धाड्कन जमिनीवर कोसळतो. अशी २ मिनिटे गेल्यावर क्रिस एंजल त्यांना जागे व्हा असा आदेश देतो आणि सारेजण जागे व आश्चर्यचकीत होतात. (ह्याचे विडिओ तुनळीवर आहेत)

संमोहन ह्या प्रकाराबद्दल मिपावर कोणी माहितगार आहेत का? हे सर्व खरे आहे की बनावट? कोणी असा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे का? सामान्य / सश्रध्द/ विवेकवादी / विज्ञानवादी लोकांचे ह्याबाबत काय मत आहे? (ज्याने त्याने आपापली क्याटेगरी ठरवावी ) ;)

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

13 Jul 2010 - 6:31 pm | प्रियाली

लास वेगासला लक्सॉर हॉटेलात क्रिस एंजलचे शोज असतात. मी पाहिलेले नाहीत. मी लान्स बर्टनचा शो पाहिला आहे पण त्यात संमोहन नसते.

असे शोज तूफान चालतात.

जादू वगैरे खरी नसते असे मला वाटते. :) पण क्रिस एंजलचे शोज टिव्हीवरही पाहिले आहेत. तेथे नेमके काय होते ते कळत नाही. असो.

भडकमकर मास्तर's picture

15 Jul 2010 - 2:34 am | भडकमकर मास्तर

मनोहर नाईकांच्या क्लासला गेलेल्या एका डॉक्टराने माझ्यावर एकदा संमोहन केले... मी बारावीत... वडिलांबरोबर त्यांच्या कामानिमित्त त्या डॉक्तरच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो... अजून त्याचे काही स्नेही, नातेवाईक मंडळी त्याने जमवली होती... मग अंधार करून सर्वांना बाकड्यावर बसवून नाईकांची क्यासेट लावली..... ( पायाच्या अंगठ्यापासून सुरू करून एक एक अवयव बधीर रिलॅक्स वगैरे होत आहे अशा कंटाळा येईपर्यंत पुन्हा पुन्हा सूचना ऐकल्या.....)... मी सर्वात बारक्या होतो, मन लावून ऐकत होतो.. ( नंतर कळाले की बरीच वयस्कर मंडळी चुळबूळ करत वैतागून बसून होती किंवा झोपली होती)... थोड्या वेळाने डॉक्टराने दिवा लावला आणि माझ्या मनगटाखालच्या त्वचेतून नेहमीची इन्जेक्शनची दीड इन्ची नीडल खुपसलेली आणि पुन्हा बाहेर काढलेली मला दिसली.... मी मनातल्या मनात त्या डॉक्टराला जाम शिव्या दिल्या...या xxxने हे काम कधी केले मला कळाले नव्हते. काही दुखत नव्हतं, आणि हा बुवा स्वतःचा प्रयोग यशस्वी वगैरे झाल्याप्रमाणे माझा हात उन्चावून इतरांना दाखवत होता........माझा असा वापर होताना पाहून मला चीड आली होती , चिडून ओरडावेसे वाटत होते पण सारे अंग जडावले होते आणि झोप आल्यागत वाटत होते..... मग पुन्हा दिवा बंद अंधार क्यासेट पुढे सुरू आणि सम्मोहनातून बाहेर... दिवे ऑन...घरी येताना वडीलसुद्धा त्या डॉक्तराला जाम शिव्या घालत होते..बाकड्यावर पाऊण तास अवघडून बसल्याने त्यांची पाठ दुखत होती त्यामुळे त्यांनी अजिबात क्यासेट ऐकली नाही असे ते म्हणाले... पुढे त्या डॉक्टराला कधी आयुष्यात भेटलो नाही... पण माझ्यावर सम्मोहन चांगले हो ऊ शकेल हे कळाले

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 4:58 am | प्रियाली

विषाची सुईची अशी परीक्षा न घेणे उत्तम.

पण म्हणजे तुम्ही कॅसेट बघून संमोहित झालात की हा डॉक्टर संमोहित करत होता?

........माझा असा वापर होताना पाहून मला चीड आली होती , चिडून ओरडावेसे वाटत होते पण सारे अंग जडावले होते आणि झोप आल्यागत वाटत होते.....

म्हणजे तुम्हाला काय होते ते बरेचसे कळत होते तर? मला वाटायचे की संमोहित व्यक्तीला आपण संमोहनाखाली काय सांगितले, काय केले ते आठवत नाही.

