सर्व मान्यवर सदस्य बंधु-भगिनींना एक नम्र निवेदन....!

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in काथ्याकूट
16 May 2010 - 11:53 am
गाभा: 

आज "अक्षय तृतीया..." परंपरेनुसार सोनेदागीने किंवा तत्सम वस्तु खरेदीसाठी, नातेसंबध प्रस्थापित करणेसाठी, अत्यंत शुभ मानला गेलेला मुहूर्त ! थोडक्यात काहीतरी "चांगली" खरेदी करावयाचा हा दिवस असे याचे शास्त्रात वर्णन केले गेले आहे आणि आपण ते प्रमाणभूत मानतो.

या संस्थळावर विविध विषयांवर चर्चा करताना आपण वारंवार पुस्तकांचा संदर्भ देत असतो. तेव्हा मी आपणास विनंती करीत आहे की, आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीच्या लेखकाचे (वा...अन्य कुठल्याही लेखकाचे) किमान एक पुस्तक खरेदी करावे. किंमत दुय्यम आहे. अगदी दहा-वीस रुपयांचा एक कविता संग्रह जरी घेतला तरी चालेल, पण घ्या !! शिवाय आज "रविवार" असल्याने बहुतेक सदस्यांना साप्ताहिक सुट्टी असेल त्यामुळे "नोकरीमुळे, कामामुळे बाहेर पडता आले नाही.." असेही कुणी कारण सांगू नका. परदेशस्थ तर "ऑन लाईन" खरेदी करू शकतातच.

आज खरेदी केलेले पुस्तक आपण जरूर इथे सांगावे .... म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची खरेदी केली हे पाहणेही कुतहूलपूर्वक ठरेल .

धन्यवाद .

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

16 May 2010 - 11:58 am | बेसनलाडू

उत्तम सूचना. अमलात आणायचा प्रयत्न करेन. कॅलिफोर्नियात कॅलेन्डरनुसार रविवार उजाडायला अद्याप अर्धा तास बाकी आहे (आणि सप्ताहाअंतीचा आळशीपणा, वेळकाढूपणा जमेस धरून आमचा रविवार उजडण्यास अर्धा दिवस बाकी आहे ;) ). मात्र भारतात ऑर्डर दिली जाईल, यासाठी प्रयत्न करेन.
(प्रयत्नशील)बेसनलाडू
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा आणि पवार साहेबांचा सूचनेवर विचार करून ती अमलात आणावी - किमानपक्षी प्रामाणिक प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.
(विनंतीशील)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 2:11 pm | इन्द्र्राज पवार

>.....किमानपक्षी प्रामाणिक प्रयत्न करावा,...

सिंपली ग्रेट.... यातच सर्व काही आले...!!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अमोल केळकर's picture

16 May 2010 - 12:36 pm | अमोल केळकर

धन्यवाद . छान सुचना.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ज्ञानेश...'s picture

16 May 2010 - 2:14 pm | ज्ञानेश...

आपण उत्तम सूचना केली आहे.
आजच 'शेअर बाजारातील गुंतवणूक: एक मृगजळ' हा ग्रंथ विकत घेतो.

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 11:56 pm | इन्द्र्राज पवार

"....'शेअर बाजारातील गुंतवणूक: एक मृगजळ'

धन्यवाद..... या निमित्ताने आपण शेअर बाजारात करीत असलेली गुंतवणूक मृगजळ ठरू नये हीच शुभेच्छा..!

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विंजिनेर's picture

16 May 2010 - 2:27 pm | विंजिनेर

उत्तम सूचना.
आम्ही अक्षय तृतीया नाही पण गेली कित्येक वर्षे दिवाळीला फटाके आणायच्या ऐवजी त्या पैशांची पुस्तके आणतो.

विंजिनेर

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 4:00 pm | इन्द्र्राज पवार

"....दिवाळीला फटाके आणायच्या ऐवजी त्या पैशांची पुस्तके आणतो.

व्वा.... ही तर फारच चांगली, आणि खरंतर अभिनंदनीय बाब आहे. या दिवाळीला मीदेखील असेच करेन, इतकेच आता सांगू शकतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

दत्ता काळे's picture

16 May 2010 - 4:18 pm | दत्ता काळे

तसे करणारही.

शिशिर's picture

16 May 2010 - 5:40 pm | शिशिर

सूचना छानच आहे. दिवाळी ला फटाकेएवजी पुस्तके ही कल्पना पण चांगली आहे. ह्याव्यतिरिक्त एकसष्ठी निमित्ताने होणारे समारंभ, मुलांच्या मित्रांना वाढदिवसा ची भेट, आपल्या घरी मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिली जाणरी Return Gift, वास्तुशांत व इतर समारंभ ह्या सर्व प्रसंगी मी स्वतः पुस्तकेच देत असतो. व्यवसायात देखील आपल्या customers/suppliers ना भेट म्हणून दिलेली पुस्तके त्यांना आवडतात.

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 9:57 am | इन्द्र्राज पवार

"....व्यवसायात देखील आपल्या customers/suppliers ना भेट म्हणून दिलेली पुस्तके त्यांना आवडतात....

अरेच्च्या.... ही कल्पना तर खूपच नावीन्यपूर्ण आहे, जिची अंमलबजावणी मी नक्कीच करीन. याशिवाय आपण उल्लेख केलेल्या पहिल्या तिन्ही प्रसंगी मी त्याप्रमाणे भेटी देत असतो.

शिवाय आणखीन् एक : या ना त्या निमित्ताने माझा "सीनिअर सिटिझन्स" या गटात येणार्‍या लोकांशी संबंध येत असतो. अशा प्रसंगी त्यांच्याकडे जाताना त्यातील किमान एकाला मी पुस्तक भेट देतो.... (विशेषतः श्री. पु. ल. देशपांडे यांचे.....हमखास आवडते घेणार्‍याला) फार आनंद होतो त्या लोकांना पुस्तक भेटीमुळे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पाषाणभेद's picture

16 May 2010 - 5:59 pm | पाषाणभेद

उत्तम सुचना. कच्च्या कविता लिहायला एक वही घेतली.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 May 2010 - 6:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा मुहूर्त पाळण्यावर विश्वास नाही. दुकानात जायला वेळ असेल आणि अलिकडच्या काळातच फार पैसे उधळल्याचा गिल्ट फील नसेल तर पुस्तकं घरात येतात.
काल, शनिवारीच पुस्तकं (युगान्त - इरावती कर्वे आणि करूणा गोखलेंचं, स्त्रीवादी निबंध असं काहीसं, नाव विसरले) खरेदी केली आहेत, आज वेळ नाही आणि सध्यापुरते पुस्तकखाती असलेले पैसे संपवले आहेत!

अदिती

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 11:19 pm | इन्द्र्राज पवार

"....माझा मुहूर्त पाळण्यावर विश्वास नाही. ...

नाही नाही.... मी "मुहुर्त" या अर्थाने हे निवेदन दिले नाही. अक्षय तृतीया हे एक निमित्त असते आपणा सर्वांकडे की, "चला आजचा दिवस काहीतरी चांगले खरेदी करु या..." हाच धागा पकडून मनात आले की का नाही "खरेदी यादी"त पुस्त़के घ्यावीत?

आपण खरेदी करू तोच मुहूर्त हे जरी सत्य असले तरी "गुढी पाडवा, दसरा, आणि अक्षय तृतीया" आपण अशा कारणासाठी हवेहवेसे मानतो, इतकाच उद्देश.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विकास's picture

16 May 2010 - 6:52 pm | विकास

कल्पना खूपच छान आहे!

"वाचाल तर वाचाल" या घोषणेची आठवण झाली. :-)

(आत्ताच आमच्या ९ वर्षाच्या मुलीस, असेच अक्षय तृतिया आहे म्हणून आणि लोकं कसे सोने वगैरे घेतात ते सांगितले. ती तात्काळ म्हणाली की आपण मला पुस्तके आणूया! :) )

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ऋषिकेश's picture

16 May 2010 - 6:56 pm | ऋषिकेश

हे पवारसाहेबांच्या विचाराला ९ वर्षाच्या मुलीच्या विचाराइतके म्हणणे झाले की स्वतःच्या मुलीच्या मोठ्ठ्यांसारख्या विचाराची ओळख करून देणे ? ;)

(ह घ्या हे वे सां न)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विकास's picture

16 May 2010 - 7:35 pm | विकास

हे पवारसाहेबांच्या विचाराला ९ वर्षाच्या मुलीच्या विचाराइतके म्हणणे झाले की स्वतःच्या मुलीच्या मोठ्ठ्यांसारख्या विचाराची ओळख करून देणे ?

Great Minds Think Alike इतकेच सांगायचे होते ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 11:36 am | इन्द्र्राज पवार

"....ती तात्काळ म्हणाली की आपण मला पुस्तके आणूया!...."

हे मला फार म्हणजे फारच आवडले, विकास जी...!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

chipatakhdumdum's picture

16 May 2010 - 8:28 pm | chipatakhdumdum

युगान्त .. इरावती कर्वे
असा मी असामी .. पु ल
खेकसून म्हणणे आय लव्ह यू .. श्याम मनोहर

टारझन's picture

16 May 2010 - 8:53 pm | टारझन

अक्षयतृतीया असो वा दिवाळी दसरा .. ३६५ दिवस सारखेच ... आम्ही आणंदी असु तो दिवस आमचा सण असतो :) तेंव्हा उगा उन्हा-तान्हाचं भरकटण्यात अर्थ नाही ... वेळ मिळेल तेंव्हा आणि मुड असेल तेंव्हा घेऊ पुस्तक :)

रामदास's picture

16 May 2010 - 9:23 pm | रामदास

पण तेवीस तारखेला सर आणि मी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे .ज्योत्स्ना कदम यांचे हे पुस्तक त्यांच्या आणि संभाजी कदम यांच्या जीवनावर आहे.पुस्तक उत्तम असेल याची खात्री असल्यामुळे या महीन्यात तेच खरेदी करणार आहे.

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 10:57 pm | इन्द्र्राज पवार

व्वा...नेमके हेच पुस्तक मला "घ्याच..." म्हणून माझ्या पुस्तक विक्रेत्याने अगदी हातात ठेवले होते, पण त्या अगोदरच माझी बजेटच्या हिशोबाने खरेदी पूर्ण झाली असल्याने हे आणि महाराणी गायत्रीदेवी यांचे आत्मचरित्र बाजुला ठेवणे भाग पडले. (दोन्ही पुस्तके सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत.)

"सर आणि मी" ची निर्मिती मात्र अत्यंत देखणी अशीच असून त्या थोर चित्रकाराच्या नावाला शोभेल अशीच आहे. चाळले मी हे पुस्तक थोडावेळ... पण पहिल्याच पानावर "वॉर्निंग" आहे... ती अशी की, "सदर पुस्तकातील मजकुराचा वापर कुठ्ल्याही माध्यमाच्या चर्चेत, लेखिकेच्या परवानगीशिवाय, करता येणार नाही..." म्हणजेच याचा अर्थ असा की, उद्या जर आपण त्यातील एका प्रकरणावर इथे चर्चा करतो म्हटले तर ते अशक्य असे म्हणावे लागेल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पांथस्थ's picture

16 May 2010 - 11:22 pm | पांथस्थ

साला आम्हाला तर संधी मिळेल तेव्हा पुस्तके विकत घ्यायची सवय....त्यात दुपारीच हा सल्ला वाचला आणि मग काय "पिने वाले को पिने का बहाना चाहिये" ह्या चालीवर आमची पाऊले वळाली लँडमार्क कडे (बेंगळूरूमधे मराठी पुस्तके नाही मिळत आणि मागच्याच आठवड्यात पुणे वारीत काहि मराठी पुस्तके आणली होती...)

हि घ्या यादी....(विंग्लीश पुस्तकांची असल्याने विंग्लीश मधेच देत आहे)

१. Poems from Puravi: Ravindranath Tagore
२. Palgrave's Golden Treasury (Collection of English Poems)
३. The Absent Traveller: Prakrit Love Poems from Gathasaptasati of Satavahana Hala
४. The Khushwant Singh Treasury
५. Dancing Earth: An Anthology of Poetry from Northeast India
६. Geetanjali: Ravindranath Tagore (W.B. Yeats translation)
७. Tagore Selected Poems: Oxford
८. Gulzar: 100 Lyrics

काहि व्यावसायिक व व्यवस्थापना संबधित पुस्तके देखील आणली.

१. The Checklist Manifesto: How to Get Things Right - Atul Gawande
२. Rapt: Attention and the Focused Life - Winifred Gallagher
3. The Little Big Things: 163 Ways to Pursue EXCELLENCE - Tom Peters
४. How to Become a Great Boss: The Rules For Getting and Keeping the Best Employees - Jeffrey J. Fox
५. A Compass to Fulfillment: Passion and Spirituality in Life and Business - Kazuo Inamori

#:S #:S #:S

आता बोला...बिल कुणाला पाठवायचं?

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 11:40 pm | इन्द्र्राज पवार

"...संधी मिळेल तेव्हा पुस्तके विकत घ्यायची सवय...!"

बाप रे !! पांथस्थ जी ~~ तुम्ही तर माझी बोलतीच बंद करून टाकली की !! मी देखील निवेदन दिल्यानंतर (ऐपतीप्रमाणे...) खरेदी केली, जिची माहिती आताच इथे दिली अन् तुमची प्रतिक्रिया वाचली.

आता तुमची यादी वाचल्यानंतर असे वाटले की, तुमच्या "रोल्स रॉईस" पुढे माझी "नॅनो" फारच केविलवाणी दिसत आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पांथस्थ's picture

17 May 2010 - 12:07 am | पांथस्थ

न्हाय वो! कसली रोल्स रॉईस आणि कसले काय. आपल्याला दुसरे कोणतेही (पाककला आणि छायाचित्रण सोडुन) शौक नसल्यामुळे जे आहे ते पुस्तकांमधे टाकतो. अर्थात सगळं वाचलं जात असे नाहि आणि जे वाचलं जातं ते प्रत्यक्षात उतरतं असेही नाही (अर्थात हि परीस्थिती बदलायची असे मी अनेकदा ठरवले आहे!).

असो. पण ह्या धाग्याने आज मजा आणली! धन्यवाद!!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

इन्द्र्राज पवार's picture

16 May 2010 - 11:31 pm | इन्द्र्राज पवार

संस्थळावर पुस्तक खरेदीचे आवाहन केल्यानंतर सायंकाळी मी अन् माझा एक मित्र खरेदीसाठी बाहेर पडलो आणि खालील खरेदी झाली... ती आपणालाही आवडेल :

१. शोध मर्ढेकरांचा : विजया राजाध्यक्ष ~~ मौज प्रकाशन ~~ (वास्तविक या अगोदर मी विजयाताईंचे "पुन्हा मर्ढेकर..." हे पुस्तक घेतले होते.... पण "शोध...." ची मूळ कल्पना साक्षेपी संपादक कै. श्री. पु. भागवत यांची असल्याने याही पुस्तकाबद्दल मला खूप उत्सुकता आहे. मौज परंपरेनुसार अतिशय देखणी निर्मिती आहे...... शिवाय "बा. सी. मर्ढेकर..." हा देखील माझ्या मनातील एक हळवा कोपरा आहेच.

२. बॅरिस्टरचं कार्टं : डॉ. हिम्मतराव बावस्कर ~~ मॅजेस्टिक प्रकाशन ~~ ("विंचू दंशावर महत्वाचं संशोधन करून जागतिक कीर्ती मिळविलेल्या महाड येथे कार्यरत असणार्‍या एका डॉक्टरची आगळी वेगळी आत्मकथा. श्री. अनिल अवचट यांनी आपल्या "कार्यरत" या पुस्तकात डॉ. बावस्कर यांची ओळख करून दिल्यानंतर यांच्याविषयी सर्वत्र कुतूहल निर्माण झाले. आता पुस्तक रूपाने त्यांची जीवनकहाणी वाचताना आनंदच होईल.)

३. कोंडमारा ~ अनिल अवचट ~~ मौज प्रकाशन ~~ हे पुस्तक पूर्वीदेखील माझ्याकडे होते, पण नेहमीच्या अजागळपणाचा फटका बसला, आणि नेमके कुणी हे (आणि "धागे उभे आडवे...'') पुस्तक नेले याची चित्रगुप्ताच्या दप्तरी नोंद नसल्याने, परत नव्याने घेतले.

४. महाभारताचा मूल्यवेध ~~ डॉ. रवींद्र शोभणे ~~ विजय प्रकाशन, नागपूर ~~ महाभारतातील घटनाकडे समाजशास्त्रीय, तर्कशास्त्रीय, ऐतिहासिक अशा दृष्टिकोनातून पाहण्याचा लेखकाचा प्रयत्न. यांचे फुटकळ लेखण यापुर्वी वाचले असल्याने पुस्तकाबाबत खूपच उत्सुकता आहे.

५. का़जळमाया ~~ जी. ए. कुलकर्णी ~~ पॉप्युलर प्रकाशन : या पुस्तकाबद्द्ल काही सांगायची आवश्यकता नाही इतकी याची माहिती सर्व सदस्यांना आहे.

