मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट

श्रीराजे's picture
श्रीराजे in काथ्याकूट
14 Jun 2010 - 3:20 pm
गाभा: 

आताच शैलेश यांचा शाळेवरती लेख वाचला आणि आपणही आपली एक समस्या मांडावी असे वाटले.
माझा मुलगा आता अडीच वर्षाचा होईल. तर आतापासुनच घरात बरीच चर्चा होत आहे कि त्याला कोणत्या शाळेत घालायचे ते. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट (कॉन्हेंन्ट - हे सुध्दा इंग्रजी माध्यमामध्ये येते असे वाटते.)

या सर्व चर्चेमध्ये बरेच प्रश्न उपस्थित झाले ते खालिल प्रमाणे:

१) या तीन्ही माध्यमांमध्ये कोणते फऱक आहेत आणि त्यांचा पुढील शिक्षणासाठी काही फरक पडतो का?
२) कोणते माध्यम चांगले आहे.
३) इंग्रजी माध्यम आणि कॉन्हेंन्ट यात खुप फरक आहे का? - या बद्दल बायको म्हणाली कि इंग्रजी शाळांमध्ये सर्व शिक्षक बहुतांशी मराठीतुनच बोलतात त्यामुळे इंग्रजी माध्यमच्या शाळांमध्ये मुलाला घालायला नको. तीचा हट्ट कॉन्हेंन्ट मध्येच घालण्याचा आहे. म्हणे तिथे सर्व शिक्षक नेहमी मुलांशी इंग्रजीत बोलतात त्यामुळे त्यांना लहानपणापासुनच मुलांना इंग्रजीची सवय होते. मग नंतर पुढील शिक्षणात काही अडचणी येत नाहीत. मी म्हणालो कि आपले दोघांचे शिक्षण संपुर्ण मराठीत झालेले आहे तरी आपल्याला कधी इंग्रजीची अडचण जाणवली नाही. पण असो तीला ते सांगुन पटत नाही. :)

४) कॉन्हेंन्टमध्ये घालायचे म्हणल्यावर सर्व शाळा घरापासुन लांब. मुलाचे शाळेत जाण्यासाठी किती हाल होणार हे कल्पना करुनच मला कसतरी वाटत होते. माझ्यामते शाळा हि घरापासुन जवळ असावी. म्हणजे मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ वाचतो आणि वाचलेल्या वेळामध्य ती जास्त खेळू शकतात. नाहितर ती शाळेत ये-जा करुनच दमुन जातात मग अभ्यास कधी करणार.....

५) पुण्यामध्ये कोणती शाळा चांगली आहे? (डोनेशन तर द्यावेच लागणार हे मला माहिती आहे)
६) आता शाळेच प्रश्न सोडवतो न तोपर्यंत शाळेमध्ये कोणते बोर्ड आहे हा प्रश्न उभा राहिला.
७) SSS बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड असे तीन बोर्ड आहेत सध्यातरी माझ्यामाहिती प्रमाणे. या तिन्हीमध्ये काय फरक आहे?
७) CBSE बोर्ड, ICSE बोर्ड च चांगला असे ऐकले आहे कारण पुढे competitive exams मुलांना सोपी जाते. याबाबत अधिक माहिती मिळावी.

मिपाकरांनी आपले अनुभव सांगावेत तसेच त्यांच्याकडुन मार्गदर्शन झाले तर बरे होईल.

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

14 Jun 2010 - 6:04 pm | युयुत्सु

CBSE चा अभ्यास्क्रम SSC पेक्षा निश्चितच दर्जेदार आहे पण अंमलबजावणीत शाळेशाळेत फरक पडतो. जेथे शिक्षक टिकतात त्या शाळेचा विचार करावा.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.शअ

सेंट विन्संट हि शाळा चांगली आहे असे कळाले...!
पण तिथे अ‍ॅडमिशन मिळणे कठिण आहे म्हणे.