धमुलाही कळत होते का आपल्या अंगावर कोणी उभे आहे ते?

भडकमकर मास्तर's picture

15 Jul 2010 - 4:49 pm | भडकमकर मास्तर

पण म्हणजे तुम्ही कॅसेट बघून संमोहित झालात की हा डॉक्टर संमोहित करत होता?
बघून नाही.. फक्त ऐकून .. साधी ऑडिओ कॅसेट होती... डॉक्टराने एकही सूचना दिलेली नव्हती... फक्त नाईकांच्या आवाजातील कॅसेट ऐकून मी संमोहित झालो होतो.... डॉक्टर एक शिकाऊ संमोहनतज्ञ होता.. ( कोर्स मटेरियल म्हणून ही क्यासेट आलेली असावी त्याच्याकडे... :) )

म्हणजे तुम्हाला काय होते ते बरेचसे कळत होते तर? मला वाटायचे की संमोहित व्यक्तीला आपण संमोहनाखाली काय सांगितले, काय केले ते आठवत नाही.

तुम्हाला काहीही आठवणार नाही अशा स्पेसिफिक सूचना दिलेल्या असल्या तर कदाचित पुढे काहीही आठवत नाही, असे असावे.....
मला तर व्यवस्थित कळत होते....
(धमुलाही छान समजत होते, असे दिसते.)

धमाल मुलगा's picture

15 Jul 2010 - 7:48 pm | धमाल मुलगा

मला त्या माणसाच्या मोज्यांचा वासही व्यवस्थित येत होता. माझ्यासोबत कार्यक्रमाला जी मैत्रिण आली होती तीचं "आईशप्पथ!" असं म्हणलेलंही मी स्पष्ट ऐकलं..

:)
सग़ळं कळत असतं हो, पण तरीही कसं काय असं होतं ते मात्र कळत नाही.
एकुणातच संमोहन हा प्रकार लै भारी आहे असं आपलं स्वानुभवातुन मत झालेलं आहे. :)

आणखी एक किस्सा:
माझ्या एका मित्राला आणि आणखी काही जणांना स्टेजवर बोलावलं होतं, आणि त्यांना संमोहित केल्यावर हातात कारली दिली, आणी, "व्वा काय छान गाजरं आहेत, तुम्हाला गाजरं आवडतात ना? खा मग ही गाजरं..निम्मीच खायची हां..." वगैरे म्हणाल्यावर हे सगळॅ लोक ती कारली कचाकचा खाऊ लागले. नंतर सांगितलं, "पुरे आता, उरलेलं गाजर आपापल्या खिशात ठेऊन द्या.."
मग संमोहन उतरवल्यानंतर विचारलं कशी होती गाजरं? तर पब्लिक म्हणालं, 'गोड होती की." मग त्यांनी सांगितलं, जरा खिशात हात घालुन ती गाजरं बाहेर काढा बरं....अणि मग खिशातुन कारली काढल्यावर ते संमोहित गाजरखाऊ सगळे जे गंडले =))

स्वछंदी-पाखरु's picture

13 Jul 2010 - 6:49 pm | स्वछंदी-पाखरु

संमोहन शास्त्राचा मी असाच एक चमत्कार काही वर्षांपुर्वी बघीतला होता... त्यामधे माझे भ्राताश्री हे सहभागी झाले होते. त्यांची शरीरयष्टी तेंव्हा साधारण होती ( हल्ली ते खात्यापीत्या घरातले मोडतात तो भाग वेगळा). त्या कार्यक्रमामध्ये एक पूल (Bridge) नावचा प्रकार, एक स्टंट त्यातील संमोहन शास्त्रीनी माझ्या भ्राताश्रींवर आजमावला. त्यामधे माझ्या भ्राताश्रींना त्या संमोहन शास्त्रींनी जमिनीवर सरळ झोपवले मग संमोहनाने त्याचे शरीर अगदी लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे कडक व मजबूत करण्यास सांगीतले, मग दोन मिनीटांनी व्यासपीठावर दोन मजबूत खुर्च्या समोरासमोर ठेवून, दोन स्वयंसेवकांनी माझ्या भ्रातश्रींचे लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे कडक व मजबूत झालेले शरीर एका खुर्ची वर डोके व एका खुर्ची वर पाय अश्या पद्धतीने ठेवुन तो पूल तयार केला.मग त्या पूलाची मजबूती साबीत करण्यासाठी एक अगदीच गल्लेलठ, अहो अगदी हत्ती प्रकल्पाची शरीरयष्टी असलेल्या स्त्री ला त्याच्या पोटावर उभी केली!!!! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाली कुठलाही अधार नसुन देखील माझ्या भ्रातश्रींचे शरीर (ला़कडाचा ओंडका) अजिबात वाकला नाहि.!!!!!

आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...

पण... पंख पिंजर्‍यातच अडकलेले होते..........

पांथस्थ's picture

14 Jul 2010 - 12:19 pm | पांथस्थ

हा प्रयोग मी पुण्यामधे एका शो मधे पाहिला होता.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 3:54 pm | धमाल मुलगा

च्यामारी...
हा प्रयोग पत्रकार भवन, पुणे येथे प्रविणकुमार शेंडे ह्या संमोहनतज्ज्ञाने माझ्यावरच केला हो. :(

च्यामारी, काहीतरी "शरीर जड होतंय, लोखंडाच्या कांबीसारखं टणक होतंय" वगैरे म्हणत म्हणत मला सुन्न केलं आणि दोन खुर्च्यांवर झोपवलं, मग कोणाला तरी माझ्या पोटावर उभं केलं..मला त्या माणसाच्या मोज्यांचा वासही व्यवस्थित येत होता. माझ्यासोबत कार्यक्रमाला जी मैत्रिण आली होती तीचं "आईशप्पथ!" असं म्हणलेलंही मी स्पष्ट ऐकलं.. म्हणजे संमोहनात माणसाला काहीच कळत नाही वगैरे खोटं असावं असं मी स्वानुभवावरुन म्हणु शकतो.

पण मी काडीपैलवान असुनही तो माणुस माझ्या पोटावर (मी मानेपासुन खाली ते घोट्यापर्यंत अधांतरी होतो) कसा ऊभा राहिला ते ठाऊक नाही. :)

जे.पी.मॉर्गन's picture

14 Jul 2010 - 6:03 pm | जे.पी.मॉर्गन

... पण मैत्रिणीला जादुचे प्रयोग दाखवायला नेण्याची कल्पना आवडली ;)

वेळीच सुचली असती तर... :? ... असो

जे पी

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 6:13 pm | धमाल मुलगा

=))

जे.पी. ... _/\_
तसं काही नाही बरं का. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2010 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार

मॉर्गन शेठ जादु नाही हो, संमोहन संमोहन ;)

'जादुचे' प्रयोग दाखवायला तो काय हृतीक आहे का ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
तर... च्या पुढचा कल्पनाविस्तार लिहा की अंमळ!

अदिती

एक's picture

15 Jul 2010 - 2:47 am | एक

एक ("काडी पैलवान") माणूस दुसर्‍या माणसाचं वजन सहज पेलू शकतो.. हेच तर नव्हतं ना दाखवायचं ? (किंवा सुचवायचं होतं? ) ;) ;)

धमाल मुलगा's picture

15 Jul 2010 - 7:51 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
वाक्य रिफ्रेज कर..वाक्य रिफ्रेज कर...भलताच अर्थ निघतोय. :P

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Jul 2010 - 6:52 pm | घाशीराम कोतवाल १.२

@) मायला संमोहन हा लय भारी प्रकार आहे राव @)

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

कवितानागेश's picture

14 Jul 2010 - 10:43 am | कवितानागेश

संमोहनाबद्दल अनेक गैरसमज आहेत.
पण ते अतिशय उपकारक शास्त्र आहे.
कुणाला खरोखरंच माहिती हवी असल्यास श्री. मनोहर नाईकांची पुस्तके वाचा, कार्यक्रम पहा.
उपचार करुन घ्यायचे असल्यास माझ्याकडे या!
============
माउ

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2010 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

च्यायला कुणाला खरोखरंच माहिती हवी असल्यास श्री. मनोहर नाईकांची पुस्तके वाचायची, कार्यक्रम पहायचे आणि
उपचार करुन घ्यायचे असल्यास मात्र तुमच्याकडे यायचे ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

कवितानागेश's picture

14 Jul 2010 - 4:21 pm | कवितानागेश

ते करत नाहित उपचार आता...,
फक्त शिकवतात, कार्यक्रम करतात, प्रसार करतात .
उपचारासाठी इतरांकडे (त्यांच्याकडून शिकलेल्यांकडे किंवा अजून कुणाही एम्.डी. कडे/ हल्ली अजून बरेच शिकवणारे आहेत,... त्यांच्याकडे) पाठवतात.
हसून लोळण्यासारखे काय त्याच्यात?
============
>:D< माउ

पुष्करिणी's picture

15 Jul 2010 - 1:32 am | पुष्करिणी

अहो माउ, तुम्ही या विषयात एम.डी. केलय तर थोडं विस्तारानं लिहा ना इथे...
आत्ता उपचाराची गरज नाहीये पण खूप उत्सुकता आहे..
पुष्करिणी

कवितानागेश's picture

15 Jul 2010 - 9:57 am | कवितानागेश

१. मी एम्.डी. नाही.
२. संमोहनाचे 'उपचार' म्हणून उप्योग नक्कि करत येतात.
उदहरणार्थः एखाद्याला बधीर करणार्या औषधांची अलर्जी असेल, किंवा रक्तस्त्राव फार होउन चालणार नसेल तर त्याला सम्मोहनानी बधीर करुन, दात काढणे, रक्त थाम्बणे, इ. गोष्टी करता येतात.
पण या गोष्टी अजुनही 'प्रयोग' याच पातळीवर आहेत.
कारण लोकांमध्ये प्रचंड भिती आहे.......
इथे ती मला स्पष्ट दिसतेय, म्हणूनच फार लिहित नाहीये..
..कुणाला खरोखरच माहिती हवी असेल, आणी वितंडवाद न घालता चर्चा करयची असेल, तर मला इमेल करा.
============
माउ

अर्धवटराव's picture

16 Jul 2010 - 1:33 am | अर्धवटराव

या विषयी मला अधीक जाणून घ्यायचे आहे... आपल्याला कुठल्या आयडी वर मेल टाकु ??

(संमोहीत) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2010 - 12:23 pm | प्रकाश घाटपांडे

मनोहर नाईकांचा प्रयोग खुप पुर्वी पाहिला होता. मनोरंजन झाले इतकेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भाऊ पाटील's picture

14 Jul 2010 - 1:15 pm | भाऊ पाटील

घाटपांडे काका,
तुमच्याकडून अधिक सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे. अंनिस मुळे तुमचा ह्याच्याशी कधीतरी सम्बन्ध आला असण्याची शक्यता आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2010 - 1:42 pm | प्रकाश घाटपांडे

भुरळ पडल्यामुळे एखाद्याच्या मागे जाउन तो सांगेल तसे ती व्यक्ती करते व आपले दागदागिने हवाली करते व नंतर भानावर आल्यावर त्या व्यक्तिला काही आठवत नाही . अशा व्यक्तिकडे संमोहनाची पॉवर असते अशी अंधश्रद्धा खुप लोकात पसरलेली असल्याने त्याला आम्ही मनोहर नाईकांचा प्रयोग जरुर पहा असे सांगत असु. प्रयोगात संमोहनाचे गैरसमज दूर केले आहेत. नाईक म्हणत कि असे असते तर एखाद्या कोट्याधिशाला संमोहित करुन आम्ही पैसे कमावले असते. त्या व्यक्तिची संमोहित होण्याची मानसिक तयारी असेल तरच संमोहित होता येते. तसेच विक माईंडेड लोक चटकन संमोहित होतात हा मोठा गैरसमज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंनिसत हा विषय मर्यादासह मांडला जातो. अ भा अंनिस चे श्याम मानव आता संमोहनाच्या आधारे बुवाबाजीच करतात असे माझे म्हणणे आहे.
( दाभोलकर गटातला)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भाऊ पाटील's picture

14 Jul 2010 - 3:23 pm | भाऊ पाटील

धन्यवाद...रोचक प्रतिसाद.

( दाभोलकर गटातला)..... ;)

प्रियाली's picture

14 Jul 2010 - 4:32 pm | प्रियाली

मनोहर नाईक आमच्या शाळेत होते. त्यांचे कार्यक्रम अनेकदा पाहिले आहेत. ते कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न करत. त्या काहींपैकी मोजकेच संमोहित होत. प्रश्नांची उत्तरे नाईकांनी टाकलेल्या फाशांप्रमाणे येत.

उदा. (उदाहरण जसेच्या तसे नाही)

नाईकः "त्या कमळाच्या फुलात एक हिरा आहे. तो तुला दिसतो का?"
संमोहितः "हो"
नाईकः "त्या हिर्‍यावर एका पत्त्याचे प्रतिबिंब दिसते. तो कोणता पत्ता?"
संमोहितः "अं....अं....अं चौकट दस्शी"
नाईकः "नीट बघ बघू. किल्वर नव्वी तर नव्हे."
संमोहितः "किल्वर नव्वीच."

असो. नाईकांचे संमोहन असे चालते असे सांगण्याचा हेतू नाही पण ही घटना ध्यानात आहे.

बिका, तू नाही ना कधी उभा राहीला होतास नायकांचा क्यान्डीडेट म्हणून. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2010 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाईकः "त्या कमळाच्या फुलात एक हिरा आहे. तो तुला दिसतो का?"
संमोहितः "हो"
नाईकः "त्या हिर्‍यावर एका पत्त्याचे प्रतिबिंब दिसते. तो कोणता पत्ता?"
संमोहितः "अं....अं....अं चौकट दस्शी"
नाईकः "नीट बघ बघू. किल्वर नव्वी तर नव्हे."
संमोहितः "किल्वर नव्वीच."

हाहाहा हे भारी आहे...! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jul 2010 - 11:38 pm | बिपिन कार्यकर्ते

बिका, तू नाही ना कधी उभा राहीला होतास नायकांचा क्यान्डीडेट म्हणून.

हॅहॅहॅ!!! न्हायी ब्वॉ... पण त्यांच्या संमोहन करिअरच्या सुरूवातीच्या काळात ते शाळेतच बरेच वेळा असली काही लेक्चर्स द्यायचे ते आठवते आहे.

बिपिन कार्यकर्ते

टिउ's picture

15 Jul 2010 - 12:30 am | टिउ

ही कुठली शाळा? नाईक कुठ्ल्याश्या कॉलेजात प्राध्यापक होते असा माझा समज होता. वसईला बहुदा. आमचे एक परिचीत त्या कॉलेजमधेच होते त्यांच्याकडे नाईकांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक होतं असं आठवतंय. संपूर्ण स्टाफला त्यांनी अशी स्वाक्षरी केलेली पुस्तकं दिली होती असं ऐकल्याचंही अंधुकसं आठवतंय.
मी त्यावेळी लहान होतो त्यामुळे आठवण चुकीची असल्याची शक्यता आहे.

बाकी नाईकांचा कार्यक्रम लहानपणी बघितलाय. मजा वाटली होती. बरेच जण संमोहीत झाले होते, काही नव्ह्ते...उरलेले संमोहीत झाल्याचं नाटक करत होते. त्यांना नाईकांनी परत प्रेक्षकांत पाठवुन दिलं होतं...

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 12:36 am | प्रियाली

नाईक गोरेगावला नंदादीप विद्यालयात ऑफिसात कार्यरत होते. ते शिक्षक नव्हते. अनेक वर्षे नोकरीत होते, नंतर ते नोकरी सोडून संमोहनाचे कार्यक्रम वगैरेच करू लागले असे वाटते. प्राध्यापकीशी त्यांचा संबंध नसावा.

बरेच जण संमोहीत झाले होते, काही नव्ह्ते...उरलेले संमोहीत झाल्याचं नाटक करत होते. त्यांना नाईकांनी परत प्रेक्षकांत पाठवुन दिलं होतं...

हे मलाही आठवते. ;) आम्ही त्यांचे कार्यक्रम दरवर्षीच बघायचो.

कवितानागेश's picture

14 Jul 2010 - 3:26 pm | कवितानागेश

संमोहन हे 'शास्त्र' च आहे.
जगभरातले एम्.डी. मानसोपचार तज्ञ हे शास्त्र वापरतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी कायम जागी असते, गाढ झोपेत आणी स्वप्नात सुद्धा...
त्यामुळी कोणीही आपल्या इच्छेविरुद्ध काहिही करुन घेउ शकत नाही.
'पैसे लुटले' वगरे म्हणणरे लोक एक्तर थापा मारतात, किन्वा दुसर्या एखाद्या ड्रगच्या वासानी वगरे, त्याना तात्पुरते 'डल' करुन कुणीतरी 'लोचा' केलेला असतो.
खरे तर माणूस जितका शांत, आशावादी, पॉजिटिव, तेवढा सहज संमोहित होउन त्याचा चाम्गला उपयोग करुन घेतो...
'मेन्दूत चिवचिवाट' जितका जास्त, तितका संमोहित व्यायला जास्त त्रास!
अवांतरः श्याम मानवांना बुवाबाजीपुरते सुद्धा संमोहन येत नाही, असे माझे परखड मत आहे!
============
माउ

घाटावरचे भट's picture

14 Jul 2010 - 4:28 pm | घाटावरचे भट

>>'मेन्दूत चिवचिवाट' जितका जास्त, तितका संमोहित व्यायला जास्त त्रास!

च्यामायला असलं संमोहन? अवघडाय बॉ.... ;)

मनीषा's picture

14 Jul 2010 - 4:33 pm | मनीषा

खरे तर माणूस जितका शांत, आशावादी, पॉजिटिव, तेवढा सहज संमोहित होउन त्याचा चाम्गला उपयोग करुन घेतो...
'मेन्दूत चिवचिवाट' जितका जास्त, तितका संमोहित व्हायला जास्त
त्रास!

???

मी असे ऐकले आहे कि माणूस जितका शांत , आशावादी तितकी त्याची मनःशक्ती प्रखर आणि अशा व्यक्तीवर संमोहनाचा प्रयोग अवघड अथवा अशक्य होतो.
तेच चंचल मनोवृत्ती आणि वैचारिक गोंधळ असलेल्या माणसांची मनःशक्ती कमकुवत असते आणि अशा व्यक्ती लवकर आणि सहजपणे संमोहित होतात ..

( ही सगळी ऐकीव माहीती.. कितपत खरी आहे माहीत नाही .)

*** अर्थात संमोहन शास्त्रावर( आणि विशेषतः सामुदायिक संमोहनाच्या प्रयोगांवर) माझा फारसा विश्वास नाही ..

नेत्रेश's picture

15 Jul 2010 - 7:40 am | नेत्रेश

'माणुस जेवढा चंचल तेवढा संमोहीत व्हायला कठीण' असे वाचले आहे आणी संमोहन तज्ञांकडुन ऐकले आहे.

योगी९००'s picture

14 Jul 2010 - 4:43 pm | योगी९००

माऊ

'मेन्दूत चिवचिवाट' जितका जास्त, तितका संमोहित व्यायला जास्त त्रास!

आणि मेंदूत म्यावम्याव असेल तर?

खादाडमाऊ

योगी९००'s picture

14 Jul 2010 - 4:34 pm | योगी९००

संमोहित माणूस आपल्या पुर्वीच्या जन्माबद्दल सांगू शकेल काय?

मध्यंतरी असा कोठला तरी Reality(??) show या विषयावर होता. उत्तम अभिनय कसा करावा हे या शोमुळे लोकांना कळले.

खादाडमाऊ

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 4:55 pm | धमाल मुलगा

>>मध्यंतरी असा कोठला तरी Reality(??) show या विषयावर होता.
Un-Reality असं म्हणुया का? ;)

कस्सला बळंच होता राव तो शो! एकेकजण यायचा आणि बोंबलायला रामसेच्या श्टोर्‍याच ऐकवायचे!

एका टिव्ही सिरियल्स लाईनमध्ये काम करणार्‍या मित्रानं सांगितलं की त्या लोकांना स्क्रिप्ट्स द्यायचे आणि तीच पोपटपंची करायला लावायचे. =))

अवांतरः सहजच विचार आला, अशा शोमध्ये त्या डॉक्टर/तांत्रिक/मांत्रिक्/बुवा जो कोणी असेल त्यानं मस्त लाईव्ह शोमध्ये एखाद्याला संमोहित केलं आणि विचारलं, "सांग बाबा, गेल्या जन्मी तू कोण होतास?"
आणि ह्या गड्यानं पच्चकन उत्तर दिलं, "मी गेल्या जन्मी डुक्कर होतो.." तर काय भारी मजा येईल राव :D त्या तथाकथीत संमोहन करणार्‍याच्या तोंडावर काय एक्स्प्रेशन्स येतील!

शुचि's picture

14 Jul 2010 - 6:46 pm | शुचि

राझ पीछले जनम का

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विजुभाऊ's picture

14 Jul 2010 - 4:42 pm | विजुभाऊ

संमोहित माणूस आपल्या पुर्वीच्या जन्माबद्दल सांगू शकेल काय?.
अशक्य... माणसाला जे ठाऊक असते तेच तो सांगु शकतो. फार तर जे ठाऊक असते त्याची परमिटेशन & कॉम्बीनेशन्स.
पूर्वजन्मी तो कोण होता हे सांगणारे बहुतेकजण त्यांच्या पूर्वजन्मात मानवच असतात. ( स्त्री असेल तर पूर्वजन्मातही ते स्त्रीच असतात हा आणखी घडवून आणलेला योगायोग)
आत्तापर्यन्त कोणीच पूर्वजन्मात देवीचा व्हायरस , झुरळ किंवा अगदी पेन्ग्वीन वगैरे असल्याचे साम्गितलेले अजूनतरी ऐकीवात नाहिय्ये

पुष्करिणी's picture

15 Jul 2010 - 1:39 am | पुष्करिणी

>>स्त्री असेल तर पूर्वजन्मातही ते स्त्रीच असतात

असं काही नाही ,सलिना जेटली मागच्या च्या मागच्या जन्मी महयुद्दात भाग घेतलेली जर्मन सैनिक होती ...असं तिनच 'राझ पिछले जनम का' मधे संमोहित झाल्यावर सांगितलं होत.......

पुष्करिणी

सहज's picture

14 Jul 2010 - 4:44 pm | सहज

संमोहनाने मागचे जन्म, मागच्या जन्मात मृत्यु कसा झाला हे पण कळते. आहात कुठे टिव्ही बघता ना?

जोक्स अपार्ट धमु सारखे पहीलवान देखील हा प्रयोग करु शकले यावर अजुन काय संमोहन नाही पण फिजिक्स आहे हे सांगायचे.

बाकी ख्रिस एजंलच्या कार्यक्रमाविषयी बोलायचे तर तो एक शो आहे. निवडक प्रेक्षकांवर केलेला. अहो अमेरिकेत मानसीक त्रास झाला तर दावे गुदरतात (आधीक माहीतीकरता भेटा मिभोकाका) तुम्ही पाहीलेल्या चित्रफीतीत वेटर धाडकन कोसळला तर तो काय सोडणार आहे होय. वेटर त्याचे काम सोडून ऐकत बसला होता का कार्यक्रम तरी तो फटकन पडला म्हणजे तो एकतर अफलातून केस असेल, त्याला गोळी घातली असेल किंवा .... बरोबर पेड एक्टर असेल. ड्रामॅटीक इफेक्ट येतो हो. जर आपल्या प्रयोगाशी संबध नसलेला माणुस बळी पडला तर त्याला लागले खुपले नाही हे बघायला एजंल व त्यांच्या टिम मधले लोक जातील ना बघायला.

भाऊ पाटील's picture

14 Jul 2010 - 5:16 pm | भाऊ पाटील

तसा संशय आला होताच मलाहि...म्हणूनच विचारले की हा प्रकार बनावट असतो का काय ते.

सूर्यपुत्र's picture

14 Jul 2010 - 5:54 pm | सूर्यपुत्र

डॉ. प. वि. वर्तक यान्चे या विषयावर पुस्तक आहे.

तसेच एका माणसाने संमोहनाद्वारे त्याच्या पेशन्ट्चे पूर्वजन्म आठवायला लावले होते. त्या पुस्तकाचे Many Lives, Many Master असे काहीसे नाव आहे.

-ध्येयहीन

अर्धवटराव's picture

14 Jul 2010 - 10:19 pm | अर्धवटराव

आता पब्लीक वर्तकांवर सुटतील =))

(मागचे सगळे जन्म आठवणारा पण काल-परवाची गोष्ट विसरलेला) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

अशोक पतिल's picture

14 Jul 2010 - 10:46 pm | अशोक पतिल

अहो वर्तकांचे पुस्तक काही वर्षापुर्वी मी पण वाचले होते. त्या पुस्तकात वर्तक मगळ , गुरु ग्रहावर जावुन आल्याचे वर्णन होते. संमोहन शास्त्रावर माझा विश्वास आहे, ते एक शास्त्र च आहे.

Nile's picture

14 Jul 2010 - 11:16 pm | Nile

फिस्कटला टेंपोत.. =)) =))

लोक कायच्याकाय लिहतात, वाचतात अन त्यावर विश्वास पण ठेवतात राव!

-Nile

fgf
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

भाऊ पाटील's picture

15 Jul 2010 - 1:12 pm | भाऊ पाटील

बरेचसे प्रतिसाद माहितीपूर्ण होते. काही शंका फिटल्या, काही नवीन निर्माण झाल्या. ;)
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.