शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
26 Apr 2010 - 11:30 am
गाभा: 

राम राम,

शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ मुंबैत नुकताच पार पडला. या शिबिरात २५००० हून अधिक बाटल्या रक्त गोळा झाले.. व या घटनेची गिनिज विक्रम पुस्तकात नोंदही घेतली गेली. या चांगल्या, समाजोपोयोगी कार्याकरता शिवसेनेचे मन:पूर्वक अभिनंदन..

आता हे सर्व रक्त अडलेल्या गोरगरीबांना, गरजूंना विनामूल्य तसेच वेळेवर उपयोगी पडेल हेही शिवसेनेने पाहावे तरच हा रक्तदानाचा महायज्ञ सार्थकी लागेल..

सेनेचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा!

तात्या.

प्रतिक्रिया

Manoj Katwe's picture

26 Apr 2010 - 11:53 am | Manoj Katwe

आता हे सर्व रक्त अडलेल्या गोरगरीबांना, गरजूंना विनामूल्य तसेच वेळेवर उपयोगी पडेल हेही शिवसेनेने पाहावे तरच हा रक्तदानाचा महायज्ञ सार्थकी लागेल

रक्त गोला करने हे खरच चांगले काम झाले आहे. पण ते रक्त वैद्यकीय अधिकार्य्यांकडे सोपविल्यावर शिवसेनेची जबाबदारी संपते.
"गरजूंना विनामूल्य तसेच वेळेवर उपयोगी पडेल हेही शिवसेनेने पाहावे" हे मात्र पटले नहीं. ते काम वैद्यकीय अधिकार्य्यांचे आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Apr 2010 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll

ते काम वैद्यकीय अधिकार्य्यांचे आहे
सहमत. लोकांचं रक्त गाळूनच कदाचित वैद्यकीय अधिकारी किलोने सोने कमवित असतील. :P
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

नितिन थत्ते's picture

26 Apr 2010 - 11:56 am | नितिन थत्ते

सत्कार्याबद्दल शिवसेनेचे अभिनंदन.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2010 - 1:42 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

26 Apr 2010 - 10:15 pm | इंटरनेटस्नेही

.

चिरोटा's picture

26 Apr 2010 - 12:48 pm | चिरोटा

अभिनंदन!!
शिवसेना आता पुन्हा समाजोपयोगी कामे हाती घेत आहे हे वाचुन बरे वाटले.
P = NP

विशाल कुलकर्णी's picture

27 Apr 2010 - 10:53 am | विशाल कुलकर्णी

सहमत

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पक्या's picture

26 Apr 2010 - 10:08 pm | पक्या

कितीतरी उणे तापमानात ठेवलेल्या रक्ताची एक्स्पायरी डेट साधारण महिनाभरात संपते. बहुतेक ३५ की असेच काहिसे दिवस रक्त चांगल्या स्थितीत टिकू शकते. नंतर ते वापरता येत नाही. बहुतेक जाळून त्याची व्हिलेवाट लावतात. आता शिवसेनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त गोळा केले आहे ती गरज बघून केलेले असेल तर ठिक आणि गरजवंतांना ते मिळाले म्हणजे चांगले. त्यापेक्षा रक्त पेढीत गरज आहे तेवढे रक्त साठवून हवे तेव्हा तातडीने रक्तदाते उपलब्घ करून देणे हे जास्त चांगले असे मला वाटते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

योगी९००'s picture

26 Apr 2010 - 10:48 pm | योगी९००

शिवसेनेचे अभिनंदन !!!

तसेच सर्व मराठी व्रुत्तपत्रांचे आभार कारण त्यांनी या चांगल्या कामाची दखल घेतली....मराठीद्वेषाने पोखरलेल्या हिंदी /ईग्रजी चॅनेल्स ना IPL शिवाय दुसरा विषय cover करायला नसावा..

खादाडमाऊ

सोम्यागोम्या's picture

26 Apr 2010 - 11:45 pm | सोम्यागोम्या

यज्ञ करायला शिवसेनेने आहुत्या द्यायच्या आणि यज्ञाचे फळ मात्र काँग्रेस ला? महाराष्ट्रातली जनता कधी सुधारणार? ते प्रफुल्ल पटेल चार्टर प्लेन बनवणारी त्यांची कन्या, आयपीएल मध्ये एक रुपयाचाही वाटा नसलेले शरचंद्रजी पवार, आयपीअल मधला सहभाग मान्य करणारे जावई सुळे, आई पीएल करमुक्त करुन कोट्यावधी पैसे खाणारे भुजबळ, मद्याचे कारखाने स्वतःच्या पोराला काढून देणारे विलासराव, धडधडीत खूनाची सुपारी देणारे राष्ट्रवादीचे पद्मसिंह अरे हे काय नेते आहेत का?

