मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
16 Apr 2010 - 9:33 pm
गाभा: 

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती?
आता सहज आठवणार्‍या गायिका: नूरजहान, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैय्या, जगजीत कौर, सुमन कल्याणपूरकर ....आणखी कोण कोण होत्या?

मुबारक बेगम: बेमुरव्वत बेवफा.....
गीतादत्त : ये कौन आया के मेरे दिल की दुनियामे बहार आयी...
सुरैय्या: ये कैसी अजब दासता हो गयी है.....
जगजीत कौर: तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो....

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 Apr 2010 - 9:41 pm | शुचि

(१) केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर - सुमन कल्याणपूर
(२) आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम
(३) कैसे बेशर्म आशि॑क है ये आजके - बांग्लादेशी गायिका
(४) लंबी जुदाई - रेश्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

धिन्गाना's picture

22 Apr 2010 - 8:34 pm | धिन्गाना

"आज जाने कि जिद ना करो"पहायला मिळेल काय?

गणपा's picture

16 Apr 2010 - 9:59 pm | गणपा

अ‍ॅखियोंके झरोकोंसे मैने देखा जो सावरे हे हेमलाता यांच गाण सर्रास लता आज्जीच्या नावावर खपवल जात..

http://www.youtube.com/watch?v=82nIzUkld6o
हे पहा ते गाणं! :) संगीत रविंद्र जैन.

चतुरंग

गणपा's picture

16 Apr 2010 - 10:18 pm | गणपा

धन्यु रंगा.. हापिसातन तुनळी चालत नसल्याने ईच्छा असुन दुवा देता येत नव्हता :)

नितिन थत्ते's picture

17 Apr 2010 - 10:56 am | नितिन थत्ते

गाणं लै भारी...रविंद्र जैनही.
(असो. आम्ही लता आणि हेमलता यांच्यातला फरक स्पष्ट करायला या गाण्याचं उदाहरण देतो.)

नितिन थत्ते

धिन्गाना's picture

22 Apr 2010 - 8:36 pm | धिन्गाना

कस बोल्लात राव.

येसुदास, हेमलता, रविंद्र जैन!
चतुरंग

विकास's picture

16 Apr 2010 - 10:10 pm | विकास

उमादेवी (नंतरची टुणटूण) हीचे "अफसाना लिख रही हू दिले बेकरार का" हे एक सुंदर गाणे आहे.

गीता दत्त (आणि मुकेश) चे "खयालो मे किसिके"

रुना लैला चे, "तुम्हे होना हो, मुझको तो" आणि "दमा दम मस्त कलंदर"

नाझिया हसनचे "लैला मै लैला" (मधे "ओ लैला" आरडीचे :-) )

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

दिगम्भा's picture

23 Apr 2010 - 2:49 pm | दिगम्भा

नाझिया हसनचे "लैला मै लैला" (मधे "ओ लैला" आरडीचे )

यात दोन चुका आहेत असे वाटते.
माझ्या समजुतीप्रमाणे
एक म्हणजे गाणे म्हटले आहे कंचनने (व अमितकुमार - किशोरचा हो)
दुसरे - "ओ लैला" हे म्हटले आहे अमितकुमारने.

नाझिया हसनचे एकच गाणे आहे.
आर डी व कुर्बानीचा काहीच संबंध नाही. संगीत कल्याणजी-आनंदजी चे आहे ते एक गाणे सोडून आणी त्या गाण्याचे संगीत बिड्डू चे.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2010 - 4:02 pm | नितिन थत्ते

बिन्गो.

नितिन थत्ते

विकास's picture

25 Apr 2010 - 4:45 am | विकास

मी आत्ताच आपला प्रतिसाद बघितला आणि नंतर जालावर पण पाहीले.

माहीतीत योग्य दुरूस्ती सुचवल्याबद्दल धन्यवाद!

त्या केस मधे मग अजून एक वेगळी गायिका आणि अविस्मरणीय गाणे.. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पिवळा डांबिस's picture

16 Apr 2010 - 10:13 pm | पिवळा डांबिस

बोल रे पपीहरा....
-वाणी जयराम
माझं एक अत्यंत आवडतं गाणं!

