सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो. सरधोपटपणे "ग्रेसची कविता कळतच नाही" असे म्हणणारे रसिकही आहेत. अनेक प्रयत्नांती ते या निष्कर्षाप्रत येऊन पोचतात किंवा ग्रेसच्या कविता अनाकलनीय असल्याचा पूर्वसमज पूर्वग्रहात रुपांतरीत करून ग्रेसच्या कवितांच्या वाटेला जाण्याचे टाळतात.
अनाकलनीय लेखनाच्या बाबतीत बरेचदा ग्रेसची गुलजारशीही तुलना केली जाते. परंतु एक सामान्य रसिक म्हणून मला गुलजारच्या कवितांमध्ये जी टोकाची प्रतिभा आणि आविष्कार दिसतात, तशी टोके गाठलेली ग्रेसच्या कवितेत पहायला मिळत नाहीत. म्हणजे "इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते" लिहिणाराही गुलजार आणि "आँखे भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती हैं" किंवा "आजा आजा दिल निचोडे" लिहिणाराही गुलजारच. आणि त्यातही "पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते हैं" हे वाचून "म्हणजे काय?!" अशी तात्कालिक प्रतिक्रिया हे नवल नाहीच. ग्रेसच्या बाबतीतही असे "म्हणजे काय" स्वरूपाचे प्रश्न बरेचदा पडत असतातच. जसे - "झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया" यातून काय सांगायचे असेल बरे?
इतके असूनही व्यक्तिशः मला ग्रेसच्या कविता वाचणे, अर्थ लावण्याचा नि समजावून घेण्याचा प्रयत्न करणे (पक्षी झगडणे) आवडते. तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे?
ग्रेसच्या कवितांशी रसिकांचे असे झगडणे, कविता कळण्यातील आव्हान, यांतील खुमारी तुम्ही अनुभवली आहे का? असल्यास या काथ्याकुटाच्या निमित्ताने तुम्हांला आवडलेली ग्रेसची कविता, तिचा थोडक्यात अर्थ किंवा तुम्हांला सर्वाधिक आवडलेल्या तिच्यातील एखाद्या कडव्याचा भावार्थ येथे सांगावा. तुम्हांला त्यांच्या कविता वाचण्याची संधी मिळाली आहे का? नसल्यास सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्ही ग्रेसच्या कविता वाचाल का?
वाचने
12638
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन...
चार तास
सखी निघाली आभाळातून
एकदा टिळक
ती गेली
मेघात अडकली..
ग्रेस...
पण तिथली
In reply to ग्रेस... by मनिष
खूप जणांनी विचारले ह्याबद्द्ल..
In reply to पण तिथली by पांथस्थ
साला.. हे
In reply to खूप जणांनी विचारले ह्याबद्द्ल.. by मनिष
ग्रेस =
In reply to साला.. हे by टारझन
भारीच दिसतात
In reply to खूप जणांनी विचारले ह्याबद्द्ल.. by मनिष
कवि ग्रेस यांच्या काही (मला आवडलेल्या) काही कविता
ही घ्या आषाढबन कविता
In reply to कवि ग्रेस यांच्या काही (मला आवडलेल्या) काही कविता by वाहीदा
धन्यवाद
In reply to ही घ्या आषाढबन कविता by बेसनलाडू
'कवी ग्रेस'
नागभूषण हे आडनाव असावे
In reply to 'कवी ग्रेस' by मृगनयनी
अच्छा
In reply to नागभूषण हे आडनाव असावे by बेसनलाडू
कवितेचं
In reply to अच्छा by मृगनयनी
अचूक
In reply to नागभूषण हे आडनाव असावे by बेसनलाडू
स्तोत्रांत इन्द्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
यमन!!
In reply to स्तोत्रांत इन्द्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे by बेसनलाडू
सहमत आहे
In reply to यमन!! by मनिष
अभिनंदन
मलाही हे
In reply to अभिनंदन by ऋषिकेश
अप्रतिम !!
हा धागा
"....तू असा बरस...."
ही धारणा,
In reply to "....तू असा बरस...." by इन्द्र्राज पवार
संध्यासूक्ताचा यत्रिक
बघायला
In reply to संध्यासूक्ताचा यत्रिक by भडकमकर मास्तर
हे घ्या!
In reply to बघायला by मनिष
१ तासाची
In reply to हे घ्या! by पांथस्थ
आता खुद्द...
In reply to संध्यासूक्ताचा यत्रिक by भडकमकर मास्तर
शरदिनी
In reply to आता खुद्द... by प्रमोद देव
मास्तर
In reply to संध्यासूक्ताचा यत्रिक by भडकमकर मास्तर
ग्रेस यांच्या कविता
ग्रेस यांचे अभिणंद्ण!
ग्रेस ...
झाडांशी निजलो
संभ्रम
+१
In reply to संभ्रम by मुक्तसुनीत
याच
In reply to संभ्रम by मुक्तसुनीत
कवीचे अभिनंदन....!
अगदी अगदी
In reply to कवीचे अभिनंदन....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी ग्रेस ह्यांचे अभिनंदन . .
कवितेबद्दल स्पष्टीकरण द्यायला मी काय गुन्हेगार आहे? - कवी ग्रेस