काश्मिर आणि माध्यमे

विकास's picture
विकास in काथ्याकूट
11 Jan 2010 - 8:49 am
गाभा: 

आजच्या डिएनए च्या संकेतस्थळावर एक बातमी वाचण्यात आली: RSS may go against J&K autonomy (जाने ११, २०१०)

काय आहे म्हणून उत्सुकता वाटली. तर बातमीप्रमाणे, जस्टीस शागीर अहमद समितीने काश्मिरला ऑटोनॉमस स्टेटस (मराठी?) देण्याबद्दल शिफारस केली आहे त्याला संघाने विरोध करण्याचे ठरवले आहे असे त्या बातमीतील म्हणणे होते. बातमीतील पहीले वाक्य आहे: "The right-wing Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) may announce an action plan against the recommendations of justice Shagir Ahmed committee, which has advised an autonomous status for Jammu and Kashmir."

वास्तवीक माझ्यालेखी अशी काही शिफारस केली गेली आहे हीच एक मोठी बातमी असायला हवी पण त्याबद्दल विशेष माहीती दिसली नाही. म्हणून मग गुगलून आजच्या ताज्या बातम्यात इतरत्र कुठे दिसते का ते पाहीले. तर आजच्याच काय कुठल्याच बातम्यात दिसले नाही. रिडीफ आणि दि ट्रायब्यून चंडीगढ मधे या समितीवरून पुर्वी उल्लेख आलेले दिसले पण या शिफारसीबाबत काहीच नाही!

देवेगौडा यदुरप्पांना काय म्हणाले, शशी थरूरनी कुठले विधान नाकारले यावरून भराभर आजची ताजा खबर अपडेट करणारी माध्यमे या बाबत मात्र इतकी गप्प कशी काय?

नक्की काश्मिरसंदर्भात काय चालले आहे जे आपल्याला सांगितले जात नाही अथवा किमान पक्षी मला माहीत नाही?

प्रतिक्रिया

II विकास II's picture

11 Jan 2010 - 9:26 am | II विकास II

हल्ली प्रसारमाध्यमाना, विशेषतः इलेक्टॉनिक प्रसारमाध्यमांना बटबटीत बातम्या देण्याची चांगली सवय लागली आहे. टाईम्स वाले सुद्धा यात आघाडीवर आहेत. ओबामाने मारल्या माश्या, राखी सांवतचे .... इ. इ.

काश्मिरला ऑटोनॉमस स्टेटस काही प्रमाणात देण्यात काहीच अडचण नसावी. ऑटोनॉमस स्टेटस काही प्रमाणात प्रत्येक राज्याला मिळाली, जेणे करुन जे पुर्वीपासुन राज्याचे रहीवासी आहेत त्यांना खास अधिकार देतात येतील. भारताचा एकुन इतिहास पाहीला तर, उत्तरेकडील हिंदी भाषक/मागास राज्ये दक्षिणेकडील राज्यावर अन्याय करतात.

छोटा डॉन's picture

11 Jan 2010 - 10:03 am | छोटा डॉन

हल्ली प्रसारमाध्यमाना, विशेषतः इलेक्टॉनिक प्रसारमाध्यमांना बटबटीत बातम्या देण्याची चांगली सवय लागली आहे. टाईम्स वाले सुद्धा यात आघाडीवर आहेत. ओबामाने मारल्या माश्या, राखी सांवतचे .... इ. इ.

+१, सहमत आहे.
सध्या अशी न्युज चॅनेल्स पाहण्यापेक्षा फेसबुकावर "फार्मव्हिले" खेळणे परवडले असे वाटते. असो.

काश्मिरला ऑटोनॉमस स्टेटस काही प्रमाणात देण्यात काहीच अडचण नसावी.

???
कशाला ? परिस्थेती अजुन हाताबाहेर जायला ?
मुळात ऑटोनॉमीचा अर्थ काय आहे ह्याची आपल्याला कल्पना आहे का ? तशी ती बहाल केल्यास आपल्याला सैन्याच्या डिप्लॉयमेंट ( मराठी शब्द ? ) आणि इतर नागरी कायदे ह्यावर काही प्रमाणात पडती बाजु घ्यावी लागेल ह्याबद्दल आपले मत आहे ?
ऑटोनॉमी देण्यात विघटनवाद्यांची काही प्रमाणात जीत झाल्यासारखी होईल. काश्मिरला पुर्ण स्वायत्तता देण्याची मागणी कित्येक वर्षापासुन "जे के एल एफ" करत आहे, आता जत ते अंशत: झाले तर त्यांना टॉनिक मिळनार नाही का अजुन त्यांचा लढा तीव्र करायला ?
ह्या सर्वात तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या सध्याच्या भारतीय सैन्याच्या जीवावर का होईना चाललेल्या काहीश्या सुखाच्या आयुष्याचा बळी पडेल त्याचे काय ?
निर्बंध उठवल्यावर मुद्दामुन काश्मिरमध्ये जर काळा पैसा ओतला गेला आणि त्याने पद्धतशीरपणे मुळ प्रवाहात आणुन तो गैरकामासाठी वापरला गेला तर त्याबद्दल काय ? अर्थात हे सगळीकडेच घडु शक्ते पण काश्मिरची बात वेगळी आहे म्हणुन जास्त काळजी.

>>ऑटोनॉमस स्टेटस काही प्रमाणात प्रत्येक राज्याला मिळाली,
म्हणजे कुणाला ?
कुणाची परिस्थिती काश्मिरएवढी बिकट आणि वादग्रस्त आहे ?
नॉर्थ्-ईस्ट स्टेट्स अशांत जरुर आहेत पण वादग्रस्त नाहीत. त्यावरचा आपला दावा अजुन मजबुत आहे.
काश्मिरबाबत अजुन आपण आपली ठोस भुमिका युनोत मांडु शकलो नाही. सध्या "जैसे थे" हेच उत्तम औषध आहे हे मान्य करुन उभय राष्ट्रे त्याच्याशी सहमत होउन उघड मार्गाने संघर्ष करत नाहीत, छुपे युद्ध चालु आहेच की.
बाकी इतर भारतात अशी परिस्थिती नसल्याने तिकडे असे अधिकार देण्यास अदचण नसावी/ नव्हती/नाही.

>>जेणे करुन जे पुर्वीपासुन राज्याचे रहीवासी आहेत त्यांना खास अधिकार देतात येतील.
तीच तर गोम आहे ना ?
तिकडे मुळ नागरिक कोण हे ठरवणेच अवघड आहे, काश्मिरी पंडितांनी कधीच तिकडुन पलायन केले आहे. जे उरले आहेत ते भारतीय सैन्याच्या पाठिंब्यावर.
भारतीय आणि काश्मिरी मुसलमानांबाबत काहीशी अशीच परिस्थीती आहे. अहो तिकडे निवडणुका घेणे जर इतके अवघड जात असेल तर बाकीच्या गोष्टी काय सोप्या आहेत काय ?
बाकी "खास अधिकार" म्हणजे नक्की काय म्हणायचे ते स्पष्ट लिहावे, नुसते मोघम बोलल्याने चर्चा करण्यात्ला इंटरेस्त निघुन जातो. असो.

भारताचा एकुन इतिहास पाहीला तर, उत्तरेकडील हिंदी भाषक/मागास राज्ये दक्षिणेकडील राज्यावर अन्याय करतात.

:)
असे कसे काय बुवा ?
काही उदाहरणे ?
काही अंशी काही प्रमाणात जरी हे मान्य असले तरी हे एक जनरल साचेबद्ध वाक्य म्हणावे का ?
काही उदाहरणे दिल्यास उत्तरादाखल एक शेप्रेट लेख लिहता येईल.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अशीच अजुन एक वाईट बातमी. आजचा महाराष्ट्र टाइम्स. चिनने लडाख मधे घुसखोरी करुन काही भुभाग बळकवल्याची अधिकृत कबुली सरकारी अहवालात देण्यात आली आहे.
काश्मीर, तेकडे सेवन सिस्टर्स आणि आता लेह लडाख.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

II विकास II's picture

11 Jan 2010 - 9:56 am | II विकास II

http://www.google.co.in/search?hl=en&client=firefox-a&rls=org.mozilla:en...

हे करुन बघितले तर बरेच सुंदर निकाल येतात.

भारतीय राज्यघटनेचे ३७०वे कलम म्हणजे ऑटॉनॉमी नव्हे का? नसेल तर मग ३७० कलम काय आहे?
पूर्वी शेख अब्दुल्लाच्या जमान्यात काश्मीरच्या मुख्य मंत्र्याला पंतप्रधान (Premier) म्हणत असत, नाहीं का?
अभ्यास करावा लागेल कारण परिस्थिती सारखी बदलते आहे.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"