चतुरंग's picture

16 Apr 2010 - 11:45 pm | चतुरंग

चतुरंग

विकास's picture

16 Apr 2010 - 10:16 pm | विकास

माणिक वर्मांची सगळीच गाणी सुरेल म्हणता येतील. काही आठवणारी:

कौसल्येचा राम बाई (भक्ती)
पहाट झाली उद्यानातून मंदिरी ये गारवा (प्रियकराचा विरह)
घननीळा लडीवाळा (प्रेम)
लाविते मी नीरांजन (आईचा विरह)
माळ पदक विठ्ठल (भक्ती)

सुमन कल्याणपूरांचे "केशवा माधवा" पण खूप प्रसिद्ध झाले मात्र लोकल मधून प्रवास करणार्‍यांना ते वेगळ्याच कारणाने लक्षात राहीले असे वाटते...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

धिन्गाना's picture

22 Apr 2010 - 8:40 pm | धिन्गाना

मालति पान्डे च सुद्धा एक छान गाण आहे.

विसोबा खेचर's picture

16 Apr 2010 - 10:23 pm | विसोबा खेचर

हिची पी...पी...पी संपणार केंव्हा आणि दुसर्‍यांची गाणी वाजणार केंव्हा........

अज्ञानात सुख असतं हेच खरं!

(कट्टर दीदीभक्त) तात्या.

शुचि's picture

16 Apr 2010 - 10:30 pm | शुचि

"देखो जी देखो देख रहा था पपीहा" या गाण्याची तु-नळी ची लिंक आहे का कुणाकडे? मला मिळत नाहीये. मला वाटतं सुमन कल्याणपूरचं आहे हे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

नंदन's picture

17 Apr 2010 - 12:55 am | नंदन

१. कभी तनहाईयों में यूं -- मुबारक बेगम

२. गीता दत्तची अनेक - खासकरून 'वक्त ने किया क्या हंसी सितम'

३. 'आर पार' मधली शमशाद बेगमची गाणी

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शुचि's picture

17 Apr 2010 - 3:33 am | शुचि

छान गाणी सुचवलीत. आर-पार आठवला की मला Mr & Mrs 55 सुद्धा आठवतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

हुप्प्या's picture

17 Apr 2010 - 2:30 am | हुप्प्या

सुधा मल्होत्रा
सलाम-ए-हसरत कबूल कर लो
http://www.youtube.com/watch?v=AroYTP4xW9Y

जगजीत कौर
तुम अपना रंज-ओ-गम
http://www.youtube.com/watch?v=xlxYifOdZjU
राजकुमारी
सुन बैरी बलम सच बोल..
http://www.youtube.com/watch?v=PeeC3aeg5Ic

---मंगेशकर भगिनीबद्दल यत्किंचितही अनादर नसणारा

मिसळभोक्ता's picture

17 Apr 2010 - 3:11 am | मिसळभोक्ता

हमे तुमसे प्यार कितना (चित्रपटः कुदरत) : परवीन सुलताना

जिथे दीदी/आशाताई संपतात तिथे सुरू होतं हे गाणं.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

17 Apr 2010 - 3:51 am | चतुरंग

कट्यारीसारखा चिरत जाणारा आवाज परवीन बाईंचा!

(सवाईला ऐकलेल्या आठवताहेत बेगमसाहिबा! लाजवाब!)

चतुरंग

विकास's picture

17 Apr 2010 - 5:46 am | विकास

एकदम मस्त गाणे आठवले. खूप आवडते गाणे आहे (ऐकायलाच ;) )

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हुप्प्या's picture

17 Apr 2010 - 3:35 am | हुप्प्या

हेमंत कुमारबरोबर म्हटलेले एक जुने गाणे
आ गुप चुप गुप चुप
http://www.youtube.com/watch?v=BaHDIEDrjTQ

ललिता देऊळकर (सौ. सुधीर फडके चू.भू.द्या.घ्या)
http://www.youtube.com/watch?v=aWqjDTu0n6U

जोहराबाई अंबालेवाली
अखियां मिला के जिया भरमा के ..
http://www.youtube.com/watch?v=vU-gLlZ6iqI
१९४४ सालचे गाणे अजूनही ऐकावेसे वाटते. त्याचे एक बीभत्स रिमिक्सही बनले आहे. काळाचा महिमा दुसरे काय!

