स्टॉप अनदर भोपाल..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
19 Jun 2010 - 7:22 pm
गाभा: 

१) हे मराठी संस्थळ आहे याची कल्पना आहे, पण तरीही हा धागा अपवाद समजला जावा अशी विनंती..
२) स्वाती बांदेकर ह्या व्यक्तिला मी ओळखत नाही पण विषय महत्वाचा आहे म्हणून, आणि सर्वांच्या माहितीकरता म्हणून मला आलेले त्यांचे विपत्र मी येथे डकवत आहे..

-------------------------------------------------------------------------------------------

from swatibandekar@gmail.com
reply-to swatibandekar@gmail.com
to tatya7@gmail.com
date 19 June 2010 12:41
subject Stop Another Bhopal

Hi Tatya Abhyankar Misal Pav,
What a shame! The Bhopal judgement is so unfair! The real culprits are free and the ones punished are already out on bail.

After all this our government is still bent on appeasing foreign corporations. It is only considering some cosmetic changes in the nuclear liability bill. The proposed nuclear liability bill allows foreign corporations to get away by paying a meagre compensation in case of a nuclear accident in our country.

We have to stop another Bhopal in the making. Over 1.8 lakh people, including me, have already signed the petition asking Prime Minister Manmohan Singh to stop the bill in its current form. More signatures will make the opposition to this bill stronger.

Check out this video and then add your signature to this petition.

http://www.greenpeace.org/india/stop-another-bhopal

The petition says: India must hold a public consultation before changing the liability rules for any nuclear accidents caused by U.S. corporations.

Thanks!

swatibandekar@gmail.com

You are receiving this email because someone you know sent it to you from the Greenpeace site. Greenpeace retains no information about individuals contacted through its site, and will not send you further messages without your consent -- although your friends could, of course, send you another message.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

19 Jun 2010 - 7:25 pm | अवलिया

खरंच गंभीर विषय आहे हा.... अन तितक्याच बेपर्वा वृत्तीने हाताळला जात आहे.

--अवलिया

लवंगी's picture

19 Jun 2010 - 7:45 pm | लवंगी

पिटिशन साईन केले आहे आणी फेसबुक वर टाकले आहे

मदनबाण's picture

19 Jun 2010 - 8:55 pm | मदनबाण

पिटिशन साईन केले आहे...

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

II विकास II's picture

19 Jun 2010 - 9:21 pm | II विकास II

केले

शिल्पा ब's picture

20 Jun 2010 - 4:13 am | शिल्पा ब

सहि केली आहे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

विकास's picture

20 Jun 2010 - 4:32 am | विकास

माझी सही, "India must hold a public consultation before changing the liability rules for any nuclear accidents caused by U.S. corporations." या पेटीशनसाठी नक्कीच आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि ग्रीनपीस कुठे दिशाभूल करत नाही आहे अथवा अतिरेकी पर्यावरणवाद या संदर्भात करत नाही आहे असेच वाटते. मात्र ग्रीनपीसने नक्की या संदर्भात नक्की nuclear liability bill हे संदर्भासहीत त्यांच्या संकेतस्थळावर लिहीणे उचीत ठरेल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 9:52 am | आनंद घारे

आपण कोणतेही बिल पास केल्यामुळे लगेच त्याचा जगभर अंमल होईल आणि भविष्यात अपघात घडणारच नाहीत किंवा त्यात ज्यांचे नुकसान झाले त्यांना त्याची पुरेपूर भरपाई मिळेल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे.
'पेशंटचे काही बरेवाईट झाले तर त्याला इस्पितळ जबाबदार नाही" अशा आशयाच्या पत्रकावर पेशंटच्या आप्तांकडून सही करून घेतल्यानंतरच भारतातल्या कोणत्याही रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. क्रेनचा अपघात होऊन त्यातून नुकसान किंवा जीवितहानी झाली तरी क्रेन पुरवणारी कंपनी फक्त क्रेनची दुरुस्ती करून देण्यास जबाबदार असेल अशी अट त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असते.
न्यूक्लीअर नॉनलायेबिलिटी मान्य केल्याखेरीज परदेशातून साधा नटबोल्टसुद्धा मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारच्या अपघातांची भीती दाखवली जात आहे त्यात होऊ शकणारे संपूर्ण नुकसान भरून काढणे कोणत्याही कंपनीला केवळ अशक्य आहे.
भारतातलेच उदाहरण घ्यायचे झाले तर पानशेत धरण फुटल्याने जे नुकसान झाले ते त्या धरणाचे बांधकाम ज्यांनी केले आणि ज्यांनी त्यासाठी कच्चा माल पुरवला त्यांनी भरून दिले का? किंवा ते देऊ अशी हमी कोणत्याही कंपनीने दिली का?

अव्यवहार्य अटी घालून कोणीही कितीही विरोध केला तरी प्रगती होतच आली आहे आणि ती होत राहणारच आहे हे निश्चित.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

20 Jun 2010 - 12:00 pm | नितिन थत्ते

अशी लाएबिलिटी इम्प्रॅक्टिकल आहे याच्याशी सहमत आहे.

कुठलीही कंपनी (लिमिटेड असलेली) स्थापन होण्यातले मूळ तत्त्वच हे असते की कंपनीच्या भागधारकांना त्यांनी भांडवल म्हणून ओतलेल्या रकमेखेरीज कंपनीची कोणतीही लाएबिलिटी उचलावी लागणार नाही.

समजा एखाद्या कंपनीने भोपाळसारख्या घटनेनंतर सर्व लाएबिलिटी घेण्याची तयारी दर्शवली तरी त्यास प्रत्यक्षात किती अर्थ आहे माहिती नाही. विशेषतः ज्याप्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे ते पाहता.

समजा एखाद्या आण्विक दुर्घटनेत मोठ्या प्रमानात लोक मृत, पंगू आणि जखमी झाले तर कंपनीवर जी लाएबिलिटी येईल तसेच या खेरीज पर्यावरणाची, शेतीची हानी व किरणोत्सारामुळे होणारी दीर्घकालीन हानी या सगळ्यांची भरपाई करण्याची रक्कम येईल ती भरणे कोणत्याच कंपनीला शक्य होणार नाही. कंपनीचे नेट वर्थ संपून सुद्धा याची भरपाई होनार नाही. कंपनीच्या ताळेबंदातली मुख्य स्थावर मालमत्ता जी अणुभट्टी तिचेच मूल्य शून्य झालेले असेल. कंपनी लिक्विडेशनमध्ये जाईल आणि शेवटी नुकसानभरपाईची रक्कम मिळणारच नाही.

कंपनी लिमिटेड असल्याने ही रक्कम कंपनीच्या भागधारकांकडून घेता येणार नाही.

क्रिमिनल लाएबिलिटी मात्र असायला हवी पण त्यासाठी खास कायद्याची गरज वाटत नाही. कारण कायदा केला तरी न्यायालय खटला या कायद्याखाली चालवण्यास प्रतिबंध करू शकेलच; जसा भोपाळच्या बाबतीत केला.

नितिन थत्ते

विकास's picture

21 Jun 2010 - 6:59 pm | विकास

सर्वप्रथम मी काही ग्रीनपीसचा अथवा कुठल्याच पर्यावरणवादी चळवळीचा म्हणून सभासद नाही. सह्यामोहीमेत पण मी एकंदरीत हातचे राखून भाग घेतो. येथे मी पहील्यांदाच ग्रीनपीससाठी सही केली आहे.

वरील दोन्ही प्रतिसादाचा रोख हा काहीसा, असली सही मोहीम म्हणजे नुसता "हिरवा" (पर्यावरणवादी या अर्थाने ;) ) अव्यवहार्य चळवळेपणा आहे असा काहीसा दिसत आहे. बर्‍याचदा ग्रीनपीसपासून ते मेधा पाटकरपर्यंत सगळ्यांचेच चळवळेपण हे विकासविरोधतले वाटल्याने (आणि तसे बर्‍याचदा असतेही) इथे देखील तशीच प्रतिक्रीया होत आहे असे दिसतयं. पण या संदर्भात किमान त्या सही मोहीमेत ग्रीनपीसची मागणी किमान वाटली ज्यात पब्लीक प्रोसेस आणि पारदर्शिकता असायला हवी इतकेच म्हणले आहे. त्यात मला तरी काही गैर वाटत नाही. शिवाय हे भारतापुरते बोलले जात आहे. त्याचा संबंध जागतीक गोष्टी बदलण्यासाठी नाही आहे.

याबाबतीत बाकी सर्व जाउंदेत पण अशा प्रकल्पांसाठी जे सुरक्षा नियम आणि जबाबदार्‍या या प्रगत राष्ट्रात या कंपन्यांना लागू होतात त्याच आपल्याकडे करा असे त्याच कंपन्यांना म्हणले तर त्यात चूक आहे का? त्यात कुठेच कंपनी लिमिटेड आहे की अजून काही याचा प्रश्न उद्भवत नाही. कुठल्याही दुर्घटनेची संपूर्ण भरपाई कंपनीने करावी असे कोणीच म्हणणार नाही, तशी कुणाची मागणी असली तर त्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले तर त्यातून वाचणारे पैसे हे त्यातून घडणार्‍या अपघाताच्या (कंपनीवरील आर्थिक आणि व्यवस्थापकीय) परीणामांच्या पुढे काहीच नसतील असा करार होणे महत्वाचे आहे.

एखादी कंपनी जेंव्हा गैरव्यवहार करून बुडीत खात्यात जाते तेंव्हा अनेक गोष्टी या अपरीहार्य होतात पण काही गोष्टी कायद्याने करता देखील येतात. एन्रॉन बुडले तेंव्हा हजारोंचे पेन्शन बुडले तर त्याहूनही अधिक हानी ही स्थानिक आणि शेअरबाजाराशी संलग्न अर्थव्यवस्थेस झाली. ती टळू शकली नाही. पण एन्रॉनच्या अध्यक्षाला तुरूंगात टाकणे त्यामुळे अडले नाही. वेगळे उदाहरण म्हणजे - हर्षद मेहता, त्याच्यामुळे अनेकांचे नुकसान झाले, ज्यांचा त्या गैरव्यवहारात हात नव्हता. तरी देखील हर्षद मेहता सुटू शकला नाही आणि त्या पैशाचा उपभोग घेऊ शकला नाही. हर्षद मेहता अथवा एन्रॉन हे काही पहीलेच उदाहरण होते का? अर्थातच नाही. जुन्या गोष्टी पण शोधल्यातर मिळतील. मात्र आधीच्या अनुभवातून शहाणे होऊन कायदा काही अंशी बदलला गेला, स्टॉक मार्केटचे नियम बदलले गेले वगैरे आणि त्याचा काहीतरी उपयोग झाला. आता यातून शिकून देखील अजून पुढचे नियम केले गेले आहेत. थोडक्यात "करेक्टीव्ह अ‍ॅक्शन" घेतली गेली आहे. भोपाळचा अनुभव, जितका शिळा झाला आहे तितकाच तो दुर्दैवाने (न्यायाच्या संदर्भात) तो ताजा देखील आहे. त्यातून शिकून काही कायद्यात जनतेच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने बदल केले जावेत असे वाटत नाही का? तेच बिपीच्या प्रकरणावरून देखील, "पुढच्यास ठेच" म्हणत आपण शहाणे होऊ शकतो.

क्रिमिनल लाएबिलिटी मात्र असायला हवी पण त्यासाठी खास कायद्याची गरज वाटत नाही.

कायद्यातील शब्दन शब्द महत्वाचा असतो. भोपाळसंदर्भात जर २५ वर्षाने कुणा एखाद्याला दोन वर्षांची शिक्षा झाली असेल आणि त्यावर देखील त्याला अपिल करायचा हक्क असेल तर तो कायदा बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

अवांतर आहे, पण हा प्रतिसाद थांबवताना एक अनुभव सांगतो:

आमच्या येथे एक खाजगी शाळा बांधणे चालू होते. ज्या जमिनीवर ती शाळा बांधणे चालू होते, तेथे अनेक वर्षांपूर्वी एक बॉक्सेस करायचा कारखाना होता. त्यामुळे काही चाचण्यांमध्ये तेथे काही गंभीरप्रकारचे प्रदुषण आढळले. राज्यातील कायद्यांप्रमाणे राज्य पर्यावरण विभागाला जागेच्या मालक/कंपनीने सांगितले आणि येथील कायद्याप्रमाणे आवश्यक असलेला एक लायसेन्स्ड तज्ञ त्यांनी या कामासाठी नियुक्त केला. कधी कधी असे "लायसेन्स्ड" तज्ञांना पैसे मिळवण्यासाठी "लाय" करणे जास्त "सेन्स" करते. येथे असाच प्रकार झाला. आणि त्याने काही थातूरमातूर गोष्टी करून शाळेची इमारत सेफ आहे असे सांगून आमच्या बिल्डींग इन्स्पेक्शनच्या खात्याला "ऑक्युपन्सी सर्टीफिकेट" देण्यास सांगितले. त्यांनी मला यावर काय करायचे विचारले. हा तज्ञ त्यासाठी जी सरकारी कागदपत्रे होती त्यावर सही-शिक्का न करता केवळ स्वतःच्या लेटरहेडवर सांगायला तयार होता. कायद्याने त्याला सहीशिक्क्यासाठी वर्षभराहून अधिक वेळ होता म्हणून. यावरून वाद झाला. राज्यविभागावर त्या संदर्भातील उच्चपदस्थांना मी आणले पण ते म्हणले आम्ही काही करू शकत नाही. कारण? कारण, ज्याकायद्याचा उपयोग करून त्या इमारतीचा वापर ती प्रदुषणमुक्त होई पर्यंत थांबवता आला असता, तो कायदा केवळ उद्योगांच्या इमारतींना चालतो, शाळांसाठी नाही! शाळांसाठी या संदर्भात कुठलाच कायदा वापरता येत नव्हता. शेवटी आम्ही ठरवले की तरी देखील सर्टीफिकेट देयचे नाही. कोर्टात जायचे. आणि कोर्टात हरलो तर त्या निर्णयापोटी देयचे, पण स्वतःवर (म्हणजे शहरी व्यवस्थापनावर) चुकीच्या वातावरणात मुलांना ठेवल्याचे पाप घेयचे नाही... अर्थातच आम्ही खटला हरलो. शाळेसाठी परवानगी द्यावी लागली. त्यांनी ती घेतली, शाळा काही महीने चालवल्यासारखे केले, नंतर तिथून हालवली आणि नंतर वाढलेल्या रिअल इस्टेटच्या भावात ती जागा विकली. आता तेथे काँडॉमेनियम्स (रो हाउसेस) तयार करणे चालू आहे. मधल्या काळात शहराने देखील स्थानिक नियमात काही अटी घातल्या जेणे करून कुठल्याही जागेच्या प्रदुषणमुक्तीशी तेथील बांधकामाला मिळणार्‍या परवानगीस संबंध लावला. परीणामी कंत्राटदारांना अशा जागा घर-शाळा-उद्योग, जे काही असोत, त्यासाठी साफ करणे भाग पडते...

थोडक्यात कायदा गाढव असतो आपण त्या गाढवावर कसे आणि कुठले ओझे ठेवून त्याचा वापर करावा ह्याचा विचार कायमच करावा लागतो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

वेताळ's picture

20 Jun 2010 - 10:30 am | वेताळ

केले
वेताळ

टुकुल's picture

21 Jun 2010 - 7:10 pm | टुकुल

सही केली आहे

--टुकुल

विजय आचरेकर's picture

21 Jun 2010 - 8:22 pm | विजय आचरेकर

सही केली आहे

विजय आचरेकर

नितिन थत्ते's picture

21 Jun 2010 - 8:25 pm | नितिन थत्ते

सही केली आहे.

पिटिशनच्या भावनेशी सहमत आहे पण मसुद्याशी नाही.

पिटिशनमध्ये कमाल लाएबिलिटीची रक्कम कमी करण्यापूर्वी सार्वजनिक सल्लामसलत करावी अशी मागणी आहे. असे भिजत घोंगडे ठेवण्याची गरज कळली नाही.

सरळ लाएबिलिटीची कोणतीही कमाल मर्यादा असू नये अशी पिटिशन असण्याला काय हरकत होती?

पब्लिक सल्लामसलत म्हणजे सरकारला वेळकाढूपणा करायला संधीच. पुन्हा ही सल्लामसलत झाल्यशिवाय अणुभट्टी उभारू नये अशी अट नाही. त्यामुळे लाएबिलिटीविषयी कोणताही कायदा नसतानाच अणुभट्टी उभारली जाण्याची शक्यता.

नितिन थत्ते

Manoj Katwe's picture

22 Jun 2010 - 6:51 am | Manoj Katwe

पिटिशन साईन केले आहे.
पुण्यामध्ये एक स्वयंसेवी संस्था आहे. लोकायत.

आम्ही त्यांच्या मार्फत जन जागृती चे सुद्धा काम काही प्रमाणात केलेले आहे.

जास्त माहितीसाठी
www.lokayat.org.in/downloads
पण मनमोहन साहेबांनी तर अणु-प्रकल स्थापण्याचा विडाच उचलला आहे. कोण अडवू शकणार आहे त्यांना ?
भाजप ने सुद्धा खूप प्रयत्न केले त्यांना अडविण्यासाठी , पण काय उपयोग.

मनमोहनसिंग भारताचे वाट्टोळ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हेच दिसत आहे.

हे असले पिटिशन वगेरे नि काय सध्या होईल असे दिसत नाही. कारण संसदेत अगोदरच सरकारला ह्या बाबतीत बहुमत मिळालेले आहे.
२०१६ पर्यंत सगळ्या भट्ट्या चालू झालेल्या सुद्धा असतील.

आपण खरच काही त्याच्या विरोधात करू शकतो का ह्याचा विचार करावयास पाहिजे.
जन जागृती , पिटिशन , आंदोलने , उपोषण, संप, वगेरे वगेरे ह्यातून काहीतरी संदेश सरकार पर्यंत जाईल एवढे ते संवेदनशील राहिलेले नाही.
सध्या सरकारला काहीतरी संदेश द्यायचा असेल तर फक्त सशस्त्र क्रांतीच हवी.

(नक्षलिवाल्यांच ह्याच कारणासाठी तरी थोडा फार पटत. पण त्यांनी साधारण जनतेला न मारता ह्या नतभ्रष्ट राजकारण्यांना ठिकाणी लावलं असता तर ते आदर्श ठरले असते)

पण असो. जनतेतच मुळी एकता नाही. तर राजकारणी त्याचा फायदा घेणार नाही तर अजून कोण घेणार. त्यांना जे हवं तेच करणार.

जर आपणा काही प्रयत्न केले नाही तर आपल्या मुलांना त्याचे किती वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील ह्याची काप्लाना सुद्धा करवत नाही.
थत्ते साहेब भले माझ्या भावना तीव्र असतील, पण हे सगळं म्हणजे गळ्याच्या वरचं प्रकरण आहे हो.
२०१६ च्या प्रतीक्षेत असलेला

आनंद घारे's picture

22 Jun 2010 - 8:33 am | आनंद घारे

जलविद्युतकेंद्र बांधण्यासाठी धरण बांधले तर वन्य पशुपक्ष्यांचा विनाश होतो, औष्णिक विद्युत्केंद्रातून प्रदूषण होते. या गोष्टी तर निश्चितपणे होतात, त्यांच्यामागे जर तर वगैरे नाही, अणुविद्युत्केंद्रात मात्र जर अपघात झाला तर त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात. आपल्याला यातले काहीच नको. उजेड मिळण्यासाठी रॉकेल, लाकूड, खाद्यतेल वगैरे जाळण्याचे दुष्परिणाम याहूनही वाईट आहेत. त्यामुळे दिवसाच्या उजेडात होतील तेवढी कामे करावीत आणि रात्रीच्या अंधारात बसून रहावे एवढेच शक्य आहे.
ज्या लोकांना याबाबत एवढी पोटतिडीक आहे त्यांनी निदान स्वतःपासून सुरुवात करावी.
सौर उर्जा, पवन ऊर्जा वगैरे मार्ग आहेत. पण त्यासाठी जी यंत्रसामुग्री लागते ती काही झाडाला लागत नाही. ती तयार करण्यासाठी जी ऊर्जा खर्च करावी लागते ती इतर मार्गांनी मिळाली तरच तयार होऊ शकते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

विकास's picture

22 Jun 2010 - 4:10 pm | विकास

औष्णिक विद्युत्केंद्रातून प्रदूषण होते....अणुविद्युत्केंद्रात मात्र जर अपघात झाला तर त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात.

ह्या पिटीशनचा आणि प्रदुषणाचा संबंध नसून सुरक्षेसंदर्भात (nuclear accidents)तो आहे.

आजकाल कडवे पर्यावरणवादीपण अणूउर्जेच्या विरोधा कडवे नसतात. कारण कोळशापेक्षा नक्कीच स्वच्छ हे समजले आहे. शिवाय कार्बन एमिशन नाही ते वेगळेच.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

राजेश घासकडवी's picture

22 Jun 2010 - 1:41 pm | राजेश घासकडवी

मला व्हिडिओत अगर बाजूच्या लेखनात पुरेशी कारणं मिळाली नाहीत. कदाचित हे माझं अज्ञान असेल.

भोपाळ दुर्घटना, व तीवरचा निकाल हे लांच्छनास्पद आहेत याबद्दल वादच नाही. पण ही पीटिशन साईन केल्याने ती परिस्थिती कशी बदलेल हे कळलं नाही. शिवाय त्यात अमेरिकाच फक्त नाव घेऊन का आहे? सर्वच कंपन्यांना ते लागू का नाही?

प्रत्येक गोष्ट करताना काही धोका असतो. ऊर्जा निर्मिती बाबत तर हे अनादी कालापासून सत्य आहे. अजूनही ज्या चुली गावोगाव वापरल्या जातात त्यातून दर वर्षी कित्येक लाख धुराच्या प्रदूषणाने मरतात. गेल्या शतकात तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, सेफ्टी स्टँडर्डही सुधारले आहेत (असा अंदाज आहे). असं असताना अपघात होतीलच असं गृहित धरणं व फक्त त्याच धोक्याचा विचार करणं हे एकांगी वाटतं.

पिटिशनमधल्या प्रक्रियेमुळे भारतात अणू ऊर्जा उशीरा येईल अथवा कमी येईल अशी खात्री वाटते. जितकी ऊर्जा उशीरा तितकी गरीबी अधिक काळ राहील. या सर्वाची सहज न मोजता येण्यासारखी किंमत द्यावी लागते. ती लाखोंच्या आयुष्याची आहे. पिटिशन वर सही करण्यापूर्वी त्या किमतीचाही विचार व्हावा असं वाटतं.

कुठल्याही गॅस दुर्घटनेपेक्षा गरिबी व अज्ञान यांनी अधिक आयुष्यं बरबाद होतात.

अवांतर - स्वसंपादित केलं आहे. चुकीच्या विधानाबद्दल (कोणी वाचलं असेल तर) क्षमस्व.

नितिन थत्ते's picture

22 Jun 2010 - 2:31 pm | नितिन थत्ते

जर नुकसानभरपाईवर कमाल मर्यादा नसेल तर कोणी कंपनी अणूभट्टी उभारायला तयार होईल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

मी उद्या मोटार विकत घ्यायला गेलो आणि गाडीचा ब्रेक निकामी झाल्यास अपघात होऊन जे नुकसान होईल आणि जीवितहानी होईल त्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल असे मी मोटार उत्पादकाला म्हणालो तर तो उत्पादक मला मोटार विकणारच नाही. (मला मोटार मिळालीच नाही तरी हरकत नाही अशा परिस्थितीतच मी अशा आग्रहाशी चिकटून बसू शकतो).

हे उदाहरण पुढे खेचायचे तर अशा नुकसानीसाठी सर्वसमावेशक विमा उतरवणे वीज कंपनीला बंधनकारक ठेवावे.

अवांतर : अमेरिकेचा उल्लेख हा हिस्टॉरिकल बॅगेज ;) आहे असे समजावे.

अमेरिकेचे नाव घेण्याचे दुसरे कारण आपण प्रगतीचे जे मॉडेल वापरू पहात आहोत (रिअल इस्टेट आणि मोटार उद्योगावर आधारित आणि कर्जोत्तेजित ग्रोथ/विकास) ते अमेरिकन मॉडेल आहे.

नितिन थत्ते

विकास's picture

22 Jun 2010 - 4:19 pm | विकास

मी उद्या मोटार विकत घ्यायला गेलो आणि गाडीचा ब्रेक निकामी झाल्यास अपघात होऊन जे नुकसान होईल आणि जीवितहानी होईल त्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल असे मी मोटार उत्पादकाला म्हणालो तर तो उत्पादक मला मोटार विकणारच नाही. (मला मोटार मिळालीच नाही तरी हरकत नाही अशा परिस्थितीतच मी अशा आग्रहाशी चिकटून बसू शकतो).

टोयोटा कंपनीचे अमेरिकेत मध्यंतरी काय झाले ते माहीत असेलच. टोयोटोच्या अध्यक्षाला रस्त्यावर झालेल्या अपघातांवरून अमेरिकेन सिनेटमध्ये दोन्ही पक्षांच्या राज्यकर्त्यांनी कसे धारेवर धरले याची देखील कल्पना असेल. जर आपले राज्यकर्ते आणि जनता यांना स्वतःच्या जीवाची काळजी आहे असे भोपाळ आणि इतरत्र दिसले असते तर कदाचीत अशा पेटीशनची गरज भासली नसती.

आज त्या पेटीशनने काय होणार आहे हा जो मुद्दा येतो, तेंव्हा त्यातून जसा सरकारवर दबाव आणता येऊ शकतो तसेच इथल्या सकट अनेक संस्थळावर चर्चा होऊन आपण विचार करू शकतो हा देखील फायदा असतो.

अमेरिकेचा उल्लेख हा हिस्टॉरिकल बॅगेज आहे असे समजावे.

अमेरिकेचा उल्लेख वरकरणी नक्कीच अनावश्यक वाटतो. पेटीशनमधे ते नसते तरी काही बिघडले नसते. मात्र त्याचा संबंध भारत-अमेरिका अणूउर्जा कराराशी असावा असे देखील वाटते. तसेच फ्रान्समधे (ज्यांना भारतात या संदर्भात धंदा हवा आहे) ८०-९०% वीज ही अणूउर्जेने तयार होते आणि त्यांचे सेफ्टीरेकॉर्ड चांगले आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी (मॅसॅच्युसेट्स सकट) अशी वीज केंद्रे बंदच आहेत...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नितिन थत्ते's picture

22 Jun 2010 - 4:54 pm | नितिन थत्ते

टोयोटाला धारेवर धरले असेल पण अपघाताने होणार्‍या नुकसानीची भरपाई टोयोटाकडून घेता येईल का हा प्रश्न आहे. सहसा अशा बाबतीतही प्रॉडक्ट रीकॉल इतकीच लाएबिलिटी मानली जाते.

जनतेला स्वतःच्याजिवाची काळजी नसेल तर कोणीच काहीच करू शकत नाही.

अमेरिकेचा उल्लेख हिस्टॉरिकल बॅगेज आहे याचा अर्थ शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिका ही शत्रू असल्याचे डाव्यांच्या मनात बिंबलेले आहे. हाच अणूकरार सुरिनाम/सुदाम/चिली आणि भारत यांच्या दरम्यान असता तर सरकार पाडण्याइतका विरोध डाव्यांनी केला नसता. ;)

नितिन थत्ते

विकास's picture

23 Jun 2010 - 2:12 am | विकास

प्रतिसादाचे शिर्षक दुहेरी आहे ;)

टोयोटाला धारेवर धरले असेल पण अपघाताने होणार्‍या नुकसानीची भरपाई टोयोटाकडून घेता येईल का हा प्रश्न आहे. सहसा अशा बाबतीतही प्रॉडक्ट रीकॉल इतकीच लाएबिलिटी मानली जाते.

या संदर्भात खटले चालू आहेत. अमेरिकन काँग्रेस /सिनेटने पण बोलावले ते नुकसान भरपाई अथवा रिकॉल लाएबिलीटीच्याहून अधिक आहे. तेच साम्य जर कुठल्याही उद्योगांच्या अपघातासंदर्भात (इथे अणूशक्ती) आहे असे वाटते.

हाच अणूकरार सुरिनाम/सुदाम/चिली आणि भारत यांच्या दरम्यान असता तर सरकार पाडण्याइतका विरोध डाव्यांनी केला नसता.

अच्छा म्हणजे तुमचा साम्यवादाला विरोध आहे तर! अहो मग आपण नेटच्या एकाच बाजूला उभे राहून, एकमेकाविरुद्ध टेनिस खेळायचा प्रयत्न करत आहोत ;) ते डावे काय म्हणाले आणि अगदी उजवे काय म्हणले याचा येथे काहीच संबंध नाही. किमान माझ्या डोक्यात तरी... सत्तेत आता संपुआ च्या ऐवजी रालोआ असते तरी माझे या संदर्भात असेच मत असते. यात अणूशक्तीला विरोध नाही आहे तर ती निर्माण करताना सुरक्षेचे कायदे कडक असावेत आणि ते देखील केवळ कंपन्यांच्या संदर्भात नाही तर सरकार/सरकारी अधिकार्‍यांच्या संदर्भात देखील, इतकेच म्हणणे आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शिल्पा ब's picture

23 Jun 2010 - 5:54 am | शिल्पा ब

बरीच जड चर्चा चालू आहे :-) ...चांगले आहे...आम्हालाही थोडे ज्ञान मिळतेय..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

23 Jun 2010 - 7:59 am | नितिन थत्ते

माझा विरोध साम्यवादाला नाही. उलट जराशी सहानुभूतीच आहे.
माझ्या प्रतिसादातील ते उल्लेख राजेश घासकडवींच्या 'व्हिडिओमध्ये फक्त अमेरिकेचेच नाव का?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून होते.

क्रिमिनल लाएबिलिटी असावीच असे माझेही म्हणणे आहे. विशेषतः सेफ्टी ऑडिटची रेकमेंडेशन अमेरिकेतील कारखान्यात अंमलात आणणे पण भारतात न करणे वगैरे. (खटल्यात सदोष मनुष्यवध न म्हणता निष्काळजीपणाचे कलम लावावे असे न्यायालयाने ठरवू नये म्हणून काय करता येईल? तसा कायदा केला तर तो घटनाविरोधी म्हणून न्यायालय रद्द करू शकेल असे वाटते).

आर्थिक लाएबिलिटीच्या बाबतीत त्या भरपाईच्या व्यवहार्यतेबाबत प्रश्नचिन्ह (मनात) आहे. पण पिटिशनवर सही केलीच आहे.

दहा पंधरा अपघात/मृत्यू झाल्यावर द्यावी लागणारी नुकसानभरपाई आणि भोपाळसदृश अपघातानंतर द्यावी लागणारी नुकसानभरपाई यात खूपच फरक आहे.

अवांतर : भरपाईचे खटले सिव्हिल मॅटर म्हणून चालतील त्यामुळे सिव्हिल खटल्यांना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागणे गृहीत धरायला हवे. (** वकीलांची तिसरी पिढी आम्ही पोसत आहोत ;) )

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

22 Jun 2010 - 3:26 pm | ऋषिकेश

प्रथम मला याबाबतची थोडीही माहिती नसल्याने सही केलेली नव्हती. आता दोन्ही कडच्या बाबी ऐकल्यानंतरही हे देशविघातक आहे याची पुरेशी कारणे न मिळाल्याने सही करत नाहि आहे

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन