बाल वाहनधारक

४ऊ दत्त's picture
४ऊ दत्त in काथ्याकूट
11 Apr 2010 - 3:48 pm
गाभा: 

R.T.O. चे licence मिळवण्यासाठी १८ वर्षे वयाची अट आहे आणि learning licence साठी १६ वर्षे वयाची. तरी पण आज हजारो जण या नियमाचे राजरोसपणे उल्लंघन करतात. पुणे व मुंबईकडे काय स्थिती आहे हे माहीत नाही, पण आमच्या परभणी मधे तर सर्रास अगदी १२-१३ वर्षांची मुलेही अगदी सुसाट वाहने चालवतात. बहुतेक वेळेस तर ती आई-वडिलांनीच दिलेली असतात. शाळा किंवा क्लास दूर असल्याच्या नावाखाली हे केले जाते.

हे नक्कीच अयोग्य नाही का? मग पालक हे लक्षात का घेत नाहीत की ह्यात त्यांच्या पाल्याला पण धोका आहे म्हणून? की ह्यामागे आणखीन काही युक्तिवाद आहे? आपल्याला काय वाटते?

प्रतिक्रिया

रेवती's picture

11 Apr 2010 - 9:05 pm | रेवती

गंभीर विषय आहे हा!
परभणीत असे आहे तर पुण्यामुंबईत जास्तच असेल असा अंदाज परस्पर न बांधल्याबद्दल आपले अभिनंदन!
खरंतर मलाही माहीत नाही त्याबद्दल पण माझ्या जाऊबाईंनी त्यांच्या मुलाला मात्र लायसन्स मिळेपर्यंत गाडीला हात लावू दिला नव्हता असे म्हणाल्या ते आठवले. नंतर मात्र त्याने एकही दिवस गाडी वापरणे सोडले नाही. अगदी कोपर्‍यावरच्या दुकानात जायचे तर गाडी....
आता तेव्हढा उत्साह नसेल राहिला त्याला!
पण लहान वयातल्या मुलांना त्यांच्या उद्योगांच्या परिणामांची कल्पना मात्र नसते. माझ्या दोन नातेवाईक महिला अश्या प्रकारच्या अपघातात दगावल्यामुळे मला भिती वाटते हे खरे!

रेवती

शुचि's picture

12 Apr 2010 - 3:52 am | शुचि

पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहीजेच जर पालकांना अक्कल नसेल तर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

टारझन's picture

12 Apr 2010 - 11:02 am | टारझन

पोकळ बांबु चे फटके दिले पाहिजे त्या पालकांना .. आणि बालगाडीवानांना !!

- १३मेरा७

इन्द्र्राज पवार's picture

12 Apr 2010 - 11:29 am | इन्द्र्राज पवार

इथे कोल्हापुराततर या सुट्टीच्या दिवसात बाल वाहनधारकांचा निव्वळ हैदोस चालू असतो, यंदाही आहे. शिवाय हे अभिमन्यू (.....आणि केवळ अभिमन्यू नाही, तर उत्तरादेवी ही मागे नाहीत, बरे का !!) वेळ निवडतात ती नेमकी शाळा भरायची व सुटायची ~~ कारण उघड आहे. आता त्यांना ह्या दुचाकी चारचाकी गाड्या दिल्या कुणी? तर अर्थातच पूज्य पिताश्रीनी. बरे विचारायला जावे तर आपणा सर्वाना `कोल्हापुरी` उत्तराची पद्धत माहित आहेच. `तो बाराबोड्याचा पोलीस काय बी विचारत न्हायी, तर तुमाला का तरास होतोय ?`` आहे याला काय उत्तर? यांच्या मातोश्रींची देखील काही वेगळी प्रतिक्रिया नसते. त्या म्हणतात `आहे गाडी म्हणून चालवतोय, नसती तर गेला असता कि चालत चालत !` आता यांना परवानापत्र, पात्रता, यातील धोके याविषयी काही सांगणे म्हणजे `गाढवापुढे वाचली गीता, काळाचा गोंधळ बरा होता !`` यदाकदाचित पोलीस मामाने पकडले तर जास्तीतजास्त काय करेल? एक तर स्वत: दहा वीस रुपये घेईल नाहीतर ५० ची पावती करेल. म्हणून काय यांचा हवेत वाहन उडविण्याच्या कार्यक्रमात खंड पडणार आहे का ? कोल्हापुरात या बाबतीत एक म्हण आहे : `या पोरांना व पोरांच्या बापांना शहाणपण शिकविणे म्हणजे वाळूत मुतल्यासारखे आहे.`
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"