"अक्सुमो..!!"(भारतीय रवा पिझ्झा...)

डावखुरा's picture
डावखुरा in पाककृती
18 Apr 2010 - 4:31 pm

साहित्यः
१)कांदा,टमाटे,कोथिंबिर...

कांदा,टमाटे,कोथिंबिर

२)बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी...

बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी

३)पिझ्झा तयार करण्याची पुर्वतयारी:

अ]पिझ्झा चटणी: दोन कांदे,५-६ पाकळ्या लसुण,१ टेबल स्पून लाल तिखट,
चवीप्रमाणे मीठ.. थोडे पाणी टाकुन मिक्सरमधे वाटुन घ्यावे.[घट्टसर]

ब] पिझ्झा बेसः रवा,दही आणि सोडाखार कोम्हट पाण्यात तीन तास भिजवुन ठेवावे..
[ईड्लीच्या पिठासारखे..]

पिझ्झा बेस पिठ

तीन तासानंतर...

कृती: तवा गरम झाल्यावर त्यावर भिजवुन ठेवलेले मिश्रण [उत्तप्प्यासारखे जाड] टाकावे.
दोन्ही बाजुने भाजुन घ्यावे. भाजतांना तेल सोडावे..

४)पिझ्झा बेस(तयार):

पिझ्झा बेस

+तयार झालेला पिझ्झा बेस वर पिझ्झा चट्णी लावुन घ्या.
+त्यावर बारीक चिरलेला कांदा-टमाटा पसरवुन घ्या , व टमाटा सॉस टाका..
+वरुन पिवळी बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबिर.

५)तयार अक्सुमो पिझ्झा.....

अक्सुमो पिझ्झा..

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत....!!

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

18 Apr 2010 - 6:16 pm | पर्नल नेने मराठे

:D यमी

चुचु

विसोबा खेचर's picture

18 Apr 2010 - 6:49 pm | विसोबा खेचर

छान.. :)

प्राजु's picture

18 Apr 2010 - 9:18 pm | प्राजु

हा खरंच अशा नावाचा खाद्य पदार्थ आहे का?
की तुमचेच काही इनोव्हेशन आहे??

जर इनोवेशन असेल... तर तुमच्या कल्पनाशक्तीची दाद द्यायला हवी.. जो असा काही पदार्थ कल्पना करून तयार केलात!!
आणि खरंच पदार्थ असेल तर... सॉरी झेपला नाही मला!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

रेवती's picture

18 Apr 2010 - 10:05 pm | रेवती

असेच म्हणते.
पदार्थाचे नाव कोणत्या भाषेतील आहे?

रेवती

अरुंधती's picture

18 Apr 2010 - 10:26 pm | अरुंधती

मला तर हा आपला उत्तप्पा दिसतोय.... त्याचेच हे फॅन्सी रूप आहे का?
मी आंतरजालावर पाहिल्यावर मला तसा दिसला रवा पिझ्झा पण त्याला अक्सुमो वगैरे नाव नव्हते. त्यात रवा, दही व बेकिंग पावडर १५ मिनिटे एकत्र भिजवले. दुसरीकडे तेलावर कांदा, टोमॅटो व इतर भाज्या मीठ घालून परतून घेतल्या. तव्यावर तेल पसरून त्यावर हे रवा मिश्रण पसरले, त्यावर भाज्या, चीझ घालून ते जरा दाबले व झाकण घालून मन्द आचेवर शिजू दिले. उलटताना काळजीपूर्वक उलटले व दुसरी बाजू शेकली. पिझ्झा तयार!

तुम्ही रेसिपीमध्ये वापरलेली चटणी त्यात नव्हती.... ह्या पिझ्झ्याविषयी (अक्सुमो) इतर काही माहिती दिलीत तर अजून छान! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

पिंगू's picture

19 Apr 2010 - 11:19 am | पिंगू

नविन आणि भन्नाट..... करुन पाहीन!!!!!!! :)

बेसनलाडू's picture

19 Apr 2010 - 12:22 pm | बेसनलाडू

चवदार झाले असणार हे चित्र पाहूनच कळत आहे. भूक चाळवली गेली.
(खवय्या)बेसनलाडू

प्रदीपा's picture

7 May 2010 - 5:14 pm | प्रदीपा

ते अक्सुमो म्हनजे काय हो?....