आयच्या गावात कटकट !!!

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
23 Jun 2010 - 10:15 am
गाभा: 

णमस्कार्स लोक्स ,

आज सकाळी उठल्याउठल्या णेहमीप्रमाणे पहिलं काम, मेलबॉक्स खोलला. (२५ नव्या मेल्स). त्यातल्या स्पॅमछाप १५ मेल्स ओपन न करता डिलीट मारल्या. काही फेसबुक अपडेट्स काही जॉब मेल्स पाहुन डिलीट मारल्यावर एक मेल उरला. एका इंजिनियरींग च्या मित्राचा होता. त्यात सात आठ फॉरवर्ड्स दिसले. मेल ओपन केली आणि डोका आउट झाला. त्यात साई बाबांची २ चित्र लावली होती, आणि काही तरी बिण्डोक मजकुर लिहीला होता. समथिंग लाईक "तुमच्या १५ मित्रांना फॉरवर्ड करा , गुडलक तुम्हाला फॉलो करेल. आमक्या ढमक्यानं केलं न त्याला त्या दिवषी संध्याकाळी २ करोड ची लॉटरी लागली. अजुन अशीच काही उदाहरणं.
आणि शेवटी भडक लाल अक्षरात बोल्ड फाँट मधे .... डिलीट करु नका ... नाही तर अभद्र होईल... पुन्हा आलान्या-फलान्याचं उदाहरण, एकानं डिलीट केलं त्याचा बिझनेस बुडाला ..."
अशाच प्रकारचे अजुन काही वेगळे मेल. मग कधी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन तर्फे मेल फॉरवर्ड केल्यावर डॉलर्स अकाउंट्स ट्राण्सफर करायच्या बाता , तर कधी गुडलक साठी वेगवेगळे देव .... जमाणा बदलला साला , मी शाळेत असताना अशीच संतोषी मातेच्या नावानं लिहीलेलं पत्र यायची (कधी कोण बिण्डोक शाळेतंच हातोहात द्यायचा)

मला नेहमी विचार करतो , चला त्यावेळी लहान होतं पब्लिक असतो खुळेपणा एकेकात ! पण आजंही ? आपले मेंदु गहाण टाकतात का ही लोकं ? च्यायला ! कोणता बावळट मेल फॉरवर्ड केल्यामे नशिब फळफळत नसतं , तर ज्यांना फॉरवर्ड केलंय त्यांच्या कडुन आपल्या मेंदुची दिवाळखोरी मात्र शिक्कामोर्तब होते. इकडे कोणी अशा प्रकारचे ग्रेट कारणामे करणारे आहेत काय ? असल्यास ते असल्या मेल्स फॉरवर्ड करताणा कोणता विचार करतात ? त्यांनी आमच्यासारख्यांची तमा न बाळगता खुलेआम लिहावं बिण्धास्त. माझा असा अनुभव आहे त्यांनी जर स्पष्ट लिहीलं तर त्यांना २ करोडाची लॉटरी लागेल नाही लिहीलं तर बॅडलक विल फॉलो यु अँड यु कुड लुज युवर जॉब ..

बाकी अशा बल्क फॉरवर्ड मेल आल्या की मी सरळ रिप्लाय टु ऑल करतो , आणि मैत्रीचे संबंध क्षणभर बाजुला ठेऊन स्पष्ट शब्दांत तासतो. हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको :)

- टारझन@जंगलबुक.कॉम

प्रतिक्रिया

डिलीट करु नका ... नाही तर अभद्र होईल.. हा बॅनर वापरायला सुरुवात कर आता.

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=))
=))
=))
=))
=))
=))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jun 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> बाकी अशा बल्क फॉरवर्ड मेल आल्या की मी सरळ रिप्लाय टु ऑल करतो , आणि मैत्रीचे संबंध क्षणभर बाजुला ठेऊन स्पष्ट शब्दांत तासतो. हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको <<

असाच पण फक्त व्यक्तीगत प्रतिसाद आम्ही आमचे एकेकाळचे सुहृद श्री. **** यांना दिला होता; तेव्हा त्यांनी शहाजोगपणे "एक इमेल डिलीट करायला तुला किती वेळ लागतो? मिपाचं पान तर तू मिनीटातून दोनदा रेफ्रेश करतेस ना!" असं उत्तर दिलं होतं. अर्थातच मी त्यांना जीमेलवरून ब्लॉक केलं तर म्हणे हे पैलवान बराच काळ डिप्रेस होऊन रा.रा. कार्यकर्ते यांच्यासमोर रडत होते.

असो. कधी कधी बाळंही थोडी(तरी) मोठी होतात तर!

अदिती

पांचट फॉर्वर्ड **** करणार। भक्कम बँडविड्थचा त्याला आधार।
मला त्याचा राग येणार। भडका उडणार निश्चित॥
॥ इति इमेलयुजर महावाक्यम्॥

II विकास II's picture

23 Jun 2010 - 2:26 pm | II विकास II

>>अर्थातच मी त्यांना जीमेलवरून ब्लॉक केलं तर म्हणे हे पैलवान बराच काळ डिप्रेस होऊन रा.रा. कार्यकर्ते यांच्यासमोर रडत होते.

सहाजिकच आहे. जो माणुस असले इ-मेल पाठवुन नशीव सुधरायची आशा करतो, तो दिप्रेस होउन रडेलच ना.

असो. कधी कधी बाळंही थोडी(तरी) मोठी होतात तर!
== हे वाक्य जास्त महत्वाचे आहे.

टारझन's picture

23 Jun 2010 - 1:08 pm | टारझन

हा हा हा !! भारी किस्सा !!
असाच एक किस्सा माझ्या सोबत घडला होता. आमचा पण एके काळचा मित्र होता (ए कोण केकलला रे मैत्रिण म्हणुन ? मित्रंच होता ... ) हा मित्र बाकी वेळी आम्हाला फार ग्रांटेड घ्यायचा .. अगदी "** ** " वगैरे पासुन सोज्वळ शब्दांचा आम्ही अगदी आपुलकीने स्विकार करायचो .. मैत्रीत चलता है म्हणुन :)
एकदा काय झालं , आमच्या ल्यापटॉपात व्हायरस आला , आणि एके दिवशी माझ्या टोटल काँटॅक्ट्स ना स्पॅम फॉरवर्ड झाल्या .... बर्‍याच जणांनी मला विचारलं काय रे हे ? म्हंटलं लेकांनो ... चुकुन झालंय ते ... व्हायरस आहे ल्यापटॉपात ... बाकी सगळ्या मित्रांना हे कळलं .. पण एक मित्र काय अचानक हायपर झाला ... (तसा तो सदान कदा हायपर असायचा म्हणा) त्याला समजावला ठिक भाषेत , तरी चालुच .. ज्यामायला .. मग म्हंटलं .. दिवसभर फुकाचा पगार घेउन खुर्च्या उबवतंच असतोस की ... एखाद डिलीट चं बटण दाब की .. मी काय तुला स्वःता मेल फॉरवर्ड केलीये का ? =)) ह्यावेळी चांगल्याच मिर्‍या झोंबल्या त्याला =)) म्हणतो कसा ... "मी तुला ब्लॉक करिन " म्हंटलं "गो अहेड " हुषार्‍या कोणाला बॉ ? =)) नंतर मी सुद्धा बिकांना झाला प्रकार सांगितला होता , हा योगायोग , आणि हो ... लै जोरात (आणंदात) रडलो मी त्या दिवशी ...

बाकी देवानं त्या मित्राला "श्याणं" केलेलं दिसत नाही ..येडंचे ते अजुन .. त्याला फॉरवर्डेड मेल्स आणि ऑटोजनरेटेड मेल्स मधला किमान फरक कळण्याची बुद्धी येवो हिच प्रार्थणा :) एखाद दिवशी चुकुन मेल फॉरवर्ड केल्यामुळे असा चमत्कार झाला तर खरंच खुप मज्जा येईल न?

असो ... आपल्या प्रतिसादामुळे आठवणी जाग्या झाल्या , धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

23 Jun 2010 - 1:39 pm | राजेश घासकडवी

एकंदरीत टारझन व अदितीचे किस्से वाचून दोघांनाही आपापले नको असलेले मित्र गमवायची संधी मिळाली हे दिसलं. तीसुद्धा या इमेली फॉरवर्ड केल्यापासून काही दिवसात! म्हणजे चांगले अनुभव येण्याचं भाकीत खरं ठरतं तर!

आणि हो ... लै जोरात (आणंदात) रडलो मी त्या दिवशी ...

हे कोल्हापुरी 'आणि हो' की नुसतंच?
पुरुष रडत नाहीत असं कोणीतरी नुकतंच म्हटल्याचं आठवतं... नाव आठवत नाही, पण काही वेदना घेऊन सतत (न रडता!) वावरत असावेत असं काहीसं स्मरतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jun 2010 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश, फरक आहे; नको असलेले मित्र कधीच नसतात. लिस्टमधे असलेले काही नकोसे का होतात त्याचा किस्सा मी लिहीलेला आहे.
असो.

अदिती
(अधिक माहितीसाठी रा.रा.कार्यकर्तेंना इमेल करा.)

राजेश घासकडवी's picture

23 Jun 2010 - 2:10 pm | राजेश घासकडवी

टारझन यांचा वरील प्रतिसाद संपादित होऊन बदललेला आहे. एका त्याज्य शब्दप्रयोगाच्या जागी "** **" आलेलं आहे. माझ्या मते ते योग्य संपादन असलं तरी ते कोणी केलं व का केलं याची नोंद यावी. हे स्वसंपादन असलं तरी तसं लिहिलं जावं.

प्रक्रियेत पारदर्शकता हवी.

आंबोळी's picture

23 Jun 2010 - 2:16 pm | आंबोळी

ते कोणी केलं व का केलं याची नोंद यावी
सहमत.
आम्हीही आमच्या नुकत्याच उडालेल्या धाग्याच्या नोंदीच्या प्रतिक्षेत आहे.

आंबोळी

II विकास II's picture

23 Jun 2010 - 2:24 pm | II विकास II

"** **"

एक चांदणी जास्त झाली त्याचे पण स्प्ष्टीकरण यावे.

सहज's picture

23 Jun 2010 - 10:35 am | सहज

टारझनशी सहमत आहे.

पण याचे अजुन एक रुप असे आहे की हा तुझा लेख देखील जसाच्या तसा दणादणा फॉर्वर्ड होउ लागेल की तुम्हाला कधी असे विरोप आले तर असे असे उत्तर द्या.

एकंदर फॉर्वर्ड तसेच मास इमेलला कडक नियम केले पाहीजेत!

शेखर's picture

23 Jun 2010 - 10:58 am | शेखर

बहुतेक तु साईबाबांच्या मेल डिलीट करतोस की काय त्यामुळे तुझे प्रतिसाद डिलीट होत असावेत अशी एक शंका आली. :)

शानबा५१२'s picture

23 Jun 2010 - 11:21 am | शानबा५१२

काही कांरणांमुळे मीच प्रकाटाआ.

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

II विकास II's picture

23 Jun 2010 - 11:12 am | II विकास II

ते इ-मेल डिलिट करण्या ऐवजी मिपावर टाक, म्हणजे जिततके जास्त लोक वाचतील तितके पुण्य तुला मिळेल. आणि जर लेख उडवला गेला तर पाप पण दुसर्‍याला लागेल.

:D

आंबोळी's picture

23 Jun 2010 - 11:22 am | आंबोळी

खरच लै डोकं फिरत असले मेल बघुन....
पण पब्लिक पण लै घाबरट असतं लक च्या नावाखाली कशालाही घाबरत.
यावरून एक होस्टेलवरचा किस्सा आठवला....

होस्टेलमधे आमच्या मजल्यावर तेलगू पब्लिकचा लै भरणा होता... हे पब्लिक लक खराब होइल वगैरे प्रकारला लै घाबरत...
तर होस्टेलच्या बाथरूम मधे आम्ही एका मासिकात आलेला एक उत्तान फोटो चिकटवला होता.... परिक्षेच्याकाळात पहिल्या पेपरच्या दिवशी माझा रुमपार्टन गमतीने त्यातल्या २-३ तेलगू पबलिकला म्हणाला ,"बाथरुममे जाके आशीर्वाद लिया क्या? नही तो पेपर खराब जायेगा..." लगेच १-२ जण जाऊन नमस्कार करून आले.
एकाने माज केला... आणि नेमका त्याला पहिला पेपर घुसला....

दुसर्‍या दिवसापासून पेपरच्या आधी त्या बाथरुम बाहेर रांगा लागायला लागल्या.....

आंबोळी

राजेश घासकडवी's picture

23 Jun 2010 - 11:23 am | राजेश घासकडवी

गुडलक वगैरे ठीकच आहे, पूर्वी अमेरिकेत पत्रं यायची - या खालच्या यादितल्यांना एकेक डॉलर पाठवा, तुमचं नाव यादीत घाला आणि वीस लोकांना पाठवा...कोण असल्या स्कीम्सना फसायचं कोण जाणे.

रामदासांची प्रतिक्रिया आवडली. :D

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jun 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

हा हा हा टार्‍या तुझ्या वैतागावरुन खुप वर्षापुर्वी आलेल्या एका इ-मेलची
आठवण झाली.

A Mail from a frustrated victim of chain mails:

I wanted to thank all my friends and family who have forwarded chain letters to me in 2003, 2004, 2005, 2006, 2007 and 2008 and continuing it in 2009 also.

Because of your kindness:

* I stopped drinking Coca Cola after I found out that it's good for removing toilet stains.

* I stopped going to the movies for fear of sitting on a needle infected with AIDS.

* I smell like a wet dog since I stopped using deodorants because they cause cancer...

* I don't leave my car in the parking lot or any other place and sometimes. I even have to walk about 7 blocks for fear that someone will drug me with a perfume sample and try to rob me.

* I also stopped answering the phone for fear that they may ask me to dial a stupid number and then I get a phone bill with calls to Uganda , Singapore and Tokyo ..

* I also stopped drinking anything out of a can for fear that I will get sick from the rat faeces and urine.

* When I go to parties, I don't look at any girl, no matter how hot she is, for fear that she will take me to a hotel, drug me, then take my kidneys and leave me taking a nap in a bathtub full of ice.

* I also donated all my savings to the Amy Bruce account. A sick girl that was about to die in the hospital about 7,000 times.. (Poor girl! She's been 7 since 1993...)

* Still open to help some from Bulgaria who wants to use my account to transfer his uncle's property of some hundred millions $.

* Made some Hundred wishes before forwarding those Ganesh , Tirupathi Balaji, Jesus, pics etc. Now most of those 'Wishes' are already married (to someone else)

IMPORTANT NOTE:
If you do not send this e-mail to at least 11,246 people in the next 10 seconds, a bird will SH** on your head today at 6:30pm

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

23 Jun 2010 - 4:16 pm | II विकास II

>>If you do not send this e-mail to at least 11,246 people in the next 10 seconds, a bird will SH** on your head today at 6:30pm

हे कसे शक्य आहे?
जीमेलची मर्यादा दिवसाला ५०० ची आहे ना.

असल्या इ-मेल साठी इ-मेल सर्वर घ्यायचा का?

अर्धवट's picture

23 Jun 2010 - 1:08 pm | अर्धवट

असाच एकदा सक्काळ सक्काळी मि वैतागुन रीप्लाय ऑल केला होता एकीला.. कोणती तरी बाय होती फटुत.. तो रीप्लाय तसाच्या तसा डकवतोय

Hi,

I am deleting it immediately after this reply. I am proclaiming its all rubbish, And challenging this email god to do whatsoever is threatened about in this email.
I will definitely inform you if i die in next 20 days..

Wait for the update..

Warm regards,

जे.पी.मॉर्गन's picture

23 Jun 2010 - 1:58 pm | जे.पी.मॉर्गन

रिप्लाय ऑल मेलचा फॉरमॅट दिल्याबद्दल धन्यवाद ! एक टेंप्लेटच बनवून टाकतो. एरवी आपण अश्या मेल्सकडे ढुंकुन पाहात नाही. पण आता नक्की बघीन ;)

जे पी

II विकास II's picture

23 Jun 2010 - 2:16 pm | II विकास II

I will definitely inform you if i die in next 20 days from the hell/heaven.

मेघवेडा's picture

23 Jun 2010 - 4:55 pm | मेघवेडा

स्वत:बद्दल आत्मविश्वास असावा माणसाला ;) एक काय ते नक्की सांगा ;)

Nile's picture

23 Jun 2010 - 5:00 pm | Nile

पण तुला काय माहित नाही का रे मेवे? कुणाला विश्वास असो वा नसो. :)

-Nile

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2010 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो, आत्मविश्वास आहेच म्हणून संदिग्ध बोलावे लागले असेल. ;)

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

23 Jun 2010 - 2:21 pm | इंटरनेटस्नेही

छान आहे.

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

हर्षद आनंदी's picture

23 Jun 2010 - 3:14 pm | हर्षद आनंदी

लोकांना तासुन तुझा वेळ आणि शक्ति वाया घालवणे, अश्या विषयावर काथ्याकुट काढुन मिपाची सर्व्हर स्पेस वाया घालविणे यापरिस चुपचाप डीलिट करणे सोपे नाही का?

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

Nile's picture

23 Jun 2010 - 3:18 pm | Nile

टारुपंतांनी ग्यानबाची शिकवणी लावली की काय? ;)

-Nile

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jun 2010 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार

टारुपंतांनी ग्यानबाची शिकवणी लावली की काय?

काय बोल्तो ??

टार्‍याला अनावृत्त पत्र लिहायला घेउ का मग ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

23 Jun 2010 - 5:56 pm | अवलिया

मस्त रे टा-या....

--अवलिया

चतुरंग's picture

23 Jun 2010 - 5:59 pm | चतुरंग

खरोखरच काही आपत्ती यायची रे बाबा!! सावध रहा!!! :W

चतुरंग

रेवती's picture

23 Jun 2010 - 6:17 pm | रेवती

हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको
हे मात्र बरोबर बोललास (लिहिलस) बघ!
अरे, कुणाला कश्यात पांचटपणा वाटेल ते सांगता येत नाही. तुझ्या मेल्स पाहून इतरांना तोही पांचटपणा वाटू शकतो. मित्रानं अशी मेल पाठवली ती जशी तुला आवडली नाही तसेच इतरांना तुझ्या मेल्स (व्य. नि.) न आवडण्याची शक्यता असतेच!;) जशी तुझी बाजू तुला बरोबर वाटते तशी त्यांची बाजूही त्यांना बरोबर वाटत असतेच कि!
रेवती

II विकास II's picture

23 Jun 2010 - 10:26 pm | II विकास II

संपादक मंडळ हा प्रकारच मी पहील्यांदा मिपावर पहात आहे. त्यापेक्षा, ज्या संपादकाला प्रतिसाद उडवावा असे वाटत असेल किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर त्याने स्वतःचे नाव टाकावे म्हणजे संपर्क साधता येईल.
सगळ्यांनाच सोपे होइल.

मिपावर बरेच संपादक आहेत, काहींची नावे ही आठवत नाहीत.
प्रत्येकाला तुम्ही व्यनी, खरडी टाकणे व्यवहारीक होत नाही.

संपादक मंडळ's picture

23 Jun 2010 - 10:49 pm | संपादक मंडळ

नमस्कार,

विविध संपादकांना व्य. नि. किंवा खरडी पाठवण्याचा सदस्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून संपादक मंडळ ही नवी ओळख तयार करण्यात आली आहे. आपल्या तक्रारी, शंका आणि इतर प्रश्न यापुढे या ओळखीला विचारावे. मंडळाला योग्य वाटणार्‍या शंकांचे निरसन केले जाईल.

सदर चर्चेतील काही अनावश्यक प्रतिसाद काढले आहेत. धाग्याशी संबंधित नसणार्‍या शंका उपस्थित करून धागा भरकटणार नाही याची काळजी घ्यावी.

कृपया सहकार्य अपेक्षित आहे.

धन्यवाद,
संपादक मंडळ.

II विकास II's picture

23 Jun 2010 - 10:52 pm | II विकास II

संपादक मंडळाचा दुवा मुखपृष्ठावर द्या म्हणजे संपर्क साधणे सोपे जाईल.

प्रभो's picture

23 Jun 2010 - 6:35 pm | प्रभो

हाहाहा... =))

भारी रे टार्‍या...... :)

शुचि's picture

23 Jun 2010 - 8:29 pm | शुचि

व्हायाग्रा, बोअरड हाऊस वाईफस, लेट अस मीट टुनाईट, सिंगल्स इन युअर एरीया या काही मेल्स त्या प्रकारात मोडणार्‍याच.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

23 Jun 2010 - 10:19 pm | पंगा

व्हायाग्रा, बोअरड हाऊस वाईफस, लेट अस मीट टुनाईट, सिंगल्स इन युअर एरीया या काही मेल्स त्या प्रकारात मोडणार्‍याच.

अशा विपत्रांच्या शेवटी "हे विपत्र आणखी दहा जणांना पुढे पाठवा. पाठवलेत तर तुमचे कल्याण होईल; नाही पाठवलेत तर..." अशा छापाचा "वैधानिक इशारा" आजवर तरी पाहिलेला नाही. (कोण जाणे, पुढेमागे दिसेलसुद्धा.)

- पंडित गागाभट्ट.

शुचि's picture

23 Jun 2010 - 10:22 pm | शुचि

=))
नाही नाही मला म्हणायचं होतं - स्पॅम (अ‍ॅनॉयिंग मेल्स) मधे मोडणार्‍या मेल्स.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

आजकालचे मेल सर्व्हर्स बर्‍यापैकी स्मार्ट झालेत , तेंव्हा अशा मेल्स ऑटोमॅटिक स्पॅमबॉक्स मधे जातात. त्यामुळे तो विषय नाही.
विषय आहे , आपल्यातलेच कार्टुण्स ह्या देवादिकांचे बावळट मेल्स का फॉरवर्ड करतात ? ह्यामागे णक्की कोणता लॉजिकल विचार असतो ? की उगाच रिस्क णको म्हणुन गाढवासारखे मेल फॉरवर्ड करायच्या ? :)
ह्या मेल्स चुकुन नाही तर पुर्ण शुद्धित फॉरवर्ड होतात.

असो , लेखाचं प्रयोजन आणि शब्दन शब्द समजला असेल अशी आषा करतो :)

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 10:24 pm | मुक्तसुनीत

"लेट अस मीट टुनाईट " अशा प्रकारच्या विपत्रात "आणखी दहा जणांना पुढे पाठवा. पाठवलेत तर तुमचे कल्याण होईल " अशा स्वरूपाचा मजकूर आला तर बहुदा " समस्त लोकांनी आरेस्व्हीपी अमुक वेळेपर्यंत कळवा/ ब्रिंग युअर ओन बीयर " असेदेखील काय काय पाठवावे लागेल !
=))

पंगा's picture

23 Jun 2010 - 10:30 pm | पंगा

ब्रिंग युअर ओन बीयर

बियर?????? #o

- पंडित गागाभट्ट.

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 10:32 pm | मुक्तसुनीत
शुचि's picture

23 Jun 2010 - 10:35 pm | शुचि

लै भारी.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मेघवेडा's picture

23 Jun 2010 - 10:58 pm | मेघवेडा

BYOB तल्या दुसर्‍या B च्या या मांदियाळीत आपल्याकडे 'Biwi' सुद्धा अ‍ॅड करायला लागेल! ;) किंवा करता येईल म्हणूया! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jun 2010 - 11:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका लोकांकडून आलेला प्रतिसाद पहाता "Bring Your Own Babe" ऐवजी " Bring Your Own Biwi"च म्हणावं लागेल! काय मुसुकाका? ;-)

अदिती

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 11:26 pm | मुक्तसुनीत

उपरोक्त प्रतिसादात अनेकविध बाबी विचारात घ्यायला हव्या :

१. मला "काका" म्हण्टल्याबद्दल तीव्र निषेध. आजोबा, मामा, पणजोबा काहीही चालेल. तेव्हढे काका नको .

२. बीवायोबी : आमचे आपले बीयर व्हर्जन आहे ते बराय. बेब, बिवी, वगैरे वगैरे न झेपणार्‍या गोष्टी.

पार्टनर's picture

24 Jun 2010 - 12:27 am | पार्टनर

मित्र वगैरे तरी पण ठीक, न ओळखणारे लोकंही त्याच त्याच ई-मेल्स ना रिप्लाय टू ऑल करून तीच तीच, किंवा अजून दुसरी वर्षानुवर्षाची जुनी ई-मेल्स पाठवत राहतात.

(तीच मायक्रोसॉफ्टची लॉटरी, तीच हरवलेली चेन्नईची मुलगी, तोच कॅन्सर झालेला नवरा. दरवर्षी.)

तेव्हा मीही एकदा धीर करून रिप्लाय टू ऑल करून (आणि काही नावे उडवून) असाच एक अजून फॉरवर्ड आलेला ई-मेल उत्तर म्हणून पाठवला होता :

फॉन्ट : कॉमिक सान्स.
फॉन्ट साइज् : शक्य तेव्हढा मोठा. ४०.
फॉन्ट कलर : लाल.

Hi,

My name is Tillu.

Three days ago I lost my new Rubber waala pencil (Red Colour). ICICI Bank is going to pay me 1 paisa for each email sent.

Please forward to as many people as you can. Otherwise my mumma will scold me :(

- Tillu.
Junior KG Div B.
Adarsh Vidya Mandir.

मला तर याचा अनुभवही आलाय. तुम्ही सुद्धा पाठवून बघा काय चमत्कार होतोय तो.

-- पार्टनर

नितिन थत्ते's picture

24 Jun 2010 - 10:41 am | नितिन थत्ते

=)) =)) =))

भारी. फुटलो

नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

24 Jun 2010 - 12:05 pm | शिल्पा ब

हे असलं काही होऊ नये म्हणून आम्ही लोकांना जरा लांबच ठेवतो...अन स्वतःला माणूसघाणे म्हणवून घेतो..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

24 Jun 2010 - 8:06 pm | पंगा

(वेळ कोणावर सांगून येत नाही. :()

- पंडित गागाभट्ट.