एवढं सगळं दिसूनही जनता विचार करायला केव्हा शिकेल? कृपया काँग्रेस्च्या एका तरी समर्थकाने पुढे येवून उत्तर द्यावे.

वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत. मग आहे तरी काय या महाराष्ट्रात?

ज्ञानेश...'s picture

27 Apr 2010 - 12:10 am | ज्ञानेश...

यज्ञ करायला शिवसेनेने आहुत्या द्यायच्या आणि यज्ञाचे फळ मात्र काँग्रेस ला?

तुमची भावना कळते आहे... पण,
आहुत्या??
रक्तदान केल्याने माणूस मरत नसतो हो..!

------------------------------------

शिवसेनेचा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. त्यांचे अभिनंदन.

वर कोणीतरी रक्ताच्या बाटल्यांची शेल्फ लाईफ एक महिना सांगीतली आहे, ती योग्य नाही. रक्तात citrate, phosphate, dextrose आणि Adenosine ही preservatives अ‍ॅड करतात, त्याने रक्ताची शेल्फ लाईफ चार ते सहा महिन्यापर्यंत वाढते.

सोम्यागोम्या's picture

27 Apr 2010 - 12:44 am | सोम्यागोम्या

शिवसेनेने यज्ञ केला म्हणजे का खरोखर होम पेटवून त्यात रक्त टाकून दिले का? नाही ना. मग तद्वदच आहुती दिली म्हण्जे मेले असा अर्थ होत नाही.
त्यागासाठी व चांगलया कामासाठी दिलेली उपमा होती ती एक.

तिमा's picture

27 Apr 2010 - 9:22 am | तिमा

चार सहा महिन्यांनंतर त्या रक्ताचे काय होणार? की वाया जाऊ नये म्हणून दंगली करुन तेवढे 'पेशंट' घडवणार?
यज्ञ, आहुत्या या उपमा स्वत:च द्यायच्या नसतात. इतरांनी दिल्या तर योग्य!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सोम्यागोम्या's picture

27 Apr 2010 - 7:43 pm | सोम्यागोम्या

शिवसेनेच्या नावाची एवढी अ‍ॅलर्जी यांना. चांगले काम सुद्धा चांगले म्हणवत नाही. तिरशिंगराव तुमच्या घरातल्या कोणाला रक्ताची गरज पडली तर तिथे नकार द्या. म्हणावं छे छे शिवसैनिकांनी दिलेलं रक्त आम्ही घेणार नाही.

ब्लड बँक नावाचा काही प्रकार असतो की नाही? शॉर्ट टर्म व लाँग टर्म (Cryopreservation) असे दोन प्रकार असतात रक्त साठवण्याचे.

>>यज्ञ, आहुत्या या उपमा स्वत:च द्यायच्या नसतात. इतरांनी दिल्या तर योग्य!
मी इतरच आहे. मी शिवसैनिक नाही याची कृपया नोंद घ्यावी.

मी विचारलेल्य प्रश्नांना एकाही कॉंग्रेस समर्थकाने उत्तर दिलेले नाही.

तिमा's picture

28 Apr 2010 - 9:00 am | तिमा

आम्हाला कोणाचीही अ‍ॅलर्जी नाही. रक्तदानाचे काम चांगलेच आहे. प्रश्न आहे की एवढ्या बाटल्या रक्त टिकेल की नाही ? निव्वळ गिनीज बुक मधे नांव नोंदवले गेल्यामुळे ही वस्तुस्थिती बदलणार आहे का ? आम्ही विज्ञानवादी आहोत. त्यामुळे 'शिवसैनिकाचे रक्त वेगळे' अशा भावनिक विधानावर आमचा विश्वास नाही.
ह्याच रक्तदात्यांचे पत्ते घेऊन ठेवले असते आणि जरुर असेल तेंव्हा त्यांना बोलावले असते तर ते नक्कीच तिथे धावून गेले असते.
आमचा विरोध शिवसैनिकांना कधीच नव्हता. तर भडक भाषणे करुन त्यांची माथी भडकवणार्‍यांना होता व राहील.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

योगी९००'s picture

27 Apr 2010 - 12:13 am | योगी९००

सोम्यागोम्या,

तुम्ही म्हणता ते एकदम पटले..!!!