६. रमलखुणा ~~ वरीलप्रमाणेच.

याशिवाय "सर आणि मी" हे श्रीमती ज्योत्स्ना संभाजी कदम यांचे कालच बाजारात आलेले पुस्तक घेण्याचा आग्रह विक्रेता करीत होता.... पण बजेट त्यापूर्वीच डळमळले असल्याने त्या पुस्तकाची खरेदी राहुन गेली. मात्र पुस्तक अतिशय देखणे काढले आहे. सदस्यांनी ते जरूर पहावे.

(क्रमांक ५ व ६ यांचा प्रती माझ्याकडे आहेतच.... पण ही दोन्ही पुस्तके एका समविचारी मित्राला भेट देण्यासाठी घेतली आहेत.)

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

Pain's picture

17 May 2010 - 12:57 am | Pain

तुमचे रमलखुणा वाचुन झाले का ?

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 9:42 am | इन्द्र्राज पवार

हो. पूर्वीच ! आणि इतक्या वेळा वाचले आहे की, त्यातील दोन्ही दीर्घकथा "प्रवासी" अन् "इस्किलार" अगदी तोंडपाठ झाल्या आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. तुम्ही वाचले नसेल तर आजच विकत घ्या.... मात्र वाचन "रात्री"च्या वेळीच (एकटे असताना... टीव्ही.... मोबाईल... बंद करूनच....! नीरव शांततेत या दोन कथा अनुभव्यात इतक्या त्या अप्रतिम आहेत...)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मी-सौरभ's picture

16 May 2010 - 11:45 pm | मी-सौरभ

आत्ता वाचलं :(

-----
सौरभ

पांथस्थ's picture

17 May 2010 - 12:09 am | पांथस्थ

आता तुम्ही वाचणार नाही :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

शुचि's picture

17 May 2010 - 12:16 am | शुचि

http://www.amazon.com/Desire-Tantric-Awakening-Daniel-Odier/dp/0892818581

डिझायर बाय डॅनिअल ओडिअर

विकत घेतलेलं आहे. रोचक वाटत आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 6:49 pm | इन्द्र्राज पवार

ग्रेट !! या लेखकाची अशा पध्द्तीच्या लेखनाची एक सीरिजच आहे असे वाचल्याचे आठवते.... पण अजून मन लाऊन वाचावे इतका "सीरिअस" वेळ मिळेना. वाचनखूण मात्र नक्की करीत आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सुधीर काळे's picture

17 May 2010 - 8:45 pm | सुधीर काळे

दोन पुस्तके (१) प्राजूचा "फुलांची आर्जवे" हा कवितासंग्रह व (२) 'सोन्याच्या धुराचा ठसका' घ्यायचा संकल्प आज केलाय. खरेदी एक जूनला पण वाचन मात्र "Nuclear Deception" हातावेगळे केल्यानंतर! (मोंगल सैन्याला पूर्वी सगळीकडे संताजी-धनाजी दिसायचे असे वाचले आहे तसे सध्या मला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त "Nuclear Deception" दिसतेय्.)
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

भोचक's picture

17 May 2010 - 11:37 am | भोचक

अक्षयतृतीयेचाच मुहूर्त साधून असे नाही, पण नेमका त्याच काळात पुण्यात आल्याने 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी हे प्रतिभा रानडेंचे पुस्तक घेतले आहे. शिवाय दुर्गाबाईंनी आणीबाणीनंतर अबूमध्ये दिलेल्या भाषणानंतर उठलेल्या वादासंदर्भात त्यांची भाषणातूनच भूमिका स्पष्ट करणारे एक पुस्तकही 'फूटपाथ'वर मिळाले.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

विजुभाऊ's picture

17 May 2010 - 12:45 pm | विजुभाऊ

मी
प्रकाशवाटा : प्रकाश आमटे
बिम्म्ची कखर : जी ए
मुग्धाची रंगीत स्वप्ने : जी ए
सत्यनिरंजन : कुंटे ( तेच ते माते नर्मदे वाले)

ही पुस्तके घेतली.... घरातून काहितरी तिरीमीरीत बाहेर पडलो... रागारागाने पुस्तके घेतले

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 2:51 pm | इन्द्र्राज पवार

"....घरातून काहितरी तिरीमीरीत बाहेर पडलो... रागारागाने पुस्तके घेतले..."

मला हे एक नवीनच कारण समजले...की, लोक रागारागानेदेखील पुस्तके घेतात. "ललित" च्या अशोक कोठावळ्यांना सांगितले पाहिजे.

आपल्या यादीतील पहिली तिन्ही पुस्तके माझ्याकडेही आहेत.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

दत्ता काळे's picture

17 May 2010 - 5:36 pm | दत्ता काळे

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुस्तक खरेदी केले, कि जे माझ्या मुलांनाही वाचायला आवडेल, ते असे :

विचित्र माणसं, विक्षिप्त शास्त्रज्ञ
- लेखक निरंजन घाटे
मधुराज पब्लिकेशन्स प्रा.लि., पुणे
मूल्य : रु. १६०/-

ह्या पुस्तकात एकूण २७ मासलेवाईक व्यक्तीं ( शास्त्रज्ञ आणि इतर जगप्रसिध्द व्यक्तीं ) च्या गोष्टी आहेत. पुस्तक मी अजून वाचलेले नाही.

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 6:42 pm | इन्द्र्राज पवार

"....जे माझ्या मुलांनाही वाचायला आवडेल, ते असे :...

मुलांचा उल्लेख केला म्हणून सांगतो की, तुमच्या मुलांना "यांनी घडवलं सहस्त्रक" हे रोहन प्रकाशन, पुणे, यांनी अत्यंत देखण्या पध्दतीने प्रस्तुत केलेल ग्रंथ द्या. १००० वर्षातील १००० प्रभावशाली व्यक्तींचा (सर्व क्षेत्रातील...) दीर्घ परिचय योग्य त्या माहितीसह दिला आहे..... पुस्तक अर्थात २००३ मध्ये प्रकाशीत झाले असल्याने कदाचीत तुमच्या संग्रही असेलदेखील..... नसेल तर या सुचनेचा अवश्य विचार करावा.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

दत्ता काळे's picture

17 May 2010 - 9:09 pm | दत्ता काळे

संग्रही नाही, पण मुलांनी वाचलं आहे. त्यांच्या शाळेतून, ज्यांना वाचनाची आवड आहे अश्या, मुलांना शाळेच्या वाचनालयात खास बोलावून पुस्तके दिली जातात. सुदैवाने, माझ्या दोन्ही मुलांना वाचनाची आवड आहे.

सुखदा राव's picture

17 May 2010 - 7:33 pm | सुखदा राव

सुचना आवडल्याड्मुळे लगेच दुकानात गेले. सोनेरी धुराचे थसके घ्यायला, पन 'आमच्याकडे आल नाहिये अजुन' अस ऐकुन परत आले. अन मागच्याच महिन्यात एकदम ३००० ची पुस्तके घेतल्याने आता बजेट सम्पलय, आता अजुन २ महिने तरी नविन कही घेउ शकत नाही.

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 8:29 pm | इन्द्र्राज पवार

"....अन मागच्याच महिन्यात एकदम ३००० ची पुस्तके घेतल्याने आता बजेट सम्पलय...

३००० चे खरेदी झाली असल्याने पुन्हा लागलीच पुस्तकांची खरेदी करावी असेही नाही. मी फक्त "त्या" निमित्ताने तसा विचार अवश्य करावा असे सुचविले होते.

तुम्ही सुचना आवडल्याने लगेच दुकानात गेला...यातच सर्व काही आले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

खरंच मी नुकतंच "Working with Zia" हे ज. खलिद मोहम्मद आरिफ यांनी लिहिलेले पुस्तक घेतले. त्यातला भुत्तोंच्या आयुष्यातली शेवटची रात्र याबद्दलचा मजकूर फारच हृदयद्रावक आहे. या संकेतस्थळाच्या नियमांमुळे देता येत नाहीं नाहीं तर दिला असता!

सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 9:35 pm | इन्द्र्राज पवार

".....त्यातला भुत्तोंच्या आयुष्यातली शेवटची रात्र याबद्दलचा मजकूर फारच हृदयद्रावक आहे......"

हा प्रसंग मी आपले सुप्रसिध्द लेखक "श्री. खुशवंत सिंग" यांच्या "Not a Nice Man to Know: The Best of Khushwant Singh" या पुस्तकात वाचला आहे. त्यांना त्या रात्री भुत्तोंची मुलाखत घेण्याची अनुमती खुद्द झियांनी दिली होती. फारच वाचनीय आहे ते लेखन.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"