कापूसकोन्ड्या's picture

14 Jun 2010 - 8:58 pm | कापूसकोन्ड्या

लहान मुलांना शाळा घराजवळच हवी.
आइच्या भाषेत शिकणे खुप महत्वाचे आहे. विकास (म्हणजे फक्त परिक्षेतील मार्कस नव्हे.) मुले फक्त शाळेतच शिकतात असे नाही.लहान मुलाना कमीतकमी प्राथमिक शिक्षण तरी आइच्या भाषेतच असावे. नंतर काय ते कुठल्याही भाषेतसुध्दा शिकू शकतात.

डॉ.अनिल अवचट यांचे विचार वाचावे. त्यांच्या दोनीही मुलींचे शिक्षण म.न.पा. शाळेत झाले दोघीही डॉक्टर आहेत.
अमेरिकेत यावर खुप संशोधन झालेले आहे. (नक्की संदर्भ आत्ता सांगता येत नाहीत) पण सुमारे १७-१८ वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या बाबतीत खुप अभ्यास करून नंतर मराठी शाळेत घातले. आम्हाला तरी कोणताही पश्चाताप होत
नाही.
cognitive learning theory/ and reinforcement या विषयावर अभ्यास करावा.
जाता जाता भावे स्कुल ते भावे स्कुल.
तुम्ही पुण्यात आहात काळजी नसावी.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2010 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

जाता जाता भावे स्कुल ते भावे स्कुल.

जाने कहा गये वो दिन :) भावेस्कुलची संपुर्ण वाट लागली आहे आता. शाळेच्या आवारात हिंडताना देखील घाबरणारी मुले आता सर्रास तिथे चाकु सुरे घेउन मारामार्‍या करायला लागली आहेत.

सेंट भावेजचा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शुचि's picture

14 Jun 2010 - 9:10 pm | शुचि

लहान मुलांना शाळा घराजवळच हवी. +१००००
मुलं कशी जाणार? रीक्षा? कार? बस?
बसमधे अतिशय वाईट लोक देखील असतात. तुम्ही सुजाण आहातच.
बाकी मला काही म्हणायचं नाही. इंग्रजी अथवा मरठी ज्याला जायचं तो पुढे जातो. तुम्ही मुलांना पंख आणि जीवनमूल्य द्यालच.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चतुरंग's picture

14 Jun 2010 - 9:20 pm | चतुरंग

मुलांना शाळेत/शाळेतून सोडता/आणता आले तर उत्तमच.
अन्यथा हल्ली रिक्षाचा पर्याय सोयीचा असतो.
शाळेला मैदान असले तर आणखीन छान, मुलांना खेळायला भरपूर मिळावे हे महत्त्वाचे.
(बाकी बोर्डाबद्दल सध्यातरी ताजी माहिती नाही.)
चतुरंग

रश्मि१२३'s picture

14 Jun 2010 - 9:38 pm | रश्मि१२३

माझ्या मते सि बि एस सि हा बोर्ड एस एस सि हुन नक्किच चांगला आहे.
मला खरंच नाहि माहित की मराठि शाळेत टाकावे की इंग्रजी. पण खास
बोर्ड साठि म्हणुन तरि इंग्रजी शाळा असु देत.
मी स्वत: एस एस सि बोर्डातुन शिकलेले असुन, आता मी इंटर्नशनल शाळेत शिकवते आहे. पण त्या साठि खुप मेहनत करावि लागली. खास करुन.
का मला नाहि माहित पण मला असे वाटते कि इंग्रजि शळेतल्या मुलांना जास्त आत्मविश्वस असतो.
बाकी शाळे चे घरापसुन चे अंतर अर्धा तसा पेक्षा जास्त नको .
आणि शाळेत शिकवण्या चि कोणति पध्द्त वापरतात हे हि तपसण्या सारखि गोष्ट आहे.

टारझन's picture

14 Jun 2010 - 10:18 pm | टारझन

माझ्या मते MBBS ला घालावे. :)

विनायक प्रभू's picture

14 Jun 2010 - 10:28 pm | विनायक प्रभू

__/\_ टार्‍या.

मिहिर's picture

14 Jun 2010 - 10:58 pm | मिहिर

मराठी. इंग्रजी समजते नंतर. cbse चा अभ्यास पोरे नंतर स्वतः करू शकतात. कॉन्व्हेंटची अनेक मुले ओव्हर कॉन्फिडंट वाटतात.

प्रमेय's picture

15 Jun 2010 - 2:00 am | प्रमेय

मला वाटते की १-४ मराठी माध्यम चांगले!
नंतर convent पेक्षा semi-eng OR English चांगले!

शेवटी मुलाला/मुलीला काय हवे आहे याच पण विचार केला पहिजे!

टारझन's picture

15 Jun 2010 - 2:05 am | टारझन

शेवटी मुलाला/मुलीला काय हवे आहे याच पण विचार केला पहिजे!

समहत आहे, आमच्या शेजारचे त्यांच्या २ वर्षाच्या मुलाला विचारल्या शिवाय शेयरमार्केट मधे पैसे सुद्धा आडकवत नाहीत, त्यांनी घरी त्याच्यासाठी घेतलेल्या संगणकाचं कॉन्फिगरेशन सुद्धा मुलानेच डिसाईड केलं होतं

- व्यत्यास

पंगा's picture

15 Jun 2010 - 2:10 am | पंगा

- व्यत्यास

आवडले!

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 2:29 am | शिल्पा ब

कुठे हवं तिथं घाला!!! शाळेत हो...आम्ही आधी खेड्यात,मग मुंबईत असे मराठी शाळेत शिकलो म्हणून आम्ही बोललेले इंग्रजी कालेजातल्या सौथ इंडिअन लोकांना कळायचे नाही...मग हळूहळू कळायला लागले आणि "आपल्याला इंग्रजी येते" हे कळुस्तवहर अमेरिकेत आले...मग काय इथल्या लोकांना आमचे इंग्रजी कळायचे नाही आम्हाला त्यांचे...एकूण काय आनंदच...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

15 Jun 2010 - 2:44 am | टारझन

कुठे हवं तिथं घाला!!! शाळेत हो...

भावुक झालो !!

- (भावनाप्रधान) टारझन

सुखदा राव's picture

23 Jun 2010 - 2:13 pm | सुखदा राव

मुलानी आपल्या मात्रुभाशेत शिकाव अस माझ मत आहे. (नवर्याचही हेच मत असल्याने हा प्रश्न आम्हाला पडणार नाहिये.)
१. त्यामुळे त्याच विशयान्च आकलन चान्गल्या प्रकारे होत. माझ्या इन्ग्लिश मिडियम मध्ये शिकणार्या भाच्याबाबतचा आमचा अनुभव याबाबतित अनेक पालकाना उपयोगी ठरेल. त्याला वास सन्गितल नाकाने घ्यायचा वास की कुन्डी हेच कळत नाही. शिवाय मम्मी म्हणून सान्गितल्या शिवाय त्याला आई हे कळत नाही. (हा पालकान्चा दोश असू शकतो, मतितार्थ लक्षात घ्यावा.)
२.घरात १ आणि शाळेत १ अशा २ भाशा मुल एकदम शिकू शकत नाही. ते त्याच्यासाठी कठीण असत.
३.इन्ग्लिश शाळान्ची फी जास्त असते. शिवाय इतर खर्चही जास्त असतात. पर्यायाने मुलान्वर अपेक्षान्च ओझ लादल जात. ('आम्ही तुझ्या शिक्षणावर एवढा खर्च करतो अन तुला मात्र निट अभ्यास करुन मार्कही मिळवता येत नाही' वगैरे वगैरे). त्याचप्रमाणे कालान्तराने त्याला घरी शिकवण कठीण होत, त्यामुळे शिकवणीचा खर्च इतर मिडियमपेक्षा लवकर सुरु होतो.
४.लहानपणा पासुन एकदम इन्ग्लिश बोलायला लागल्याने इन्ग्लिश व्याकरणात मुल कच्ची राहतात. आणि इन्ग्लिश शाळेमुळे अवान्तर मराठी वाचन होत नाही. थोडक्यात '१ ना धड भाराभार चिन्ध्या' अशी अवस्था होते.
५.इन्ग्लिश मिडियम मध्ये आपल्यापेक्षा काही पटीने जास्त अभ्यास असतो. मुल त्या ओझ्याखाली इतक दबून जात की खेळ, छन्द याला वेळच उरत नाही. (त्या अभ्यासाच टेन्शन पालक, त्यातही आई जास्त, घेतात. आणि त्यातुन इतरही अनेक प्रश्ण उद्भवतात)

एसेस्सी बोर्ड माझ्या मते चान्गले.
१.त्याच्या शाळा सगळ्यात जास्त आहेत. प्रवेश मिळायला त्रास होत नाही. सिबिएस्सी हे नॅशनल लेव्हल बोर्ड असल्याने आपल्याकडे त्याच्या शाळा कमी असतात. आणी त्याची सध्या क्रेझ असल्याने प्रवेश मिळण खुप कठिण होउन बसलय.
२.सिबिएस्सी शाळान्मध्ये शिकवणार्या शिक्षकान्चा दर्जा तपासायची पद्धत आपल्याला माहित नसते. त्यामुळे शन्केला वाव राहतो.
३.आयसिएस्सी हे इन्टरनॅशनल बोर्ड असत. पण ते कुठल्या विद्यापीठाला जोडलेल आहे, मुल कुठली परीक्षा पास होउन बाहेर पडेल, त्यानन्तर त्याला आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या मार्कान्च्या आधारे प्रवेश मिळेल या बाबतित खात्रीशिर माहिती काढण गरजेच असत.
४.विनाअनुदानित शाळान्मध्ये शिक्षकान्च नोकरी सोडून जान्याच प्रमाण जास्त असत. सिबिएस्सी आणि आयसिएस्सी या शाळा विनाअनुदानित असतात, त्यामुळे तिथे हा प्रश्ण नेहमीच येतो. ( अनुदान नसल्यामुळेच त्यान्ची फी पण जास्त असते. पण याच कारणामुळे मराठी किन्वा इन्ग्लिश शाळान्ची फी पण जास्त असु शकते हे लक्षात घ्यावे)
५.आयसिएस्सी शाळेत शिकवणार्या शिक्षकान्च्याही दर्जाबाबत शाश्वती नसू शकते.

आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे मराठी माध्यमात शिकलो पण आम्ही सगळे आज चान्गल्या पदान्वर काम करत आहोत. कदाचित तुमचाही हाच अनुभव असेल. त्यानुसार योग्य निर्णय घ्या. कारण हा मुलाच्या आयुश्याचा १ महत्त्वाचा निर्णय असतो.

पक्या's picture

24 Jun 2010 - 1:03 am | पक्या

>>त्याला वास सन्गितल नाकाने घ्यायचा तर वास की कुन्डी हेच कळत नाही.
अहो तो शब्द वास नव्हे (vase) वेस आहे. वास हा उच्चारच मुळात चुकीचा आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

घाटावरचे भट's picture

24 Jun 2010 - 2:14 am | घाटावरचे भट

vase = वास्/वाज् आणि वेस हे दोन्ही बरोबर आहे. 'वास' हा आपल्यावर राज्य केलेल्या गोर्‍या सायबाच्या देशातला उच्चार आहे. 'वेस' हा हिरव्या नोटावाल्या देशातल्या गोर्‍या सायबाचा उच्चार आहे. असो. आम्ही सरळ 'फ्लावरपॉट' म्हणून मोकळे होतो.

पक्या's picture

24 Jun 2010 - 2:19 pm | पक्या

http://www.merriam-webster.com/dictionary/vase
येथे उचार ऐकता येतात. त्यात वेस , वेज आणि वाज हे ३ उचार सांगितलेले आहेत पण वास मात्र नाहिये. इतरत्र पण शोधल्यावर वास हा उच्चार सापडला नाही . पण वाज मात्र आहे.

( एकदा वेस ऐकल्यावर वाज हा उचार नक्कीच वास नाहिये हे कानांना कळते)
जय महाराष्ट्र , जय मराठी !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 12:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्रिटनची राणीसुद्धा एवढ्या छातीठोकपणे अमुक उच्चार चुकीचा आहे असं सांगेल का नाही याची शंका आहे. बाकी मिपावर अशी प्रतिक्रिया पाहून अंमळ मौज वाटली. बाकी भटाने उत्तर दिलेले आहेच.
व्ही (v) चा उच्चार साधारण व्ह आणि व च्या मधे होतो, हे माझं कर्णज्ञान!

अदिती

सहज's picture

24 Jun 2010 - 7:04 am | सहज

>२.घरात १ आणि शाळेत १ अशा २ भाशा मुल एकदम शिकू शकत नाही. ते त्याच्यासाठी कठीण असत.

हे काही पटले नाही. उलट लहान मुलांना तर ते अगदी सोपे जाते. दुवा तसेच प्रत्यक्ष अनुभव.

हा शाळेत बायलॉजी व घरी जीवशास्त्र शिकवत असतील तर बहुदा गडबड होईल. पण फक्त भाषा (हिंदी, मराठी, इंग्लीश) शिकणे उद्देश ठेवला तर मुलांना एकाच वेळी चार-पाच भाषा देखील शिकणे फार कठीण नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2010 - 7:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>फक्त भाषा (हिंदी, मराठी, इंग्लीश) शिकणे उद्देश ठेवला तर मुलांना एकाच वेळी चार-पाच भाषा देखील शिकणे फार कठीण नाही.

अगदी अगदी...!

-दिलीप बिरुटे

श्रीराजे's picture

24 Jun 2010 - 1:43 pm | श्रीराजे

+१

कशिद's picture

24 Jun 2010 - 12:21 am | कशिद

ssc बोर्ड चांगला आहे काही प्रॉब्लम होता नाही मुलाना
cbsc and icse board जय पलाकाना देशानत्रगत बादल्या होतात त्यांचा साठी आहेत ..icsc or cbsc ह्या बोर्ड कहे मुले ११ वि साठी hsc बोर्ड साठी लाइन लावतात,

मग तय साठी 90;10 कोटा best of five सारख्या गोष्टी येतात अणि पालकांचा डोक्याला ताप करतात..

नंतर medical किंवा enginering साठी जायचे असल्यास ms cet चे marks count होतात हे लक्षात घ्या अणि तो अभ्यासक्रम HSC चा असतो

सुखदा राव's picture

24 Jun 2010 - 12:26 pm | सुखदा राव

मुल एकदम २ भाशा शिकू शकत नाही अस म्हणण्याचा अर्थ हा होता की काही गोश्टी एकदम २ भाशान्मधुन शिकू शकत नाही. भाशा हा शब्द चुकला माझा, मला माध्यम म्हणायच होत.पण तज्ज्ञान्च या बाबतित सन्शोधन असेल तर ते मी अनुभवाअन्ती मान्य करेन नक्कीच.
तो उच्चार वास आहे तसाच वेस ही आहे. पण जर तो फक्त वेस असेल तर परत इन्ग्लिश मिडियम मध्ये शिकवणार्या शिक्षकान्च्या उच्चाराच्या ज्ञानाबद्दल शन्काच उपस्थित होइल.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jun 2010 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=21354:2...

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix