सध्या पुण्यात काय चालले आहे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
10 Apr 2010 - 7:49 am
गाभा: 

सध्या पुण्यात काय चालले आहे?

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

10 Apr 2010 - 9:28 am | मदनबाण

बलात्कार !!! दुसरे काय ?

दफोराव आपण फक्त "जय महाराष्ट्र" म्हणत राह्यचे बघ !!!
मग भलेही इथले शेतकरी मरोत...विद्यार्थी आत्महत्या करतो...इथे दारुचा पुर येवो...राज्य कोट्यावधीच्या कर्जात जावो... बलात्कारावर बलात्कार घडोत...आणि शेवटी उरलेला मराठीपणा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातुन नष्ट होवो....मुंबईच्या मागे पुणे....पुण्याच्यामागे नाशिक...नाशिकच्यामागे....हे संपणार नाही....
-
-
-
-
-

आपण फक्त जय महाराष्ट्र म्हणत राह्यच बघ...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

पाषाणभेद's picture

10 Apr 2010 - 10:26 am | पाषाणभेद

अती शहरीकरणाचे परिणाम आता आपली पुढली पिढी भोगायल लागली आहे.
अवांतर: सैनीक युद्धावर असतांना युद्धस्थळी असणार्‍या गावांमध्ये नंगा नाच करतात, असाह्य स्त्रीयांवर बलात्कार करतात हे माहीत आहे. पण शांततेच्या काळात असली घटना म्हणजे आपल्या लश्कराच्या माथी कलंक आहे. त्या सैनिकांचे कोर्टमार्शल होईल तेव्हा होईल पण ही घटना एक नविनच सामाजिक प्रश्न जन्माला देवून गेली.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

विकास's picture

11 Apr 2010 - 12:44 am | विकास

सैनीक युद्धावर असतांना युद्धस्थळी असणार्‍या गावांमध्ये नंगा नाच करतात, असाह्य स्त्रीयांवर बलात्कार करतात हे माहीत आहे.

हे वाक्य जरा अतिसुलभीकरण करत आहे आणि प्रत्येक सैनिक असेच वागतो असे गृहीत धरत आहे असे वाटले. तुमचा तसा लिहायचा उद्देश नसेल असे वाटते पण अर्थ काय निघू शकतो हे त्यातून जाणवल्याने येथे लिहीले.

तेच त्याच्या पुढील वाक्यासंदर्भात: "पण शांततेच्या काळात असली घटना म्हणजे आपल्या लश्कराच्या माथी कलंक आहे." म्हणजे, युद्धजन्य परीस्थितीत असली घटना घडली तर कलंक नाही का? अर्थातच तो देखील कलंकच आहे असे वाटते...

ही घटना एक नविनच सामाजिक प्रश्न जन्माला देवून गेली.
हा सामाजिक प्रश्न नक्कीच आहे. पण तो केवळ सैनिकांनी केला म्हणून नविन नाही आहे. (या संदर्भात नागरी भागात, शांततेच्या वेळेस. जरी असा फरक पटत नसला तरी) जर सैनिकांकडूनच सातत्याने सर्वत्र होत असल्याचे जाणवले तर गोष्ट वेगळी आहे.

यात मी सैनिकांची बाजू घेत आहे अथवा झालेल्या घटनेचे (so what? no big deal! म्हणत)अतिसुलभीकरण करत आहे असे कृपया समजू नये.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

11 Apr 2010 - 8:38 am | II विकास II

हे वाक्य जरा अतिसुलभीकरण करत आहे आणि प्रत्येक सैनिक असेच वागतो असे गृहीत धरत आहे असे वाटले. तुमचा तसा लिहायचा उद्देश नसेल असे वाटते पण अर्थ काय निघू शकतो हे त्यातून जाणवल्याने येथे लिहीले.

तेच त्याच्या पुढील वाक्यासंदर्भात: "पण शांततेच्या काळात असली घटना म्हणजे आपल्या लश्कराच्या माथी कलंक आहे." म्हणजे, युद्धजन्य परीस्थितीत असली घटना घडली तर कलंक नाही का? अर्थातच तो देखील कलंकच आहे असे वाटते...
== +१
काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर हेच आरोप होतात. तीथे युध्द नसले तरी युध्द्सदृष्य स्थिती नक्कीच आहे. मग त्या सैनिकांना सुट आहे का? किती फक्त परदेशात केलेल्या सैनिकांना सुट आहे. सुट असेल तर इतर देशातील सैनिकांनी येउन बलात्कार केले तर त्यांना ही ह्याच न्याय लावायचा का?

--हा सामाजिक प्रश्न नक्कीच आहे. पण तो केवळ सैनिकांनी केला म्हणून नविन नाही आहे.
== भारतात एकुन झालेल्या बलात्कारातील फक्त ५ ते १० टक्के उजेडात येतात असे वाचले आहे.

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

तिमा's picture

10 Apr 2010 - 10:36 am | तिमा

बलात्कार्‍याचे लिंग कापून टाकण्याची शिक्षा हवी, तरच ह्याला आळा बसेल.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मी-सौरभ's picture

10 Apr 2010 - 11:46 pm | मी-सौरभ

धीन्ड काढून , अश्या लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे

-----
सौरभ :(

सुचेल तसं's picture

11 Apr 2010 - 4:57 am | सुचेल तसं

पूर्वीचं पुणं नाही राहिलं आता....

चित्रगुप्त's picture

11 Apr 2010 - 5:01 am | चित्रगुप्त

"पुणे शहराचे वर्णन" नामक फार जुने पुस्तक वाचनात आले होते.....हे पुस्तक कुणाकडे आहे का?

हुप्प्या's picture

11 Apr 2010 - 8:27 am | हुप्प्या

ह्या मालिकेतील पहिल्या बलात्काराचा आरोपी हा राजकीय नेत्यांच्या खास मर्जीतला आहे असे कळते. त्याच्या तडिपारीचा हुकूम रद्द करण्यात आला. आणि हे करण्यात कुणी पुढाकार घेतला ते काही कळत नाही म्हणजे बर्‍यापैकी उच्चपदस्थ असावा.
असो. सामान्य लोकांनीच कायदा हातात घेऊन असल्या काही नराधमांना ठेचून वा अन्य प्रकारे ठार मारण्याची वे़ळ आली आहे. म्हणजे झक मारत सरकार असल्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा ठोठवू लागेल. नाहीतर असल्या गुन्ह्यांचे खटले लटकत रहाणार आणि शेवटी पुरेसा पुरावा नाही म्हणून किरकोळ शिक्षा होऊन हे नराधम तसलीच कृत्ये करायला मोकळे.

मदनबाण's picture

11 Apr 2010 - 8:33 am | मदनबाण

शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगा करण्याची शिक्षा होती...जो पर्यंत शिक्षेचा धाक नसतो,तो पर्यंत असे नरपशु मोकाट हिंडत राहतात.

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama