झणझणीत आणि चटपटीत

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
21 Jan 2010 - 1:35 pm
गाभा: 

१) मिसळपाव पुर्वीसारखा झणझणीत आणि चटपटीत कां लागत नाही?
आपले वय झाले आहे, की मिसळपावचे वय झाले आहे?
२) मिसळपावची ती मजा गेली असे सगळ्यांनाच वाटते की, काही जाणांना सध्याची सपक चव आवडते?
३) काही प्रॉब्लेमच नाही, की मालक सध्या व्यस्त असल्याने तात्पुरता प्रॉब्लेम आहे, की खरच काही उपाय करायला हवा, जेणेकरून पुर्वीची खमंग चव परत चाखायला मिळेल?

मिपाप्रेमींची मते (आणि उपाय) वाचायला आवडेल.

मी तर म्हणेन, तात्या कुठे आहात तुम्ही?

*******

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Jan 2010 - 1:38 pm | ब्रिटिश टिंग्या

तात्या पुरे आता!

या लवकर परत! :)

गणपा's picture

21 Jan 2010 - 1:59 pm | गणपा

तात्या याच आता.

अरुण मनोहर's picture

21 Jan 2010 - 2:04 pm | अरुण मनोहर

गणपा, तुम्ही येवढे रेसिपी बहाद्दर आहात, मग ही रेसीपी सध्या अशी कां झालीय त्याबद्दल काही लिहा ना!

गणपा's picture

21 Jan 2010 - 2:32 pm | गणपा

तरीत अंमळ पाणी जास्त पडले आहे.
तिखटाचा रंग सध्या उडाला आहे.
जराश्या झणझणीत फोडणीची गरज आहे.
मालक आल्यावर हे बदल करुन परत एकदा चमचमीत मिसळ पाव देतीलच हा भरवसा आहे. :)

उग्रसेन's picture

21 Jan 2010 - 2:47 pm | उग्रसेन

१) मिसळपाव पुर्वीसारखा झणझणीत आणि चटपटीत कां लागत नाही?
आपले वय झाले आहे, की मिसळपावचे वय झाले आहे?

मिसळपाव मॅच्युअर झालंय.
२) मिसळपावची ती मजा गेली असे सगळ्यांनाच वाटते की, काही जाणांना सध्याची सपक चव आवडते?

चव हाय तीच हाय, जराशीक पांचटपणा कमी झालाय.

पुर्वीची खमंग चव परत चाखायला मिळेल?

भरती ओहटी येत र्‍हाती.

पुर्वी कधी कधी जास्तच तिखटजाळ रेसीपी होती म्हणून सध्याची चवच चांगली आहे?

सध्याची चवच चांगली आहे.

बाबुराव :)

निमीत्त मात्र's picture

21 Jan 2010 - 5:41 pm | निमीत्त मात्र

बाबुरावांशी सहमत आहे.

सध्यातरी पानचटपणाच कमी झालेला दिसतो. चवीचं म्हणाल तर हळू हळू मिपावर जुनी मंडळी (जी ह्या पानचटपणाला कंटाळून लिहायची बंद झालेली) कार्यरत होऊन पुन्हा झणझणीत चव परत येइल अशी आशा करुया. काही काळजी करु नका अरूणजी.

अरुण मनोहर's picture

21 Jan 2010 - 6:09 pm | अरुण मनोहर

हे मात्र अगदी बरोब्बर बोललात निमीत्य मात्र!
झणझणीतपणाच्या नावाखाली पुष्कळदा पानचटपणा आणि कडवटपणा कालवणारे लोकही होते.
ते जाऊन केवळ मस्त चटपटीत भेळ मिसळ पुन्हा मिळेल ह्या आशेवरच येत आहे व लिहीत देखील आहे.
पण मालक कोठे आहेत?

टारझन's picture

22 Jan 2010 - 12:01 am | टारझन

आज मिसळपाव जे काही आहे निमित्त मात्र आणि बाबुरावामुळेच !! :)

- पांचट कुत्र

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 12:21 am | निमीत्त मात्र

'पांचट कुत्रा' ह्यांच्याशी मी असहमत आहे. मिसळपाव जे काही आहे ते सर्व मायबाप मिपाकरांच्या* योगदानाने आहे.

*सरपंचांकडून साभार

टारझन's picture

22 Jan 2010 - 1:51 am | टारझन

ह्या ह्या ह्या ... ते "पांचट कुत्र" आहे .. कुत्रा वेगळा .. कुत्र वेगळं ...
असो .. वर कुठेतरी आपण केलेल्या विधानाला आपल्या ह्या विधानाने अंमळ छेद गेला.
असो .. आमच्यासाठी तर बाबा मिपा म्हणजे "पांचट कुत्र" चं !

- गोट्याराव

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 2:03 am | निमीत्त मात्र

बरं ठीक आहे. पण तुमची सही सतत बदलती असल्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही. प्रतिसादात सुधारणा करुन 'पांचट कुत्र' असं म्हणायचे ठरवले तर तुम्ही आता गोट्याराव झाला आहात. असो..

टारझन's picture

22 Jan 2010 - 9:01 am | टारझन

पण तुमची सही सतत बदलती असल्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही.

आयला .. आम्ही समजत होतो त्यापेक्षा आपण अंमळ ३.१४% जास्तंच बुद्धीमान निघालात :)

प्रतिसादात सुधारणा करुन 'पांचट कुत्र' असं म्हणायचे ठरवले तर तुम्ही आता गोट्याराव झाला आहात. असो..

हॅहॅहॅ .. सॉरी आपला बुद्ध्यांक ३.१५% आहे :)

पण काहीही म्हणा , आज तुम्ही आणि बाबुराव आहात म्हणून मिसळपाव चालतंय हो :) आणि अशी क्रॉस विधानं काय करता हो म्हाराष्ट्राच्या शियेम सारखे ? लाचार वगैरे आहात काय ?

- निरो* वाप्रं

उग्रसेन's picture

22 Jan 2010 - 6:55 pm | उग्रसेन

मिसळपाव जे काही आहे निमित्त मात्र आणि बाबुरावामुळेच !!
आभारी हाय. माणूस माणसापासून दूर जातोय. स्वार्थाशिवाय माणसाला काय दिसत नाय. आस्सं असतांना, चांगल्या गोष्टीचं श्रेय एखाद्याला देणं म्हंजी काय सोप्पं काम नाय. तेव्हढं मोठं मन केल्याबद्दल आभारी.

बाबुराव :)

टारझन's picture

22 Jan 2010 - 7:52 pm | टारझन

बाबुराव .. आपण महान आहात , आपलं श्रेय कोण हिरावून घेईल :)
हॅहॅहॅ ..

- बाबुलाल

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2010 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll

अरुणजी सहमत आहे आपल्याशी. परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा. तेथे इतरानी काय सांगावे. असो.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2010 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll

अरुणजी सहमत आहे आपल्याशी. परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा. तेथे इतरानी काय सांगावे. असो.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2010 - 2:49 pm | llपुण्याचे पेशवेll

अरुणजी सहमत आहे आपल्याशी. परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा. तेथे इतरानी काय सांगावे. असो.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

निमीत्त मात्र's picture

21 Jan 2010 - 7:54 pm | निमीत्त मात्र

चुपक्रम होणे म्हणजे काय हो पेशवे? आणि मालकांनी ही इच्छा तुम्हाला कानात सांगीतली का? मला तरी असे म्हणताना ते कुठे दिसले नाहीत.
(का मालक अडचणीत आहेत. इथे येत नाहीत हे पाहून त्या संधीचे फायदा उठवणे चालले आहे?)

अक्षय पुर्णपात्रे's picture

21 Jan 2010 - 8:48 pm | अक्षय पुर्णपात्रे

परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा.

सर्वप्रथम उपरोल्लेखित संकेतस्थळाचा उल्लेख करण्याचे कारण उमगले नाही. तात्यांविषयी गैरसमज पसरवणे थांबवावे.

II विकास II's picture

21 Jan 2010 - 9:20 pm | II विकास II

>>अरुणजी सहमत आहे आपल्याशी. परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा. तेथे इतरानी काय सांगावे. असो.

उपक्रम हे एक दर्जेदार संकेतस्थळ आहे.
बाकी प्रतिक्रिया, धागा, विषय याबद्दल प्रतिक्रिया नाही.

असो.
ज्याची त्याची आवड.

टारझन's picture

22 Jan 2010 - 12:07 am | टारझन

>>अरुणजी सहमत आहे आपल्याशी. परंतु मिपाचे चुपक्रम व्हावे ही तर मालकांची इच्छा. तेथे इतरानी काय सांगावे. असो.

उपक्रम हे एक दर्जेदार झोपेची वातुळ गोळी आहे
बाकी प्रतिक्रिया, धागा, विषय याबद्दल प्रतिक्रिया द्यायची बुद्धी मला नाही.

असो.
ज्याची त्याची अक्कल.

धाकली's picture

21 Jan 2010 - 5:03 pm | धाकली

तात्या रोशनी घेउन या आता म्हणजे मिसळपाव परत पुर्ववत होईल!!!!

chipatakhdumdum's picture

21 Jan 2010 - 11:48 pm | chipatakhdumdum

१. प्रवेश प्रतिबंधित च्या घोषणा वारंवार व्हायला लागल्या की असे होते, अरुणभाउ.
२. वयाचे म्हणाल तर, यस्मात राजा कालस्य कारणम , तस्मात संपादक चवीस्य कारणम.
वय संपादकांचे झाले असणार, टारुचे, पेशव्यांचे, पाषाणभेदचे, गणपाचे, टिंग्याचे आणि इतर अनेक नियमित लिहीणार्‍यांचे झालेले दिसत नाही.
३. काही जणाना सपक चव आवडते, असे नसून, नक्कीच नियंत्रण कक्षातील लोक काविळीच्या भीतीने तेल, तिखट, मीठ, मसाले यापासून मिसळपावला लांब ठेवत आहेत. याची कल्पना असल्याने वर नमूद केलेले नियमित लेखक हल्ली अनैसर्गिकरित्या सपक लिहीत आहेत. याच लेखकांचे एक वर्षापूर्वीचे लेख पुन्हा वाचून पहा, खात्री पटेल.
४. अपाय तात्यांच्या गैरहजेरीमुळे झाला आहे, उपाय सुद्धा तेच हजर झाल्यामुळे होइल, याची खात्री बाळगा.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jan 2010 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे

या धाग्यानिमित्त आनंद घारे यांनी केलेल्या मिसळपाववरील पहिले वर्ष याची आठवण आली. चव लागण्यासाठी चवीत बदल देखील करावा लागतो. समजा मला श्रीखंड पुरी आवडते म्हणुन दररोज तेच अन्न दिल तर किती काळ तुम्ही खाल? एखाद्या दिवशी मिसळ भजी खावीशी वाटणारच. तसच मिसळ आवडते म्हणुन रोज मिसळ खाल्ली तर काही काळानी मूळव्याध होणार.
मिसळपावचा झणझणीतपणा हा कुणासाठी अंजन बनुन माज उतरवतो तर कुणाची सर्दी घालवतो.कुणाचा रुचीपालट करतो तर कुणाचा खुर्चीपालट करतो.;)
माणसाला विविधता हवी असते. आवडत असलेला तोचतोचपणा देखील नंतर कंटाळवाणा होतो. मैत्री -शैत्रीची नाती मूड , उपयुक्तता-उपद्रवमुल्य यानुसार बदलत जातात.
कोणीच आदर्श नसत म्हणुन आदर्श मते उपाय असु शकत नाही. काळ हेच उत्तर.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

टुकुल's picture

23 Jan 2010 - 8:26 am | टुकुल

तात्या,
लै झाल, या परत आता.

--टुकुल

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Jan 2010 - 1:11 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मनोहर, विरजणाच्या कमतरतेमुळे पुरेसे दही उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून ग्राहकच कमी झणझणीत मिसळ मागवू लागले आहेत. काळजी करू नका. विरजण जसे उपलब्ध होईल तशी मिसळ झणझणीत होईल.

---------------------------------------
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.