हाच लेख जर शिवसेनेच्या विरोधात असता तर आत्तापर्यंत ५०/६० प्रतिसाद सहज आले असते..!!!

खादाडमाऊ

शिवसेनेचे कार्य कौतुकास्‍पदच. मात्र या सर्व प्रकारात एक बाब खटकली... एरवी शिवसेनेत खट्ट झालं तरी किंवा सामन्‍यातून बाळासाहेबांनी कोणाबद्दल काय-काय लिहिलं आहे. याचं दिवसभर चर्वण करणा-या हिंदी माध्‍यमांनी रक्तदान महायज्ञाची किंवा निदान पक्षी गिनीज बुकात नोंद झाल्‍याची तरी बातमी द्यायला हवी होती. ती कुठेही दिसली नाही.

मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी

विकास's picture

27 Apr 2010 - 2:57 am | विकास

शिवसेनेचे आणि उद्धव ठाकर्‍यांचे अभिनंदन!

रक्त सांडून नावारूपाला येण्याऐवजी, रक्त गोळा करून आलेले कधीही उत्तम. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सन्जोप राव's picture

27 Apr 2010 - 6:04 am | सन्जोप राव

'सौ चूहे खाके बिल्ली चली हज को' या म्हणीची आठवण झाली
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

अनामिका's picture

27 Apr 2010 - 8:45 am | अनामिका

रक्तदानाचा महायज्ञ यशस्वीपणे पूर्णत्वास नेल्याबद्दल सेनेचे मनःपुर्वक अभिनंदन .आणि या रक्तदान यज्ञाच्या निमित्ताने समाजसेवेच्या गावगप्पा मारणार्‍यांची तोंडे सेनेने व कार्याध्यक्षांनी कायमची बंद केली हे अत्यंत महत्वाचे....
सेनेने आपल्या ८०% समाजकारण व २०% राजकारण या मूळ भुमिकेकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले याचा आनंद जास्त आहे
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

वेताळ's picture

27 Apr 2010 - 9:52 am | वेताळ

एव्हढ रक्त एकावेळी गोळा करुन काही उपयोग होईल असे वाटत नाही. झालाच तर तो श्रीमंत लोकांनाच होईल.इतके रक्त ज्यादा दिवस टिकवुन ठेवण्याची व्यवस्था व गरज आहे कि नाही हे प्रथम उध्दव ठाकरेनी तपासुन पाह्यला हवे होते.
वेताळ

सुधीर काळे's picture

27 Apr 2010 - 9:59 am | सुधीर काळे

खरं तर 'मनसे'ने असला कांहीं उपक्रम केलेला नाहीं, मग शिवसेनेला एकदम हा झटका कां आला?
मी शिवसेनाप्रेमी जरूर आहे, पण हल्ली शिवसेना 'मराठी'ची 'हिंदू' झालीय हे मात्र खूप खटकते. रक्त गोळा करा जरूर, अभिनंदनीय गोष्ट आहे. पण मराठींना नोकर्‍या द्या. सगळ्या हिंदी-इंग्रजी वाहिन्यावर अमराठी वार्ताहार खूप जास्त प्रमाणावर आहेत, 'डीडी'वरही 'Metro News' वर मुंबईचे वार्तापत्र एक शेट्टी नावाची वार्ताहार देते. इकडे शिवसेनेने लक्ष दिले पाहिजे.
मागे मी झी-न्यूजला लिहिले होते व इतरांनाही लिहायला सांगितले होते. पत्ताही दिला होता! कितींनी लिहिले ते माहीत नाहीं. पण हा आग्रह राजकीय पक्षांनी धरला पाहिजे!
असो. चांगल्या गोष्टीचे जरूर अभिनंदन, पण आजची गरज महाराष्ट्राला परत 'मराठी' करण्याची आहे असे मला वाटते! असे 'कांहीं तरी चांगले' करून मुख्य गोष्टीकडे शिवसेनेने दुर्लक्ष करू नये अशी कळकळीची विनंती.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

>:D< सुनिलसो

रक्तदान हे जिवनदान आहे.
मि स्वता दर ३ महिन्यानि रक्तदान करतो.
व हे मि माझे कर्त्यव्य समजतो.
आता पर्यत २० वेळा रक्तदान केले आहे.