तिसर्‍या (शिवल्या)

जागु's picture
जागु in पाककृती
2 Jul 2010 - 1:03 pm

लागणारे साहित्य:
तिसर्‍या (शिवल्या) १ ते २ वाटे
लसुण पाकळ्य ४-५
१ मोठा कांदा चिरुन
आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.
अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चविपुरते मिठ
अर्धा ते १ चमचा गरम मसाला.

पाककृती:
पहिला तिसर्‍या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्‍या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत.

उकळी आणल्यावर तिसर्‍या सुट्ट्या होतात. मग त्यातील ज्याला तिसरीचे गर आहे अशी शिंपली घ्यायची व दुसरी काढुन टाकायची.

http://farm5.static.flickr.com/4116/4754440150_0d68f7caee_m.jpg

आता पातेल्यात किंवा कढईत तेलावर लसणाची फोडणी द्यायची व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळायचा. मग त्यावर आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, तिसर्‍या घालाव्या. जे तिसर्‍या उकडलेले पाणी असते त्यातलेच थोडेसे पाणी ह्यात घालावे. जर रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचे. थोडावेळ वाफेवर ठेउन मग त्यात कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला व मिठ घालायचे. परत थोडावेळ वाफ देउन गॅस बंद करावा. ह्या शिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते.

तिसर्‍यांचे सुके.

अधिक टिपा :
* ह्या न उकडता विळीवर मधुन कापुन दोन शिंपल्या बाजुला करता येतात. त्यामुळे उकडल्यावर जे पाणी फु़कट जाते ते जात नाही कारण त्यात तिसर्‍यांचा रस उतरलेला असतो. पण हे कापायला वेळ लागतो म्हणून बहुतेक जण उकडूनच करतात.

* ह्यात आंबट घालण्याची तशी गरज नसते. पण जर आवडत असेल तर एखादा टोमॅटो घालावा.

* ह्याच प्रकाराने रस्साही करता येतो. रश्यामध्ये तिसर्‍या उकडलेले जे पाणी असते तेच वापरायचे.

प्रतिक्रिया

गणपा's picture

2 Jul 2010 - 1:12 pm | गणपा

दुबईला असताना आम्ही तिसर्‍या पकडायला जायचो. मस्त पिशव्या भरभरुन शिवल्या आणायचो. मग ३ दिवस नुसत्या शिवल्या आणि शिवल्याच. मी शिवल्यांच कालवण करायचो नी माझा गोवन मित्र शिवल्यांच सुक करायचा पण त्यात भरपुर खिसलेले खोबर असायच.

मला आत्ता शिवल्या पायजेत :''(

संदीप चित्रे's picture

2 Jul 2010 - 7:46 pm | संदीप चित्रे

मलाही ! मलाही !!
आईच्या हातच्या तिसर्‍यांची आठवण आलीय :)

सहज's picture

2 Jul 2010 - 3:25 pm | सहज

जबरी!

:-)

आंबोळी's picture

2 Jul 2010 - 3:29 pm | आंबोळी

मला पण अत्ता तिसर्‍या पायजेत....

आंबोळी

वेताळ's picture

2 Jul 2010 - 5:09 pm | वेताळ

म्हणजे शिंपलेच ना? ह्यात सगळे शिंपले खाण्यायोग्य असतात का? त्याचे काही वर्गीकरण आहे का?समुद्राच्या काठाला असे शिंपले खुप सापडतात ते खाल्ले तर चालतात का?
वेताळ

सुनील's picture

2 Jul 2010 - 5:25 pm | सुनील

समुद्राच्या काठाला असे शिंपले खुप सापडतात ते खाल्ले तर चालतात का

जरूर खा! भरपूर कॅल्शियम मिळेल! ;)

(पुलंच्या शब्दात सांगायचं तर, तुम्ही अभागी शाकाहारी समाजातील दिसताहात!)

(भाग्यवान मत्साहारी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती's picture

2 Jul 2010 - 9:22 pm | रेवती

तुम्ही अभागी शाकाहारी समाजातील दिसताहात
अशी वाक्ये कारणीभूत असतात वाद सुरु करायला.
मग संपादक आहेतच निस्तरायला.
त्यावर पुन्हा पु. ल. असे म्हणून गेले हे सांगू नका.

रेवती

सुनील's picture

2 Jul 2010 - 5:21 pm | सुनील

बोंबिल झाले. मग चिंबोर्‍या झाल्या. आणि आता तिसर्‍या! काय त्रास आहे नुसता! ;)

अशा रेसिप्या वाचून मग भेंडीची भाजी खायची तर, ती जास्तच मिळमिळीत लागणार!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभो's picture

2 Jul 2010 - 7:02 pm | प्रभो

जबरदस्त!!!

दिपाली पाटिल's picture

2 Jul 2010 - 8:20 pm | दिपाली पाटिल

छान, इकडे अमेरिकेत काही एवढ्या फ्रेश शिवल्या तर नाही मिळणार पण नक्की करणार, शिवल्या/शिंपल्या माझ्या "childhood fantasy" आहेत म्हटलं तरी चालेल कारण माझी आई शिवल्या कधीच बनवत नाही. कधीपासून शोधत होती ही पाकृ...या शिंपल्यांना खूप वास येतो ना...

दिपाली :)

चतुरंग's picture

2 Jul 2010 - 10:33 pm | चतुरंग

असताना कोकणात अगदी ताज्याताज्या तिसर्‍या खाल्ल्याची आठवण ताजी आहे. फारच मस्त लागतात. ओरपून ओरपून खाल्ल्या होत्या! :)

चतुरंग

जागु's picture

2 Jul 2010 - 11:03 pm | जागु

गणपा, संदीप, सहज, आंबोळी, वेताळ, सुनिल, रेवती, पंगा, प्रभो, दिपाली चतुरंग सगळ्यांना धन्यवाद.

वेताळ, ह्या शिंपल्यांमध्ये जिव असतो. समुद्राकाठी पडालेल्या असलेल्या शिंपल्यांत काही नसत. हे समुद्राच्या आत मिळतात. ह्यात एक खुब्याचा प्रकार असतो. तो खाडीच्या लगतच्या चिखलात मिळतो.
दिपाली जर ताज्या असतील तर नाही येत वास.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jul 2010 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिल्या आणि दुसर्‍याचीही लिंक द्याल का? ;-)

अदिती

जागु's picture

4 Jul 2010 - 10:22 pm | जागु

आदिती वरील फोटो पहा. पहील्या अख्या, दुसर्‍या उकडलेल्या आणी तिसर्‍या तयार सुके.

टारझन's picture

4 Jul 2010 - 10:42 pm | टारझन

जागु ताई , तुमचे सगळे लेख चाळले ... क्या बात है !!
इतर वेळी पाककृती पाहातो त्यात आपण नेहमी करतो तेच माहिती असलेले पदार्थ माहिती असलेल्याच पद्धतीने कसे करावेत हे सांगितलेलं असतं ..
पण तुमचं "सुना भी पेहले .. देखा भी पेहले" असतं ..
मौलिक खाद्यमाहिती बद्दल आपले आभारी आहे टारझन मित्र मंडळ :)

मी मागे एकदा भेळ ची पाककृती दिली होती , आमचा तेवढाच अवाका आहे :)

जागु's picture

4 Jul 2010 - 10:58 pm | जागु

टारझन आपल्या मित्रमंडळाची मी आभारी आहे.

तुमची भेळ मी परत चाळते आता.