सन्जोप राव's picture

17 Apr 2010 - 6:08 am | सन्जोप राव

माझ्या माहितीनुसार या जोडीचे एकमेव गाणे मिलते ही आंखे दिल हुआ दिवाना किसीका
. गाव दणाणून सोडणारा शमशाद बेगमचा आवाज आणि मलईदार श्रीखंडासारखा तलतचा आवाज यांचे काँबिनेशन करण्याची कल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्या नौशादसाहेबांना सलाम. या गाण्यात तलत शमशादला गाणं शिकवतो आहे की शमशाद तलतला, हा प्रश्न पडतो. 'बाबुल' नंतर तलतला नौशादसाहेबांनी फारसा वापरला नाही, कारण 'बाबुल' च्या रेकॉर्डिंगदरम्यान तलतला सिगारेट ओढताना त्यांनी पाहिलं, अशी एक दुर्दैवी आठवण या गाण्याच्या संदर्भात आहे.
लेके पहला पहला प्यार हे तर अजरामरच गाणे आहे. त्यातला शमशाद बेगमचा आवाज 'कलेजेपे मीठी छुरी चलानेवाला' वगैरे वाटतो. समोर रफीसाहेब आहेत म्हणून बरे, अन्यथा धडगत नव्हती. या गाण्याच्या सुरवातीच्या हार्मोनियमच्या पीसची 'कॉलर ट्यून' कुणी करुन देईल का?
अशी बरीच गाणी आहेत.
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

विकास's picture

17 Apr 2010 - 9:05 am | विकास

दोन्ही गाणी एकदम आवडती!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि's picture

18 Apr 2010 - 1:08 am | शुचि

>> गाव दणाणून सोडणारा शमशाद बेगमचा आवाज आणि मलईदार श्रीखंडासारखा तलतचा आवाज >> क्या बात है!!

गाणी आहेतच छान पण आपण केलेलं आवाजाचं रसग्रहण ...... किती सुंदर आहे.

आम्ही इथे नुसती गाण्यांची भरताड लावत चाललोय पण ते मनाला कसं भावलं, काळजावर मीठी छुरी वगैरे चालली हे एक आपणच लिहू जाणोत सन्जोप राव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

चित्रगुप्त's picture

17 Apr 2010 - 7:28 am | चित्रगुप्त

व्वा...छानच चालला आहे हा धागा.... मुबारक, शमशाद, गीतादत्त यांची आणखी गाणी काढा ना आठवणींच्या खजीन्यातून.....
आणखी एक शारदा होती बघा, शंकर जयकिशनची गाणी आहेत काही.. आठवतात का कुणाला?

धिन्गाना's picture

22 Apr 2010 - 8:44 pm | धिन्गाना

हरे राम. देव त्याचे भले करो.

पांथस्थ's picture

17 Apr 2010 - 8:56 am | पांथस्थ

छाया गांगुली: आपकी याद आती रही रात भर... (संगीतः जयदेव / गीतः शहरयार)

पुर्वार्धात अतिशय थोडके पण समर्पक संगीत....गाण्याच्या उत्तरार्धात हळुवार धरलेला ठेक, लुब्ध करणारे शब्द आणी छाया गांगुलीचा ठुमरीवजा आवाज...एक अविस्मरणीय गाणं...

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

नंदन's picture

17 Apr 2010 - 9:28 am | नंदन
तिमा's picture

17 Apr 2010 - 9:54 am | तिमा

हिकडं ही दीदी......हिची पी...पी...पी संपणार केंव्हा आणि दुसर्‍यांची गाणी वाजणार केंव्हा....

आपला इतर गायिकांची गाणी आठवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे पण जाताजाता लताबाईंवर हा शेरा खटकला.
हे देवा, आमच्यावर तू खरंच फार कृपा केलीस लतादिदींची गाणी समजण्याची शक्ती दिलीस म्हणून!!!
नूरजहान, शमशाद बेगम आणि अशा अनेक बगैर मंगेशकर गायिका माझ्या आवडीच्या आहेत, प्रत्येकाच्या आवाजाची मजा औरच! पण म्हणून लताला नांवे ठेवणे म्हणजे ...... जाऊ दे .

em>हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

पांथस्थ's picture

17 Apr 2010 - 10:09 am | पांथस्थ

सहमत आहे. एकाची प्रसंशा म्हणजे दुसर्‍याची निंदा अथवा हेटाळणी हे समीकरण बदलायला हवे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

चित्रगुप्त's picture

17 Apr 2010 - 10:42 am | चित्रगुप्त

@पांथस्थ
तुमचे फ्लिकर वरील फोटो बघण्यास सुरुवात केली अहे, फारच सुंदर आहेत....
रानातला प्रकाशही वाचूच.

.......पूर्वी फक्त पानपट्टीच्या दुकानांवरच वाजणारी गाणी ऐकायला मिळायची, घरात रेडियो नसायचे, तेंव्हाचे आमचे ते बालपणीचे स्वगत होते......
आम्हीही लताबाईंच्या अनेकानेक गाण्यांचे दीवाणे आहोतच.....
....एवढे मनावर नका घेउ हो.......

पांथस्थ's picture

17 Apr 2010 - 1:10 pm | पांथस्थ

....एवढे मनावर नका घेउ हो.......

नाहि घेत मनावर. दिले खाली ठेवुन. हाय काय आन नाय काय?

तुमचे स्वगत बाजुला ठेवुयात. पण असे अनेक जण भेटले आहेत ज्यांच्या मनात लताबद्दल आकस आहे. कारण काय तर लताने इतर गायिकांना पुढे येउ दिले नाहि. हे मला काहि कळत नाहि बुवा.

असो, हा (चाहत्यांसाठि) जरा भावनिक विषय आहे. नाहि तर ह्यावर एखादा धागा सुरु व्हायचा.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रदीप's picture

18 Apr 2010 - 6:25 pm | प्रदीप

बालपणीचा पोरकट जोक अजून, आता उतार लागल्यावरही तितल्याच आवेशाने सांगताय, तेव्हा उतार 'मस्त मस्त' नसावा असं दिसतंय!!

त्या मूर्ख उल्लेखाला टाळून पुढे जाणे मलातरी शक्य नाही. आपल्याला आशा सर्वश्रेष्ठ गायिका वाटते, ह्याविषयी माझे काहीच म्हणणे नाही, कारण ही आपली आवड आहे. आणि ती व्यक्त करण्याचा आपला अधिकार आहे. ज्याप्रमाणे लता ही सर्वश्रेष्ठ गायिका आहे हे माझे मत आहे. अजून कुणाचे तरी शारदा/ कॄष्णा कल्ले/ जोहराबाई/मधुबाला चावला...... इ. पैकी कुणीही सर्वश्रेष्ठ गायिका आहे, असे मत असले व ते त्या व्यक्तिने येथे व्यक्त केले तर काहीही बिघडत नाही. कारण ही वैयक्तिक मते स्वतःच्या आवडीनिवडीवर आधारित असतात, त्यात बरोबर/ चूक काही असू शकत नाही. परंतु कुणालाही एखादी गायिका सर्वश्रेष्ठ आहे, असे स्वतःचे मत मांडतांना दुसरी कुणीतरी भिकार कशी आहे, हे का सांगावे लागावे हे कळत नाही. त्यातून त्या आवडत्या/ नावडत्या गायिकांच्या शैली/आवाच्या प्रति अगदी भिन्न असतील (जसे लता x शमशाद, लता x नूरजहाँ, लता x गीता दत्त...) तर ते थोडे समजूही शकते. लता व आशा ह्यांच्या बाबतीत इतके टोकाचे मत असावे हे अगम्य आहे!!

खरे तर धाग्याची संकल्पना छान आहे. लता, आशा वगळून हिंदीत मला इतर दोनच गायिका आवडतात-- गीता दत्त (तिची सर्वच गाणी बहारदार होती, पण अगदी एकच द्यायचे म्हटले तर 'आज सजन मोहे अंग लगा लो') आणी सुधा मल्होत्रा (सलामे हसरत कबूल कर लो/ फिर न कीजिये मेरी गुस्ताख निगाही का गिला..).

नितिन थत्ते's picture

17 Apr 2010 - 10:52 am | नितिन थत्ते

शोभा गुर्टू यांच्या श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या गझला.....
माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना

उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या

सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा

नितिन थत्ते

पांथस्थ's picture

17 Apr 2010 - 11:16 am | पांथस्थ

माझिया प्रियाला प्रीत कळेना

ह्यात लागलेला आवाज कसा मस्त पहाडी आहे

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रदीप's picture

18 Apr 2010 - 6:29 pm | प्रदीप

मूळ धागा हिंदी चित्रपट गीतांविषयी होता असे वाटते. पण मराठीचा अंतर्भाव असेल तर सुलोचना चव्हाण व मालती पांडे ह्यांचा मी आदरपूर्वक उल्लेख करीन. (सुलोचनाबाई कदम हिंदीतही कार्यरत होत्या असे ऐकून आहे, पण त्यातील मी काहीही ऐकलेले नाही).

अरुंधती's picture

17 Apr 2010 - 1:23 pm | अरुंधती

गीता दत्त :

१.नन्ही कली सोने चली हवा धीरे आना - सुजाता....

२. वक्त ने किया क्या हसीन सितम.... कागज के फूल....

३. आज सजन मोहे अंग लगा लो - प्यासा

http://www.youtube.com/watch?v=HUeBGQUC8CY

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इंटरनेटस्नेही's picture

17 Apr 2010 - 2:38 pm | इंटरनेटस्नेही

एकाची प्रसंशा म्हणजे दुसर्‍याची निंदा अथवा हेटाळणी हे समीकरण बदलायला हवे.

सहमत

राजेश घासकडवी's picture

17 Apr 2010 - 4:46 pm | राजेश घासकडवी

प्रीती सागर - मारे घर अंगन आना भूलो ना. (मंथन)
सलमा आगा - फज़ा भी है जवां जवां. (निकाह)

जाता जाता - तात्या बसलेच लिहायला तर आपण सर्वांनी केलेल्या यादीच्या चौपट गाणी दीदीचीच (फक्त हिंदी) एका बैठकीत लिहून काढू शकतील असा विचार आल्यावाचून राहिला नाही... :>

इन्द्र्राज पवार's picture

17 Apr 2010 - 4:46 pm | इन्द्र्राज पवार

इन्टरनेटप्रेमी यान्च्याशी सहमत ....

"अ" किती मोठा हे दाखविण्यासाठी "ब" चे पाय मोडून त्याला लहान करू नये हीच अपेक्षा ! किंबहुना खुद्द "अ" ची देखील अशी इच्छा नसते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

इंटरनेटस्नेही's picture

18 Apr 2010 - 12:48 am | इंटरनेटस्नेही

श्री. पवार, सहमतीबद्दल आभारी आहे.

मी-सौरभ's picture

18 Apr 2010 - 12:51 am | मी-सौरभ

"अफसाना लिख रही हू दिले बेकरार का"- उमा देवी
"बाबूजी धीरे चलना"- गीता दत्त

-----
सौरभ :)

शशिधर केळकर's picture

18 Apr 2010 - 1:32 am | शशिधर केळकर

ज्योतिका रॉय यांची मीरेची भजने निव्वळ अप्रतिम. यू नळीवर उपलब्ध. खरेतर कोणत्या दोन गायिकांच्या आवाजाची तुलना होऊ शकत नाही, आणि ती शक्यतो करूही नये - परीक्षक सोडून अशा मताचा मी आहे.

इतर काही अविस्मरणीय आवाज -
एम. एस. सुबलक्ष्मी - यांची 'मीरा' सिनेमातील गाणी
सौ. किशोरी आमोणकर - जाईन विचारित रानफुला - वगैरे
हिराबाई, सरस्वतीबाई यांची काही गाजलेली गाणी,
ज्योत्स्ना भोळे यांची कित्येक नादमधुर गाणी
परवीन सुलताना यांचे - रसिका तुझ्याच साठी मी एक गीत गाते

आणि मग अर्थातच कित्येक लावण्या - सुलोचना चव्हाणांच्या अप्रतिम बुलंद आवाजातल्या.

मला कोणी विचारले, या सर्वात अधिक प्रिय कोण? तर मी निरुत्तर होईन - माझ्या साठी, हे सर्वजण - मी त्यांची लायकी ठरवण्याच्या फार फार पल्याड आहेत. माझ्या मनःस्थितीनुसार वेगवेगळ्या वेळी मला वेगवेगळी मंडळी आवडतात.

(संगीत प्रेमी ) शशिधर.

इन्द्र्राज पवार's picture

18 Apr 2010 - 1:51 pm | इन्द्र्राज पवार

यातील विविध प्रतिक्रिया वाचत असतानाच एफ. एम . band वर नुकतेच एक अविस्मरणीय गाणे लागले होते

"तुम मुझे भूल भी जावो, तो ये हक़ ही तुमको.....
मेरी बात और है, मैने तो मुहब्बत कि है......तुम मुझे !!!"

