निसर्गाची किमया

धनाधीश's picture
धनाधीश in जनातलं, मनातलं
16 Mar 2008 - 9:25 pm

owl!!!!
असे डोळे इंद्राकडेही नसतील.

waah!! popat
बघत राहावंसं वाटतं.

kaay garudin aahe!!

आपण प्रत्यक्षात तेथे असतो तर...

अजूनही कित्येक निसर्गाच्या किमया आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी रोज पाहात असतो, अनुभवत असतो.
पण कधीकधी त्याचे महत्त्व, त्याची किंमत व त्याचे अस्तित्व, यांचा आपणासा विसर पडतो.
काय करणार आता !

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Mar 2008 - 12:09 am | प्राजु

पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील.
शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

17 Mar 2008 - 12:16 am | स्वाती राजेश

खूपच छान आहेत.

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 2:35 am | विसोबा खेचर

छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली!

वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम...

तात्या.

धनंजय's picture

18 Mar 2008 - 2:40 am | धनंजय

क्लास! बगळा तर फारच सुंदर. रावा थोडा धुसर वाटतो...

कोलबेर's picture

18 Mar 2008 - 2:41 am | कोलबेर

प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2008 - 6:19 pm | प्रभाकर पेठकर

सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.