चित्रपट : 'दिदी' ~~ गायिका "सुधा मल्होत्रा" - यांच्यासमवेत स्वर्गीय मुकेश यांचाही आवाज आहे, पण मनात रुंजी घालून जातो तो सुधाताईंचा आवाज ! फारच सुरेख आहे ही रचना !
मला वाटते मूळ "शुक्र तारा मंद वारे...." हे अमर गीत देखील अरुण दाते समवेत सुधाताई यांनीच प्रथम गायिले होते. चू. भू. द्या. घ्या.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

धिन्गाना's picture

22 Apr 2010 - 8:52 pm | धिन्गाना

शुक्र तारामधे आवाज उन्च लावताना सुधाबाइन्चि वाट लागलि आहे असे वाटते.

चतुरंग's picture

18 Apr 2010 - 8:23 pm | चतुरंग

गाणी हा एक वेगळा लेखाचा विषय होईल. त्यातही 'कहीं दूर जब दिन ढल जाएं' हे माझं नितांत आवडतं गाणं आहे.
मुकेशच्या आवाजाचा इतका परिणामकारक वापर क्वचितच कुणी केला असेल. सलिल चौधरी ह्या देवदूतानं दिलेलं हे संगीत अजरामर म्हणावं असं आहे. एकदा हे गाणं ऐकलं किंवा त्याची आठवण जरी झाली तरी दिवसभर ते पाठ सोडत नाही!

चतुरंग

प्रदीप's picture

19 Apr 2010 - 7:43 am | प्रदीप

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती?

असा धाग्याचा विषय आहे.

चतुरंग's picture

19 Apr 2010 - 9:06 pm | चतुरंग

पण अशी एखादी सुरेल चूक चालून जावी, नाही का?

चतुरंग

चित्रगुप्त's picture

19 Apr 2010 - 9:26 am | चित्रगुप्त

होय होय, असाच मूळचा विषय आहे खरा.
सर्वजण खूपच छान प्रतिसाद देत आहेत, सर्वांचे आभार.

शुचि's picture

19 Apr 2010 - 11:14 am | शुचि

राजकुमारीचं "घीर घीर के आस्मां पर छाने लगी घटाएं" फार फार आवडीचं लहानपणापासून. विशेषतः "घीर घीर" शब्दावर जो उमड उमड स्वर बांधलाय तो लाजवाब.

"तू अपनी ओढनी मे मन बांध ले पिया का,
फिर ना वोह तुम्हे भुलाए ना भूल तुम्हे पाए"

http://www.youtube.com/watch?v=naqQzsL_1x4
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

प्राजु's picture

20 Apr 2010 - 1:18 am | प्राजु

तुमने पुकारा और हम चले आये- सुमन कल्याणपूर
आवाज दे कहा है, दुनिया मेरी जवां है - नूरजहाँ.
आज जाने की जिद्द ना करो - फरिदा खानम
ए दिल मुझे बता दे - गीता दत्त
कजरा मोहोब्बत वाला- शमशाद बेगम
बोले रे पपीहरा - वाणी जयराम
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

जयंत कुलकर्णी's picture

24 Apr 2010 - 4:11 pm | जयंत कुलकर्णी

मित्रहो,
माझ्याकडे साधारणतः जुनी - १९३८ सालापासूनच्या १९६४ सालापर्यंतची जवळ जवळ सगळी गाणी आहेत. रेकॉर्डींग एवढे चांगले नाही, पण ठीक आहे. एखादे गाणे पाहिजे असल्यास व्यनि करावा. सगळीकडे शोधून झाल्यावर, कारण नाहीतर मग मला फक्त तेच काम करावे लागेल. आशा आहे आपण समजून घ्याल. पण आत्तापर्यंत मला लोकांनी सांगितलेले अशापैकी एकही व्यनि मिळालेला नाही. निलकांत या बाबतीत मदत करु शकतील का ? फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एखादे गाणे शोधायला फार वेळ लागतो. ( संख्या : ९००० ते १००००)

समजा काही नाही मिळाली माझ्याकडे तर कृपया टर उडवू नये. तसे होणेही शक्य आहे.

सध्या मी "ते माझे घर, ते माझे घर" राग : केदार हे गाणे शोधत आहे. कोणाकडे असल्यास कृपया कळवणे.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com